तत्त्वभान
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे.