✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रॉयल कॅफेसाठी मदत हवी.

व
विलासराव यांनी
Mon, 12/07/2015 - 23:14  ·  लेख
लेख
मला रॉयल कॅफेसाठी वॉटर फ़िल्टर \कूलर, एअर फ्रायर\माइक्रो ओवन, वेफर्स अथवा सलाद बनवन्यासाठी काय वापरावे ही माहिती हवी आहे. काय योग्य राहील. फ्रायरचे आणि ओवनचे फायदे तोटे. वॉटर फिल्टरचे पाणी खरोखर काही शारीरिक नुकसान न करणारे असते का? अशी चर्चा अपेक्षीत आहे. झालाच तर सहज सोप्या पण टेस्टी आणि नाविन्यपूर्ण स्नैक्स च्या रेसिपीज सुचवल्यात तर सोने पे सुहागा. #मिपाच्या नियमात बसत नसेल तर धागा अप्रकाशीत केला तरी चालेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
मत
माहिती
चौकशी
मदत

प्रतिक्रिया द्या
15812 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा

कवितानागेश
Tue, 12/08/2015 - 01:54 नवीन
एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा निघाला होता, स्वाती दिनेश यांचा. एकन्दरीत उपयोगी वस्तू आहे, पण वीजेचे कंजम्पशन किती होते ते बघून वापरा. तुम्हाला एखादी वस्तू हाफ फ्राय करून ठेऊन आयत्या वेळेस गरम करून द्यायची असेल तर भरतीच्या वेळेस सगळे त ळू न ठेऊन नंतर एयर फ्रायर वापरणे चालू शकेल कदाचित. प्रयोग करून बघा. पाणी शुद्ध करणारे यंत्र घ्या. पण फ़क्त युव्ही पुरे.
  • Log in or register to post comments

पाणी बोअर चे असेल तर जास्त

कवितानागेश
Tue, 12/08/2015 - 02:02 नवीन
पाणी बोअर चे असेल तर जास्त चांगला प्यूरीफायर घ्यावा लागेल.
  • Log in or register to post comments

बोअरचे पाणी असेल तर आरो-युवि

संदीप डांगे
Tue, 12/08/2015 - 02:06 नवीन
बोअरचे पाणी असेल तर आरो-युवि सगळं करणारा प्युरीफायर घ्यायला लागेल. त्यामध्ये ८० टक्के पाणी वाया जाते व २० टक्के प्यायला मिळते.
  • Log in or register to post comments

सॅलडसाठी ज्या पानांच्या

रेवती
Tue, 12/08/2015 - 03:59 नवीन
सॅलडसाठी ज्या पानांच्या भाज्या वापराल किंवा नेहमीच्या कोथिंबिरीसाठीही सॅलड स्पिनर मिळतो पण ते उपकरण घरगुती वापरासाठी आहे. एयर फ्रायरमध्ये वेळ लागेल असे वाटते. रेस्टॉरंटसाठी रेसिप्या आठवल्यास लगेच देते. पोटॅटो चिप्स हे पारंपारिक तर्‍हेने तळल्यास वेळ कमी लागेल मात्र मोठा फ्रायर घ्यावा असे वाटते जो उपहारगृहांसाठी बनवलेला असतो.
  • Log in or register to post comments

मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत

संदीप डांगे
Tue, 12/08/2015 - 04:11 नवीन
मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत ज्या हॉटेल, कॅफे, रेस्तराँ साठी इंडक्शन कुकींग रेंज देत आहेत. त्यात सगळ्या प्रकारची आकाराची इंडक्शन कुकिंग टॉप्स मिळतील. बजेट व कामाच्या व्यापानुसार निवडू शकता. ४० ते ८० टक्क्यांपर्यंत गॅसबील वाचू शकते. http://www.cooktek.com/
  • Log in or register to post comments

तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक

रेवती
Tue, 12/08/2015 - 05:17 नवीन
तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक प्रकार मेन्यूवर आहेत ते कळवल्यास वेगळे सुचवता येतील. सध्यातरी कोथिंबीर वडी व चीज कॉर्न टोस्ट सुचतायत. व्हाईट सॉसमध्ये भाज्या,चीज घालून टोस्ट करणे. चीज कॉर्न बॉल्सही सगळ्यांना आवडतात. अर्थात हे उपहारगृहासाठी किती सोयिचे ठरतील बघायला हवे.
  • Log in or register to post comments

कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 10:42 नवीन
कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो बोईसरला नाहीये, बाहेरच्या माणसांना ईथे यायचे असेल तर बोईसर स्टेशनला उतरावे लागेल. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल कारण रहदारीचा रस्ता आहे पण जर ते महागाव रोडला असेल तर क्रुष्णा विनाईलस या एका कंपनी शिवाय आणि टाटा हाउसिंग काॅलनीशिवाय तिथे काही नाही , सर्व आदीवासी पाडे आणि डोंगर आहेत. त्यामुळे कॅफे कुठे आहे ते सांगाल का ??
  • Log in or register to post comments

या भागात बहुतकरुन बटाटेवडे ,

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 10:55 नवीन
या भागात बहुतकरुन बटाटेवडे , समोसे, डोसे, चायनीज भेळ, चायनीज भजी , भेळ, पाणीपुरी , दाभेली, शेवपुरी यासारखे पदार्थ खाल्ले जातात, सॅंडविचेस ही भरपुर प्रमाणात खाल्ली जात नाहीत, जवळ्पास एकच कॉलेज आहे "थीम इंजिनियरींग" ते जवळ असेल तर सँडविचेस चालु शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ठेवल्या तर उत्तम. पाव भाजी ही गर्दी बघुन किंवा कमी प्रमाणात पाहुन ठेवु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

सर्वांना धन्यवाद.

विलासराव
Tue, 12/08/2015 - 13:11 नवीन
सर्वांना धन्यवाद. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल अगदी या रस्त्यावर नाही. पण या रोडवर जे गेट आहे त्यातून आतमधे आल्यावर साधारण ५० मीटर आहे. शनिवार रविवार मुंबईचे पब्लिक येते. साधारणपने पराठे,इडली ,पोहे,पूरी भाजी, भजी, मिसळ पाव, भेळ, वडापाव आणि सैंडविच हे चालते. त्यात पाहिले चार जास्त. थिम् कॉलेजची काही मुले टाटामधे रहातात, २ टीचर पण आहेत. ते येतात. पण कॉलेज ५ ते ६ मी. अंतरावर आहे. आता बाहेर मेनरोडवर फलक लावतो. वॉटर प्यूरीफायर ,फ्रायर कोणत्या कंपनीचा चांगला? त्यात काय काय करता येऊ शकते? किम्मत? अशी माहिती मिळाली तर बारे होईल. पावभाजी आणि तवापुलाव चालेल असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि

विलासराव
Tue, 12/08/2015 - 13:13 नवीन
कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

बिर्यानी ही चालेल आणि चिकनचे

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 13:59 नवीन
बिर्यानी ही चालेल आणि चिकनचे पदार्थ दणकुन चालतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 14:36 नवीन
आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु शकतील, चायनीज सुप चालु शकतील. चिकन भुजीन्ग भरपुर चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

पाककॄतींतलं जास्त काही माहित

नाव आडनाव
Wed, 12/09/2015 - 21:35 नवीन
पाककॄतींतलं जास्त काही माहित नाही, पण एकदा घरी पोह्यात कांद्याएवजी कोबी टाकला होता. मला लई आवडले होते पोहे. ट्राय करून बघा एकदा. आवडले तर असाही एक ऑप्शन होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

त्या भागात समोसा-पाव फार

कंजूस
Tue, 12/08/2015 - 13:43 नवीन
त्या भागात समोसा-पाव फार चालतो ना? सूरण-बटाटा घालून व्हेज कटलेट्स पाव ट्राइ करा. आलू पालक,पनीर पालक ( अमूल मारके )करायला सोपे आहे. उसळ पाव,भजी-पाव. झीरो-B चे पाणी देता येईल.
  • Log in or register to post comments

रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे

पिलीयन रायडर
Tue, 12/08/2015 - 14:00 नवीन
रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे आहे का? जनरली हे पदार्थ पटकन होत असावेत:- बॉइल्ड एग्स, ऑम्लेट-पाव, मॅगी, सॅण्डविच तयार करुन ठेवण्यासारखे पदार्थ :- मिसळ , पोहे , उपमा , वडे ऑन द स्पॉट बनवता येतील असे पदार्थः- भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी टाईप चाट पॅक्ड पदार्थः- लेझ / कुरकुरे , सॉफ्ट ड्रिंक्स , चिक्की, चणे / फुटाणे / शेंगदाणे इ. हटके पदार्थः- पणिनी / पनिनी , पास्ता , कोल्ड कॉफी (दुर्गा किंवा तत्सम), नाचोज + साल्सा डिप वरुन मेल्ट्ड चीझ, कप पिझ्झा, जलजिरा टाईप सोडा
  • Log in or register to post comments

