गाभा:
काल मुलाला इन्ग्रजी चे ग्रामर शीकवत असताना त्याने मला मराठीत पन असे काही ग्रामर असते का विचारले.
मराठी व्याकरण शीकुन आता २०-२५ वर्शे लोटली आहेत. आता फार थोडे आठवते.
शाद्रुल्वीक्रीडीत, गण, यमक, अलन्कार, अनुप्रास भुजन्ग्प्रयाअस असे बरेच काही होते.
ह्या वीषयावर काहि काथ्याकूट ह्यापुर्वी मी. पा वर झाला आहे का? काही दुवा असला तर जाणकारानी शेअर करावा.
मला आठवनारी काही अपुर्न उदाहरने ....व्रुत्ते/अलन्कार
नववधु----
नववधु प्रीया मी बावरते
लाजते पुधे सरते मागे फीरते
कले मला तु प्रन सखा जरी
कले तुच आधार सुख जरी
मन्दारमाला---
सतत करीत मन्दारमाला
गुरु एक त्याचाही अन्ती वसे
प्रतिक्रिया
15 Nov 2014 - 12:32 am | धर्मराजमुटके
पालव साब ! आपने तो व्याकरणकी शिकरण कर दी ! :)
पण हरकत नाही. यानिमित्ताने माझ्या आवडीच्या विषयाला फिरुन नवीन पालवी फुटेल.
मागे मिपावर एक धागा निघाला होता खरा यासंदर्भात. कुणीतरी दुवा द्या रे प्लीज .
बाय द वे हे काही पहा. ओळखा पाहू जरा.
१.
मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि ग दोन आले |
एका पादी गणती सतरा अक्षरांचीच होते |
काढी रामा भवनदीतूनी खातसे फार गोते |
२.
गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी |
आणि मनाशीच म्हणायचा या जागेवर मी बांधीन माडी |
मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई |
भिरकावून ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई !
३.
म्हणावे तयाला भुजंगप्रयात |
क्रमानेच येती य चारी जयात |
पदी ज्याचिया अक्षरे येति बारा |
रमानायका, दु:ख माझे निवारा |
वरील सर्व उतारे स्मरणातून लिहिले आहेत. जाणकारांनी चुका दुरुस्त कराव्यात आणि एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आनंद घ्यावा ही विनंती. :)
15 Nov 2014 - 1:02 am | पालव
धर्मराजमुटके साहेब,
धन्यवाद..पहीलाच प्रयत्न होता काही लीहायचा.
पण हा वीषय त्यावेळेस़ खुप आवडायचा. आता गणपत वाणी आठ्वला.
एकदा उजळ्णी झली की आठ्वेल. १७ अक्षारान्च एक गण असे काहीतरी होते.
गण, मात्रा, व्रुत्ते, असे खुप काही होते
15 Nov 2014 - 6:51 am | जेपी
एकदा मास्तरान अलंकार इचारला.
आला नाय.
मास्तरान 14 छड्या मारत मारत समजावुन सांगितला.
व्याकरणाचा नादच सोडुन दिला.
15 Nov 2014 - 10:31 am | मिहिर
व्याकरण आणि वृत्ते ह्यांत घोळ घातलेला दिसतोय. असो.
15 Nov 2014 - 10:43 am | पिवळा डांबिस
ओ पालवशेठ, तुम्ही म्हणताय ती वृत्तं आहेत हो.
आणि तुमच्या लेकाच्या इंग्रजी व्याकरणाचं माहिती नाही पण तुम्ही इथे लिहिलेल्या धाग्यावरुन तुमचं स्वतःचं मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन अगदी गोल दिसतंय, ते आधी सुधारा!!!
आणि "मी नवीन आहे' किंवा "हा पहिलाच प्रयत्न आहे" वगैरे सबबी यावेळेस इथे चालणार नाहीत. बाकी प्रकटन ठीक आहे पण मराठी व्याकरणावर धागा काढणार्याला किमान शुद्ध मराठी हे लिहिता यायलाच हवं!!!!
(काय संपादकमंडलींनू, मी बोलतंय तां खरां का खोटां?)
:)
15 Nov 2014 - 8:00 pm | पाषाणभेद
एकदम सहमत काका.
