१-चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात. चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी. कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ? अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबई त कुठले ? त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ? सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ? ऑथेंटीक मेलीस्सा ऑइल कुठे मिळेल ? कसे ओळखावे ?
२-मकाऊ व लासवेगास मधील कॅसिनोमधील जुगाराची सर्वात कॉम्प्लेक्स मशीन कुठली? जुगाराचा सर्वात चॅलेंजींग गेम कुठला ? का ? कसा खेळला जातो ? त्यात मानवी क्षमतेचा रोल कितपत असतो ?
३-ब्रायडल (नववधु श्रुंगार) मेकअप चे पॅकेजेस कीती किमंती पर्यंत हायएस्ट जाउ शकतात ? त्यात नेमक्या कुठल्या सौंदर्यवृद्धी प्रक्रीयांचा स्टेप्स चा समावेश केला जातो (या मध्ये कमालीची गुप्तता पाळली जाते म्हणुन आपलं एक कुतुहल वाढल )
४-मराठी अभिनेत्रींमध्ये स्तंभलेखनाची (वा लेखनाची) परंपरा जुनी आहे का ? त्यात कोणकोण आहे? उदा. गेला बाजार स्मिता पाटील सद्य बाजार स्प्रुहा जोशी अजुन कोण आहेत? मराठी अभिनेत्रींना ललित च का लिहावेसे वाटते? काय प्रेरणा आहे या मागे ?
५-ब्रह्मकुमारी मध्ये माऊंट अबु च्या हेडक्वॉर्टर मध्ये शिवबाबा एका मोठ्या कार्यक्रमात मुख्य स्त्री च्या अंगात संचार करतात व त्यानंतर शिवबाबांचा विवाह दुसर्या ब्रह्मकुमारीं शी लावला जातो हा काय प्रकार आहे नेमका ? या मागे काय भावना आहे ? यानंतर त्या ब्रह्मकुमारीच्या जीवनात नेमके काय बदल होतात ? बह्मकुमारी ची याबाबत काय स्पष्टीकरण असतात ?
६-बाबा सेहगल , सुनिता राव ( परी हु मै), सिल्क रुट ग्रुप,(डुबा डुबा रहता हु) इला अरुण,(सरसो के खेतो मे पहला उजाला ) हे पक्षी एन्डेनजर्ड स्पेसीज म्हणुन घोषीत झालेत की यांचा डोडो झालाय ? हे कुठे आहेत ,काय करतात, दैनंदिन खर्च कसा भागवत असतील ? यांना परत कधी तरी (इंडीपॉप चा गोल्डन एज संपल्यानंतर) कधी कंठ फ़ुटला होता का ? आणि हो ते सय्योनी, हसन जहांगीर (हवा हवा )कुठे आहेत सध्या ?
हे का संपले व जे टिकले (शान-सोनु आदि) ते का टिकले ?
७-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?
८-इम्पीरीयल ब्ल्यु चा खल पुरुष (जो अनंत काळाने तसाच आहे व तसाच राहणार असे जे सुचित केले जाते )ते पुरुषाचं खर चित्र आहे कि रेमंड चा पुर्ण पुरुष हा खरा पुरुष आहे ? की तो नुसताच एक पोकळ आदर्श आहे ? कि खरा पुरुष तिसरच काही तरी मिश्रण असतं जे अजुन या दोघा जाहीरातदारांना दाखवण्यात अपयश आलेलं आहे? या संदर्भात डिओड्रंट मधील पुरुषी क्षमतांच जे चित्रण आहे ते अतिरेकी आहे की वास्तव ?
९-मे,पु,रेगें नी एक दिर्घ मुलाखत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीं जोशीं ची व मंगेश पाडगावकरांनी एक मुलाखत श्री,पु.भागवतांची घेतलेली आहे, या दोन्ही मुलाखती अत्यंत मार्मिक आहेत असा उल्लेख अनेक ठीकाणी रीपीट झालेला वाचला. या मुलाखती कोणाकडे आहेत का ? कुठल्या पुस्तकात आहेत ? कुठे उपलब्ध होतील ? नुकतीच एक मुलाखत विंदा करंदिकरांची विजया राज्याध्यक्षांनी घेतलेली वाचल्यानंतर वरील भुक नव्याने वाढली.
१०-माझे आवडते मराठीतले महान मुलाखत कार राजु परुळेकर सध्या कुठे आहेत? त्यांच काय चाललय? त्यांचा एखादा कार्यक्रम कुठल्या वाहीनीवर चालु आहे का सध्या ? त्यांनी आयडीयाज आर डेंजरस नंतर अजुन काहि लिहीलय का?
११- इनसेक्ट्स स्मगलींग मध्ये कुठल्या कीटकांच स्मगलींग सर्वात जास्त होत ? त्यांची किंमत कीती पर्यंत जाते ? यात कुठल्या विषयातील तज्ञ कीटक ओळखण्यासाठी लागतो ? भारतात यापैकी कुठले कीटक उपलब्ध आहेत ? भारतातुन कुठुन हे कीटक गोळा केले जातात ?
१२ -सुथबी, ख्रिस्तीज सारख्या लिलाव करणारया कंपन्या एखाद्या वस्तुच्या एन्टीक व्हॅल्यु ची मुल्यनिश्चीती कशी करतात ? यासाठी कुठले निकष वापरले जातात? विशेषत: चित्रांची व्हॅल्यु कशी ठरविली जाते? कुठल्या घटकांवर बोलीची मिनीमम किंमत ठरविली जाते ? म्युझियम मध्ये क्युरेटर नावाचा जो मनुष्य असतो ? तो नेमक काय काम करत असतो ? त्याच्या कामाच स्वरुप काय असत ?
१३-अक्चुरीअल हा इन्स्युरन्स क्षेत्रामध्ये काय काम करतो ? याचे कोर्सेस असतात का ? हे एक खरच ब्राइट करीअर आहे का ? सनराईज फ़िल्ड आहे का ? याच्या कामाच स्वरुप काय असत नेमकं ?
१४-हंसांविषयी जे सांगितल जात की हंसां च जोडपं हे आयुष्यभर एकत्र राहत कधीच एकमेकांना सोडत नाही दो हंसो का जोडा हे नुसतच कविकल्पना आहे की अस खरोखर असत ? हंसांमध्ये व्याभिचार नसतो का ?
१५-बोस च्या साऊंड सिस्टीम्स मध्ये घरातील होम थिएटर मध्ये घेण्यासाठी सर्वात चांगली सिस्टीम कुठली आहे ? कुठल मॉडेल आणि काय वैशिष्ट्य आहेत बोस च्या साउंड सिस्टीम्स ची ? म्हणजे कुठल्या बाबतीत हि सिस्टीम उजवी आहे नेमकी ?
१६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय ?
१७ -डेबोनेर मासिका चे जुन्यात जुने अंक कुठे मिळतील त्यातल्या मुलाखती त्यातील सेंटरस्प्रेड इतक्याच इंटरेस्टींग होत्या त्यातील मुलाखतींच कलेकशन असलेलं एखाद पुस्तक आहे का ? किंवा जुने अंक मिळण्याच मुंबईतील ठीकाण कुठल ?
