मला रॉयल कॅफेसाठी वॉटर फ़िल्टर \कूलर, एअर फ्रायर\माइक्रो ओवन, वेफर्स अथवा सलाद बनवन्यासाठी काय वापरावे ही माहिती हवी आहे.
काय योग्य राहील.
फ्रायरचे आणि ओवनचे फायदे तोटे.
वॉटर फिल्टरचे पाणी खरोखर काही शारीरिक नुकसान न करणारे असते का?
अशी चर्चा अपेक्षीत आहे.
झालाच तर सहज सोप्या पण टेस्टी आणि नाविन्यपूर्ण स्नैक्स च्या रेसिपीज सुचवल्यात तर सोने पे सुहागा.
#मिपाच्या नियमात बसत नसेल तर धागा अप्रकाशीत केला तरी चालेल.
प्रतिक्रिया
8 Dec 2015 - 1:54 am | कवितानागेश
एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा निघाला होता, स्वाती दिनेश यांचा.
एकन्दरीत उपयोगी वस्तू आहे, पण वीजेचे कंजम्पशन किती होते ते बघून वापरा.
तुम्हाला एखादी वस्तू हाफ फ्राय करून ठेऊन आयत्या वेळेस गरम करून द्यायची असेल तर भरतीच्या वेळेस सगळे त ळू न ठेऊन नंतर एयर फ्रायर वापरणे चालू शकेल कदाचित. प्रयोग करून बघा.
पाणी शुद्ध करणारे यंत्र घ्या. पण फ़क्त युव्ही पुरे.
8 Dec 2015 - 2:02 am | कवितानागेश
पाणी बोअर चे असेल तर जास्त चांगला प्यूरीफायर घ्यावा लागेल.
8 Dec 2015 - 2:06 am | संदीप डांगे
बोअरचे पाणी असेल तर आरो-युवि सगळं करणारा प्युरीफायर घ्यायला लागेल. त्यामध्ये ८० टक्के पाणी वाया जाते व २० टक्के प्यायला मिळते.
8 Dec 2015 - 3:59 am | रेवती
सॅलडसाठी ज्या पानांच्या भाज्या वापराल किंवा नेहमीच्या कोथिंबिरीसाठीही सॅलड स्पिनर मिळतो पण ते उपकरण घरगुती वापरासाठी आहे. एयर फ्रायरमध्ये वेळ लागेल असे वाटते. रेस्टॉरंटसाठी रेसिप्या आठवल्यास लगेच देते. पोटॅटो चिप्स हे पारंपारिक तर्हेने तळल्यास वेळ कमी लागेल मात्र मोठा फ्रायर घ्यावा असे वाटते जो उपहारगृहांसाठी बनवलेला असतो.
8 Dec 2015 - 4:11 am | संदीप डांगे
मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत ज्या हॉटेल, कॅफे, रेस्तराँ साठी इंडक्शन कुकींग रेंज देत आहेत. त्यात सगळ्या प्रकारची आकाराची इंडक्शन कुकिंग टॉप्स मिळतील. बजेट व कामाच्या व्यापानुसार निवडू शकता. ४० ते ८० टक्क्यांपर्यंत गॅसबील वाचू शकते.
http://www.cooktek.com/
8 Dec 2015 - 5:17 am | रेवती
तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक प्रकार मेन्यूवर आहेत ते कळवल्यास वेगळे सुचवता येतील.
सध्यातरी कोथिंबीर वडी व चीज कॉर्न टोस्ट सुचतायत. व्हाईट सॉसमध्ये भाज्या,चीज घालून टोस्ट करणे. चीज कॉर्न बॉल्सही सगळ्यांना आवडतात. अर्थात हे उपहारगृहासाठी किती सोयिचे ठरतील बघायला हवे.