एकदम ठरवून केलेल्या चुका धडधडीत दिसत आहेत.
लेखकमहोदय आपल्यासारख्यानी या असल्या ट्रिका आधीही केलेल्या आहेत अन मिपाकर सरावलेले आहेत.
आपण असले मराठी लिहून मराठी भाषेचा अपमान करताय असे वाटत नाही काय?
र्हस्व दीर्घ याबाबत एवढ्या ढोबळ चुका अजिबात क्षम्य नाही.
संपादक महोदय, याबाबत लेखकरावांना समज देवून त्यांच्याकडूनच चुकांची दुरूस्ती करवून घ्यावी.
15 Nov 2014 - 12:41 pm | सस्नेह
भुजन्ग्प्रयाअस ???
नका हो इतके प्रयास घेऊ *lol*
15 Nov 2014 - 1:27 pm | hitesh
भुजंगप्रयात
15 Nov 2014 - 6:15 pm | चित्रगुप्त
"शुद्ध कसे लिहावे आणि शुद्ध कसे बोलावे, हे व्याकरण शिकल्याने समजते" तस्मात वृत्ते, अलंकार, गण, यमक वगैरेंचे आधी इतके साधता आले, तरी पुष्कळ.
15 Nov 2014 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
"मी नवीन आहे' किंवा "हा पहिलाच प्रयत्न आहे" वगैरे सबबी सांगितल्या असल्या तरी अशुद्धलेखन करण्यात घेतलेले प्रचंड प्रयास स्पष्ट दिसत आहेत.
"मिपाकरांच्या हुशारीबद्दलच्या अश्या गैरसमजूतीमुळे भूतकालात अनेक जणांनी केवळ बोटेच नाही तर पूर्ण हात जाळून घेतले आहेत" हे केवळ तुमच्या प्रकृतीच्या काळजीसाठी सांगावेसे वाटते... बाकी तुमची इच्छा. अर्थात, स्वानुभवासारखा दुसरा शिक्षक नाही असे म्हणतात. :)
15 Nov 2014 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा
@लाजते पुधे =))))) सरते मागे फीरते
कले मला तु प्रन =))))) सखा जरी
===================
लेख्नात असुद्द लेकन! आं........... :-/ परत किच्चु तै ची अठवण आली! :(
15 Nov 2014 - 7:14 pm | पालव
मिपाकरांच्या हुशारीबद्दल शंका नाहीत एक्का साहेब..
पण वरील ८-१० ओळी लीहायला ४५ मि. लागली. कळत होते की चुकी चे आणी अशुद्धलेखन आहे पण खोडण्यासाठी मागे यावे तर सगळे च चुकीचे होवुन जात होते. मग परत पहील्यापासुन सुरुवात...
मी. पा. वर रोज काहीतरी वाचत होतो पण लीहीण्याचा प्रयत्न प्रथमच केला. मला वाटले मी. पा. कर समजुन घेतील असो....आता टंकलेखन सहाय्य घेवुन लीहीत आहे.
मराठी व्याकरणावर धागा काढणार्याला किमान शुद्ध मराठी हे लिहिता यायलाच हवं हे पिवळा डांबिस साहेबांचे अगदि बरोबर आहे, पण गोची झाली ती टाइप करतांना. टंकलेखन सहाय्य आता दिसले आम्हाला. हे समजुन मी. पा. करांनी माफ करावे...
धन्यवाद चुका दुरुस्त केल्याबद्दल....
15 Nov 2014 - 7:41 pm | पिवळा डांबिस
आता जमलं ना टंकलेखन सहाय्य घेऊन शुद्ध लिहायला?
अतिशय छान!
आता येऊ द्यात तुमचं लिखाण भरभरून!
स्वागत आहे!!!
15 Nov 2014 - 7:21 pm | जेपी
गमभन शिका.
15 Nov 2014 - 9:23 pm | सिरुसेरि
या वरुन आठवले ---
मना सज्जना तू कडेनेच जावे न् होऊन कोणासही दुखवावे
कुणी दुष्ट लाविल अंगासी हात तरी दाखवावा भुजंगप्रयात
15 Nov 2014 - 10:22 pm | प्यारे१
ते व्याकरणात
'स, ला, ते' 'स,ला ना,ते' ...