भुजिंग लिहायलाच आलो होतो पण

गवि
Tue, 12/08/2015 - 14:39 नवीन
भुजिंग लिहायलाच आलो होतो पण वर अन्यत्र ते सुचवलेलं दिसत आहे. मज्जा म्हणून रॉयल कॅफेवर कट्टा "न्यावा" की काय असा शिरेस विचार आला. पण खरोखर चार्जेबल बेसिसवर होणार असेल तरच. नाहीतर मिपाकर म्हणून फुकटेपणा करण्यात मजा नाही.
  • Log in or register to post comments

+१

शलभ
Tue, 12/08/2015 - 14:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कॅफेच्या दुसर्‍या बाजुच्या

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 14:51 नवीन
कॅफेच्या दुसर्‍या बाजुच्या रस्त्याने आत गेल्यास छोटे डोंगर अन टेकडया आहेत, नदी आहे, परीसर अगदी शांत आहे. आदीवासी वस्ती, शेते , पाट असं पाहायला मिळेल , ट्रेकींग करु शकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लहानपणी या टेकड्यांवर आणि

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 14:54 नवीन
लहानपणी या टेकड्यांवर आणि डोंगरांवर गेलेय मी , आजो़ळ आहे माझे ते. तिथे अरुणा ईराणीचे फार्म हाउसही आहे, लहानपणी तिथे कलिंगड खायला जायचो आम्ही. पण हे सगळे टाटा हाउसिंगच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे कॅफेच्या कॉलनीच्या उजव्या बाजुला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

परिसराची खूप माहिती आणि

गवि
Tue, 12/08/2015 - 15:06 नवीन
परिसराची खूप माहिती आणि जवळीकही दिसते आहे. भारतात असाल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत कट्टा ठरवावा मिपाकरांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 15:19 नवीन
भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही सतत भटकंती करत असल्याने उपस्थितीचं सांगु शकत नाही पण माहीती देउ शकेन. हा कॅफे बोईसरपासुन ३-४ कीमी अंतरावर आहे, येणार असाल तर बाय रोड किंवा बाय ट्रेन ने कसे यायचे सांगु शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद.

विलासराव
Tue, 12/08/2015 - 16:06 नवीन
सांगायचे राहिलेच. रॉयल कॅफे प्यूअर व्हेज आहे. नॉनव्हेज भरपूर चालेल पण मला त्यात रस नाही. @ पिलियन रायडर: होय मी चालु केलाय रॉयल कॅफे. @गवी: कधीही कट्टा करा. पण व्हेज. आणि मुक्कामी कटटा केला तरी चालेल. आपला फ्लॅट रिकामाच हाय.
  • Log in or register to post comments

गुजराती पण झणझणीत !

इरसाल
Tue, 12/08/2015 - 16:20 नवीन
गुजराती पण झणझणीत अशी "शेव उसळ" म्हणुन एक डीश आहे चालेल पण खुप.
  • Log in or register to post comments

येस. गुजराती पब्लिक येते

विलासराव
Tue, 12/08/2015 - 16:49 नवीन
येस. गुजराती पब्लिक येते विकेंडला. रेसिपी मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मग खमण ढोकळा अन ठेपले ही ठेउ

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 16:52 नवीन
मग खमण ढोकळा अन ठेपले ही ठेउ शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

येस. पण ठेपल्यापेक्षा आपली

विलासराव
Tue, 12/08/2015 - 16:58 नवीन
येस. पण ठेपल्यापेक्षा आपली थालीपीठ ठेवावे ऐसा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

हमम्म ट्राय करायला हरकत नाही

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 17:02 नवीन
हमम्म ट्राय करायला हरकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा.

