कुत्तेकी मौत

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
7 May 2015 - 8:50 pm
गाभा: 

सलमान खानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना गायक अभिजित याने असे ट्वीट केले की कुत्ता रोड पे सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा.
ही भाषा आक्षेपार्ह वाटली तरी त्यात थोडे तरी तथ्य आहे. खुलासा: सलमान खानची शिक्षा कमी व्हावी, त्याचे बाकी कर्तृत्व बघून त्याला माफ करावे वगैरे मला वाटत नाही. जे जे कायदे मोडले आहेत त्याची त्याला पूर्ण शिक्षा मिळावी.
परंतू फुटपाथवर झोपणे हे सुरक्षित आहे का? झोपाळलेला ड्रायवर, नवशिका ड्रायवर, फोन वा अन्य कारणाने लक्ष विचलित झालेला ड्रायवर आणि अर्थात नशा केलेला ड्रायवर ह्यामुळेही असा अपघात होऊ शकतो. ब्रेक निकामी होणे, टायर फुटणे हीही कारणे वाहन फुटपाथवर चढवण्यास कारणीभूत होऊ शकतात. प्रत्येक वेळी एक उन्मत्त, मद्यपान केलेला अभिनेता अशा अपघाताला जबाबदार असेल असे नाही. आणि एकदा का वाहन फुटपाथवर चढले की माणसाचा जीव धोक्यात जाणारच. मग नक्की चूक कुणाची वगैरे गोष्टी गौण आहेत. वेगात असणारे वाहन आणि झोपलेला माणूस ही अत्यंत एकतर्फी लढत आहे हे उघड आहे.

फुटपाथवर झोपणे बेकायदेशीर आहे ह्याला निव्वळ निष्ठूरपणा कारणीभूत नाही. फूटपाथ ही अत्यंत अपघातप्रवण जागा आहे. चालणारा माणूस असेल तर कदाचित थोडा जागरूक असेल त्याला कदाचित स्वतःचा बचाव करता येईल पण झोपलेला काय करणार?
त्यामुळे फुटपाथवर झोपणार्‍या आणि झोपू देणार्‍या लोकांचीही चूक आहे.
जर कुणाला फूटपाथ हे खरोख्रच गरीबांना झोपण्याकरता खुले करायचे असतील तर मग ह्या झोपेच्या वेळेत रस्त्यावरील वाहतूक पूर्ण थांबवावी आणि मग खुशाल लोकांना झोपू द्यावे. पण हा पर्याय किती व्यवहार्य आहे ह्याबाबत मी साशंक आहे.

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2015 - 9:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा धागा अजुन कसा आला नाही ह्यावर काल व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चा झाली.

हुप्प्या's picture

7 May 2015 - 10:04 pm | हुप्प्या

दुर्दैवाने ह्या उद्बोधक चर्चेला मुकलो.
मग आता धागा आल्यावर कसली चर्चा होणार? जरूर कळवा.

जेपी's picture

7 May 2015 - 9:14 pm | जेपी

=))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 May 2015 - 9:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सलमानचे गणपती प्रेम्,नरेंद्रशी असलेली जवळीक ह्यामुळे विकास्,हुप्प्या,क्लिंटन व श्रीगुरुजी ह्या विषयावर धागा काढ्णार नाहीत ह्यावर ह्यांनी पैज लावली होती. पण माझ्या अंदाजाप्रमाणे धागा आलाच.

त्यामुळे फुटपाथवर झोपणार्‍या आणि झोपू देणार्‍या लोकांचीही चूक आहे

सहमत. पण देशात गरीबांची असलेली संख्या व प्रमाणाबाहेर झालेले शहरीकरण्ही कारणीभूत आहे. असो.
देशाच्या पंतप्रधानाने असे गंभीर गुन्हे असलेल्या व्यक्तीबरोबर पतंग उडवू नयेत असे ह्यांचे मत.
patamg
(हाच सलमान राहूल गांधी ह्याचा मित्र असता तर तुमचा तो अ‍ॅपचा सर्वर डाउन झाला असता असे माझे मत)

हुप्प्या's picture

7 May 2015 - 10:10 pm | हुप्प्या

अग मायडे, जिथे तिथे तुला मोदीच का दिसतो गं? परपुरुषाबद्दल सारखा असा विचार करणे शोभते का तुला? जरा कुरसुंदीकर घराण्याच्या इभ्रतीचा काही विचार?
असो. निदान एवढे तरी मान्य करशील की सलमानने हा अपघात / गुन्हा मोदींशी सख्य व्हायच्या आधी केला होता त्यामुळे त्या घटनेला तरी मोदी जबाबदार नाहीत.
राहुलची काळजी नसावी. कृपाशंकर, वडरा, कोडा वगैरे त्यांचा सर्वर डाऊन करायला समर्थ आहेत!

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 10:59 pm | टवाळ कार्टा

देशाच्या पंतप्रधानाने असे गंभीर गुन्हे असलेल्या व्यक्तीबरोबर पतंग उडवू नयेत असे ह्यांचे मत.

आपण आजपासून माईंच्या ह्यांचे फॅन ....अतिशय सहमत

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2015 - 11:02 pm | प्रसाद गोडबोले

हा फोटो काढला तेव्हा सलमान चा गुन्हा कायद्याने सिध्द झालेला नव्हता . आणि माझ्या माहीती नुसार आपला कायदा गुन्हा सिध्द होत नाही तोवर प्रत्येकाला निर्दोषच मानतो !!

