आय टी ट्रेनिंग प्रोग्राम- माहिती हवी

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
1 May 2014 - 7:14 pm
गाभा: 

अलिकडे आय टी क्षेत्रातल्या प्रोजेक्टचे नवे लचांड अंगावर येऊन पडले आहे. माझ्या कामाचे स्वरुप पाहता मला काही प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्सेस करायचे आहेत. म्हणजे ते १-२-३ दिवसावाले, सहसा हॉटेलात, इ होणारे, सर्टीफिकेटपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व असणारे नि बर्‍यापैकी मिड लेवल किंवा अ‍ॅडवान्स. येत्या वर्षात मला किमान ५-७ कोर्सेस करावे लागतील असे वाटते. त्यांचे स्वरुप/कंटेट कसे असेल याचा माझा अंदाज मी खाली देत आहे. मी असे कोर्सेस नेटवर शोधले, पण मिळाले नाहीत. म्हणून ते कोणी घडवून आणणार्‍या कंपन्या इ माहित असतील तर सांगा. अशा कंपन्या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या (मुंबै सोडून) सांगाल तर उत्तमच!

हे कोणत्या क्षेत्रासाठी ते अगोदर सांगतो -
१. सिटी/साईट वाईड/इन बस सीसीटीवी सर्वेलन्स
२. मेट्रो, बस, ऑटो, ट्क्सी , इ इ करिता जीपीएस, व्हेकल लोकेशन,
२.२ पब्लिक इंफो बोर्ड्स , पी आय एस
३. पेमेंट सिस्टिम्स यूजिंग स्मार्तकार्ड्स इन पब्लिक ट्रान्सपोर्ट, ए एफ सी एस
४. रिवेनू कलेक्शन, इ यूजिंग हँडहॅल्ड इटीम डिव्हायसेस
५. ईंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट
६. पार्किग, वाहक परवाना, वाहन परवाना देणे
७. ऑटोमॅटिक टोल कलेक्शन
८. सीटी/प्रोजेक्ट वाईड व्हेरिएबल मेसेज
९. बीआरटी, एमाआरटी, आर आर टी
१०. रेल,बस स्तेशन्स/स्टोप्स मॉडर्नायझेशन
११. यू आय डी
१२. आय टी एम एस
तसे हे क्षेत्रे सांगण्याची गरज नाही, पण जर या क्षेत्रांशी स्पेसिफिकच ट्रेनिंग प्रोग्राम असतील तर दुधात साखर म्हणून सांगतले. शिवाय या क्षेत्रातल्या आय टी गरजा जिथे भागतात त्यापुढे जाणायची गरज नाही म्हणून.

