नवरात्र जल जागर : माळ पाचवी

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
16 Oct 2015 - 6:02 pm

==================================================================

नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...

==================================================================

आजच्या माळेतील श्री दादासाहेब काळे मंडल कृषी अधिकारी (काटोल तालुका)जि.नागपूर यांच्याशी झालेला दूरध्वनी वार्तालापाचा गोषवारा:

संत्रा मोसंबी साठी पाण्याचा वाढता वापर आणि जास्ती खोल कूप नलीका घेण्या साठी लागलेली चढाओढ यात बे सुमार उपसा (भूगर्भातून). याची परीणीती तीव्र पाणी टंचाई मध्ये झाली.
मुळात ग्रामीण भागात एकाच प्रभागात कामे हे वेग-वेग़ळ्या सरकारी यंत्रणांमार्फत राबवली जातात. त्यांचा एकमेकांशी ताळमेळ नसणे आणि सु संवाद नसणे याचा लाभ फक्त ठेकेदारांनाच होतो आणि हानी फक्त आणि फक्त शेतकर्यांना होते.(सरकारी पैशाचा अपव्यय आणि अपहार होतो ते वेगळेच आणि उद्वेगजनक आहेच)

दादा साहेबांना या कृषी विभागात प्रदीर्घ अनुभव आहे.त्यांच्याच शब्दात "काटोल तालुक्यात सुमारे ४००० बंधारे जे बांधले गेले आहेत त्यातील बहुअंशी निकामी व कुचकामी होते कारण
• सदोष पद्धतीने बांधणी
• बंधार्यांचे दरवाजे (पाटे) लोखंडी असल्याने चोरीला जाणे (परिणामी पाणी वाया जाणे)
• बंधारे बांधल्यानंतर त्याची कायमस्वरूपाच्या डागडुजीची व्यवस्था नसणे त्या मुळे बरेचदा ७५% पाणी गळती.
• काही बंधारे जिल्हा परिषद पाणलोट अंतर्गत बांधल्याने त्याची डाग्डुजीची कृषी विभागाला परवानगी नाही. (सरकारी नियम काय करणार ???)
• बर्याच बंधार्यांमध्ये गाळ,राडा-रोडा साठल्याने साठवण क्षमता ५० टक्क्यापेक्षा खालावली होती.

अश्या परिस्थीतीमध्ये नवीन बंधारे, तेही कोल्हापूर पद्धतीचे बांधण्यापेक्षा जुन्याच बंधार्यांचे पुनरूज्जीवन करण्याचे ठरवीले. काही ठिकाणी विस्तारीकरण (उंची वाढविणे, पात्र रूंदीकरण केलेही) पण जास्ती भर ओस आणि ओसाड पडलेल्या बंधार्यांना जिवंत करणे यावर भर दिला.

(हे बंधारे कृषी विभागाचे नसल्याने निधी खर्च करता येत नव्हता, तेव्हा लोक वर्गणीतून हे काम करण्यास लोकांना दादासाहेबांनी प्रव्रुत्त केले व ठेकेदाराला तेथील गाळ काढण्यास सांगून बदल्यात इतरत्र मुरूम मातीची कामे दिली आणि त्याचेही आर्थीक नुकसान टाळले)

नवीन बंधारा बांधण्याचा खर्च साधारण ३,००,०००(तीन लाख रूपये) उंची २ मीटर आणि पाणी साठा क्षमता (बॅक वॉटर) २०० मीटर पर्यंत असलेले काही बंधारे गाळ काढल्याने व उंची वाढविलाने साठवण क्षमता ६०० मीटर पर्यंत वाढली आणि खर्च फक्त ५०,००० (पन्नास हजार रूपये) आला.बचतीची आकडेमोड क.अकाँटंट ट्रुमन ई. साहेबांकडे राखून ठेवतो.

सिमेंट मध्ये बंधारे बांधून काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे दरवाजे चारी न ठेवता उंची वाढविल्याने दरवाजे चोरीला जाण्याची भिती राहिली नाही.

श्री दादा साहेबांचे माहीती नुसार फक्त नागपूर जिल्ह्यात किमान २५००० हजार बंधारे (लहान-मोठे) पुनरूज्जीवन करण्यालायक आहेत. दादासाहेब फक्त काटोल तालुक्याशी संबधीत असल्याने फक्त त्याच तालुक्याची माहीती दिली.

मिपा परिवारचे वतीने मी दादा साहेबांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेतच तुम्हीही द्या ही आग्रहाची विनंती. संपर्क क्रमांक ९४२२१४९२९८

गोंडी दिग्रस शिवारात नांदते आहे जलसंपन्नता
-

जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत झाली विविध कामे
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, हा विश्‍वास सार्थकी लावत सामूहिक प्रयत्नातून दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर पडण्यात गोंडी दिग्रस (ता. काटोल, जि. नागपूर) येथील ग्रामस्थ यशस्वी झाले. ग्रामस्थांची दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि त्याला कृषी विभागाच्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने कधीकाळी अवर्षणग्रस्तांच्या यादीत असलेली हे गाव आज जलसमृद्ध म्हणून नावारूपास आले आहे.

