मला पडलेले काही गंभीर काही चिल्लर व काही किंचीत थिल्लर प्रश्न
१-चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात. चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी. कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ? अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबई त कुठले ? त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ? सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ? ऑथेंटीक मेलीस्सा ऑइल कुठे मिळेल ? कसे ओळखावे ?
२-मकाऊ व लासवेगास मधील कॅसिनोमधील जुगाराची सर्वात कॉम्प्लेक्स मशीन कुठली? जुगाराचा सर्वात चॅलेंजींग गेम कुठला ? का ? कसा खेळला जातो ? त्यात मानवी क्षमतेचा रोल कितपत असतो ?
३-ब्रायडल (नववधु श्रुंगार) मेकअप चे पॅकेजेस कीती किमंती पर्यंत हायएस्ट जाउ शकतात ? त्यात नेमक्या कुठल्या सौंदर्यवृद्धी प्रक्रीयांचा स्टेप्स चा समावेश केला जातो (या मध्ये कमालीची गुप्तता पाळली जाते म्हणुन आपलं एक कुतुहल वाढल )
४-मराठी अभिनेत्रींमध्ये स्तंभलेखनाची (वा लेखनाची) परंपरा जुनी आहे का ? त्यात कोणकोण आहे? उदा. गेला बाजार स्मिता पाटील सद्य बाजार स्प्रुहा जोशी अजुन कोण आहेत? मराठी अभिनेत्रींना ललित च का लिहावेसे वाटते? काय प्रेरणा आहे या मागे ?
५-ब्रह्मकुमारी मध्ये माऊंट अबु च्या हेडक्वॉर्टर मध्ये शिवबाबा एका मोठ्या कार्यक्रमात मुख्य स्त्री च्या अंगात संचार करतात व त्यानंतर शिवबाबांचा विवाह दुसर्या ब्रह्मकुमारीं शी लावला जातो हा काय प्रकार आहे नेमका ? या मागे काय भावना आहे ? यानंतर त्या ब्रह्मकुमारीच्या जीवनात नेमके काय बदल होतात ? बह्मकुमारी ची याबाबत काय स्पष्टीकरण असतात ?
६-बाबा सेहगल , सुनिता राव ( परी हु मै), सिल्क रुट ग्रुप,(डुबा डुबा रहता हु) इला अरुण,(सरसो के खेतो मे पहला उजाला ) हे पक्षी एन्डेनजर्ड स्पेसीज म्हणुन घोषीत झालेत की यांचा डोडो झालाय ? हे कुठे आहेत ,काय करतात, दैनंदिन खर्च कसा भागवत असतील ? यांना परत कधी तरी (इंडीपॉप चा गोल्डन एज संपल्यानंतर) कधी कंठ फ़ुटला होता का ? आणि हो ते सय्योनी, हसन जहांगीर (हवा हवा )कुठे आहेत सध्या ?
हे का संपले व जे टिकले (शान-सोनु आदि) ते का टिकले ?
७-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?
८-इम्पीरीयल ब्ल्यु चा खल पुरुष (जो अनंत काळाने तसाच आहे व तसाच राहणार असे जे सुचित केले जाते )ते पुरुषाचं खर चित्र आहे कि रेमंड चा पुर्ण पुरुष हा खरा पुरुष आहे ? की तो नुसताच एक पोकळ आदर्श आहे ? कि खरा पुरुष तिसरच काही तरी मिश्रण असतं जे अजुन या दोघा जाहीरातदारांना दाखवण्यात अपयश आलेलं आहे? या संदर्भात डिओड्रंट मधील पुरुषी क्षमतांच जे चित्रण आहे ते अतिरेकी आहे की वास्तव ?
९-मे,पु,रेगें नी एक दिर्घ मुलाखत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीं जोशीं ची व मंगेश पाडगावकरांनी एक मुलाखत श्री,पु.भागवतांची घेतलेली आहे, या दोन्ही मुलाखती अत्यंत मार्मिक आहेत असा उल्लेख अनेक ठीकाणी रीपीट झालेला वाचला. या मुलाखती कोणाकडे आहेत का ? कुठल्या पुस्तकात आहेत ? कुठे उपलब्ध होतील ? नुकतीच एक मुलाखत विंदा करंदिकरांची विजया राज्याध्यक्षांनी घेतलेली वाचल्यानंतर वरील भुक नव्याने वाढली.