तर आता खालील ट्रेनिंग हवे आहे.
१. डाटा सेंटर - वेरिअस सर्वर्स नीडेड नि त्यांच्या ओ एस
२. ऑपरेशन सेंटर
३. सर्वर्स, रॅक्स, टाईप अँड असोसिएटेड इंजिन;
४. स्टोरेज, सॅन
५. स्मार्तकार्ड, स्मार्ट टोकन्स, आर एफ आय डी, पेमेंट्सिस्टीम्स
६. पीसीज, स्कॅनर्श, प्रिंटर्स
७. लार्ज डि़जिटल डिस्प्लेज
८. सी सी टी वी
९. हॅंडहेल्ड टिकेटींग मशिन्स
१०. फेअर गेट्स
११. जी पी एस डीवाइस
१२. इंटरनेट कनेक्शन ऑप्शन्स
१२.१ नेटवर्किंग, रावटर्स, स्विचेस
१३. यू पी एस
१४. बेवसाईट बेस्ड अप्लिकेशन
१५. डाटा मायनिंग
१६. क्लाऊड कंप्यूटींग
१७. (लर्निंग फ्रॉम) जागतिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट्स
१८. ओन द शेल्फ सॉफ्टवेअर्स (अँटीव्हायरस, डाटाबेस, फ्रंटएंड)
१९. अ‍ॅडवान्सड सिग्नलिंग सिस्टिम्स
२०. पी आर टी
२१. ग्रीन ट्रान्स्पोर्ट
२२. कॉल सेंटर
२३. आय टी प्रोजेक्ट (रीलेटेड स्पेसिफिक इश्श्यूज, असतील तर) इन फायनान्शियल असेसमेंट
२४. आय टी प्रोडक्ट स्टँडर्ड्स
२५. टॅक्सेशन इन आय टी
२६. इंटिग्रेटेड पेमेंट सिस्टिम फॉर ऑल मोडस ऑफ ट्रान्सपोर्ट इन अ सिटी
२७. प्रोजेक्ट सायझिंग गाइडलाइन्स इन आयटी
२८. एस एल ए कॉस्टींग
२९. सी एम एम आय अँड अदर आय टी स्पेसिफिक सर्टीफिकेशन्स
३०. मॅप्स अँड जी आय एस डाटा
३१. व्हॉइस कम्यूनिकेशन सिस्टिम्स, आय व्ही आर एस
३२. व्हर्च्च्यूलायझेशन
३३. ए व्ही एल, ए एफ सी, ट्रान्सपोर्ट रेलेटेड अप्लिकेशन सॉफ्टवेर्स
३३.१ बिझनेस इंटेलिजन्स सिस्टिम, एंटरप्राईज मेनेजमेंट सिस्टिम सॉफ्टवेर
३४. लाईफ सायकल ऑफ आय टी प्रोजेक्ट
३५. आ पी आर इन आय टी.

कव्हरेजची अपेक्षा:
१. तांत्रिक - प्रोजेक्टमधे या भागाचे काम काय, त्याचे कोणकोणते कंपोनेंट असतात, या भागांचे किती प्रकारे काय काय क्लासिफिकेशन होते, भागांची नि कंपोनेंटची मुख्य स्पेसिफिकेशन्स काय काय असतात, तो भाग वापरून, टाळून इ इ कोणकोणती प्रोजेक्ट ऑप्शन्स असतात, इ इ
२. कॉमर्शियल - देशविदेशात याचे नावाजलेले ब्रँड नि सप्प्लायर कोण आहेत, यांच्या सप्लायच्या, कराराच्या खूप टिपीकल अटी काय काय असतात, कोणत्या स्पेसिफिकेशला किंमतीची काय रेंज असते, टॅक्सेस काय असतात, लाइफ सायकल काय असते, स्पेअर किती लागतात, ए एम सी कंडीशन्स काय असतात, ऑपरेटिंग कॉस्टस काय असतात, इ इ. इथे भारतातल्या कोणत्याही मेट्रोचे उदाहरण घेता येईल.

या ३५ पैकी ४-५ प्रकारचे ट्रेनिंग बाजारात असले नि त्यांचीही २५%च माहिती मिळाली तरी ही पोस्ट सार्थक होईल. इथे उद्देश केवळ ओव्हरव्ह्यू हाच आहे. मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट, किंवा प्रोग्रांमिंग, किंवा वापर यापैकी काही करणार नाही. पुस्तके सुचवली तरी चालेल, पण ट्रेनिंग प्रोग्रामला पर्याय नाही.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

1 May 2014 - 7:22 pm | यशोधरा

किती सखोल माहिती हवी आहे?

वैज्ञानिक वैगेरे माहिती नको. म्हणजे एक दोन ओळीचींच. तोच प्रोजेक्ट किती टेक्निकल काँफिगरेशन्सनी केला जाऊ शकतो इतके कळावे इतकीच वैज्ञानिक माहिती. मग प्रोजेक्ट मधे ज्या गोष्टी किंमत, उपलब्धता, मेंटेनन्स, टर्म्स, कंपॅटिबिलिटी, इ इ निकषांवर क्रिटीकल बनतील त्यांचे ते ते निकष घेऊन फोकस करायचा.

उद्या परवापरेंत व्यनी करु? काही माहिती मी देऊ शकेन.