8 Dec 2015 - 10:42 am | कविता१९७८
कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो बोईसरला नाहीये, बाहेरच्या माणसांना ईथे यायचे असेल तर बोईसर स्टेशनला उतरावे लागेल. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल कारण रहदारीचा रस्ता आहे पण जर ते महागाव रोडला असेल तर क्रुष्णा विनाईलस या एका कंपनी शिवाय आणि टाटा हाउसिंग काॅलनीशिवाय तिथे काही नाही , सर्व आदीवासी पाडे आणि डोंगर आहेत. त्यामुळे कॅफे कुठे आहे ते सांगाल का ??
8 Dec 2015 - 10:55 am | कविता१९७८
या भागात बहुतकरुन बटाटेवडे , समोसे, डोसे, चायनीज भेळ, चायनीज भजी , भेळ, पाणीपुरी , दाभेली, शेवपुरी यासारखे पदार्थ खाल्ले जातात, सॅंडविचेस ही भरपुर प्रमाणात खाल्ली जात नाहीत, जवळ्पास एकच कॉलेज आहे "थीम इंजिनियरींग" ते जवळ असेल तर सँडविचेस चालु शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ठेवल्या तर उत्तम. पाव भाजी ही गर्दी बघुन किंवा कमी प्रमाणात पाहुन ठेवु शकता.
8 Dec 2015 - 1:11 pm | विलासराव
सर्वांना धन्यवाद.
कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल
अगदी या रस्त्यावर नाही. पण या रोडवर जे गेट आहे त्यातून आतमधे आल्यावर साधारण ५० मीटर आहे. शनिवार रविवार मुंबईचे पब्लिक येते.
साधारणपने पराठे,इडली ,पोहे,पूरी भाजी, भजी, मिसळ पाव, भेळ, वडापाव आणि सैंडविच हे चालते. त्यात पाहिले चार जास्त.
थिम् कॉलेजची काही मुले टाटामधे रहातात, २ टीचर पण आहेत. ते येतात.
पण कॉलेज ५ ते ६ मी. अंतरावर आहे.
आता बाहेर मेनरोडवर फलक लावतो.
वॉटर प्यूरीफायर ,फ्रायर कोणत्या कंपनीचा चांगला? त्यात काय काय करता येऊ शकते?
किम्मत? अशी माहिती मिळाली तर बारे होईल.
पावभाजी आणि तवापुलाव चालेल असे वाटतेय.
8 Dec 2015 - 1:13 pm | विलासराव
कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्या रस्त्यावर असेल तर
असे वाचावे.
8 Dec 2015 - 1:59 pm | कविता१९७८
बिर्यानी ही चालेल आणि चिकनचे पदार्थ दणकुन चालतील
8 Dec 2015 - 2:36 pm | कविता१९७८
आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु शकतील, चायनीज सुप चालु शकतील. चिकन भुजीन्ग भरपुर चालेल
9 Dec 2015 - 9:35 pm | नाव आडनाव
पाककॄतींतलं जास्त काही माहित नाही, पण एकदा घरी पोह्यात कांद्याएवजी कोबी टाकला होता. मला लई आवडले होते पोहे. ट्राय करून बघा एकदा. आवडले तर असाही एक ऑप्शन होइल.
8 Dec 2015 - 1:43 pm | कंजूस
त्या भागात समोसा-पाव फार चालतो ना?
सूरण-बटाटा घालून व्हेज कटलेट्स पाव ट्राइ करा.
आलू पालक,पनीर पालक ( अमूल मारके )करायला सोपे आहे. उसळ पाव,भजी-पाव.
झीरो-B चे पाणी देता येईल.
8 Dec 2015 - 2:00 pm | पिलीयन रायडर
रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे आहे का?
जनरली हे पदार्थ पटकन होत असावेत:-
बॉइल्ड एग्स, ऑम्लेट-पाव, मॅगी, सॅण्डविच
तयार करुन ठेवण्यासारखे पदार्थ :-
मिसळ , पोहे , उपमा , वडे
ऑन द स्पॉट बनवता येतील असे पदार्थः-
भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी टाईप चाट
पॅक्ड पदार्थः-
लेझ / कुरकुरे , सॉफ्ट ड्रिंक्स , चिक्की, चणे / फुटाणे / शेंगदाणे इ.
हटके पदार्थः-
पणिनी / पनिनी , पास्ता , कोल्ड कॉफी (दुर्गा किंवा तत्सम), नाचोज + साल्सा डिप वरुन मेल्ट्ड चीझ, कप पिझ्झा, जलजिरा टाईप सोडा
8 Dec 2015 - 2:39 pm | गवि
भुजिंग लिहायलाच आलो होतो पण वर अन्यत्र ते सुचवलेलं दिसत आहे.
मज्जा म्हणून रॉयल कॅफेवर कट्टा "न्यावा" की काय असा शिरेस विचार आला. पण खरोखर चार्जेबल बेसिसवर होणार असेल तरच. नाहीतर मिपाकर म्हणून फुकटेपणा करण्यात मजा नाही.
8 Dec 2015 - 2:49 pm | शलभ
+१
8 Dec 2015 - 2:51 pm | कविता१९७८
कॅफेच्या दुसर्या बाजुच्या रस्त्याने आत गेल्यास छोटे डोंगर अन टेकडया आहेत, नदी आहे, परीसर अगदी शांत आहे. आदीवासी वस्ती, शेते , पाट असं पाहायला मिळेल , ट्रेकींग करु शकाल.
8 Dec 2015 - 2:54 pm | कविता१९७८
लहानपणी या टेकड्यांवर आणि डोंगरांवर गेलेय मी , आजो़ळ आहे माझे ते. तिथे अरुणा ईराणीचे फार्म हाउसही आहे, लहानपणी तिथे कलिंगड खायला जायचो आम्ही. पण हे सगळे टाटा हाउसिंगच्या दुसर्या बाजुला म्हणजे कॅफेच्या कॉलनीच्या उजव्या बाजुला आहे.
8 Dec 2015 - 3:06 pm | गवि
परिसराची खूप माहिती आणि जवळीकही दिसते आहे. भारतात असाल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत कट्टा ठरवावा मिपाकरांनी.
8 Dec 2015 - 3:19 pm | कविता१९७८
भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही सतत भटकंती करत असल्याने उपस्थितीचं सांगु शकत नाही पण माहीती देउ शकेन. हा कॅफे बोईसरपासुन ३-४ कीमी अंतरावर आहे, येणार असाल तर बाय रोड किंवा बाय ट्रेन ने कसे यायचे सांगु शकेन.
8 Dec 2015 - 4:06 pm | विलासराव
सांगायचे राहिलेच. रॉयल कॅफे प्यूअर व्हेज आहे.
नॉनव्हेज भरपूर चालेल पण मला त्यात रस नाही.
@ पिलियन रायडर: होय मी चालु केलाय रॉयल कॅफे.
@गवी: कधीही कट्टा करा. पण व्हेज. आणि मुक्कामी कटटा केला तरी चालेल.
आपला फ्लॅट रिकामाच हाय.
8 Dec 2015 - 4:20 pm | इरसाल
गुजराती पण झणझणीत अशी "शेव उसळ" म्हणुन एक डीश आहे चालेल पण खुप.
8 Dec 2015 - 4:49 pm | विलासराव
येस. गुजराती पब्लिक येते विकेंडला.
रेसिपी मिळेल का?
8 Dec 2015 - 4:52 pm | कविता१९७८
मग खमण ढोकळा अन ठेपले ही ठेउ शकता
8 Dec 2015 - 4:58 pm | विलासराव
येस. पण ठेपल्यापेक्षा आपली थालीपीठ ठेवावे ऐसा विचार आहे.
8 Dec 2015 - 5:02 pm | कविता१९७८
हमम्म ट्राय करायला हरकत नाही
8 Dec 2015 - 6:37 pm | अभ्या..
थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा. आमच्या इथे बृयाच हॉटेलात डिश मिळते. दोन धपाटी, दही, शेंगाचटनी आणि थॉडासा मिरच्याचा ठेचा. स्नॅक्स म्हणून पण चालतो अन जेवण म्हणून पण.
8 Dec 2015 - 10:48 pm | विलासराव
रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच धापाटे खायला घालतो.