१८-काळ्या मुंग्या व्यवस्थित पाळायच्या आहेत कशी माती कसे अन्न काय काय व्यवस्था करावी लागेल ? त्यांची वस्ती कशी डेव्हलप करता येईल ?
१९- रांगोळी काढतांना रेषा फ़ार जाड जाड पडतात, त्यासाठी रांगोळी पेन प्लास्टीकचा वापरुन बघितला पण जमत नाही. बारीक रेघ उमटण्यासाठी चिमुट कीतीही हळु सोडली तरी रांगोळी जास्त सांडुन रेघ जाड होते ? यावर काही उपाय आहे का ? प्रॅक्टीस कशी करावी ? की हळुहळु च जमत हे ? पोर्ट्रेट रांगोळी हा काय प्रकार असतो ?
२०- बॅलन्सशीट च्या लायबीलीटी साइड ला पहिला हेड कॅपिटल हा इथे का असतो ? ती तर प्रोप्रायटरने केलेली स्वत:ची गुंतवणुक असते. ती लायबीलीटी का म्हणुन धरली जाते ? त्यामागे काय लॉजिक असत ? स्वत:चीच गुंतवणूक ही तर आपली संपत्ती आहे मग ती लायबीलीटी साइड ला कशी येते? ( अकाउंट हा माझा विषय नाही पण हे कुतुहुल कुठलीही बॅलन्सशीट बघितली की उफ़ाळुन येत. आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ?
२१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ?
२२- राजु परुळेकरांनी एकदा त्यांनी स्वत: दिलेल्या मुलाखतीत एका कवितेचा उल्लेख केला होता ती अफ़्रिकन कविता होती इतकच माहीती आहे.(तो मुलाखतीचा व्हीडीओ नेट वर आहे) व त्यातल इतकच आठवतय. मला प्लिज कुणी ही मुळ कविता पुर्ण देइल का ? मला आठवत असलेल्या मोजक्या ओळींनी मी अजुनही भारावुन जातो. या वयातही माझ्या सरावल्या हातांना कंप सुटु लागतो. ( शब्दांची चुकभुल पुढे मागे देणे घेणे)
जगातल शेवटच झाड जेव्हा उन्मळुन पडेल
जगातल शेवटच फ़ुल जेव्हा गळुन पडेल
जगातील शेवटची नदी जेव्हा सुकुन जाइल
जगातला शेवटचा पक्षी जेव्हा गायचा थांबेल
अस काय काय येत असत आणि शेवटी अशी काहीशी ओळ येते
तेव्हा आणि तेव्हाच माणसाला या निसर्गाची या प्रुथ्वीची किंमत खरोखर कळेल.
हि कविता मला पुर्ण हवी आहे अनुवाद इंग्रजी नेटवर कुठे असेल तर हवा आहे.
यावरुन च दुसरी एक आठवते. रॉबिन्सन जेफ़र्स नावाचा कवि पृथ्वीला उद्देशुन म्हणतो.
डु नॉट वरी ऒ ब्युटिफ़ुल प्लॅनेट
ह्युमन रेस इज नॉट इम्मॉर्टल !
सहकार्यासाठी मंडळ आपले आभारी आहे!
प्रतिक्रिया
14 Nov 2014 - 10:28 am | टवाळ कार्टा
जर मिपाकरांनी मनावर घेतले तर हा लेख रोहित शर्मा सारखा रेकॉर्ड्ब्रेक करेल \m/
14 Nov 2014 - 10:50 am | आनन्दा
असहमत
रोहित शर्माला क्रॉस करायला लागणारे रॉ मटेरियल या धाग्यात आहे. जर एखाद्या तज्ज्ञाने त्यात मसाला भरला तरच हा धागा त्रिशतकी मजल मारू शकतो..
शेवटी चओकार षटकार महत्वाचे, सिन्गल्स डबल्स वर किती रन करणार?
14 Nov 2014 - 10:28 am | आयुर्हित
एवढे प्रश्न डोक्यात ठेवून, कसे काय जगतात लोकं? असा प्रश्न का नाही पडला?
14 Nov 2014 - 10:36 am | जेपी
पहिला प्रश्न वाचला आणी......
संपलो.
टक्या पम्या सगा माप यारे खांदा द्यायला
14 Nov 2014 - 11:33 am | टवाळ कार्टा
कुठे पोचवायचाय ;)
14 Nov 2014 - 10:42 am | समीरसूर
१६. कॅलिडोस्कोप
बाकी सगळ्यांचं उत्तर एकच 'माहित नाही'! ;-)
14 Nov 2014 - 11:06 am | यसवायजी
अगदी असेच म्हणतो.
@ मारवा- पुर्वी गावाकडे जत्रेत मिळायचे. आता बघावे लागेल. लहाणपणी जत्रेतच घेतलेला १ कॅलिडोस्कोप माझ्याकडे आहे.
15 Nov 2014 - 12:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
शोभादर्शक
14 Nov 2014 - 10:46 am | स्वामी संकेतानंद
१०. राजू परुळेकर सध्या फेसबुकवर असतात आणि सक्रीय असतात.
२२. राजू परुळेकरांनाच फेसबुकावर विचारा.
14 Nov 2014 - 10:48 am | स्वामी संकेतानंद
६. सिल्क रूट चा लीड गायक मोहीत चौहानचं बरं चाललंय. सध्याच्या आघाडीच्या गायकांपैकी आहे. इला अरूण पण अधेमधे दिसत असते इकडेतिकडे, अभिनय वगैरे करत असते. बाकी माहीत नाही.
14 Nov 2014 - 11:49 pm | मारवा
स्वामीजी मोहित च बर चाललय ऐकुन बर वाटल गुणी आहे हो पोरगा.
डुबा डुबा रहता हु ( पाण्यातल गाण) फार सुंदर होत गुणगुणायला नि बघायला ही
इला च सरसो के खेतो मे पहला उजाला
मार डाला मार डाला मार डाला तेरी तिरछी नजर ने मार डाला
पण जाम मजेदार गाण होत.
लय मस्त धमाल गाणी भेसळ धेडगुजरी मिक्स सहित आवडायची मात्र
ती शुभा पण काय छान होती ना थोडा वेळ या टवाळांमध्ये गायची
नंतर ते तिच एक अफाट सुंदर गाण होत फार जुन नसाव
ते एका ट्रक मध्ये चढलेल्या बायका एक आपल्या मुली बरोबर राजस्थान लाल साडित
ग्रेट ग्रेट गाणं
मन के मांझी रे
बाजे मृदंग अंग अंग
जबरदस्त लिरीक्स होते प्रसुन जोशी चे जबरदस्त आवाज मुग्दल फिरवल्यासारखा ,
शास्त्रीय संगीत आवडत मुळात म्हणुन असेल पण शुभा मुग्दल ची गाणी जास्त भिडतात मनाला
14 Nov 2014 - 10:55 am | अत्रुप्त आत्मा
आगागागागागागागा.....