प्रसाद१९७१'s picture

2 May 2014 - 12:25 pm | प्रसाद१९७१

तुम्ही अश्या गोष्टी आणि प्रोजेक्ट करणार्‍या व्हेंडर ना बोलवुन तुम्हाला काय पाहीजे ते सांगा. त्यांना काय पाहिजे ते प्रश्न विचारा, तुमचे फुकटात आणि बसल्या जागी ट्रेनिंग होईल. त्यांच्याशी काँट्रक्ट फायनल करे पर्यंत तुमचे ज्ञान खुप च वाढले असेल.

व्हेंडरशी मिटींग फार तर ३०-४० मिनिटांची असते. ती आमच्या कंपनीचे टेक्निकल लोक लीड करतात. व्हेंडर चा फोकस 'त्याचीच उत्पादने' आणि 'तोच प्रोजेक्ट' असा असतो. त्यातून जितके ज्ञानामृत मिळायचे ते मिळाले आहे. शिवाय तिथे "मूलभूत माहिती विचारणारा प्रश्न" उभा करणे थिल्लर दिसते.

त्याउलट एक "इंटरनेट/कनेक्टाविटी" वरचा पेड १-२ दिवसांचा ट्रेनिंग प्रोगाम घ्या.

१. तो पहिल्याने थोडक्यात ती कशी काम करते, तिचे प्रकार किती, कोणते (leaseline, broadband, wifi, bluetooth,MPLS), तिचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स काय (speed, reliability, data, compatibility, scalability,), कुठे कुठली वापरली जाते (mobile, comp, devices), तिचे एकूण आय ती प्रोजेक्त मधे कसे स्थान असते, हार्डवेर, सॉफ्टवेर कंपोनंट्स, ओ एस, त्यांची कामे, इ थोडक्यात
२. मग भारतात ग्राहकांचे प्रकार कॉर्पोरेटचे उपप्रकार), त्यांच्या गरजांचे स्पेक, त्यांच्या किंमती (Capital cost for a certain project configuration), सेवादाते, ब्रँडची तुलना, पॅकेजेस,
३. ए एम सी, ऑपरेटींग कोस्ट, सीम कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट, डेटा कॉस्ट, स्पीड कॉस्ट, नि जनरली बाजारात ही कशी निगोसिएट होतात. हेवी यूज, मोबिलिटीच्या, जागांची स्प्रेड यांचा परिणाम. टेक्सेस काय आहेत. वहन नि विम्याचे काही वेगळे रूल
४. याची लाईफ किती असते, ३-४ वर्षांनी इतरत्र वापरण्याची शक्यता, सॅल्वेज व्हॅल्यू, स्पेर किती लागतात,
५. यांचे एस एल काय असतात.
६. कोड्स नि स्टँडर्ड्स.
७. बाजारात काय प्रॅक्टीस आहेत.
८. इंटरनॅशनल प्रॅक्टीसेस
९. ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्त मधे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीडची, रिलायेबिलिटीची, स्टोरेजची गरज असते. म्हणून कोणत्याही एक प्रोजेक्ट मधे कनेक्टीव्हीटी कशी साधली गेली याची केस स्टडी.
१०. सरकारी कंप्लायंसेस. हे करू शकत नाही, इ इ

शिवाय नविन ट्रेनिंना व्हेंडरसमोर बसवता येत नाही. तरीही आपल्या युक्तिसाठी आभारी आहे.

असले ट्रेनिंग प्रोग्राम बाजारात नसणार, पण याशी बरेच साधर्म्य दाखवणारे असू शकतात. म्हणून पृच्छा.
मला ट्रेनिंग

प्रसाद१९७१'s picture

2 May 2014 - 4:24 pm | प्रसाद१९७१

आयला, तुमच्या कंपनी मधे टेक्नीकल लोक आहेत तर मग काय काळजी? त्यांच्या कडुनच शिका.

तुम्हाला काहीही करुन ट्रेनिंग ला च जायचे असेल तर गोष्ट वेगळी , पण असल्या ट्रेनिंग मधे काही फारसे शिकायला मिळत नाही. अगदीच प्राथमिक असते. ते ज्ञान कुठेही जाता येता मिळेल.