अभ्या..
Tue, 12/08/2015 - 18:37 नवीन
थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा. आमच्या इथे बृयाच हॉटेलात डिश मिळते. दोन धपाटी, दही, शेंगाचटनी आणि थॉडासा मिरच्याचा ठेचा. स्नॅक्स म्हणून पण चालतो अन जेवण म्हणून पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच

विलासराव
Tue, 12/08/2015 - 22:48 नवीन
रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच धापाटे खायला घालतो. लवकर बनवा बॅनर. बॅनर पाहूनच कॅफेला गर्दी केलि पाहिजे लोकांनी असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरे वा, हे छान आहे व्हेज आहे

स्रुजा
Tue, 12/08/2015 - 23:35 नवीन
अरे वा, हे छान आहे व्हेज आहे ते ! साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, इडली, दावणगिरी डोसा, कोथिंबीर वडी, अळु वडी, थालिपीठ, शेव भाजी, मोठ्या उपासांना म्हणजे कार्तिकी , आषाढी एकादशीला वगैरे ऑर्डर घेऊन भगर आमटी वगैरे पण ठेवु शकता. शिवाय ठेपले, पराठे, वेग वेगळे ज्युसेस, भाजी भाकरी, पिठलं भाकरी, तांदळाची भाकरी आणि वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे प्रकारांवर उड्या पडतात. व्हेज कटलेट्स, उपासाची कचोरी हे प्रकार देखील नेहमी ठेवता येतील. मिसळ, बटाटावडा यांचा उल्लेख आलाच आहे. हेल्दी मिसळ पण ठेवु शकता. उपासाची मिसळ पण लोकप्रिय आहे. अजुन ही सुचतं तसं सांगेन. कवि, एकदा खरंच जाऊयात आणि मी तुला घेऊन जाणार च. त्यात मदत करते वगैरे चालणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 23:43 नवीन
ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ लोक घरी करतात त्यामुळे त्याची शचक्यता कमी, उपवासाची भगर आमटी वैगरे ईथला लोकल पदार्थ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात

स्रुजा
Tue, 12/08/2015 - 23:50 नवीन
अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात म्हणतात ना ते. त्यांना उपासाला येता येईल. शिवाय काही कर्मचारी जे घरी राहत नाहीत वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

मी काही म्हणतीये कारण माझा

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 23:56 नवीन
मी काही म्हणतीये कारण माझा जन्मच बोईसरचा आहे, मला ईथला एरीया माहीतीये, ही जागा ईस्टलाआहे अन एम आय डी सी एरीया बर्‍याच लाम्ब वेस्टला जिथे मी राहते, ईस्टला जायला जास्त वाहने नाहीत, स्वत:चे वाहन असेल तरच जाणे सोयीचे पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ओके , आलं लक्षात.

स्रुजा
Wed, 12/09/2015 - 00:01 नवीन
ओके , आलं लक्षात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे

कविता१९७८
Wed, 12/09/2015 - 00:05 नवीन
आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे उपवास करतात गं, मी सांगतीये कारण ईथे बरेचजण खुप खर्च करुन काही सुरु करतात पण कालांतराने त्यांना पब्लिक नुसार बदल करावे लागतात. हा अनुभव आहे. ईथे कामगार वर्ग जास्त राहतो, नाॅनवेजचे प्रमाण जास्त या सर्व गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात कारण खाण्याच्या पदार्थांचे शेल्फ लाईफ खुप कमी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

एक आठवण

श्रीरंग_जोशी
Wed, 12/09/2015 - 00:21 नवीन
एमसीए करत असताना आमच्या होस्टेलच्या मेसच्या जेवणाच्या चवीला कंटाळून मी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शनिवारचा उपास करणे सुरू केले. दुपारच्या जेवणात छान ताट भरून साबुदाणा खिचडी व वाटीभर दही मिळत असे. चवही एकदम चांगली असायची. योगायोगाने त्या सेमिस्टरमध्ये माझा दुसर्‍या सेमिस्टर पासून बॅक असणारा प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हा पेपर क्लिअर झाला. त्यावर माझ्या ज्युनियर मंडळींनी, मी शनिवारचा उपास धरल्यानेच तो पेपर निघाला अशी आवई उठवून अनेकांना शनिवारचा उपास धरण्यास प्रवृत्त केले. उपासाचे पदार्थ चविबाबतीत आकर्षक असल्याने उपास न करणारेही आनंदाने खातात. भविष्यात अमेरिकेत मराठी फास्ट फूड उपहारगृह सुरू करून साबुदाणा वडा या पदार्थाचा ब्रॅन्ड बनवावा असे स्वप्न आहे. विलासरावांना रॉयल कॅफेच्या पुरर्रचनेसाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड

अभ्या..
Wed, 12/09/2015 - 00:25 नवीन
प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हे टायपणारा माणूस पुनर्रचना टायपू शकत नाही??? ह्या कैतरीच कै ;) हल्केच घे हो श्रीरंगा. तू दुरुस्ती करायला येशीलच खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Wed, 12/09/2015 - 00:29 नवीन
प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिजची आठवण निघाली की अजुनही हात थरथरतात रे अभ्या!! पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए करणार्‍यांना कधी विचार याबाबत ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि

स्रुजा
Wed, 12/09/2015 - 00:31 नवीन
हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि शनिवारी भक्तीभावाने सा. खिचडी आणि सा. वडे खायचे दह्या बरोबर. एक ऑर्डर माझी असायची च दर आठवड्याला. कॉलेज मधली मुलं उपास करत नसली तरी त्यांचे काहीही मोटीव्हेशन्स असु शकतात उपासाचे पदार्थ खायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी

विलासराव
Tue, 12/08/2015 - 23:48 नवीन
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी विसरलो होतो लिहायला. बाकी माझी जी काही संकल्पना आहे कॅफेची ती तुम्ही नेमकी पकडलीत. वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे क्या बात कही आपने? एकदम नेमके. तुम्ही याच. कविता ताईहि येतिलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

:) येऊ नक्की

स्रुजा
Tue, 12/08/2015 - 23:51 नवीन
:) येऊ नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

हो या ना.

विलासराव
Tue, 12/08/2015 - 23:56 नवीन
हो या ना. मी चालु केला तेव्हाच सर्व मिपाकरांना आमंत्रण दिल होत खरडफळयावर. आपले मिपाकर शिद यांनी पहिला मान मिळवलाय भेट देण्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

शिद ही ईथलेच आहेत, दुसरा मान

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 23:58 नवीन
शिद ही ईथलेच आहेत, दुसरा मान मी मिळवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

साबुदाण्याची खिचडी ठेवतो.

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 12/09/2015 - 14:03 नवीन
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. विलासराव, खिचडी बरोबर काकडीची दह्यातली कोशिंबीर पण देत जा. खिचडी काकडी माझ्या आवडत्या डिश पैकी एक आहे. त्या बरोबर अजून एक पदार्थ म्हणजे उपासाची मिसळ. दाण्याची आमटी, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, उपासाचा चिवडा असे बरेच पदार्थ घालुन बनवला जातो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

नक्की

इरसाल
Wed, 12/09/2015 - 12:51 नवीन
खरच खुप मस्त असते. देतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

सध्या इथे चायनीज भजी

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 16:29 नवीन
सध्या इथे चायनीज भजी (मंचुरीयन) हे खुप खपले जाते, चहा बरोबर मस्त लागते, पास्त्याचा प्रकार इतका चालणार नाही कदाचित, प्रॉपर बोईसर मधे डोमिनोज पिझ्झा आहे , सुरुवातीला १५ दिवस खच्चुन गर्दी असायची पण आता कुणीच दिसत नाही , थोडी फार होम डीलेव्हरी आहे, टाकोज पण एकाच ठेलेवाला (हो ठेलाच लावलाय त्याने) ठेवतो. म्हणजे हटके पदार्थांना प्रॉपर बोईसर मधेच वाव नाही तर हे बोईसर हुन जरा लांब आहे. सिजलर्सचं पण तेच.
  • Log in or register to post comments

एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस

पिलीयन रायडर
Tue, 12/08/2015 - 16:40 नवीन
एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस असेल कॅफे तर खास तोच पदार्थ खायला मंडळी येतात. शिवाय एकच पदार्थ मोठ्या प्रमाणात ठेवणे सोपे जात असावे. बाकी पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवायचे. म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?
  • Log in or register to post comments

म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस

विलासराव
Tue, 12/08/2015 - 16:53 नवीन
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.
  • Log in or register to post comments

पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव

कविता१९७८
Tue, 12/08/2015 - 16:56 नवीन
पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव रेसिपी आहे , व्य नि करते, बघा उपयोगी आली तर, गुजराथी मिटक्या मारुन खातात हा अनुभव आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

ओक्के.

रेवती
Tue, 12/08/2015 - 18:42 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा