चहावाल्याचे पंख.....
चहावाल्याचे पंख.....
काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.
चहावाल्याचे पंख.....
काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.
हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात.
ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर..
...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या. मात्र 'त्या गोष्टी घडल्या' हे ही वाचकांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक वाटत असल्याने हा वेगळा धागा काढत आहे.
या घटना अर्थातच मूळ लेखाशी संबंधित असल्या तरी येथे येताना विस्कळीतपणे येणे अपरिहार्य आहे.
प्रिय मिपाकरांनो,
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे.
वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५.
काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही.
प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.
*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).
अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ आक्टोबरला अलाहाबाद उत्तरप्रदेश मध्ये हिंदू कायस्थ परिवारा मध्ये झाला. त्यांचे वडिल डाॅ. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी व आई तेजी बच्चन कराची मधील शिख कुंटुबातील होती.
डाॅ. हरिवंशराय बच्चन यांना दोन मुले, मोठा अमिताभ व लहान अजिताभ. सुरवातीला अमिताभ यांचे नाव इन्कलाब होते पण नंतर त्यांचे नाव अमिताभ ठेवले. अमिताभ चा अर्थ "कधी न विझणारा प्रकाश". अमिताभ यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण नंतर त्यांच्या वडिलांनी बच्चन आडनाव लावले. अमिताभ यांनी दोन ठिकाणाहून एम.ए. ची डिग्री घेतली.
पहिला भाग लिहील्यानंतर बर्याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं!
--------------
'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे. तशी अगदी नावागावापासून सुरुवात करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो. :)
==================================================================
==================================================================