==================================================================
नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...
==================================================================
झिल्पा गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष संपला
आजच्या माळेतील बी एस जुनघरे , तालुका कृषी अधिकारी, काटोल यांच्या संपर्क होऊ शकला नाही परतु याच काटोलची अतिरीक्त जबाबदारी ही पाच्व्या माळेतील श्री दादासाहेब काळे मंडल कृषी अधिकारी (काटोल तालुका) दिलेली होती आणि त्यांनी तसा उल्लेखही केला होता यांच्याशी झालेला दूरध्वनी वार्तालापाचा गोषवारा:
मा मुख्यंमंत्र्यांनी झिल्पा गावातील जलक्रांती पाहून काळे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांचे समोर पुढील योजना मांडण्याची संधी मिळाली.त्यामध्ये श्री काळे यांनी एक अभिनव आणि शाश्वत उपयुक्त उपाय योजना सुचवली आहे.
पारंपारीक बंधार्यांमध्ये अतिरिक्त पाणी ( क्षमतेपेक्षा जास्त वाहून आलेले पाणी वाहून पुढे तसेच वाया जाते तेव्हा बंधार्याच्या समतल असा बंधार्याच्याच आतील बाजूस एक खोलवर कूप नलीका किमान २०० फूट घेऊन तीचे तोंड एक झाकण लावून बंदीस्त करणे.(कचरा जाऊ नये म्हणून) परंतु त्या झाकणापसून खाली बाजूने कूप नलीका पाईप सुमारे १ फूटापर्यंत सच्छीद्र पण जाळी लावलेला ठेवावा.
त्यामुळे बंधार्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आलेले पाणी त्या पाईपद्वारे थेट भूगर्भातील जलस्तोत्रांमध्ये जाईल आणि बंधार्यामधील पाण्याच्या क्षमतेला धक्का न लावता जल पुनर्भरण होईल.याच्या बाबतच्या तांत्रीक आणि उपयुक्तता बाबी ह्या पूरणतः नैसर्गीक रचना (चढ उतार्,क्षेत्र,वन विभाग) पाहून करता येईल. मृत झालेले खोलवरचे जलस्तोत्रांमध्ये जरी पाणे खेळले तरी दूरवर्च्या गावांपर्यत त्याचा फरक जाणवेल. असा श्री काळे यांचा विश्वास आहे.
ग्रामस्थांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला कृषी विभागाच्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने कधीकाळी अवर्षणग्रस्तांच्या यादीत असलेले झिल्पा (ता. काटोल, जि. नागपूर) गाव आज जलसमृद्ध म्हणून नावारूपास येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असून, पाण्यासाठीचा त्यांचा संघर्ष थांबला आहे.
विनोद इंगोले
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नैसर्गिक, सेंद्रिय शेतीपद्धती; तसेच नवनवे प्रयोग या भागातील शेतकरी करतात. संत्रा व मोसंबी बागांची संख्या अधिक असल्याने पाण्याची गरजही शेतकऱ्यांना अधिक भासते. परंतु, नजीकच्या काळात तालुक्यातील जलस्रोतांची पाणीपातळी कमी झाली होती. तालुक्यातील झिल्पा हे अवर्षणग्रस्त गाव म्हणून ओळखले जात होते. पाण्याचा उपसा बेसुमार व्हायचा. तुलनेत पुर्नभरण अत्यल्प होते. गावाची लोकसंख्या चार हजारांवर आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गावालगतच वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर आहे; परंतु नाल्यात जलसंचय होत नसल्याने शेतीसोबतच पिण्यासाठीही पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत होते. विहिरीतील पाणी टाकीमध्ये सोडत तेथून नळाद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोचविले जाते; परंतु आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव झिल्पा ग्रामस्थ घेत होते.
झिल्पा गावात झाली जलक्रांती
झिल्पा ग्रामस्थ पाणीटंचाईचे चटके सोसत असतानाच शासनाची जलयुक्त शिवार अभियान योजना जाहीर झाली. त्याअंतर्गत आपल्या गावाचा समावेश व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून झाली. कृषी विभागाने त्यास प्रतिसाद देत गावातील पाणलोटाची माहिती संकलित करण्यात आली. सारे सोपस्कार पूर्णत्वास गेल्यानंतर कामाचा आराखडा व पुढे कामांस सुरवात झाली. 500 मीटर नाला खोलीकरण करण्यात आले. या कामामुळे 18.13 हजार घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला. कामावरील अपेक्षित खर्चातही वाढ होत तो 9,47, 293 रुपयांपर्यंत गेला. ग्रामस्थांचा वाढता उत्साह पाहता कृषी विभागानेही निधी तरतुदीत हात आखडता घेतला नाही. त्याचे दृश्य परिणाम आज अनुभवण्यासारखे आहेत.