मला नेट वर मिळाले नाहीत. कंपनीत २०-२५ जणांना अशी ट्रेनिंग बाहेर द्यावी (म्हणजे नवे ज्ञान मिळेल, इ ) असा विचार आहे. माहिती असेल तर अवश्य कळवा. आगाऊचे आभार.

धर्मराजमुटके's picture

1 May 2014 - 7:46 pm | धर्मराजमुटके

विनोदी : हे सर्व याच जन्मात करायचे आहे काय ? आणी तुम्हाला एकट्यालाच करायचे आहे काय ?

गंभीर : दिल्लीतच राहून करायचे आहे काय ? तिथे उपलब्ध नसेल तर दुसरर्‍या शहरात जायला तयार आहात काय ?

मलाही अगदी हेच वाटले होते. कामाचा आवाका (आयटीच्या भाषेत स्कोप) प्रचंड मोठा आहे.

आम्ही कोडर म्हणजेच आयटी हमाल असल्यामुळे सिस्टीम्स आणि नेटवर्किंगमधील विशेष काही कळत नाही. जाणकार माहिती देतीलच. :)

बाबांनो, हे सर्व ज्ञान एकूण कामातील खूप लहान हिस्सा आहे. वेगवेगळ्या आयटमच्या किमती काढून, प्रोजेक्टचे काँफिगरेशन करून, वेगवेगळी टेक्निकल ऑप्शन्स पाहून, एकूण चित्र दाखवणारे बहुवर्षीय आर्थिक मॉडेल बनवणे नि वेगवेगळ्या संभावनांचा विचार करणे, कंपिटिशनपेक्षा जास्त चांगले निघणे, इ इ नि मग प्रोजेक्ट नि फायनान्सिंग करार करून "प्रोजेक्ट प्रोजेक्ट टिमच्या हवाली करणे" हा प्रकार आहे. बाकी क्षेत्रात आपण काय विकत घेतोय हे कळते, पण आय टी मधे जरा प्रबोधन लागते. न शिकता या गोष्तींत चूक होऊ शकते.

धर्मराजमुटके's picture

1 May 2014 - 9:36 pm | धर्मराजमुटके

व्यनी केला आहे. मी काही मदत करु शकेन.

arunjoshi123's picture

2 May 2014 - 3:25 pm | arunjoshi123

धन्यवाद

आदूबाळ's picture

1 May 2014 - 8:09 pm | आदूबाळ

असं नै विचारायचं.

असं विचारायचं:
अरूण जोशी एकच माणूस आहे का १२३ वेगवेगळी माणसं आहेत?

अरूण जोशी एकच माणूस आहे का १२३ वेगवेगळी माणसं आहेत?

अजूनही शंका? शोभते या वयात ? (ह घ्या)

मी पुण्याचा आहे, तेव्हा या निमित्ताने मला पुण्यात चकरा मारायला आवडेल. ते प्राधान्य असेल, आवश्यकता नाही. तसा प्रोग्राम जगात कुठेही असला तरी चालेल, पण मग कंटेट पाहून आमचे रिजनेबल हेड संतुष्ट झाले पाहिजेत.

दिल्लीत असले तरी आनंदच आहे. मुंबईत टाळायचे आहेत, पण तिथेच असतील तर करावे लागतील.

एकंदरीत कामाचा आवाका आणि तुमची या क्षेत्राविषयीची अनभिज्ञता पाहता हे काम एखादया कन्सल्टन्सीकडून करुन घेणे जास्त व्यवहार्य ठरेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2014 - 9:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकंदरीत कामाचा आवाका आणि तुमची या क्षेत्राविषयीची अनभिज्ञता पाहता हे काम एखादया कन्सल्टन्सीकडून करुन घेणे जास्त व्यवहार्य ठरेल.

घागा अर्धामुर्धा वाचून झाल्यावर हेच सर्वप्रथम मनात आले... यापेक्षा वेगळा प्रयोग करणे फारच धोकादायक आहे.