पार डोस्क्याची आळंदी करुन टाकली कि वो तुम्ही! 
जाऊ द्ये ना ह्ये सगळं....निवां.......त पडा बरं कुटं तरी सावलीला!
14 Nov 2014 - 11:04 am | असंका
प्रश्न कळले. (म्हंजे असं वाटतं खरं. टायटलचा आणि लेखाचा काय संबंध असा एक प्रश्न पड्ला आहे.)
सहकार्य कसलं म्हंटा ते नाय कळ्ळं. जरा तेही सांगताल तर आभार योग्य जागी पोचतील असं वाटतं.
14 Nov 2014 - 11:07 am | मदनबाण
चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात.
उत्तर :-मोहम्मद अली रोड, नागपाडा { मी माझी बरीचशी अत्तरे माणिकलाल [इंदुर] इथुन घेतो.}
चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी.
उत्तर :-अर्थातच हुंगुन ! :P
कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ?
उत्तर :-हॅहॅहॅ... तसे बरेच आहेत. आवड अपनी अपनी ! ;)
अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबई त कुठले ?
उत्तर :-बहुतेक मस्जिद बंदर.
त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ?
उत्तर :-लव्हेंडर
सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ?
उत्तर :- मेरुकु वुड्स, म्हैसुर किंग इं मसाला अगरबत्ती आवडतात, सेंटेड डोक्यात जातात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 11:33 am | टवाळ कार्टा
=))
14 Nov 2014 - 1:48 pm | एस
सुगंधाची पारख आम्ही चित्र काढून करतो. :-)
14 Nov 2014 - 1:58 pm | सूड
ओक्के सुगंधा होय !! ;)
14 Nov 2014 - 10:08 pm | सतिश गावडे
कोण सुगंधा? आम्हाला महाभारतातील मत्स्यगंधा माहिती आहे.
17 Nov 2014 - 12:26 pm | एस
नाही माहिती? कादंबरी वाचा. न जमल्यास चित्रपट पहा. पण त्यापेक्षा कादंबरीच वाचा, ती जास्त चांगली जमलीयं.
17 Nov 2014 - 7:29 pm | सामान्यनागरिक
मुंबईत राहिल्यामुळे मच्चीका पानी असे ओरडत जाणार्या अनेक महिला पाहिल्या आहेत ब।उतेक त्यांनाच मत्स्यगंधा म्हणत असावेत. आणि तो वास एकदम नाकांत भरुन पाहिलेला आहे. हे असे ओरडने ऐकले की पटकन जिन्यावर बाजुला उभे रहातो.
15 Nov 2014 - 12:12 am | मारवा
सेंटेड खरच डोक्यात जातात
या वाक्याशी प्रचंड सहमत
लव्हेंडर च्या स्ट्रेस बस्टर क्वॉलीटी बद्दल यापुर्वी देखील असाच इनपुट मिळाला होता अजुन वापरण्याचा योग नाही आला
दिल्ली च्या एयरपोर्ट जवळ तैवानी वस्तुंचं एक दुकान आहे तिथे उत्कृष्ठ अॅरोमा ऑइल्स मिळतात अशी ताजी माहिती हाती आलेली आहे.
तिथे बघायला पाहिजे
मदनभौ धन्यवाद
( बाकि मदनाचा बाण असल्यावर इतर आयुधांची तशी फारशी गरज पडत नसेल बहुधा ) इथे १५ स्मायला वाचाव्यात
14 Nov 2014 - 11:08 am | सुनील
असावी. हंसा वाडकरांच्या 'सांगत्ये ऐका' पासून ही परंपरा सुरू झाली असावी.
14 Nov 2014 - 11:16 am | माहितगार
बाकी धागा लेखावर ओझरतीच नजर टाकली, हि शेवटची ओळ मात्र मस्त आहे त्या साठी दाद आणि उधृत करण्यासाठी धन्यवाद.
14 Nov 2014 - 12:27 pm | पैसा
सगळा लेख वाचण्यासाठी बराच वेळ लागेल. त्यामुळे तूर्तास एवढेच.
14 Nov 2014 - 12:17 pm | विजुभाऊ
मराठी अभिनेत्रीत काही काळ सोकूल या नावाचा स्तंभ सोनाली कुल्कर्णी लिहीत होत्या. सध्या सई परांजपे आणि अमृता सुभाष यांचे स्तंभ लोकसत्ता आणि मटा मधे येतात
14 Nov 2014 - 12:22 pm | विजुभाऊ
अत्तराचा गंध वेगळ्या व्यक्तीना वेगवेगळा येतो. त्याची तीव्रता कमी जास्त होते.
हे असे होण्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या त्वचेचे तापमान, स्नीग्धता आणि ओलसरता.
अत्तर पारखायचे असेल तर ते प्रथम मनगटाच्या सुरवातीला थोडे लावावे. साधारणतः एक मिनिटानंतर त्याचा अचूक गंध यायला लागतो. तीन चार वेगवेगळ्या अत्तरांचा गंध हुंगल्या नंतर नाकाचे सेन्सेशन कमी होते. त्यासाठी दोन मिनिटे थाम्बून कोरी कॉफी पावडर हुंगतात. आणि नव्याने अत्तराचा गंध घेतात. अशाने नाकाचे सेन्सेशन पुन्हा पहिल्यासारखे होते.
( अवांतरः असाच काहीसा प्रकार वाइन/दारू चे टेस्टर सुद्धा करतात. जिभेवरील ऋचिकलीका रीफ्रेश करण्यासाठी मीठ चाटतात )
15 Nov 2014 - 12:03 am | मारवा
सुगंध टेस्ट करतांना सेन्सेशन कमी होते व त्यासाठी कोरी कॉफी पावडर हि माहिती एकदम च नवी कोरी आहे.
वरील इंटरेस्टींग माहितीसाठी धन्यवाद
14 Nov 2014 - 12:23 pm | विजुभाऊ
आपल्याकडे नैसर्गीक अत्तरे करताना बहुतेकदा मिडियम म्हनून चम्दनाचे तेल वापरतात. परदेशात व्हॅनिला ऑईल वापरतात.
14 Nov 2014 - 12:48 pm | सूड
>>कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ?
याचा विचार करण्याची कधी गरज पडली नाही.
>>ब्रायडल (नववधु श्रुंगार) मेकअप चे पॅकेजेस कीती किमंती पर्यंत हायएस्ट जाउ शकतात ?
लग्न झाले असेल तर हा प्रश्न पडायची गरज नाही. नसेल तर करुन बघा, परत इथे येऊन प्रश्न विचारायची गरज पडणार नाही.
>>व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ?
आम्ही अर्धी चड्डी घालून पुणे ते कोल्हापूर, पुणे ते मुंबई/माथेरान असा प्रवास करत असतो. पायजमे वापरायची कधी गरज पडली नाही.
>>याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?
तुम्ही किती संयमी आहात त्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे.
>>माझे आवडते मराठीतले महान मुलाखत कार राजु परुळेकर सध्या कुठे आहेत?
माझा आवडता कप, आवडता शर्ट घरात कुठे ठेवलाय हे माझं मला माहित असतं. सदर मुलाखतकार तुमचे आवडते असल्याने त्याची माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे.