'ने ए शी' , 'नी ई या शी'...
त ई आ, त ई आ
प्रथमा... ते सप्तमीचे प्रत्यय वगैरे
असलं काही काही होतं एवढं आठवतंय.
15 Nov 2014 - 11:26 pm | पालव
आचार्य अत्रे ह्यांची एक कवीता होती "आजीचे घड्याळ" नावाची...ती बहुतेक शार्दुलविक्रीडीत ह्या व्रुत्तात होती असे आठवते. लग्नाच्या मंगलाष्ट्के ह्या देखील शार्दुलविक्रीडीत व्रुत्ताचे एक उदाहरण होते असे आठवते.
''आहे व्रुत्त विशाल त्यास म्हणती शार्दुलविक्रीडीत ''
वरील नववधु चे उदाहरण परत एकदा लिहीत आहे
नववधु:
नववधु प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते, मागे फीरते ||
कळे मला तु प्राण सखा जरी
कळे तुच आधार सुख जरी
मना जवळ यावया गांगरते
नववधु प्रिया मी बावरते....
गडद निळे गडद निळे आकाश आणी हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार व्रुक्षापरी हे दोन उदाहरणे कसली.. कोणाला आठ्वतात का?
16 Nov 2014 - 2:28 pm | सस्नेह
एक दिवसात टंकनातील लक्षणीय घोडदौड पाहून अतीव आश्चर्य वाटल्या गेले आहे.
अशीच प्रगती याकरणात होवो ही सदिच्छा.
16 Nov 2014 - 3:01 pm | प्यारे१
>>> अशीच प्रगती याकरणात होवो ही सदिच्छा.
याकरण असो की त्याकरण, खायला उसळ आणि शिकरण! ;) =))
19 Nov 2014 - 9:11 pm | पालव
धन्यवाद...
16 Nov 2014 - 1:29 am | खटपट्या
"याकरन" ? ह्यां काय असता ? ल्हानपनी शालंत कायतरी आयकला व्हता. मेलो मास्तरबी मालवनीच, त्यामुळे ह्यां काय ता याकरन पुस्तकातच रवला. पुस्तकातली भाषा आमी कदी बोललंव नाय. कदी दशावतारात बोललो तर.
आनी ते सुद्द्लेकन..... जावदे... वशाडी ईली... माका जमा नाय...
16 Nov 2014 - 7:28 pm | कंजूस
१)मामाची बायको सुगरण,
रोजरोज पोळी शिकरण.
२)रस्ता अजगरासारखा सुस्त पडला होता.
३)चंद्रमा आज का रुसला ?
४)बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला.
५)तुमच्या चिरंजिवांचा प्रताप!
18 Nov 2014 - 2:26 pm | सुनील
ह्या निमित्ताने एक जुनाट शंका विचारून घेतो -
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी-शिकरण
ह्या ओळींतून, मामीला तिच्या स्वयंपाकाबद्दल 'सुगरण' असे संबोधून, शाल-जोडीतील दिले गेले आहेत काय?
कारण शिकरण करण्यासाठी काही खास पाककौशल्य लागते, असे नाही!
18 Nov 2014 - 2:32 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी..
परंतु मामा अन मामी हे पारंपरिकरीत्या पाहता प्रेमळ नाते मानले गेलेय. सासू-सून, नणंद-भावजय, इ. सारखा प्रकार नाहीये त्यात. त्यामुळे शालजोडी नसावीसे वाटते.
तदुपरि- पोळी-शिकरण हे यमकासाठी असावेसे वाटते, ते सुबत्तेचे निर्देशक मानता येईल काय?
अतिअवांतरः लहानपणी शिकरण हा प्रचंड नावडता प्रकार. अजूनही आवडत नाही. उलटी दाबून दडपायची कला बाकी अवगत झालीय आता.
18 Nov 2014 - 2:57 pm | सुनील
शक्य आहे.
अगदी!!
विशेषतः मामा-मामी जर एखाद्या विशिष्ठ नगराचे (खास करून त्याच्या तिसाव्या उपनगराचे) रहिवासी असतील, तर नक्कीच! ;)
18 Nov 2014 - 9:49 pm | आदूबाळ
शालजोडीतलाच आहे.
