माहिती हवी - तळपते विक्रम संहारिणी

कहर's picture
कहर in जनातलं, मनातलं
30 Nov 2015 - 6:07 pm

लहानपणी (जेव्हा लोक सकाळी रेडीओ ऐकत कामे आवरत ) त्याकाळी रेडीओ वर एक गाणे लागायचे . त्याचे शब्द पूर्ण लक्षात नाहीत पण ध्रुवपद "तळपते विक्रम सौदामिनी / संहारिणी" असे काहीसे होते. अभिमन्यूच्या चक्रव्युहातील पराक्रमाचे वर्णन या गाण्यात केले होते. त्यावेळी इतके लहान होतो कि या गाण्याचे गीतकार, गायक लक्षात ठेवण्याचीही अक्कल नव्हती. पण मनाच्या गाभार्यात लुप्त झालेली चाल आणि अस्पष्ट शब्द पुन्हा ओठावर येऊ लागले " द्रोण कृप … …. शल्य जयद्रथ , दुर्योधन …. … कर्ण महारथ, तरी तयाचे कौतुक झळके द्रोणांच्या लोचनी , तळपते विक्रम सौदामिनी"

या गाण्याबद्दल कोणाला काही आठवण / माहिती असेल तर कृपया सांगा. आंतरजालावर काहीच विदा सापडत नाहीये

कविताचौकशी

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

30 Nov 2015 - 10:28 pm | जव्हेरगंज

मला पण एक गाणं हवं आहे,
त्यातलं ध्रुवपद "दिईईईल, दिईईईल (दिल) एवढच आठवतयं. बाकी संगीत क्लियरकट लक्षात आहे पण गाणं कुठं अजून भेटलं नाही. कोणाला आठवलं तर सांगा. बहुदा नव्वदीतलं गाणं आहे.
धन्यवाद.