>>इनसेक्ट्स स्मगलींग मध्ये कुठल्या कीटकांच स्मगलींग सर्वात जास्त होत ? त्यांची किंमत कीती पर्यंत जाते ? यात कुठल्या विषयातील तज्ञ कीटक ओळखण्यासाठी लागतो ? भारतात यापैकी कुठले कीटक उपलब्ध आहेत ? भारतातुन कुठुन हे कीटक गोळा केले जातात ?
कीटक गोळा करणे, स्मगलिंग करणे किंवा विकत घेणे कसलाही अनुभव नसल्याने उत्तर माहित नाही.
>>हंसांविषयी जे सांगितल जात की हंसां च जोडपं हे आयुष्यभर एकत्र राहत कधीच एकमेकांना सोडत नाही दो हंसो का जोडा हे नुसतच कविकल्पना आहे की अस खरोखर असत ? हंसांमध्ये व्याभिचार नसतो का ?
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तेव्हा हंसाचा जन्म घ्या म्हणजे तुम्हाला कळेल किंवा मला कधी हंसाचा जन्म मिळाला आणि चुकूनमाकून भेटलातच पुन्हा तर मग मी सांगू शकेन.
>>काळ्या मुंग्या व्यवस्थित पाळायच्या आहेत कशी माती कसे अन्न काय काय व्यवस्था करावी लागेल ?
आम्ही साखर, चहा सांडतो. मुंग्या येतात, खाऊन जातात. तुम्हाला त्या 'व्यवस्थित' पाळायच्या असल्याने माहीत नाही. (स्वगतः व्यवस्थित या शब्दावरुन तुमचा बोलविता धनि कोण याची थोडी कल्पना आली आहे.)
>> रांगोळी काढतांना रेषा फ़ार जाड जाड पडतात, त्यासाठी रांगोळी पेन प्लास्टीकचा वापरुन बघितला पण जमत नाही. बारीक रेघ उमटण्यासाठी चिमुट कीतीही हळु सोडली तरी रांगोळी जास्त सांडुन रेघ जाड होते ? यावर काही उपाय आहे का ?
देवदिवाळीच्या दिवशी रांगोळी काढणार आहे, शिकवतो तुम्हाला.
>>मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ?
अनुभवशून्य असल्याने, माहित नाही.
टीपः नेहमीसारखेच त्याचा काय उपयोग करणार असे विचारुन सोडून देणार होतो. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावायच्या भीतीतून हा प्रतिसाद प्रपंच. तुमचे अजूनही प्रश्न येऊ देत.
14 Nov 2014 - 12:51 pm | वेल्लाभट
हा विषय जिव्हाळ्याचा आहे. मुहम्मद अली रोड वर अनेक दुकानं आहेत. ए ए अत्तरवाला प्रसिद्ध. गिवेन्ची, अरमानी पासून मजमूहा, फिरदौस सारख्या अनेक प्रसिद्ध सुगंधांची बेस अत्तरं मिळतात. ठाण्यात घोडबंदर रोडच्या टोकास फाउंटन हॉटेल आहे तिथे असलेल्या दुकानातही मिळतात. मी घेतो. माझी फेवरेट - डनहिल डिजायर रेड. आणि एव्हरग्रीन ब्रूट. बॉस ओरिजिनल पण खलास आहे. अचरट स्ट्राँग हवं असेल तर मॅग्नेट किंवा ५५५ ट्राय करा.
चांगला सेंट तीन पातळीत बघतात. बेस नोट, मिड नोट, टॉप नोट असं काहीसं. मला फारसं ज्ञान नाही त्यामुळे इथेच थांबतो. बाकी मंडळी सांगतीलच. माझा एक बालमित्र या क्षेत्रात आहे, तो मला मार्गदर्शन करत असतो. हा पर्फ्यूम घे तो घे. असं.
14 Nov 2014 - 12:58 pm | प्रमोद देर्देकर
१) चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात. चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी. कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ? अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबईत कुठले ? त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ? सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ? ऑथेंटीक मेलीस्सा ऑइल कुठे मिळेल ? कसे ओळखावे >>>>>>
मशिद बंदरला "A A Attarawaalaa" आहे. लई म्हणजे लईच फेमस आहे.तिथुन अत्तर घ्या.
वर बाकीच्या प्रश्नांना मदनबाणाने बाणेदारपणे उत्तर दिलेत ती बरोबरच आहेत.
अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबईतच मस्जिदबंदरला उतरल्यावर त्या ए.ए. अत्तरवाल्याच्या लाईनलाच कॉस्मेटीकचे लई मोठे दुकान आहे. मला वाटते तो एकमेव स्टोकिस्ट असावा भारतातल्या सगळ्या कं. च्या कॉस्मेटीक प्रोडॅक्टचा.
सर्वोत्तम अगरबत्ती कुठली :- अंबिका हेवन लावुन बघा सगळ्यात महाग आहे असे मला वाटते. सर्व प्रकारच्या अगरबत्ती मिळण्याचे ठिकाण म्हणजे माटुंगा पुर्व अगदी लायनीत दुकाने आहेत.
२-मकाऊ व लासवेगास मधील कॅसिनोमधील जुगाराची सर्वात कॉम्प्लेक्स मशीन कुठली? जुगाराचा सर्वात चॅलेंजींग गेम कुठला ? का ? कसा खेळला जातो ? त्यात मानवी क्षमतेचा रोल कितपत असतो ?>>>>
काहीही नाही तुम्ही कितीही चांगलं खेळा त्यावर कॅसिनोच्या मालकाने ठेवलेल्या माणसांचा हात असतो की तुम्ही ठराविकच रक्कम जिंकु शकता.
४) अभिनेत्रींमध्ये स्तंभलेखनाची (वा लेखनाची) परंपरा जुनी आहे का ? त्यात कोणकोण आहे? उदा. गेला बाजार स्मिता पाटील सद्य बाजार स्प्रुहा जोशी अजुन कोण आहेत?>>>>>
आहेत की लालन सारंगचे " जगले जशी " आहे. कांचन घाणेकार काशीनाथ घाणेकाराच्या
बायकोचे " नाथ हा माझा" काहीसे नावाचे आहे.
७) पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिवुन मिळतो?
दादरला "शहाडे आणि आठवले" मध्ये कापड मिळेल. शिंप्याला पैसे दिल्यावर कोणतही शिंपी देईल की शिवुन.
याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो? >>>> ज्याच्या त्याचा प्रश्न. जास्त व्हेंटीलेशन हवे असल्यास घालुन समुदावर फिरायला जा.
१२ -सुथबी, ख्रिस्तीज सारख्या लिलाव करणारया कंपन्या एखाद्या वस्तुच्या एन्टीक व्हॅल्यु ची मुल्यनिश्चीती कशी करतात ? यासाठी कुठले निकष वापरले जातात? विशेषत: चित्रांची व्हॅल्यु कशी ठरविली जाते>>> कॉलींग विजुभावु , चतुरंग काका
http://www.boseindia.com/home/ ला भेट द्या आणि तुम्ही स्वतःच ठरवा कोणती सिस्टिम तुम्हाला हवी आहे ती पैसा आणि सुस्पष्ट आवाज या सगळ्याच बाबतीत.