मात्र, कन्सल्टंटच्या विश्वासूपणाची, अनुभवाची आणि क्षमतेची खात्री करावी जे क्लायंटच्या व्यवस्थापनाच्या आवाक्यात असते.

ही सर्व तांत्रिक क्षमता आमच्या कंपनीत आहे. त्याच्यामुळे चिंतेची गरज नाही. तांत्रिक लोकांना वाणिज्यिक गोष्टींचा गंध नसतो नि वाणिज्यिक लोकांना तांत्रिक.

पण जे लोक नवे उद्योग मिळवतात, सर्व आर्थिक नि रिस्कचा अभ्यास करून कोट करतात, मग प्रोजेक्टचा करार निगोशिएट करतात, त्यांना दोघांच्या मधे उभे राहावे लागले आहे. मी यापूर्वीही इथे मॉडेल्स नि बीड्स नि करार केले आहेत (काही जिंकले देखिल), पण लोकांनी सांगावे ते काँफिगरेशन ऐकावे, सांगाव्या त्या किमती भराव्या हे रुचत नाही. पूर्वी तेल, गॅस, ऱोड्स मधे काय काय लिहिलं चाललय ते सगळं कळायचं. अर्थात तिथेही टेक्निकल टिम हीच बी ओ एम बनवायची. आम्ही छोटे छोते आक्षेप घ्यायचो.

बीड करताना नाजूक स्थिती असते. अगदी शेवटच्या वेळी एका आयटमचा / टायटलचा क्ष क्ष म्हणून गृहित धरलेला खर्च जर थोडाही वाढला, तर बीड इनकंपिटंट होते. अशात आय टी वाले (कशाची किंमत शेवटच्या क्षणी, एका छोट्या स्पेक मुळे) बरीच वर खाली करतात. मला काहीच बोलता येत नाही. आणि बर्‍याचदा त्यात चॅलेंजला स्कोप असतो. उदाहरण देतो. समजा दिल्लीत सगळ्या पार्किंग मधे लाइट लावायला १०० +- २०% रु लागतात इ मला अनुभवाने माहित आहे. नी मॉडेलही तेच सांगते. अचानक कोणी बाबा येऊन अरे कंट्रोलर २० रुचा नाही, ३५ चा आहे म्हणतो. सगळा घोळ होतो. मग आता आम्ही जिंकायची शक्यता उरतच नाही. इथे आम्हाला नि त्या तांत्रिक टिमला ट्रेनिंगची गरज आहे. ती (गरज) प्रत्येक कंपनीत असते. काही कंपन्यांतच ट्रेनिंग डिपार्टमेंट असते. आमच्याकडे नाही, नि असला मसाला जालावर दिसेना, म्हणून विचारले.

समजा मी दिलेल्या धाग्यावर १०० एकके टेक्निकल नि २०० एकके व्यापारीय ज्यान अपेक्षित आहे( फॉर ४० प्रोडक्टस नि १० सेक्टर्स) तर यातली १०-२० , १०-२० एकके कवर करणारे प्रोग्राम तरी बाजारात असणारच.

नसले तर हा धंदा जबर्‍या चालेल याची गॅरंटी.

संजय क्षीरसागर's picture

1 May 2014 - 9:46 pm | संजय क्षीरसागर

तुमचा फोर्टे असलेलं काम देणारी नवी कंपनी बघावी हे उत्तम!

+१ हेच म्हणतो. चांगल्या आयटी फर्म्स कडुन यातली सगळी कामे करुन घेता येतील. हे एकट्या दुकट्या माणसाचे काम नाही.
काही वाचनिय दुवे आत्ता देवुन ठेवतो :-
४. स्टोरेज, सॅन
Best practices for the SAN Shared Storage Option
Large SAN Design Best Practices using MDS 9710
१२.१ नेटवर्किंग, रावटर्स, स्विचेस
Midsize Business Solutions
cisco ला पर्याय नाही. याचे सीसीएनए,सीसीएनपी इं सर्टिफिकेशन आहे.
Training & Certifications
१६. क्लाऊड कंप्यूटींग
Google Cloud Platform Partner Program
Big Data as a Service
Top 5 latest trends in cloud computing
३२. व्हर्च्च्यूलायझेशन
VMware
Hyper-V
माझं मत विचाराल तर मी Hyper-V च्या जागी VMware ला पसंती देइन. मी फार थोड्या प्रमाणात VMware वर काम केलं आहे. अमेरिकेच्या एका नामांकित इन्सुरन्स कंपनीसाठी याचा वापर करुन सर्व्हर बील्ट करण्याचे काम करत असे.
बाकी तुमच्या विचारणेचा आवाका पाहता तुम्हाला ITIL माहिती सुद्धा असणे गरजेचे वाटते.