अवर्षणग्रस्त गोंडी दिग्रस
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकरी रासायनिक शेतीबरोबरच नैसर्गिक, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचे प्रयोगही सातत्याने करीत असतात. संत्रा व मोसंबी बागांची संख्या तालुक्‍यात अधिक असल्याने त्याकरिता पाण्याची गरजही शेतकऱ्यांना अधिक भासते; परंतु अलीकडीस काळात तालुक्‍यातील जलस्रोताची पाणीपातळी कमी होत चालली आहे. साहजिकच शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. याच तालुक्‍यातील गोंडी दिग्रस, राजणी ही गावेदेखील अवर्षणग्रस्त गाव म्हणून ओळखली जात होती.

गोंडी दिग्रसला बसले पाणीटंचाईचे चटके
गोंडी दिग्रस गावाची लोकसंख्या दोन हजारांवर आहे. गावाची प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी या परिसरातील जलसंधारणाची कामे कृषी विभाग व जिल्हा परिषदेने संयुक्‍तपणे हाती घेतली. लोकसहभागाची त्यास साथ मिळाली. कामांतर्गत लांडगी नदीला बांध घालण्यात आला. या ठिकाणी जिल्हा परिषदेने कधीकाळी कोल्हापुरी बंधारे घेतले होते. त्याला बसविण्यात आलेले लोखंडी गेट चोरीला गेल्याने पाणी संचय होत नव्हता. पाणी वाहून जात होते. कृषी विभागाकडून या ठिकाणी लोखंडी गेटचा "पॅटर्न' काढून टाकत सिमेंट व वाळूच्या माध्यमातून पक्‍के बांधकाम करण्यात आले. जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे सहकार्य त्यासाठी घेण्यात आले. परिणामी या वर्षीच्या पावसात या बंधाऱ्यात जलसंचय होत, त्याचा वापर शेतीसाठी होऊ लागला. राज्याच्या इतर भागांत पारंपरिक पिकांची उत्पादकता अनिश्‍चिततेच्या फेऱ्यात असताना या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र संरक्षित सिंचनाच्या बळावर पीक उत्पादकतेचा चांगला पल्ला गाठण्याचा विश्‍वास आहे.

गोंडी दिग्रस या गावालगत वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बांध यापूर्वी होते. हे बांध गाळाने बुजलेल्या असल्याने त्याचा जलसंधारणकामी कोणताच उपयोग होत नव्हता. जलयुक्‍त शिवार अभियानातून नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले. एक नाला 220 मीटर, दुसरा 350 मीटर आणि तिसरा 550 मीटरपर्यंत लांबीचा तसेच सरासरी 8 मीटर रुंदीचे तर तीन ते साडेतीन मीटर खोलीकरणाचे काम या ठिकाणी करण्यात आले. गोंडी दिग्रस प्रमाणेच तेथून जवळच असलेल्या राजनी गावानेदेखील अनेकदा दुष्काळाचे चटके सोसले आहेत. पाणी समस्या ही गावाच्या पाचवीलाच पुजलेली. कृषी विभागाने या गावात दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट नाला बांध घेतले होते. त्यानंतर त्याची दुरुस्ती न झाल्याने ते गाळाने बुजले. जलयुक्‍त शिवार अभियानातून सिमेंट नाला बांध दुरुस्तीच्या कामाला हात घालण्यात आला. सहा सिमेंट नाला बांधांचे 2 ते अडीच किलोमीटर लांबीचे व 8 ते 10 मीटर रुंदीचे, 2 ते 3 मीटर खोलीचे नाला खोलीकरणाचे काम तडीस नेण्यात आले, त्यामुळे लगतच्या विहिरीतील पाणीपातळी वाढीस लागली. जुलै महिन्यात पावसाने खंड दिल्यानंतर नाल्यालगत शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी या नाल्यातील पाण्याचा उपसा करीत संरक्षित सिंचनाचा पर्याय निवडला. नाल्यातील गाळ उपसला गेला, तो अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकला, त्यामुळे शेतीची सुपीकताही वाढीस लागली. सिद्धिविनायक ट्रस्टने या भागातील कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. एका अशासकीय संस्थेमार्फत त्या निधीचा विनियोग करीत जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे देखील परिसरात संपन्नता नांदण्यास मदत झाली आहे. विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांच्या मार्गदर्शनात काटोलचे मंडळ कृषी अधिकारी दादासाहेब काळे, कृषी पर्यवेक्षक रामदास खरपकर, कृषी सहायक गुलाबराव रेवतकर यांच्या प्रयत्नातून हे मोठे परिवर्तन घडते आहे.