१०-माझे आवडते मराठीतले महान मुलाखत कार राजु परुळेकर सध्या कुठे आहेत? त्यांच काय चाललय? त्यांचा एखादा कार्यक्रम कुठल्या वाहीनीवर चालु आहे का सध्या ? त्यांनी आयडीयाज आर डेंजरस नंतर अजुन काहि लिहीलय का?
११- इनसेक्ट्स स्मगलींग मध्ये कुठल्या कीटकांच स्मगलींग सर्वात जास्त होत ? त्यांची किंमत कीती पर्यंत जाते ? यात कुठल्या विषयातील तज्ञ कीटक ओळखण्यासाठी लागतो ? भारतात यापैकी कुठले कीटक उपलब्ध आहेत ? भारतातुन कुठुन हे कीटक गोळा केले जातात ?
१२ -सुथबी, ख्रिस्तीज सारख्या लिलाव करणारया कंपन्या एखाद्या वस्तुच्या एन्टीक व्हॅल्यु ची मुल्यनिश्चीती कशी करतात ? यासाठी कुठले निकष वापरले जातात? विशेषत: चित्रांची व्हॅल्यु कशी ठरविली जाते? कुठल्या घटकांवर बोलीची मिनीमम किंमत ठरविली जाते ? म्युझियम मध्ये क्युरेटर नावाचा जो मनुष्य असतो ? तो नेमक काय काम करत असतो ? त्याच्या कामाच स्वरुप काय असत ?
१३-अक्चुरीअल हा इन्स्युरन्स क्षेत्रामध्ये काय काम करतो ? याचे कोर्सेस असतात का ? हे एक खरच ब्राइट करीअर आहे का ? सनराईज फ़िल्ड आहे का ? याच्या कामाच स्वरुप काय असत नेमकं ?
१४-हंसांविषयी जे सांगितल जात की हंसां च जोडपं हे आयुष्यभर एकत्र राहत कधीच एकमेकांना सोडत नाही दो हंसो का जोडा हे नुसतच कविकल्पना आहे की अस खरोखर असत ? हंसांमध्ये व्याभिचार नसतो का ?
१५-बोस च्या साऊंड सिस्टीम्स मध्ये घरातील होम थिएटर मध्ये घेण्यासाठी सर्वात चांगली सिस्टीम कुठली आहे ? कुठल मॉडेल आणि काय वैशिष्ट्य आहेत बोस च्या साउंड सिस्टीम्स ची ? म्हणजे कुठल्या बाबतीत हि सिस्टीम उजवी आहे नेमकी ?
१६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय ?
१७ -डेबोनेर मासिका चे जुन्यात जुने अंक कुठे मिळतील त्यातल्या मुलाखती त्यातील सेंटरस्प्रेड इतक्याच इंटरेस्टींग होत्या त्यातील मुलाखतींच कलेकशन असलेलं एखाद पुस्तक आहे का ? किंवा जुने अंक मिळण्याच मुंबईतील ठीकाण कुठल ?
१८-काळ्या मुंग्या व्यवस्थित पाळायच्या आहेत कशी माती कसे अन्न काय काय व्यवस्था करावी लागेल ? त्यांची वस्ती कशी डेव्हलप करता येईल ?
१९- रांगोळी काढतांना रेषा फ़ार जाड जाड पडतात, त्यासाठी रांगोळी पेन प्लास्टीकचा वापरुन बघितला पण जमत नाही. बारीक रेघ उमटण्यासाठी चिमुट कीतीही हळु सोडली तरी रांगोळी जास्त सांडुन रेघ जाड होते ? यावर काही उपाय आहे का ? प्रॅक्टीस कशी करावी ? की हळुहळु च जमत हे ? पोर्ट्रेट रांगोळी हा काय प्रकार असतो ?