लवकर बनवा बॅनर. बॅनर पाहूनच कॅफेला गर्दी केलि पाहिजे लोकांनी असा.
8 Dec 2015 - 11:35 pm | स्रुजा
अरे वा, हे छान आहे व्हेज आहे ते ! साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, इडली, दावणगिरी डोसा, कोथिंबीर वडी, अळु वडी, थालिपीठ, शेव भाजी, मोठ्या उपासांना म्हणजे कार्तिकी , आषाढी एकादशीला वगैरे ऑर्डर घेऊन भगर आमटी वगैरे पण ठेवु शकता. शिवाय ठेपले, पराठे, वेग वेगळे ज्युसेस, भाजी भाकरी, पिठलं भाकरी, तांदळाची भाकरी आणि वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे प्रकारांवर उड्या पडतात. व्हेज कटलेट्स, उपासाची कचोरी हे प्रकार देखील नेहमी ठेवता येतील. मिसळ, बटाटावडा यांचा उल्लेख आलाच आहे. हेल्दी मिसळ पण ठेवु शकता. उपासाची मिसळ पण लोकप्रिय आहे. अजुन ही सुचतं तसं सांगेन.
कवि, एकदा खरंच जाऊयात आणि मी तुला घेऊन जाणार च. त्यात मदत करते वगैरे चालणार नाही :)
8 Dec 2015 - 11:43 pm | कविता१९७८
ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ लोक घरी करतात त्यामुळे त्याची शचक्यता कमी, उपवासाची भगर आमटी वैगरे ईथला लोकल पदार्थ नाही
8 Dec 2015 - 11:50 pm | स्रुजा
अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात म्हणतात ना ते. त्यांना उपासाला येता येईल. शिवाय काही कर्मचारी जे घरी राहत नाहीत वगैरे.
8 Dec 2015 - 11:56 pm | कविता१९७८
मी काही म्हणतीये कारण माझा जन्मच बोईसरचा आहे, मला ईथला एरीया माहीतीये, ही जागा ईस्टलाआहे अन एम आय डी सी एरीया बर्याच लाम्ब वेस्टला जिथे मी राहते, ईस्टला जायला जास्त वाहने नाहीत, स्वत:चे वाहन असेल तरच जाणे सोयीचे पडते.
9 Dec 2015 - 12:01 am | स्रुजा
ओके , आलं लक्षात.
9 Dec 2015 - 12:05 am | कविता१९७८
आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे उपवास करतात गं, मी सांगतीये कारण ईथे बरेचजण खुप खर्च करुन काही सुरु करतात पण कालांतराने त्यांना पब्लिक नुसार बदल करावे लागतात. हा अनुभव आहे. ईथे कामगार वर्ग जास्त राहतो, नाॅनवेजचे प्रमाण जास्त या सर्व गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात कारण खाण्याच्या पदार्थांचे शेल्फ लाईफ खुप कमी असते.
9 Dec 2015 - 12:21 am | श्रीरंग_जोशी
एमसीए करत असताना आमच्या होस्टेलच्या मेसच्या जेवणाच्या चवीला कंटाळून मी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शनिवारचा उपास करणे सुरू केले. दुपारच्या जेवणात छान ताट भरून साबुदाणा खिचडी व वाटीभर दही मिळत असे. चवही एकदम चांगली असायची.
योगायोगाने त्या सेमिस्टरमध्ये माझा दुसर्या सेमिस्टर पासून बॅक असणारा प्रॉबॅबिलिटिज अॅन्ड कॉम्बिनेटोरिज हा पेपर क्लिअर झाला. त्यावर माझ्या ज्युनियर मंडळींनी, मी शनिवारचा उपास धरल्यानेच तो पेपर निघाला अशी आवई उठवून अनेकांना शनिवारचा उपास धरण्यास प्रवृत्त केले.
उपासाचे पदार्थ चविबाबतीत आकर्षक असल्याने उपास न करणारेही आनंदाने खातात.