रचक्याने तुम्ही हेडफोन लावा ना कशाला शेजारच्याला फुकट ऐकवता शिवाय ध्वनी प्रदुषण होइल ते वेगळंच ( कृ. ह. घ्या.)
१६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय >>>
हो माझ्या मुलाने ४थीत असताना शाळेत प्रोजेक्ट मध्ये बनवलं होतं अजुनही त्याच्याकडे आहे. त्याला वर
येसवायजींनी सांगितल्याप्रमाणे " कॅलिडोस्कोपच" म्हणतात. तुम्हाला हवा असल्यास त्याचे सुटे भाग कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळतात. ते घरी आणुन फक्त जोडायचे. अगदिच नाही जमलं तर डीडीवरचा जुना गजरा कार्यक्रम बघुन त्यावर आपली तहान भागवा.
बाकीचे प्रश्न पास.
14 Nov 2014 - 1:00 pm | वेल्लाभट
बोस..... बोस आता (आय मीन बास आता) यापुढे काय बोलायचं.
एव्हरीथिंग इज ग्रेट अबाउट इट सर. इन्क्लूडिंग द प्राइस. चाळीस एक हजाराला २.१ सिस्टिम येते. For true audiophiles. क्रिस्टल क्लियर साउंड. हियर इट टू फील इट. सांगून कळणे नाही.
इतर पर्याय सुचवू का? यामाहा, डेनॉन, मिळाल्यास फोकल, किंवा क्लिप्श
ग्रेट आउट्पुट.
14 Nov 2014 - 1:23 pm | वेल्लाभट
हासुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणून आणखी थोडी उठाठेव करतोय.
काही दुवे देत आहे.
http://home-audio.toptenreviews.com/home-theater-speakers/
http://www.cnet.com/topics/speakers/best-speakers/home-theater/
http://www.trustedreviews.com/best-surround-sound-systems_round-up_Page-1
बघा, आणि निवड करा.
हे बोस चे दुवे. ५.१ चॅनल सिस्टिम ४८००० ला आहे.
https://www.boseindia.com/category/51-channel-home-theatre-systems1/
ही सिस्टिम बघा. https://www.boseindia.com/product/acoustimass-5-stereo-speaker-system/
14 Nov 2014 - 1:33 pm | सूड
वेल्लाकाका, लय शिरीयसली घेतलो मरे हो धागो. टायमपास म्हणान टाकलेलो धागो दिसतां रे, उत्तरां पण तशीच जायत!! ;)
14 Nov 2014 - 10:51 pm | वेल्लाभट
मी गंभीरतेन दखल घेत्ली असा. त्येका याचो उपयोग झालो म्हणजे झालं.
मालवणीची वाट लावली असेन मी तर क्षमस्व.
14 Nov 2014 - 11:54 pm | मारवा
वेल्लाभट सुंदर सुगंधी माहीती पुरवल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद,
बोस च्या व इतर सर्व उपयुक्त लिंक्स पुरवण्यासाठी आपला अत्यंत मनापासुन आभारी आहे.
या निमीत्त्ताने तुमचा नविन इंटरेस्टींग धागा वाचायला मिळाला सुगंधावरचा
अजुन काय हवे ?
15 Nov 2014 - 1:22 pm | वेल्लाभट
स्वागत आहे :)
15 Nov 2014 - 3:35 pm | वेल्लाभट
मी काहीही कर्तव्य नसतानाही स्पीकर्स, गाड्या, गॅजेट्स, नवीन पर्यटन स्थळं, रेसिपी, सेंट, एक्सरसाइज, अशा अने आवडीच्या गोष्टींचे रिव्ह्यूज नियमितपणे वाचतो. शिवाय आवाज/संगीत याची नशा आहे. त्यामुळे..... ! असो.
एन्जॉय.
14 Nov 2014 - 1:34 pm | मदनबाण
कोणाला चांगला परफ्युम ट्राय मारायचा असेल तर...

Elizabeth Arden चा Red Door Perfume पहाच... मी माझ्या बायडीला घेउन दिलेल्या गिफ्ट पैकी हे एक होत. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 1:52 pm | टवाळ कार्टा
बायडींनी वापरायच्या गोश्टी बाप्यांसाठी कशाला :P
14 Nov 2014 - 2:04 pm | मदनबाण
बायडींनी वापरायच्या गोश्टी बाप्यांसाठी कशाला
१}सुगंध हा त्याचा आनंद घेणार्या प्रत्येकासाठीच असतो... मग ती स्त्री असो वा पुरुष
२}स्त्रीया गजरा माळतात म्हणुन पुरुषांनी मोगर्याचा सुगंध घेउ नये असे थोडीच असते ?
३}मला स्वतःला हा गंध स्त्रीयांचा आणि हा गंध पुरुषांचा आहे हा फरक पटत नाही, हा एक वेळ वेगवेगळ्या गंधाला दोघांची प्रतिक्रिया वेग-वेगळी असु शकेल इतकेच...
४} इतका विचार करत बसण्या पेक्षा सुंगध अनुभवायला शिकणे अधिक योग्य ठरेल.
५}ज्यांना त्यांच्या बायडीला किंवा मैत्रीणीला { बायडींनी वापरायच्या गोश्टी बाप्यांसाठी कशाला हे गॄहीतक धरुन } द्यायच्या आहेत त्यांनाही मदत होइलच.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 2:08 pm | टवाळ कार्टा
हे बाकी खरे...
14 Nov 2014 - 2:25 pm | मदनबाण
असेच २न इथेही दिले होते... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 2:36 pm | आनन्दा
आजच्या जमान्यात तो परफ्युम पुरुषांना आवडतो (धुंद करतो-- धागालेखकाच्या भाषेत) तो स्त्रियांचा, आणि तो स्त्रियांना आवडतो, तो पुरुषांचा असे म्हटले जाते.
14 Nov 2014 - 2:41 pm | मदनबाण
आजच्या जमान्यात तो परफ्युम पुरुषांना आवडतो (धुंद करतो-- धागालेखकाच्या भाषेत) तो स्त्रियांचा, आणि तो स्त्रियांना आवडतो, तो पुरुषांचा असे म्हटले जाते.
हा.हा.हा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
14 Nov 2014 - 2:42 pm | समीरसूर
पुरुषांचा आणि स्त्रियांचा पर्फ्युम वेगळा असतो ही कंपन्यांनी केलेली मार्केटिंगची चतुराई आहे असं मी १-२ जाणकारांकडून ऐकले आहे. त्यांच्यामते बायकांचे अमुक एक प्रकारचे सुगंध आणि पुरुषांचे ढमुक एक प्रकारचे सुगंध असं काहीच नसतं. असा फरक अजिबात नाहीये. केवळ टार्गेट सेंगमेंटेशन व्यवस्थित होऊन माल जास्त खपावा म्हणून योजिलेली ही निव्वळ मार्केटिंग गिमिक आहे.