२०- बॅलन्सशीट च्या लायबीलीटी साइड ला पहिला हेड कॅपिटल हा इथे का असतो ? ती तर प्रोप्रायटरने केलेली स्वत:ची गुंतवणुक असते. ती लायबीलीटी का म्हणुन धरली जाते ? त्यामागे काय लॉजिक असत ? स्वत:चीच गुंतवणूक ही तर आपली संपत्ती आहे मग ती लायबीलीटी साइड ला कशी येते? ( अकाउंट हा माझा विषय नाही पण हे कुतुहुल कुठलीही बॅलन्सशीट बघितली की उफ़ाळुन येत. आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ?
२१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ?
२२- राजु परुळेकरांनी एकदा त्यांनी स्वत: दिलेल्या मुलाखतीत एका कवितेचा उल्लेख केला होता ती अफ़्रिकन कविता होती इतकच माहीती आहे.(तो मुलाखतीचा व्हीडीओ नेट वर आहे) व त्यातल इतकच आठवतय. मला प्लिज कुणी ही मुळ कविता पुर्ण देइल का ? मला आठवत असलेल्या मोजक्या ओळींनी मी अजुनही भारावुन जातो. या वयातही माझ्या सरावल्या हातांना कंप सुटु लागतो. ( शब्दांची चुकभुल पुढे मागे देणे घेणे)
जगातल शेवटच झाड जेव्हा उन्मळुन पडेल
जगातल शेवटच फ़ुल जेव्हा गळुन पडेल
जगातील शेवटची नदी जेव्हा सुकुन जाइल
जगातला शेवटचा पक्षी जेव्हा गायचा थांबेल
अस काय काय येत असत आणि शेवटी अशी काहीशी ओळ येते
तेव्हा आणि तेव्हाच माणसाला या निसर्गाची या प्रुथ्वीची किंमत खरोखर कळेल.
हि कविता मला पुर्ण हवी आहे अनुवाद इंग्रजी नेटवर कुठे असेल तर हवा आहे.
यावरुन च दुसरी एक आठवते. रॉबिन्सन जेफ़र्स नावाचा कवि पृथ्वीला उद्देशुन म्हणतो.
डु नॉट वरी ऒ ब्युटिफ़ुल प्लॅनेट
ह्युमन रेस इज नॉट इम्मॉर्टल !
सहकार्यासाठी मंडळ आपले आभारी आहे!
प्रतिक्रिया
२}स्त्रीया गजरा माळतात म्हणुन
यासाठी अॅप्लॉज
अभिनेत्यां/त्रींचे लिखाण
राही जी इतकी दिर्घ परंपरा असेल असे माहीत नव्हते
मनोभावे
पयजमे
मावश्ये काय हे आता माझ वय राहिल का ग हे करण्याच ?
डोक्यावर प्रश्नांची बादली उपडी केल्यामुळे
१३ अक्चुरीअल
परफ्युम
सध्या एका प्रश्नाचं उत्तर
आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी
बॅलन्सशीट बद्दल एक पुरवणी:
आदुबाळ आपल्या माहितीपुर्ण उत्तरासाठी धन्यवाद
धन्यवाद!
प्रश्न १६
झकास लिंक साठी भरघोस धन्यवाद
अरविंद गुप्ता ह्यांचा TED talk
एकविसावा प्रश्न भारी आहे म्हणून त्याचं उत्तर !
संक्षी प्रश्न थोडा नाजुक होता म्हणुन सांकेतीक आवरणात गुंफला
त्याचं असं आहे :
प्रश्न क्रमांक एकोणिस
सर्व जाणकार विद्वान रसिक प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !
१८चं उत्तर देईन मी हे केलं
लई मोकळा वेळ आहे राव!
बहुगुणी जी तुमच्याकडे सुंदर लिंक्स असतात हो फार
छान प्रश्र्न...
>>> ७-पट्यापट्याचा टीप्पीकल
अर्धवटरावांची तुमच्या एका
खरा तो एकचि धर्म जगाला प्रश्न
Pagination