मदनबाण, दुव्यांबद्दल धन्यवाद. सावकाश वाचेन. काही वाचलेलेही आहेत.

शिवाय हा एकहाती प्रयत्न नाही. माझ्या कंपनीत बर्‍याच लोकांना असे प्रोग्राम कामाला येतील. नि माझा आजचा रोल मी उत्तमरित्या पार पाडतो. त्यात पुढे काही नवे शिकता आले तर पाहणे ( नि मला पक्की खाती आहे कि याचा आमच्या प्रोजेक्ट असेसमेंट वर परिणाम होईल.)

(हलक्याने -
ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी कि ते हलके फुलके असतात. दिवस कसा जातो ते कळत नाही.)

आत्मशून्य's picture

2 May 2014 - 12:04 am | आत्मशून्य

आपल्याला कार्यात भरगोस यश मिळावे, माझ्या शुभेच्छा आप्णासोबत आहेत.

आपली पार्श्वभूमी काय आहे ?

मी कोणतेही नविन कार्य करत नाहीय. जे चाललं आहे ते अजून जास्त समजून घेऊन करायचं आहे. माझी बाकीची पार्श्वभूमी महत्त्वाची नाही, पण २०११ पासून परिवहन क्षेत्रात दर्वर्षी १. आय टी प्रोजेक्टच्या ~ २५ २. नॉन आय टी प्रोजेक्ट ~ ३५ निविदा भरत असेन. पण १ अप्रिल २०१४ पासून (तसे तर २०१५ पासून) मला आय टी ची पण अक्कल असणे अपेक्षित करण्यात आले आहे.

आत्मशून्य's picture

3 May 2014 - 2:34 am | आत्मशून्य

माझ्या शुभेच्छा आपली सोबत करतील.

आत्मशून्य's picture

3 May 2014 - 2:48 am | आत्मशून्य

या विषयाशी संबंधित टेक मागझिंस सबस्क्राइब करा, नेट वरील साइट्स व प्रोडक्ट फ़ोरम्स वाचा

परमेश्वर कृपेने कोणत्याही कोर्सची आवश्यकता नाही.

ट्रेनिंग प्रोग्रामची गरज आहे कि नाही यावर चर्चा अपेक्षित नाही. कंपनीत अर्थातच आपण सुचवलेले उपाय चालतात. पण डिपार्टमेंटच्या १०-१५ लोकांना वाचते करणे, सवयी लावणे असंभव आहे.

आय टी कंपन्या इतके प्रोजेक्ट करतात. लोक सगळं आत जाऊनच शिकतात का? जसे बँकिग मधे क्रेडीट अप्रेजल बद्दलचे कोर्स चालतात. तसे आय टी त प्रोग्रामिंग लँग्वेज आणि नेटवर्किंग सोडून ट्रेनिंग नसतेच का?

शिवाय एच आर वाल्यांना कोणाच्या किती ट्रेनिंगा केल्या त्याचा रिपोर्ट वर्षा अखेर द्यावा लागेल. आता तरी ...

तर जी माहिती डोळ्यासमोर येइल त्याची contextual प्रिटाउट मारत चला कंपनीत तुम्ही स्वत:च एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरु कराल. कारण संबधित प्रिंटस कोणी वाचल्या क़ी नाही याची खातर जमा करता येइल. त्यावर सेशंन्स ठेवता येतील व एक कलेक्टिव इंटेलिजन्स तयार होइल.