14 Nov 2014 - 2:50 pm | आनन्दा
नाही हो.. खरच सांगतो - तुम्ही टिपिकल लेडीज म्हणून असलेले परफ्युम घेऊन बघा, त्याचा वास तुम्हाला छाती भरून ठेवावासा वाटेल.. मला नुकताच नोकरीला लागलो तेव्हा हा प्रश्न देखील पडायचा, की हा वास जर मला इतका आवडतो, तर मग तो परफ्युम लेडीज कसा, त्याचे उत्तर अर्थातच नंतर कालौघात मिळाले हे वे सा न ल.
14 Nov 2014 - 3:04 pm | समीरसूर
हाहाहा...मला व्यक्तिशः तसा फरक कधी जाणवला नाही. मी दोन्ही प्रकारचे परफ्युम्स खास एवढ्यासाठीच वापरून बाहेर पडलो आहे, आणि अनेकदा लेडीज पर्फ्युम मारूनदेखील बाहेर पडलेलो आहे. एकालाही मी लेडीज पर्फ्युम मारून आलेलो आहे हे कधी कळले नाही. :-) काही काहींना पर्फ्युम मारलेला आहे हेच कळत नाही. 'आला का वास?' असे विचारले की 'कसला?' असा प्रश्न मख्ख चेहरा मख्ख ठेवून विचारतात. पर्फ्युमचा सांगीतला की 'काही सांगतो, तू अन पर्फ्युम? साला, तू आंघोळ केली तरी खूप झालं...' वरून असं ठेवून देतात. ;-)
अर्थात, वास घेताक्षणी हा लेडीजचा आणि हा जेण्ट्सचा पर्फ्युम असे ओळखण्याइतका अभ्यास लाखातून एखाद्याचा असेल. पण तुम्ही म्हणता तसे असू शकेल. तुमच्या त्या लिखाणातूनच एक मनोरम सुगंध येतोय इतकं मनापासून तुम्ही ते लिहिलंय. म्हणजे असा फरक असू शकतो हे मानावयास जागा आहे. ;-)
14 Nov 2014 - 3:26 pm | मदनबाण
पुरुषांचा आणि स्त्रियांचा पर्फ्युम वेगळा असतो ही कंपन्यांनी केलेली मार्केटिंगची चतुराई आहे असं मी १-२ जाणकारांकडून ऐकले आहे. त्यांच्यामते बायकांचे अमुक एक प्रकारचे सुगंध आणि पुरुषांचे ढमुक एक प्रकारचे सुगंध असं काहीच नसतं. असा फरक अजिबात नाहीये. केवळ टार्गेट सेंगमेंटेशन व्यवस्थित होऊन माल जास्त खपावा म्हणून योजिलेली ही निव्वळ मार्केटिंग गिमिक आहे.
हेच असाव...
बाकी आजच्या जमान्यात तो परफ्युम पुरुषांना आवडतो (धुंद करतो-- धागालेखकाच्या भाषेत) तो स्त्रियांचा, आणि तो स्त्रियांना आवडतो, तो पुरुषांचा असे म्हटले जाते.
हा तर्क जर धरला तर.. ऑन्ली फॉर मेन परफ्युम ज्याचा गंध पुरुषालाही तितकाच आवडतोय { हा गंध स्त्रीसाठी आहे} तर काय ? आणि असं असत... तर पुरुष्याच्या मागे स्त्री, स्त्रीच्या मागे पुरुष, स्त्री च्या मागे स्त्री शेवटी पुरुषाच्या मागे पुरुष अशी गंमत का दिसत नाही ? :P
अर्थात, वास घेताक्षणी हा लेडीजचा आणि हा जेण्ट्सचा पर्फ्युम असे ओळखण्याइतका अभ्यास लाखातून एखाद्याचा असेल.
अगदी ! इथे कोणाला मेंदुच्या गंध फरक ओळखण्याच्या क्षमतेची चाचणी घ्यायचीय... घ्यायचा आहे तो सुगंधाचा अनुभव आणि आनंद !
तुमच्या त्या लिखाणातूनच एक मनोरम सुगंध येतोय इतकं मनापासून तुम्ही ते लिहिलंय. म्हणजे असा फरक असू शकतो हे मानावयास जागा आहे.
काय लिवलय... त्याचा दुवा द्या की राव...
@ आनन्दा
तुमचे या बाबतीतल्या अनुभव विश्वा बद्धल जरा अजुन सांगा की....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
15 Nov 2014 - 12:00 am | मारवा
फरक नक्कीच असतो
ओळखण्यासाठी मात्र अनुभव व आवड दोन्ही लागतात हे ही तितकचं खर
मात्र फरक काहिच नसतो असे अजिबात नाही
14 Nov 2014 - 11:55 pm | मारवा
२}स्त्रीया गजरा माळतात म्हणुन पुरुषांनी मोगर्याचा सुगंध घेउ नये असे थोडीच असते ?
14 Nov 2014 - 11:56 pm | मारवा
२}स्त्रीया गजरा माळतात म्हणुन पुरुषांनी मोगर्याचा सुगंध घेउ नये असे थोडीच असते ?
14 Nov 2014 - 1:53 pm | राही
मराठीमध्ये केवळ चित्रपट किंवा नाट्यक्षेत्रातले अभिनेते/नेत्रीच नव्हेत तर या क्षेत्राशी संबंधित इतर अनेकांनी आत्मचरित्रपर लिखाण केले आहे. जुन्या काळातले वसंत शांताराम देसाई, गजानन जागिरदार, केशवराव धायबर, लीला चिटणीस, स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, वी.शांताराम(लिहवून घेतलेले), हरिभाऊ मोटे, विश्राम बेडेकर, अलीकडचे श्रीराम लागू, याव्यतिरिक्तही अनेक आहेत.
निशिगंधा वाड, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, यांनी मासिके/दैनिकांमध्ये स्तंभलेखन अथवा अतिथी संपादन केले आहे.
14 Nov 2014 - 10:02 pm | मारवा
खुपच दिर्घ परंपरा आहे हो आपल्या अभिनेत्रींची लेखनाची
सगळ्या गोगोड्ड ललित च लिहीतात मेल्या पण....
एखादि देखील उग्र विषय घेत नाही.
14 Nov 2014 - 10:14 pm | आयुर्हित
अश्विनी भावे (मनोभावे हे सदर)यांना विसरलेत काय?
14 Nov 2014 - 2:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पूर्वी दादरला रानडे रोडला लागून जी दुकाने आहेत तेथे अनेक शिंपी बसत.गिरगावात मुगभाट लेन्,भडकमकर रस्त्यावर असली दुकाने होती.पण सध्याच्या पीटर इंग्लंड्,लुइ फिलिपच्या जमान्यात हा असला अवतार करून अत्तर लावून कुठे फिरणार आहेस?(ह.घे.रे)
14 Nov 2014 - 10:06 pm | मारवा
अग मी हिप्पी होतो एकेकाळी तेव्हा करायचो
पुष्कर मध्ये पडिक असायचो अजुनहि ते धुंद दिवस आठवतात
मारवा मारिजुआना मध्ये मिसळुन जायचा
वुडस्टॉक फेस्टीवल तर असा लक्ख आठवतोय मला जसाचा तसा...
