विज्ञानाबद्दल माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Apr 2014 - 6:51 pm
गाभा: 

मराठी विकिपीडियावरील वि़ज्ञान हा लेख अद्ययावत करू इच्छितो आहे. खालील माहितीचे स्वागत असेल

१) वि़ज्ञान म्हणजे काय (व्याख्या) ?

* उपप्रश्न :
** वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय ? वैज्ञानिक पद्धती कशी अवलंबिली जाते ? सायंटीफीक एनक्वायरी (मराठी शब्द सुचवा) म्हणजे काय ती कशी केली जाते ?

२) वि़ज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे उद्दीष्ट/ध्येय/साध्य काय असते ?

३) विज्ञानाची अभिप्रेत कार्ये कोणती ?

४) विज्ञानाची साधने कोणती ?

५) कुतूहल, जिज्ञासा, वस्तुनिष्ठता, निरीक्षणे, विश्लेषण, पडताळणी, प्रयोग, दुजोरा, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण, तर्कसुसंगतता इत्यादींचा विज्ञानातील रोल काय/कशा पद्धतीचा असतो ?

६) विज्ञानाने आता पर्यंत काय प्रगती साध्य केली आहे ? विशेषत्वाने २१व्या शतकात ?

उपप्रश्न :

** वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे काय ? वैज्ञानिक दृष्टीकोण रुजवण्याचे मार्ग आणि आव्हाने कोणती ?
** विज्ञानात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही ? विज्ञानाच्या संदर्भाने सर्वसाधारण आढळणारे गैरसमज कोणते ? ज्या गोष्टी विज्ञानाच्या निकषावर मान्य करता येत नाहीत पण दावे केले जातात अशा दाव्यांची उदाहरणे आणि त्यातील तर्कदोष कोणते ?

* संदर्भ दुव्यांचे स्वागत असेल. नित्या प्रमाणे ह्या धाग्याचा उद्देश विकिप्रकल्पांकरता असल्यामुळे आपले या धाग्यावरील आपले स्वत:चे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

उपाशी बोका's picture

28 Apr 2014 - 12:53 am | उपाशी बोका

(प्रयत्न करतो) :)

विज्ञान म्हणजे काय?
विज्ञानाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे निसर्गातील घटना बघणे (observe), त्याबद्दल नियम शोधणे (propose a theory), घटनांबद्दल अंदाज बांधणे (computatation of consequence and prediction) आणि प्रयोगाद्वारे ते पडताळून बघणे (compare with experiment). वैज्ञानिक पद्धती म्हणजे प्रयोगाद्वारे कुठलीही थिअरी वस्तुनिष्ठ पद्धतीने (rationally) पडताळून बघता येते. वैज्ञानिक पद्धतीची गृहितके समान ठेऊन (keeping assumptions same) प्रयोग केला तर नेहमी एकसमान उत्तरच मिळते ही वैज्ञानिक पद्धतीची एक कसोटी (test) आहे.

संदर्भ: (reference)
प्रख्यात वैज्ञानिक रिचर्ड फाइनमन याचा व्हिडिओ देत आहे, तो बघावा.

चौकटराजा's picture

28 Apr 2014 - 5:04 am | चौकटराजा

" विज्ञान" म्हणजे कार्य व त्याचे कारण शोधण्याचे शास्त्र.ते माहितीचे शास्त्र नव्हे.या अर्थाने वनस्पती शास्त्र व भूगर्भ शास्त्र ही माझ्या तरी मते विज्ञ्याने नाहीत.खरे तर फिजिक्स हे एकमेव विज्ञान आहे. रसायन हे त्यातीलच कार्यकारणामुळे चालते.
बाकी गणित हे ही विज्ञान नाही . ती एक परिभाषा आहे.

माझ्या मते "स्केप्टीझम (मराठी शब्द??)व "सुधारणांचे स्वागत" ही विज्ञानाची मोठी बलस्थाने आहेत.

माहितगार's picture

30 Apr 2014 - 8:47 am | माहितगार

scepticism एका ऑनलाईन शब्द कोशा नुसार संशयी वृत्ती सरकारी पारिभाषिक शब्दकोशानुसार संशयवाद पण तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थछटेबद्दल मी साशंक आहे.

संशय आणि शंका यांचे अर्थ जवळपास सारखे असले तरी अर्थछटेत जरासा फरक आहे असे वाटते. संशयी पेक्षा "शंकेखोर पणा" असा शब्द मला स्वतःला अधिक चपखल वाटतो

आत्मशून्य's picture

30 Apr 2014 - 9:53 am | आत्मशून्य

माहितगार's picture

1 May 2014 - 7:18 am | माहितगार

शुचि ताईंनी वापरलेला इंग्रजी शब्द scepticism स्केप्टीझम शब्द बरोबरच आहे. माझ्या मते प्रस्थापीत म्हणून सांगीतल्या गेलेल्या सत्या बद्दल शंका घेणे म्हणजे स्केप्टीझम.

संशय हा शब्दाची अर्थछटा व्यक्तीच्या कृतींबद्दलची शंका अशी वाटते, म्हणून मी साशंकता व्यक्त केली.

आयुर्हित's picture

2 May 2014 - 8:47 pm | आयुर्हित

इंग्रजी शब्द scepticism स्केप्टीझम शब्दाला जवळचा आणि वापरात असलेला शब्द आहे "टीका"
टीका ही दर्शनशास्त्र समजून घ्यायला खूप उपयोगी ठरलेली आहे.