अर्थात आपला उद्देश /उद्योग लोकांना कामाला लावणे व ते दाखवणे हां असल्याने अर्थातच आता मी आपल्या कार्याला मौलिक शुभेच्छा देऊन रजा घेतो. धन्यवाद.

तुम्हाला विल्स्न नेल्सचा जोक माहित आहे का?

आत्मशून्य's picture

3 May 2014 - 9:54 pm | आत्मशून्य

जरुर क्ळ्वावा.

पेरु's picture

2 May 2014 - 9:57 am | पेरु

pluralsight.com इथले काही कोर्सेस रिलेवंट आहे का ते बघता का?

इथे प्रदीर्घ शैक्षणिक कोर्सेस आहेत. ट्रेनिंग प्रोग्राम्स नाहीत. धन्यवाद.

हे सारं एका छत्राखाली देणारी कंपनी नसेलही, पण अनेक कंपन्या आपल्या मापाचं ट्रेनिंग शिवून देतात!
माहिती घेऊन मग व्य. नि. करतो.
आपण टोलवाल्यांसाठी काम करता असं का बरं वाटतंय?

मी अर्बन ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करतो. जालावर नको त्या विषयावर माथापच्ची करून वाटले कि हाच वेळ सदुपयोगी पण लावता येईल. आपल्यापेक्षा तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, ते घेण्यासाठीही संकेतस्थळांचा वापर केला जाऊ शकतो.

संजय क्षीरसागर's picture

3 May 2014 - 12:44 am | संजय क्षीरसागर

माथापच्ची करून वाटले कि हाच वेळ सदुपयोगी पण लावता येईल.

हे लवकर लक्षात आलं ते बरं. पण त्यासाठी संकेतस्थळाचा तो एकमेव उपयोग आहे अशी धारणा असलेले संकेतस्थळ बदलेलं बरं. उगीच अंतर्गत बलात्कार करण्यात हशील नाही.

मला आपण कोणत्या साईटबद्दल काय म्हणता हे कळले नाही, पण मी म्हटले आहे ते म्हणत वर वैवाहिक बलात्कारांचा धागा काढणे "सयुक्तिक" दिसत नाही हे मान्य.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 May 2014 - 6:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

आपली कंपनी एखादे डेटासेंटर किंवा क्लाउड तयार करायच्या विचारात आहे काय? लेखात विचारलेल्या सर्व टेक्नॉलॉजी एकत्र शिकायच्या म्हणजे आक्खा जन्म लागेल, आणि जाणकारांनी वर म्ह्टल्याप्रमाणे ते एका माण्साचे काम नाही.

कन्सल्टंसीचा पर्याय आहे पण ते काय सोल्युशन देतात ते समजुन घ्यायला पुन्हा टेक्निकल माहीती हवीच.

सरतेशेवटी ही एक आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे आणि त्याला कुठलाही कोर्स उपलब्ध नाही असे माझे मत आहे.

मला आवडलेली काही पुस्तक सुचवत आहे.
http://www.amazon.in/Demystifying-Computers-Achyut-Godbole/dp/1259028879...

http://www.amazon.in/Web-Technologies-Internet-Application-Architectures...

http://www.amazon.in/Operating-Systems-Achyut-Godbole/dp/0070702039/ref=...

http://www.amazon.in/Data-Communications-Networks-Achyut-Godbole/dp/0071...

arunjoshi123's picture

3 May 2014 - 11:33 pm | arunjoshi123

"जाणकारांनी वर म्ह्टल्याप्रमाणे ते एका माणसाचे काम नाही."

-थकलो.

आत्मशून्य's picture

7 May 2014 - 5:21 am | आत्मशून्य

सरळ जाड टाइपात टंकले असते की कंपनीच्या पैशात विवीध प्रदेशात मस्त मस्त हॉटेल मधे टाइमपास करायची संधी(अनेक वचनी) ज्यातुन ज्ञान मिळवीले असे द्रुश्यही निर्माण कसे करता येइल याद्देशने धागा टंकला आहे तर... "-थकलो." म्हणायचे वेळ आली नसती. असो.