भविष्यात अमेरिकेत मराठी फास्ट फूड उपहारगृह सुरू करून साबुदाणा वडा या पदार्थाचा ब्रॅन्ड बनवावा असे स्वप्न आहे.
विलासरावांना रॉयल कॅफेच्या पुरर्रचनेसाठी शुभेच्छा!!
9 Dec 2015 - 12:25 am | अभ्या..
प्रॉबॅबिलिटिज अॅन्ड कॉम्बिनेटोरिज हे टायपणारा माणूस पुनर्रचना टायपू शकत नाही??? ह्या कैतरीच कै ;)
हल्केच घे हो श्रीरंगा. तू दुरुस्ती करायला येशीलच खात्री आहे.
9 Dec 2015 - 12:29 am | श्रीरंग_जोशी
प्रॉबॅबिलिटिज अॅन्ड कॉम्बिनेटोरिजची आठवण निघाली की अजुनही हात थरथरतात रे अभ्या!! पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए करणार्यांना कधी विचार याबाबत ;-) .
9 Dec 2015 - 12:31 am | स्रुजा
हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि शनिवारी भक्तीभावाने सा. खिचडी आणि सा. वडे खायचे दह्या बरोबर. एक ऑर्डर माझी असायची च दर आठवड्याला. कॉलेज मधली मुलं उपास करत नसली तरी त्यांचे काहीही मोटीव्हेशन्स असु शकतात उपासाचे पदार्थ खायला.
8 Dec 2015 - 11:48 pm | विलासराव
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी विसरलो होतो लिहायला.
बाकी माझी जी काही संकल्पना आहे कॅफेची ती तुम्ही नेमकी पकडलीत.
वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे क्या बात कही आपने?
एकदम नेमके.
तुम्ही याच. कविता ताईहि येतिलच.
8 Dec 2015 - 11:51 pm | स्रुजा
:)
येऊ नक्की
8 Dec 2015 - 11:56 pm | विलासराव
हो या ना.
मी चालु केला तेव्हाच सर्व मिपाकरांना आमंत्रण दिल होत खरडफळयावर.
आपले मिपाकर शिद यांनी पहिला मान मिळवलाय भेट देण्याचा.
8 Dec 2015 - 11:58 pm | कविता१९७८
शिद ही ईथलेच आहेत, दुसरा मान मी मिळवते
9 Dec 2015 - 2:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
साबुदाण्याची खिचडी ठेवतो.
विलासराव, खिचडी बरोबर काकडीची दह्यातली कोशिंबीर पण देत जा. खिचडी काकडी माझ्या आवडत्या डिश पैकी एक आहे.
त्या बरोबर अजून एक पदार्थ म्हणजे उपासाची मिसळ. दाण्याची आमटी, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, उपासाचा चिवडा असे बरेच पदार्थ घालुन बनवला जातो.
पैजारबुवा,
9 Dec 2015 - 12:51 pm | इरसाल
खरच खुप मस्त असते. देतो मी.
8 Dec 2015 - 4:29 pm | कविता१९७८
सध्या इथे चायनीज भजी (मंचुरीयन) हे खुप खपले जाते, चहा बरोबर मस्त लागते, पास्त्याचा प्रकार इतका चालणार नाही कदाचित, प्रॉपर बोईसर मधे डोमिनोज पिझ्झा आहे , सुरुवातीला १५ दिवस खच्चुन गर्दी असायची पण आता कुणीच दिसत नाही , थोडी फार होम डीलेव्हरी आहे, टाकोज पण एकाच ठेलेवाला (हो ठेलाच लावलाय त्याने) ठेवतो. म्हणजे हटके पदार्थांना प्रॉपर बोईसर मधेच वाव नाही तर हे बोईसर हुन जरा लांब आहे. सिजलर्सचं पण तेच.
8 Dec 2015 - 4:40 pm | पिलीयन रायडर
एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस असेल कॅफे तर खास तोच पदार्थ खायला मंडळी येतात. शिवाय एकच पदार्थ मोठ्या प्रमाणात ठेवणे सोपे जात असावे. बाकी पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवायचे.
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?
8 Dec 2015 - 4:53 pm | विलासराव
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?