आता सुधारलोय
आता सिमेट्री आवडते गणितात रस येतो कायद्यांच हि महत्व पटु लागलय,
सिस्टीम पाहिजेच जीवनात कशी का असेना
14 Nov 2014 - 3:12 pm | माम्लेदारचा पन्खा
जे येत होतं तेही विसरलोय....
चांगलं मानधन देत असाल तर करतो तुमच्यासाठी संशोधन. ;-)
14 Nov 2014 - 3:29 pm | कपिलमुनी
अक्चुरीअल बद्दल मोग्याम्बो याम्ना विचारा
14 Nov 2014 - 4:00 pm | सिरुसेरि
हरिहरेश्वरला काही दुकानांमध्ये १२ राशींनुसार १२ वेगवेगळे पर्फ्युमस मिळतात . ज्यांचा राशींवर विश्वास आहे ते त्यानुसार किंवा सहज गंमत/बदल म्हणुन घेतात.
14 Nov 2014 - 4:00 pm | संजय क्षीरसागर
Liabilities & Assets ऐवजी Sources & Application of Funds असं (योग्य) नामकरण केल्यास उलगडा होईल.
VAT Incentive Scheme मधे, काही अविकसित क्षेत्रात इंडस्ट्रीअल डिवेलपमंटसाठी, VAT Collect करुन तो State Loan म्हणून वापरुन नंतर परत करायचा असतो. याला डिफरल म्हणतात. अशी टॅक्स लायबलिटी डिफर्ड टॅक्स म्हणून दाखवली जाते.
14 Nov 2014 - 5:27 pm | प्रसाद प्रसाद
आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ?
अकौंट बुक्समधील आणि आयकर कायद्याप्रमाणे आलेला घसाऱ्यातील फरकातून येणाऱ्या डिफर्ड टॅक्स लायबिलीटीबाबत ही हा प्रश्न कदाचित असू शकेल.
14 Nov 2014 - 6:16 pm | आदूबाळ
बॅलन्सशीट बद्दल एक पुरवणी:
अकाऊंटिंग हे "independent entity concept" ने केलं जातं. म्हणजे अकाऊंटिंग करताना व्यवसायधंदा आणि प्रोप्रायटर/प्रमोटर/पार्टनर हे वेगवेगळे व्यक्ती आहेत (independent entities) असं धरलं जातं. प्रोप्रा/प्रमोटर्/पार्टनरने एक्विटी कॅपिटल धंद्यात घातलं म्हणजे धंदा त्या प्रोप्रा/प्र/पा ला ते कधीतरी परत देणं लागतो असा त्याचा तात्त्विक अर्थ आहे. व्यवसायाच्या लिक्विडेशनच्या वेळेला अॅसेट्स विकून, बाकीची देणी भागवून उरलंसुरलं प्रो/प्र/पा ला परत दिलं जातं.
डिफर्ड टॅक्स लायाबिलिटीबद्दलः
संक्षी आणि प्रसाद यांनी DTLची दोन उदाहरणं दिली आहेत. यामागचं तत्त्व असं आहे, की अकाऊंटिंग प्रॉफिट (गॅप**नुसार काढलेलं) आणि आयकर कायद्यानुसार काढलेलं प्रॉफिट यात काही कारणांमुळे फरक असू शकतो. सहाजिकच,ती कारणं अनेक असू शकतात - टॅक्स इंसेंटिव्ज (संक्षींचं उदा.), घसारा (प्रसाद यांचं उदा.), आयकर कायद्यानुसार खर्चापेक्षा जास्त मिळणारी वजावट (उदा. रिसर्चसाठी केलेला खर्च), इ.
यातले काही फरक कायमस्वरूपी असतात (उदा. रिसर्च) तर काही तात्पुरते असतात (उदा. घसारा). मग या तात्पुरत्या फरकांवरचा टॅक्स हा "डिफर्ड टॅक्स" म्हणून वेगळा दाखवतात. डिफर्ड टॅक्स लायाब्लिटी म्हणजे या फरकांमुळे आज टॅक्स कमी भरलाय, पण तो भविष्यात भरावा लागेल. (डिफर्ड टॅक्स अॅसेट म्हणजे बरोब्बर उलट)
तर टॅक्स हा कायदेशीररीत्या डिफर वगैरे करता येत नाही##. बॅलन्सशीटमध्ये दिसणारी डिफर्ड टॅक्स लायाबिलिटी हा गॅप आणि करकायद्यांतला सेतू आहे.
------
**Generally Accepted Accounting Principles
## भारतात तरी. लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंडसारख्या देशांत मांडवली करून टॅक्स भरणं लांबणीवर टाकता येतं.
14 Nov 2014 - 9:58 pm | मारवा
आदुबाळ- आपल्या मार्मिक विसृत प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद
अकाउंट हा किती इंटरेस्टींग विषय आहे हे लक्षात येतय. मला माझा एक ग्लास टेक्नॉलॉजी विषय सोडुन दुसर काहीच येत नाही याची खंत वाटते
इंडिपेंडंट एंटीटी हि खुपच कन्विन्सींग आणि इंटरेस्टींग कन्सेप्ट वाटली
पुन्हा एकदा धन्यवाद
14 Nov 2014 - 10:36 pm | आदूबाळ
धन्यवाद!
आणि डेबोनेरच्या जुन्या अंकांसाठी फाउंटनच्या फुटपाथवरील विक्रेत्यांना विचारा.
14 Nov 2014 - 4:08 pm | झकास
http://new.arvindguptatoys.com/activity/kaleidoscope-magic/
15 Nov 2014 - 12:25 am | मारवा
साईट अतिशय सुंदर आहे अनोखी आहे
सर्वांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी
झकास धन्यवाद
17 Nov 2014 - 10:27 am | झकास
अरविंद गुप्ता ह्यांचा TED talk सुद्धा अगदी must watch.
http://www.ted.com/talks/arvind_gupta_turning_trash_into_toys_for_learning
अंधांसाठी बनवलेला drawing board आणि सगळ्यात शेवटी सांगितलेली गोष्ट एकदम अप्रतिम.
एकदा पहाच.
14 Nov 2014 - 4:14 pm | संजय क्षीरसागर
इतकी लांबण लावण्यापेक्षा,
पती-पत्नी प्रणयात, काल्पनिक पातळीवर वेगळ्या विश्वात असतात का? शारीरिक आणि मानसिक पातळीवर एकरुप असणार्यांचं प्रमाण किती? आणि वय वाढल्यावर त्या एकरुपतेमधे फरक पडतो का?
सगळ्यांच उत्तर एकच :
जे भोगायचं आहे ते प्रत्यक्षात हजर असावं लागतं हे ज्यांना शेवटपर्यंत कळू शकत नाही; त्यांना आहे ते भोगता येत नाही. आणि कल्पनेतलं भोगण्याचा प्रश्नच येत नाही!