नाले झाले जलयुक्त
झिल्पा गावालगत वाहणाऱ्या नाल्याची ओळख झिल्पा नाला अशी आहे. 550 मीटरवर कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून घेण्यात आले होते, त्यावरील दरवाजे वाहून गेले होते. त्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात न आल्याने पाणी साठवण न होता ते वाहून जात होते. सोबतच नाला गाळाने भरला होता. नाल्यात पाणी साठल्यास भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार होती. तसे न झाल्याने परिसरातील विहिरींचे स्रोतही कोरडे पडले होते. तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे, मंडळ कृषी अधिकारी डी. के. काळे, पर्यवेक्षक रामदास खरबकर यांच्या प्रयत्नातून हे नाले सिमेंट कॉंक्रीटने कायमस्वरूपी बांधण्यात आले. त्याच नाल्याचे 500 मीटर लांब व तीन ते चार मीटर खोल काम करण्यात आले. तालुका जलयुक्त शिवार समिती, काटोल यांच्या सहकार्याने कृषी विभागाने पुढाकार घेत या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण या कामासाठी पुढाकार घेतला. नाल्यावर तीन ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले. त्या माध्यमातून 18.13 टीसीएम एका नाल्यात, दुसऱ्या नाल्यात 9.67, तर तिसऱ्या नाल्यात 4.30 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला. आजच्या घडीला नाला पाण्याने भरून परिसरातील जलस्रोतही तुडुंब आहेत. शेतकऱ्यांच्या शेतांतील विहिरींची पातळीही वाढली. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. स्थानिकांचे सहकार्यही या कामांस मिळाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला, असे मंडळ कृषी अधिकारी काळे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींकडूनही समाधान
काटोलचे आमदार आशिष देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट देत कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पाण्याने तुडुंब भरलेल्या या नाल्याचा उपयोग मत्स्यपालनाकरिता व्हावा अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनीही कामांची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. पाणलोटाच्या बाबतीत आदर्शवत अशा या कामांच्या संदर्भाने जागृती होण्याच्या उद्देशाने काटोल परिसरात आमदार देशमुख यांनी ठिकठिकाणी "होर्डिंग्ज' लावली आहेत.
पाण्यासाठी संघर्ष थांबला
रोशन दादासाहेब काळे कपाशी, तूर, संत्रा ही पिके घेतात. झिल्पा नाला त्यांच्या शेतालगतच्या भागातूनच वाहतो. नाल्याच्या पाण्याची तसेच काळे यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी एकसारखी आहे. संत्रा बाग जगविण्याकरिता दरवर्षी त्यांना संघर्ष करावा लागे. नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे तो थांबल्याचे समाधान बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट झळकत होते.
पिण्याचे आणि शेतीचे पाणीही दुर्लभ
झिल्पा येथील विनायक दादाराव राऊत पाच एकरांत कपाशी व तूर घेतात. रब्बीत ओलावा कायम राहिला तर पीक घेणे शक्य व्हायचे. जलसंधारणाच्या कामांमुळे नाल्यात जलसाठा असल्याने त्यांच्या विहिरीच्या पाणीपातळीतही वाढ झाली. यंदा रब्बी पीक घेणे शक्य होणार असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
आता आली स्वयंपूर्णतः
महादेव निंबूरकर यांची चार एकर शेती. पाण्याअभावी त्यांनी प्रयोगशीलतेचे धाडस केले नव्हते. कपाशी व तूर हीच पीकपद्धती असलेल्या निंबूरकर यांच्या शेतातील विहीर यंदा पाण्याने तुडुंब भरली. या वेळी उत्पादकतावाढ त्यांना अपेक्षित आहे.
संपर्क - बी. एस. जुनघरे - 9404356451
तालुका कृषी अधिकारी
नदी जल तज्ञ आणि सामाजीक प्रणेते राजेंद्र सिंह यांचा अभिप्राय
मराठवाड्यातील जलक्रांती
सदर लेखमालेतील विभागातील लोकांचे अनुभव आणि परिणाम जाणून घेणे मला आवडेल.
समारोपाचा भाग हा आजमितीचा पाणी साठा किती आहे आणि मागील ३-४ वर्षांत झालेया पावसांसबंधी असेल.
आपले अभिप्राय हुरुप देणारे आहेतच पण आपणही त्यासंबधी वाचलेले अनिकूल्/प्रतीकूल लिखाण इथे मांडावे म्हणजे ही एकांगी न राहता परीपूर्ण लेखा-जोखा व्हावी हीच अंबाबाईकडे प्रार्थना...
उदे ग अंबे उदे......
प्रतिक्रिया
21 Oct 2015 - 11:16 am | एस
नक्कीच. या विषयावर अजून मिपाकरांचे अनुभव, मते इत्यादी वाचायला आवडेल. सवडीनुसार मीही काही टंकण्याचा प्तयत्न करतो.
21 Oct 2015 - 12:09 pm | सस्नेह
फारच महत्वाच्या अन जिव्हाळ्याच्या विषयावरील माहितीपूर्ण लेख. सर्व लेख अभ्यासपूर्ण आहेत.
पाण्याचा थेंबही वाया जाताना पहिला तर मन तळमळते. दुर्दैवाने भारतात याविषयी अत्यंत अनास्था दिसते.
जल-अभियान होणे आवश्यक आहे.
21 Oct 2015 - 2:13 pm | प्रसाद१९७१
नाखु साहेब, ह्या लेख माले बद्दल तुमचे आभार मानावेत तितके कमी आहेत.
धन्यवाद.
22 Oct 2015 - 5:32 pm | पैसा
अजून लिहा असे काही चांगले!
22 Oct 2015 - 5:41 pm | एक एकटा एकटाच
छान लेख
22 Oct 2015 - 8:27 pm | प्यारे१
अतिशय उत्तम लेखमाला झाली आहे.
23 Oct 2015 - 8:30 pm | पद्मावति
उत्तम लेखमाला.
25 Oct 2015 - 12:39 pm | मदनबाण
उत्तम लेखमाला...
जाता जाता :- महाराष्ट्राला बर्याच काळाने एक उत्तम मुख्यमंत्री लाभला आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Tak