आता थकवा गेला आहे. पुन्हा उत्तर देतो. मी इतके विषय आणि इतकी क्षेत्रे आहेत ती सिमित करून एकच विषय ठेवतो. कुणाला Electronic Ticketing Machines , Handheld Devices, इ इ ची माहिती असेल तर सांगा.

आत्मशून्यजी, मी प्रोफेशनल स्किल्ससाठी (as against soft skills) आजवर २५-२० ट्रेनिंग केल्या आहेत. त्या सगळ्या हॉटेलातच होत्या. सहसा १-२ दिवसाच्या असतील तर त्या हॉटेलात होतात. मला महिना, सहा महिन्याच्या ट्रेनिंगपासून फरक करायचा होता म्हणून मी हॉटेलमधे म्हटले. तसे मला अपरिचित लोकांमधे, एका रूम मधे, ८ तास ताटकळत बसायला आवडत नाही. जेवण देखिल बायकोच्याच हातचे आवडते. पण असा प्रोग्राम जर धारावीच्या झोपडपट्टीत जरी असेल तरी कळवायला हरकत नाही. माझा मतलब कंटेंटशी आहे, स्थानाशी नाही.

जगात खूप जास्त खोटारडे लोक पाहिल्यानंतर माणसाची मानसिकता फार निगेटीव होते. आपल्या इथल्या प्रतिसादांचा सुर पाहता आपली मानसिकता देखिल अशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मनाने हे लोक चांगलेच असतात. त्यांना जर हे कळले कि कोणी जर खरोखरीच प्रामाणिकपणे काही म्हणत आहेत तर मग मात्र ते त्या विशिष्ट माणसासाठी वागण्यात अपवाद करतात. माझ्या बाबतीत आपण करावी ही विनंती. मी पुन्हा लिहितो -
१. मला स्वतःचे पैसे द्यायला हरकत नाही.
२. प्रोग्राम झोपडीत, झाडाखाली, इ इ असला तरी हरकत नाही.
३. माझ्या ऑफिसच्या अगदी शेजारी असला तरी हरकत नाही.

हे सगळे जाड टायपात आहे असे माना. आपण केवळ आत्मशून्य आहात, भवत्शून्य, जगत्शून्य, ब्रह्मांडशून्य, सकलजनशून्य, इ इ नाही आहात. तेव्हा आम्हाला आपल्या दृष्टीने काही ना काही अर्थ असणारच. पाहू आपण आत्मनामाला कसे जागता ते.

शिवाय या विषयांसाठी मला अख्खा जन्म इ इ लागणार नाही. या सर्व गोष्टींत मला थोडीशी अगोदरच प्राप्त आहे. हे सर्व ज्ञान संकलन करणे, मार्गदर्शनाशिवाय आत्मसात करणे याचे माझ्या कंपनीला थेट आर्थिक तोटे असतील. मी एकच विषय घेऊन, त्यात संबद्ध, असंबद्ध असे बरेच काही वाचून /टाळून माझे ज्ञान बनवू शकतो. पण ते एकांगी असेल. शिवाय अति वेळखाऊ असेल. या विषयात २०-३०% तांत्रिक नि ७०-८०% वाणिज्यिक ज्ञान मला अलरडी आहे, त्यातले काही कन्फर्म करून घ्यायचे आहे, काही अप्डेट घ्यायचे आहेत. हे मॅगॅझिन, वेबसाईट वर मिळत नाही. म्हणून इथे लिहिले आहे.

माझ्या या प्रतिसादात कोणता खवचट टोन आहे असे मानू नका. तो नाही हे मी कसे सांगू? पण याउपरही आपण निराशावादी वा हेटाळणीचा प्रतिसाद दिला तर मी माझे भूमिका मांडायचे सारे कौशल्य पणाला लावून आपणांस पुढचा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन. त्यात यश नाही आले तर मी खर्‍या अर्थाने थकलो असे म्हणता येईल.

नक्कीच थकवा पुरेसा गेला नाहिये. अजुन विश्रांति घ्यावी.