14 Nov 2014 - 9:52 pm | मारवा
संक्षी प्रश्न थोडा नाजुक , त्यात सामाजिक संस्थळ , त्यात आपण मराठी माणसं, त्यात मी शालीन, त्यात संपादकांची करडी नजर चुकवुन
मग काहितरी सांकेतिक तर व्हाव च लागेल ना ?
अहो प्रश्न भौतिकच आहे प्रश्न कल्पनेतल्या स्वकीय-परकीय कल्पनाचित्रांसंदर्भातील आहे.
कल्पना कल्पनातीत उन्नयन गाठु शकते मात्र मग नैतिकतेचा कुट प्रश्न तेथे उपस्थित होतो
कल्पना व वास्तव वेगवेगळे असावे का नसावे
14 Nov 2014 - 11:29 pm | संजय क्षीरसागर
मूळ प्रश्न नैतिकतेचाच आहे! आणि एकदा प्रश्नाचा भुंगा निर्माण झाला की स्वास्थ्य हरवलं. स्वास्थ्य हरवलं की भोगातली मजा संपली!
कल्पना एक खेळणं म्हणून उत्तम आहे. पण इच्छा तिच्यावर स्वार झाली की संपलं!
14 Nov 2014 - 4:23 pm | संजय क्षीरसागर
मुळात रांगोळी अत्यंत बारीक दळलेली हवी. मग ती चिमटीतून सोडण्यावर रेष कमी-अधिक येण्याचं सगळं कौशल्य आहे. माझी पणजी सांगायची की एका चिमटीत, `श्रीराम जय राम जयजय राम' अशी सगळी अक्षरं आली पाहिजेत.
ते प्रत्यक्ष ऑन साइट पाहा.
14 Nov 2014 - 9:43 pm | मारवा
मी माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलेल्या सर्व प्रतिसादकांचे हार्दिक धन्यवाद मानतो.
तुमच्या उत्तरांनी मला खरोखर मोठा लाभ झाला
माझ्या ज्ञानात मौल्यवान भर पडली.
अनेक अनेक बाबी नविन माहीती झाल्या
कुतुहुल पुर्ण जरी नाही तरी अपेक्षेपेक्षा जास्त शमले.
पुन्हा एकदा सर्व उत्तरे माहिती देणारया प्रतिसादकांचे अनेक अनेक आभार !
मंडळ आपले आभारी आहे ( कन्फ्युज्ड अकौटंटा तुझ कनफ्युजन अकाउंट च्या कक्षा भेदुन जात आहे रे, मंडळ आभारी आहे ही एक दैनंदिन महाराष्ट्रीय जीवनातील गमतीची फ्रेज आहे. आगाउ व पावती फाडल्यानंतर च्या गणेश मंडळाकडुन पावती पुस्तकावर व नंतर तोंडात रुळलेले वाक्य आहे. तु यात ही कनफ्युज झालास व मला हे हि एक्सप्लेन कराव लागल याहुन मोठ मराठी माणसांच दुर्देव काय असु शकत ?)
14 Nov 2014 - 11:14 pm | कंजूस
१८चं उत्तर देईन मी हे केलं आहे. २०चं उ॰ आदुबाळने अगोदरच दिलं आहे. वैज्ञानिक आणि रसिक प्रश्न वेगवेगळे थोडेथोडे विचारलेत तर मारवाजी तज्न सूज्ञ आणि मग्न सर्वांचेच काम सोपे होईल आणि थंडीत शेकोटी न पेटवता उब मिळेल.
14 Nov 2014 - 11:38 pm | बहुगुणी
लई मोकळा वेळ आहे राव तुमच्यापाशी :-) थोडा पाठवून द्या जमलं तर!
२२: हे quotation आधी वाचलेलं होतं म्हणून पटकन सापडलं, मला माहीत आहे ते असं:
“When the last tree is cut, the last river poisoned, and the last fish dead, we will discover that we can’t eat money…”
बाकी इतिहास इथे.
15 Nov 2014 - 12:38 am | मारवा
बहुगुणी जी तुमच्याकडे खजिना दिसतोय
नेटवर निवडु चांगल काही सारखं
खुप सुंदर लिंक थोडीच वाचली निवांत वाचायची साठवुन ठेवली
पण बहुगुणी जी राजु परुळेकरांनी जी म्हणुन दाखवली होती ना ती थोडी जास्त ओळींची कविता होती बहुधा
एक उल्लेख नक्क्की आठवतो ते म्हणाले होते अफ्रिकन आहे असा
मला डाउट आहे ती वेगळी कुठली तरी अफ्रिकन ट्राइबची ( जे निसर्गाच्या सानिध्यात पिढ्यानपिढ्या राहतात व त्यामुळे जी अटॅचमेंट नॅचरल निर्माण होते अशाच कुठल्या तरी कम्युनीटीची ट्रॅडिशनल कविता वा गाण लोकगीत असाव बहुधा)
असो
मात्र तुम्ही दिलेल्या सुंदर लिंक साठी अनेक धन्यवाद !
15 Nov 2014 - 12:04 am | मुक्त विहारि
तितकेच छान प्रतिसाद.
हसते-खेळते मिपा.
15 Nov 2014 - 12:14 am | श्रीगुरुजी
>>> ७-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?
पायजम्यातून व्हेंटिलेशन होत नाही. व्हेंटिलेशनसाठी संघाच्या गणवेषातील अर्धी खाकी विजार सर्वोत्तम. ती मान्य नसेल तर (म्हणजे जातीयवादी अशी शिवी ऐकून घ्यायची नसेल तर) लुंगी, बर्म्यूडा इ. वापरा. आत काही घालणे किंवा न घालणे हे व्यक्तिगत आवडीनिवडीवर अवलंबून आहे.
>>> १६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय ?
याला शोभादर्शक किंवा कॅलिडोस्कोप म्हणतात. कोणत्याही वैज्ञानिक खेळण्यांच्या दुकानात हे घरी बनविण्याचे किट मिळते. हे किट वापरून साधारण अर्ध्या तासात शोभादर्शक घरी बनविता येतो.
>>> १७ -डेबोनेर मासिका चे जुन्यात जुने अंक कुठे मिळतील त्यातल्या मुलाखती त्यातील सेंटरस्प्रेड इतक्याच इंटरेस्टींग होत्या त्यातील मुलाखतींच कलेकशन असलेलं एखाद पुस्तक आहे का ? किंवा जुने अंक मिळण्याच मुंबईतील ठीकाण कुठल ?
फुटपाथवरील पुस्तक विक्रेत्यांकडे किंवा गुगलून पहा.
>>> २१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ?
'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' हे नाटक पहा. बर्याच शंकांची उत्तरे मिळतील.
15 Nov 2014 - 1:18 pm | प्यारे१
अर्धवटरावांची तुमच्या एका धाग्यावरची कमेण्ट आठवली.
अगदी योग्य आयडीनाव. :)
17 Nov 2014 - 4:11 pm | संदीप डांगे
खरा तो एकचि धर्म जगाला प्रश्न अर्पावे.... :-)