मामा हे प्रेमाचं नातं. मामी (भावजय) आली आणि मामाच्या प्रेमाचं विभाजन झालं, याची चिडचिड अनेक आई-प्रणीत बालगीतांतून मामीला व्हिलन ठरवून व्यक्त होत असते.
उदा.
लव लव साळूबाई, मामा येतो
हाती खोबर्याची वाटी देतो
मामी येते, हिसकून घेते
हज्जार वार रेशीम सहज घेऊ शकणार्या मामाला शिकरण हा सुग्रणतेचा बेंचमार्क असणारी मामी मिळावी हा केवढा दैवदुर्विलास.
18 Nov 2014 - 10:44 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, तेबी खरंच म्हना!
18 Nov 2014 - 11:54 pm | प्यारे१
रोज रोज पोळी शिकरण नंतरच्या वाक्यात काय आहे?
चिरंजीवांसाठी युट्युबवर ऐकलेल्या गाण्यात 'गुलाबजामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊ या असं आहे'.
मामी 'बरी' असावी. :)
18 Nov 2014 - 2:33 pm | सस्नेह
पण पोळी करण्यासाठी लागते ना !
18 Nov 2014 - 10:29 pm | पिशी अबोली
ऐन वेळी आलेल्या पाहुण्यांना वाटेला लावण्यासाठी केलेली शिकरण वेगळी.. खास बेत करून केलेली शिकरण वेगळी. नारळाचा रस, वेलची वगैरे घालून केली जाते ती ही असावी असं वाटतं.. कारण 'रोज रोज पोळी' हा आता उपहास आहे. रोज पोळी म्हणजे आधी अप्रूप असावं असं जुन्या लोकांच्या गोष्टींवरून वाटतं..
19 Nov 2014 - 7:20 am | सस्नेह
अगो बाय पोळी म्हणजे पुरणपोळी !
ग्रामीण भागात पोळी आणि चपाती असे भेद आहेत
19 Nov 2014 - 7:52 am | मुक्त विहारि
हेच योग्य वाटते....
19 Nov 2014 - 4:18 pm | बॅटमॅन
यद्यपि अनेकजण विशेषतः ब्राह्मण समाजातील लोक पोळी = चपाती हे समीकरण वापरतात. अन हे पुण्यातच चालतं असं नाही.
20 Nov 2014 - 12:26 am | पिशी अबोली
+१
परफेक्ट.. हे अजिबातच लक्षात नव्हतं आलं..
18 Nov 2014 - 12:20 pm | विटेकर
वरिल ठऴक अक्षरात लिहिलेल्या शब्दांचे व्याकरण चालवायचे आहे काय ?
18 Nov 2014 - 2:17 pm | कंजूस
हा हा !उपमा उत्प्रेक्षा रुपक यमक वगैरे आहेत.
18 Nov 2014 - 9:23 pm | कंजूस
तुम्हाला सुचलेली उदाहरणे टाका हसत खेळत मिपावर व्याकरणाची उजळणी होईल.
मामा मोठा तालेवार आहे त्याला भाच्यांचे लाड करावेसे वाटताहेत. सुटिला पुण्यात मामाकडे आल्यावर चंगळ नको का ?मामीही प्रेमळपणे रोज पौष्टिक शिकरण पोळी खाऊ घालतेय. दीड महिन्याने गालाची गुलाबी सफरचंदे होतील.अतिशयोक्ति हा अलंकार हल्ली नवजोत सिध्दू वापरतो.
19 Nov 2014 - 9:09 pm | पालव
येवु देत मंड्ळी...अजुन एक उदाहरण...
मातीत ते पसरले अतीरम्य पंख
केले वरी उदर पांढुर निष्कलंक
चंचु तशीच उघडी पद लांबवले
नीष्प्राण देह पडला श्रमही नीघाले
ह्या उदाहरणात मेलेल्या पाखराचे चित्रण आहे.. बहुदा एखाद्या वस्तुचे/जागेचे हुबेहुब चित्रण केलेले असते ...कोणाची कविता आहे आता आठवत नाही.
19 Nov 2014 - 9:11 pm | धर्मराजमुटके
नीष्प्राण देह पडला श्रमही निमाले.
बाकी सुद्द्लेकन सुदारण्याचा कंटाला आलाय.