असाच विचार आहे.
पराठ्यामधे विविधता लागेल.
वडापाव ,समोसा व मिसळ चालेल.
मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.
8 Dec 2015 - 4:56 pm | कविता१९७८
पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव रेसिपी आहे , व्य नि करते, बघा उपयोगी आली तर, गुजराथी मिटक्या मारुन खातात हा अनुभव आहे :)
8 Dec 2015 - 6:42 pm | रेवती
ओक्के.
8 Dec 2015 - 4:55 pm | विलासराव
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?
असाच विचार आहे.
पराठ्यामधे विविधता लागेल.
वडापाव ,समोसा व मिसळ चालेल.
मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.
वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटणींचा वाटा फार मोठा असतो या गोष्टी फेमस होण्यात.
त्यांच्याही रेसिपीज दिल्या तर् बरे होईल.
8 Dec 2015 - 5:12 pm | गवि
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास).
जालावर लाखो रेसिपीज आहेत. मिसळपावचा पाककृती विभाग धुंडाळणं अजिबात अवघड नाही. पण कोणीही कितीही रेसिपीज दिल्या तरी खुद्द स्वतः तिथल्या गिर्हाईकांचा कल पाहून पदार्थ इम्प्रूव्ह करत नेणं याची आवड असणं लाँग टर्ममधे अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी तुमचे आचारी उपलब्ध नसतील तरी तुम्ही तितक्याच किंवा जास्त चवीने स्वहस्ते बरेचसे पदार्थ बनवू शकत असलात तर दीर्घकालीन फायद्याचं आहे.
कोणीतरी पाकृ देईल आणि कोणीतरी अन्य त्यानुसार बनवेल हे ठीक आहे, पण खुद्द प्रयोग करणं हा फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. नाहीतर तो फेमस वडापाव / मिसळ फेमस होताच अन्य कोणासोबत तरी पलायन करु शकते.
8 Dec 2015 - 10:43 pm | विलासराव
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का?
मी खवय्या होतो आधी. जवळपास २५ वर्ष मी हॉटेलमधे खाल्लय.
तेव्हा मला नेहमी वाटायच की आपण एक बार चालु करायचा. त्यावेळी मई ड्रिंक घ्यायचो. आवड खायची होती. बनवायची नव्हती आणि नाही.
खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास).
काही प्रयोग केले नाहीत. एका आमच्याच् कॉलनीमधील बाईंना मदत म्हणून मी फायनांस केला आणि त्यांनी कॅफे चालवायचे असे ठरले होते.
बाई भलत्याच् स्मार्ट निघाल्या. ३ महिन्यातच सोडला कॅफे आणि घरून मेस चालवतात आता.
मी आहे विपश्यनेच्या २ महिन्याच्या शिबिरात सेवेला. मग माझ्या पुतन्याने ते जमील तसे चालु ठेवले आहे. बराच आर्थिक फटकाही देऊन गेल्यात. असो.
आता बचेंगे तो और भी लडेंगे अशी आनीबानीची वेळ आलिया म्हणून हां प्रपंच.
मी ७ ते ८ महीने इगतपुरीलाच असतो. आता पुतन्याला तयार करून ही लढाई लढायचीय.
आपली चांगली बाजू म्हणजे स्वच्छता आणि चांगले मटेरियल वापरतो.
एक कट्टा जमवाच.
त्यादिवशी रेग्युलर कॅफे बंद ठेवू. आपण आपल्यासाठी फ़क्त पाहिजे ते मेनू बनवु.
आणि धमाल कट्टा करू. माझा फ्लॅट आहेच. बाजुचाही गरज असल्यास मिळेल.
पार्किगची आणि जागेची कसलीच अड़चन नाही.
ठाण्यावरुन गाडीने दीड दोन तास लागतील. भिवंडी, वाड़ा, मनोर मस्त रस्ता आहे.
बघा कस जमताय ते. ३१ डिसेम्बर जमात असेल तरी माझी हरकत नाही.कधीही या.मी
४ फेब्रुवारी पर्यन्त फ्री आहे. जानेवारीत १२ दिवस सोडून.
