एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो. त्या जगप्रसिध्द संस्थळाचे संपादक काहीही झाले तरी पहिल्यांदा सदस्यच असतात व सद्स्यांचेच संपादक झालेले असतात. ते त्या स्वयंघोषित प्रेशिताला उत्तरे देण्यास समर्थ असतात. ते बघून इतर सदस्यांनाही चेव येतो व ते पुन्हा एकदा साद प्रतिसांदाचि नव्या जोमाने देवाणघेवाण करू लागतात. स्वयंघोषित प्रेशिताच्या प्रत्येक शब्दाचा किस पाडुन त्याची मते हाणुन पाडायला सुरवात करतात. तो स्वयंघोषित प्रेशितही चवताळुन सदस्यांवर तुटुन पडतो. आणि मग एका घनघोर शाब्दिक युद्ध सुरु होते. माघार घ्यायला कोणिच तयार नसते. या सगळ्याचा अतिरेक झाल्यावर संपादक त्या स्वयंघोषित प्रेशिताचा यथायोग्य सत्कार करतात व त्याला चपला घालुन चालु पडायला सांगतात. जाताना प्रेशित मनाशी म्हणतो "माझ्या ज्ञानाची इथे काही किम्मतच नाही. इकडल्या लोकांची माझ्याशी बोलण्याची पात्रताच नाही. या चिखलात लोळणार्या डुकरांना मी स्वच्छ कसे रहायचे हे शिकवायचा प्रयत्न करतोय आणि उलट ते सगळे कंपु करुन माझ्यावर चिखलफेक करत आहेत. केवढी ही कृतघ्नता. यांना यांच्या भ्रमातच राहुदे."
तात्पर्य
- सार्वजनिक ठिकाणी कोणी विचारला नसताना / कोणाला गरज नसताना सल्ला देणे व उगाचच जिथेतिथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे मुर्खपणाचे आहे
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
18 Sep 2015 - 1:06 pm | एस
बादवे, प्रेषिताच्या मनातलं तुम्हांला कसं कळलं?
18 Sep 2015 - 3:20 pm | विशाल कुलकर्णी
बाकी काही कळो ना साक्षात प्रेषिताच्या मनातले कळणारा सेमी प्रेषित मिपावर आहे हे कळले.अहोभाग्य...
मठ वगैरे काढणार असाल तर कळवा, ;)
18 Sep 2015 - 4:53 pm | बॅटमॅन
सेमी प्रेषित म्हणजे "से मी इज़ प्रेषित" अर्थात "मला फुले वहा" पंथी =)) =))
ह. घ्या.
18 Sep 2015 - 6:58 pm | सूड
म्हणजे मकारादि मकारान्त !! ;)
19 Sep 2015 - 11:27 am | विशाल कुलकर्णी
अरेच्च्या ही विभक्ती लक्षातच आली नव्हती ;)
18 Sep 2015 - 1:27 pm | प्यारे१
भ्रम हा एक शब्द परिचयाचा वाटला. पेरणा इस्कटली आहे. सापडत नाहीये.
18 Sep 2015 - 1:39 pm | चाणक्य
.
18 Sep 2015 - 1:37 pm | मांत्रिक
पेरणा का दिसत नाही? आता नवीन मेंब्रांना कसं कळावं बरं!
18 Sep 2015 - 1:48 pm | मांत्रिक
असो पण स्वतंत्र म्हणूनही बलवान आहे. नित्य व्यवहारातील उदाहरण.
18 Sep 2015 - 1:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
पेरणेलाच पंख लागले बहुतेक.
आता आमच्या या लेखाचे काही खरे नाही.
पैजारबुवा,
18 Sep 2015 - 1:58 pm | नाखु
मूळ वाचेपर्यंत ही (काळ)वेळ वाचकांवर यावी.
जागो जागो वाचक जागो चळवळ्या नाखु
18 Sep 2015 - 2:44 pm | बाबा योगिराज
नाय कळले...
.
कन्फ्यूज़्ड बाबा
18 Sep 2015 - 2:46 pm | आदूबाळ
ये सब क्या हय?
18 Sep 2015 - 2:54 pm | सस्नेह
हा रतिबाच्या दुधाचा खरवस आहे.
18 Sep 2015 - 2:58 pm | नाखु
सगळ्यांना खरवस वाटप होईस्तोर तरी मूळ "खव्वा का पाणी घातलेल दूध" गायब करायच नव्हतं ना?
अभामिपाजमेल्तिथेशंकामिळालेतर्चसमाधान्वाचक्संघ
18 Sep 2015 - 3:00 pm | प्यारे१
म्हशीला यावेळी पण टोणगा च का?
18 Sep 2015 - 3:03 pm | नाखु
साठी समीती नेमली असावी असा अंदाज आहे.
अंदाजपंचे नाखु
18 Sep 2015 - 3:05 pm | प्यारे१
म्हस कुनाचीय?
18 Sep 2015 - 3:10 pm | नाखु
"धन्या शेठ" ना संपर्क करणे .
मिपा नितवाचक नाखु
18 Sep 2015 - 9:20 pm | सस्नेह
गवळ्याची
18 Sep 2015 - 9:45 pm | अभ्या..
लावा रे एट्रोसिटी. ;-)
18 Sep 2015 - 9:57 pm | सस्नेह
बेशक =))
18 Sep 2015 - 10:17 pm | प्यारे१
तुम्चा काय इशय न्है.
म्हशीला म्हन्तोय त्यो. रेड्याचं नाव हाय ते लाडाचं.
18 Sep 2015 - 10:48 pm | पीके
कोण? आपला दिनू?
18 Sep 2015 - 3:01 pm | मदनबाण
काय हो हे पैजारबुवा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
18 Sep 2015 - 3:16 pm | मारवा
मज आंधळ्याला बघता येत नाही
संजय हवा होता
दाखवायला
त्याला दुरदृष्टी चे वरदान लाभलेले होते.
18 Sep 2015 - 6:46 pm | होबासराव
मि मिपा चा सदस्य होण्यापुर्वि इथे ज्ञानकण वाटत असावे. त्यामुळे फारच संक्षीप्त कळाले.
निराकार होबासराव
18 Sep 2015 - 6:48 pm | मुक्त विहारि
क्या बात है....
अद्यापही असे काही गहनविचारी, नाना प्रकारे, इतर नावाने सदस्यत्व घेवून आणि स्वतःलाच टिडियस करणारे फुल्ल बॉटल लिंबू सरबत पिवून, उगाच्च सचिनच्या आवेशात, उद्दामपणे हितोपदेश करत असतात.
18 Sep 2015 - 6:57 pm | होबासराव
खानवळितल्या सगळ्याच मेंब्राचि हजेरि घेतलि.
18 Sep 2015 - 7:36 pm | मुक्त विहारि
असो,
पैजारबुवांचा लेख वाचून,
अद्याप काही जणांची पोटे, जागो रे जागो रे, करत दादा करत आणि ताई-अक्का, असे रेकत पण असतील.
असो,
तात्पर्य काय तर-----काजवा देखील स्वयंप्रकाशित असतो, पण ही अशी गूणी बाळे, कचर्यात पडलेले अभ्रक, त्यांच्या स्वतःच्याच मुखकमलाला लावून, सोंगे आणतात.
18 Sep 2015 - 6:53 pm | द-बाहुबली
ख्यिक्क... त्यापेक्षा सरळ कट्टे करावेत असे माझं प्रामाणीक मत आहे.
18 Sep 2015 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा
त्यांना जौन आज "वर्ष" वग्रे झालं का??? ;)
एकदम श्रद्धेची अंजलीच वाहीलीये.. :D म्हून इचरायलो!
18 Sep 2015 - 8:23 pm | भैड्या
फस्क्लास जमलिये जिल्बी..!
18 Sep 2015 - 10:02 pm | प्रभाकर पेठकर
ओसामाला कसं अमेरिकेनेच वाढवला आणि अमेरिकेनेच संपविला..
18 Sep 2015 - 10:20 pm | मित्रहो
पेरणा न कळल्याने फारसे कळले नाही.
पेरणा फार जुनी वाटत नाही. हे ३२८४४ तर पेरणा ३२८४१.
18 Sep 2015 - 10:24 pm | अभ्या..
आज ओपनला काय फिगर??
18 Sep 2015 - 10:32 pm | मित्रहो
पेरणा मात्र आजच १०:३९ ते १०:५८ च्या दरम्यान
18 Sep 2015 - 10:28 pm | मारवा
आता लइ येळ झाला
मंडळी खोळंबलीत
नाव घ्या बरया बोलानं
वंदा मंदा सुनंदा कोनाच बी घ्या
पण नाव घ्याच आत्ता
आमी जीवाचा कान करुन एकतोय
उत्तरासाठी नवा धागा नका काढु फक्त
19 Sep 2015 - 10:47 am | vikramaditya
Self proclaimed genius was roasted and " barbecued " at " Mipa" nation.
May he find peace at "heaven"ly abode.
Amen.
19 Sep 2015 - 12:25 pm | असंका
नक्की काय होती म्हणे पेरणा?
19 Sep 2015 - 12:29 pm | रातराणी
संदर्भ नाही कळला पण त्यानं फारस काही बिघडलं नाही. :D