शोध राजीव हत्येचा भाग-२
21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या.
घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते. जो नाही तो एकमेकांशीच बोलुन खातरजमा करून घेत होता.