8 Dec 2015 - 11:32 pm | pacificready
पुतण्या तुमची कंपनी बघतोय ना? की तो भाऊ?
बाकी माझ्या काकाचा पांचगणी मध्ये वडापाव चा गाडा आहे. रोज उपस्थित असणं अत्यंत आवश्यक असतंच असतं.
Consistancy विथ गुड टेस्ट शुड बी द की.
8 Dec 2015 - 11:43 pm | विलासराव
आपली कंपनी बघतो तो चुलत भाऊ.
कॅफे पहातो तो पुतन्या.
मला थाम्बायला वेळ नाहीना महाराज.आपन जाणताच सर्वकाही.
8 Dec 2015 - 11:24 pm | कंजूस
हॅाटेलची थोडी उमेदवारी( वेटर) करून धंद्यात शिरायला पाहिजे खरं म्हणजे.गिह्राइक आलं नाही तर पदार्थ कसे वाचवायचे हे मागे गेल्यावरच कळतं.ते कुठे गुगलून नाही मिळत.रेसिप्या वेगळ्या आणि हॅाटेलात डिश म्हणून देणं वेगळं.मालकाच्या भुमिकेतून कसं वागायचं ते कुठे उघडपणे लिहिता येत नाही.
8 Dec 2015 - 11:29 pm | विलासराव
खराय.
माझे बरेचसे हॉटेलवाले कस्टमर आहेत .
काही मित्रही आहेत. देतात ते टिप्स.
पण मला जे रुचेल तेच मी करतो.
8 Dec 2015 - 11:29 pm | विलासराव
खराय.
माझे बरेचसे हॉटेलवाले कस्टमर आहेत .
काही मित्रही आहेत. देतात ते टिप्स.
पण मला जे रुचेल तेच मी करतो.
9 Dec 2015 - 12:47 am | कविता१९७८
बरोबरय शेवटी अनुभव तुम्हालाच येणार आहेत आणि त्यातुनच तुम्हाला नवनवीन कल्पना मिळत जातील.
9 Dec 2015 - 10:36 am | कविता१९७८
ईथे नारळाची झाडे भरपुर आहेत , कुठल्याही वाडीतुन तुम्हाला आख्खी शहाळी 5-6 रु. मधे मिळतील, पिकअप वाले २०-५०रु फेरी अशा दराने आणुन देतात, ती कापुन पाणी पाउचमधे पॅक करुन विकु शकता, प्रवासात वैगरे लोकं नारळाचे पाणी जास्त प्रीफर करतात.
9 Dec 2015 - 10:46 am | विलासराव
मस्त आहे ही आइडिया. या किमतीला मिळतील का आजही?
9 Dec 2015 - 10:59 am | कविता१९७८
हो चिंचणीला वाडीत स्वत: जाउन भरपुर नारळ घेतले तर मिळतात. थोडी घासघीस करावी लागते. तेच बाहेर एक शहाळे कमीत कमी २५ रु. ना विकले जाते. ठेलेवाले भैये तसंच करतात.
9 Dec 2015 - 2:24 pm | कविता१९७८
वर कुणी तरी झुणका भाकर वैगरे सुचवलय, झुणका भाकर , ज्वारीची कडक भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे पदार्थ चालण्यासारखे आहेत कारण हे पदार्थ लोकल नाहीयेत, बाहेरुन नोकरीसाठी आलेली लोकं हे सर्व घरच्या घरीच बनवतात त्यामुळे बाकीच्यांना आवडत असुन फारसे खायला मिळत नाहीत , बोईसरला झुणका भाकर केंद्र असुनही तिथे वडापावच विकला जातो, इथे कुठल्याही हॉटेलात सध्या असे पदार्थ मिळत नाहीयेत त्यामुळे असे पदार्थ चालण्यासारखे आहेत.
9 Dec 2015 - 9:21 pm | कवितानागेश
उपवासाची फराळी मिसळ हा मस्तच पदार्थ आहे. नक्की खपेल.