आम्ही झालो लाभान्वित
"आमच्या शेतालगत वाहणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आलेल्या सिमेंट बांधाची पूर्वी देखभाल व निगा राखण्यात येत नव्हती. परिणामी त्यातील पाणी पुढे वाहून जात त्याचा काही एक उपयोग होत नव्हता. जलयुक्‍त शिवार अभियानातून सिमेंट बांधाची पुनर्बांधणी झाली. या वर्षीच्या पहिल्या पावसात जलसंचय होत परिसरातील पाण्याची पातळी वाढली. आमचे कुटुंब भाजीपाला उत्पादन घेते. त्याकरिता या पाण्याचा उपयोग होत आहे.'
- मंजुळा कुमेरिया,
गोंडी दिग्रस, ता. काटोल, जि. नागपूर

आमचे गाव पाणीटंचाईग्रस्त होते. आता गावात भूजलपाणीपातळी वाढीस लागली. प्रसंगी नाल्यातील पाण्याचा उपसा करून त्याचाही उपयोग संरक्षित सिंचनासारखा करण्यात आला. माझी पाच एकर शेती असून, कपाशी व तूर व दोन एकरांवर संत्रा लागवड आहे. या पिकांकरिता पाण्याचा उपयोग केला आहे.
- हेमराज पुंडलिक महल्ले, पोलिस पाटील राजनी,

"माझ्याकडे जेमतेम दोन एकर शेती. त्यातील उत्पादकता व उत्पन्नाच्या बळावर कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवाव्या लागतात, त्यामुळे अपेक्षित उत्पादकता मिळविण्यावर माझा भर राहतो. त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. गेल्या काही वर्षांत नैसर्गिक कारणांमुळे यात यश आले नाही. या वर्षी मात्र कृषी विभागाच्या पुढाकाराने जलयुक्‍त शिवार अभियानातून नाल्यात पाणी संचय उपलब्ध झाला. त्यातील पाण्याचा उपयोग करीत अपेक्षित उत्पादकतेचा हेतू साधता आला.
- अशोक संतोष काळे,

"माझ्या कुटुंबीयाची 1 हेक्टर 54 आर एवढी अत्यल्प जमीनधारणा. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे व्यावसायिक पीक घेणे शक्‍य होत नाही. त्यामुळे कपाशीसारख्या पारंपरिक पिकावरच भिस्त असताना त्याचीही उत्पादकता अपेक्षित मिळत नाही. कपाशी पीक फुलावर असताना व बोंडे धरण्याच्या कालावधीत पाण्याची गरज भागविण्याचा स्रोतच नव्हता. जलयुक्‍त शिवारमुळे असा स्रोत उपलब्ध झाला आणि या वर्षी अपेक्षित उत्पादकतेचा विश्‍वास नाही तर आत्मविश्‍वास आहे.'
- दिलीप कृष्णाजी बागडे.

"माझ्या कुटुंबीयांची सहा एकर शेती. मोसंबी, कपाशी, तूर यासारखी पिके त्यात आहे. फळबागा जगविण्याकरिता पाण्याची गरज भासते. परिसरात जलसंधारणाची कामे झाल्याने आता आमच्या शेतातील विहीर व बोअरवेलचे जलस्रोत अधिक बळकट झाले आहेत.
- हेमराज सूर्यभान उकंडे

पर्जन्यमान दृष्टिक्षेपात
- 774 मि.मी. सरासरी पर्जन्यमान, पावसाचे दिवस 42.

संपर्क -
दादासाहेब काळे-9422149298
मंडल कृषी अधिकारी

समाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

वाचतोय. यातील सर्वच क्रमांकांशी संपर्क साधून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

मुक्त विहारि's picture

16 Oct 2015 - 7:44 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2015 - 1:12 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच स्पृहणिय काम चालले आहे. त्याची ओळख करून देत असल्याबद्दल धन्यवाद !

मार्गी's picture

17 Oct 2015 - 8:19 am | मार्गी

महत्त्वाचे कार्य! हार्दिक शुभेच्छा!

आतिवास's picture

17 Oct 2015 - 10:46 am | आतिवास

माहितीपूर्ण लेखमालिका.
वाचते आहे, नावं आणि संपर्क क्रमांकांची माहिती उपयुक्त आहे.

जगप्रवासी's picture

17 Oct 2015 - 11:45 am | जगप्रवासी

त्या काम करणाऱ्या लोकांसोबत हि माहिती आमच्या सारख्या पर्यंत पोहोचवणाऱ्या तुमच पण कौतुक

आज सरतेशेवटी महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजना मात्र दुष्काळसदृश्य परिस्थितीत केल्या जाणार्‍याच असणार आहेत.

तुमची कळकळ थोडी आमच्या अंगी पण येवो...!!

परत एकदा धन्यवाद....!!

पैसा's picture

20 Oct 2015 - 10:24 am | पैसा

_/\_

धन्यवाद नाखु!