नवरात्र जल जागर : माळ तिसरी

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 9:14 am

==================================================================

नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...

==================================================================

सर्वप्रथम अभ्याचे पुन्हा एकडाव अभिनंदनः

  • प्रतिकुल परिस्थीतीत हातपाय न गाळता जिद्दिने स्वतःचे स्थान मिळविण्याची धडपड कदाचित या मातीचाच गुण असला पाहीजे नाही तर त्या पाण्यात असलेला सत्व सार.
  • हे अभियान एका रात्रीत यशस्वी झालेले नाही तर त्या मागे अनंत अडचणी झेलून प्रसंगे कटू पण धाडसी निर्णय घेऊन मा. देवेंद्र फडणवीसांनी तडफदार कार्य्क्षम सरकारी अधिकार्यांचे कौतुकही केले.
  • हे मी फक्त बातम्या+माहीती वाचून लिहित नाही तर किमान ५-७ अधिकारी/सरपंच यांच्याशी थेट संपर्क साधला आहे.
  • लेखमालेच्या ओघात अनुषंगाने त्या त्या भागात त्यांचे संपर्क संदर्भ येतीलच.या उप्परही काही आधिक संबधीत माहीती असेल तर ती इथे प्रतीसादत द्यावी म्हणजे हे लेखन एकतर्फी आणि एकसूरी होणार नाही.
  • सर्व जागरूक व गुणग्राही मिपाकरांना मैत्रीची नम्र विनंती की त्यांनी त्या व्य्क्तींशी संपर्क करून त्यांचे अभिनंदन+कौतुक करावे.
  • या धाग्यावर प्रतिक्रिया दिल्या काय नाही दिल्या त्या पेक्षाही हे महत्वाचे आहे.
  • काही जुणे जाणते साक्षेपी (पण सध्या सक्रीय नसलेले बक्कल क्र ५००० चे आतील) मिपाकरही आहेत जे आवर्जून पेठकर का़कांचे सदृश्य काही निवडक धाग्यावर मोजकी, नेटकी प्रतीक्रिया देतात. त्यांनीही आवर्जून या लोकांचे कौतुक करावे.
  • आपल्या कष्टप्रद जिद्दीची कुणीतरी दखल घेत आहे आणि शहरातील (तथा कथीत पांढरपेशा समाज) आपल्याशी जोडलेला आहे ही जाणीव फार मोठी गोष्ट आहे.

वि.सू. (तथा कथीत पांढरपेशा समाज) हा गेल्या दोन-तीन वर्षांमधील मिपा/मिपा बाह्य बातम्यांमधून निशाणा साधला गेलेला सॉफ्ट टारगेट याच अर्थाने वापरला आहे.

या अनुषंगाने केलेल्या संपर्कात मंडल कृषी अधिकारी यांनी फक्त फोनवर सुमारे १५-२० मिनिटे उत्साहाने माहीती दिली आणि त्यांच्या कामांची मुख्यमंत्र्यांनीही कशी दखल घेतली हेही सांगीतले.

(मुख्यमंत्री काही अशासकीय एन जी ओ मार्फत कामाची माहीती मागवीत असतात असे ऐकीवात आहे)

या लेखामालेशी उपयुक्त गीत.

'जलयुक्त'च्या कामांमध्ये सोलापूर पहिल्या स्थानी

सोलापूर - टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. 280 गावे, पूर्ण झालेली 13 हजार 99 कामे आणि प्रगतिपथावर असलेली सहा हजार 217 कामांचा यामध्ये समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व त्यांच्या प्रशासनाने शिस्तबद्ध कार्यक्रम आखला होता.

जलयुक्त शिवार अभियानातून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांना आता दमदार पावसाची अपेक्षा आहे. सोलापूर शेजारी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याने या अभियानाच्या कामात दुसऱ्या क्रमांकावरची बाजी मारली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 217 गावांमध्ये 10 हजार 48 कामे पूर्ण झाली आहेत. 6 हजार 539 कामे प्रगतिपथावर आहेत. राज्याच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक नाशिक जिल्ह्याने मिळविला असून या जिल्ह्यातील 229 गावांमध्ये सहा हजार 529 कामे पूर्ण झाली आहेत तर एक हजार 826 कामे प्रगतिपथावर आहेत.

जिल्हाधिकारी मुंढे यांच्या नेतृत्वातून सोलापूर जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे. विहीर पुनर्भरणाचीही कामे मोठ्या प्रमाणात झाली असून या कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या वर्षी यंदा राज्यातील सहा हजार 202 गावांमध्ये 17 जुलैपर्यंत एक लाख एक हजार 423 कामे पूर्ण झाली आहेत. 32 हजार 753 कामे प्रगतिपथावर आहेत.

महसुली विभागनिहाय जलयुक्त शिवार अभियानाची स्थिती

विभाग गावे पूर्ण कामे प्रगतिपथावरील कामे विभागातील नंबर वन जिल्हा
नाशिक 941 16302 5724 नाशिक
अमरावती 1396 20446 2020 यवतमाळ
नागपूर 1077 11727 2578 चंद्रपूर
पुणे 903 22196 9206 सोलापूर
कोकण 203 3381 1204 पालघर
औरंगाबाद 1682 27371 12021 उस्मानाबाद
(कामांची स्थिती 17 जुलैपर्यंतची)

समाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

अस्वस्थामा's picture

15 Oct 2015 - 6:04 pm | अस्वस्थामा

नाखू मालिका मस्तच चाललीय. माहितीपूर्ण. जर हा भाग पण इतर दोन भागांबरोबर जोडलात तर शोधायला सोपे पडेल असं वाटतं.

सुरेख मालिका होत आहे. धन्यवाद!!

अनुप ढेरे's picture

15 Oct 2015 - 6:12 pm | अनुप ढेरे

छान आहे मालिका!

मुक्त विहारि's picture

15 Oct 2015 - 6:34 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

मदनबाण's picture

15 Oct 2015 - 8:15 pm | मदनबाण

वाचतोय...
एक इडियो आमच्याकडुन बी घ्या,,,

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla

पैसा's picture

16 Oct 2015 - 7:47 pm | पैसा

छान वाटतंय हे सगळं वाचताना.

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2015 - 7:22 pm | प्राची अश्विनी

खूप सुरेख माहिती देताय. पैताई म्हणाल्या तसं वाचून खूप बरं वाटतय.