आता कधी काळी नरेन्द्र मोदी ह्यांन्नी सलमान बरोबर पतंग उडवला होता हे एवढे एक सोडले तर मोदींचा काय संबंध आहे इथे ?

मिसळपाव वर अशा अत्यंत व्यक्तीद्वेषी विखारी विचारसरणीवर कारवाई होणार की ह्यांन्ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोकळे सोडले जाणार ?

संपादकीय कारवाईच्या प्रतिक्षेत !!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 May 2015 - 8:21 am | माईसाहेब कुरसूंदीकर

बाबा रे प्रगो, अरे तो फोटो जानेवारीतला आहे.
http://indiatoday.intoday.in/story/salman-khan-and-narendra-modi-can-be-...
नरेंद्रच्या ऐवजी फोटोत राहूल असता तर 'गुन्हा सिद्ध झाला नव्हता,फूटपाथवर झोपणे चुकीचे आहे..' अशा प्रकारची वाक्ये येथे आली असती का? थंडपणे विचार करून पहा.
मोदींच्या ऐवजी राहूल पतंग उडवत असता सलमानबरोबर तर आंतर्जालावर एव्हाना केवढी चर्चा झाली असती,कोणी किती बौद्धिके घेतली असती ह्याचाही विचार करून पहा.

पैसा's picture

8 May 2015 - 10:45 am | पैसा

1

Please Do not feed the Trolls.
.
.
.
.

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 10:51 am | सतिश गावडे

या चिन्हाचा अर्था काय म्हणायचा?

कपिलमुनी's picture

8 May 2015 - 4:35 pm | कपिलमुनी

ट्रोल असला तरी पाँइट बरोबर आहे.
श्रीगुरुजी सुद्धा जिथे तिथे भाजपाच्या अक्षता वाटत फिरतात . पण तिथे संपादकीय कारवाईची मागणी होत नाही

बॅटमॅन's picture

8 May 2015 - 6:02 pm | बॅटमॅन

अगदी सहमत. हा बायस आहेच.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2015 - 6:20 pm | llपुण्याचे पेशवेll

पॉइंट बरोबर आहेच पण पैसा ताईनी ट्रोलचा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण हेच असावे की धागा रस्त्यावर झोपणार्‍यांच्या सुरक्शिततेची चिंता करणारा आहे आणि प्रतिसाद मोदीनी कोणाबरोबर पतंग उडवावा या विषयावर येत आहेत.

पैसा's picture

12 May 2015 - 8:17 am | पैसा

पर्फेक्ट!

इरसाल's picture

13 May 2015 - 3:53 pm | इरसाल

माईडी म्हणजेच काऊडी की कॉय ?

hitesh's picture

29 May 2015 - 6:22 am | hitesh

मी नाना नाही.

मी माई नाही

आशु जोग's picture

19 Jun 2015 - 12:21 am | आशु जोग

नवी माहिती भेटली

संदीप डांगे's picture

7 May 2015 - 10:12 pm | संदीप डांगे

आम्हाला आमचे अनुभव सांगायची फार घाण खोड आहे बुवा. घ्या हा एक किस्सा:

स्थळः जगप्रसिद्ध व श्रीमंत लोकांनी खच्चून भरलेले, तेच हो आपले सलमान खानचे बांद्रा.
वेळः रात्रीचे तीन वाजलेले.

मातोश्रीच्या बाजूला लागून आमचे होस्टेल आहे. आमच्या गणेशोत्सवाची सजावट आणि रंगरंगोटी रात्रंदिवस चालते. अशाच एका रात्री आम्ही आठ दहा पोरं कलानगर स्टॉपवर, मुख्य मोठ्या रस्त्यावर आलो. मुंबईतले रात्रीचे जगप्रसिद्ध आश्रयस्थान बिहारी/भैय्याची सायकल-टपरी. फूटपाथ वर रांगेत बसून आम्ही चहा, कॉफी, सिगरेट व गप्पा हाणत बसलेलो. डोळ्याचे पाते लवते न लवते तेवढ्यात अगदी समोर ३०-४० फूटांवर एक होंडा अकॉर्ड भरधाव येऊन लोखंडी डीवायडरवर चढली. खर्रर्रर्र....खाट खाट. २०-३० सेकंदासाठी सगळे वातावरण थंडगार. मद्यधुंद ड्रायवरने गाडी झर्रकन मागे घेतली, परत गीअर टाकला, ज्या वेगात आपटला त्या सुस्साट वेगात वेडीवाकडी वळणे घेत पश्चिम बांद्राकडे भरधाव गायबला.

आता विचार करा. इथे आम्ही फूटपाथवर उभे आहोत. काही ध्यानी मनी नसतांना ती कार आमच्यावर येऊन आदळली असती तर वरच्या लेखातलं नेमकं काय लागू झालं असतं?

झोपाळलेला ड्रायवर, नवशिका ड्रायवर, फोन वा अन्य कारणाने लक्ष विचलित झालेला ड्रायवर आणि अर्थात नशा केलेला ड्रायवर ह्यामुळेही असा अपघात होऊ शकतो.

ह्या सगळ्या गोष्टी अजिबात घडू नये म्हणून ३६५ दिवस सरकार आम्हा गरिबांचा पैसा खर्च करून गाडीवाल्यांना बोम्बलून बोम्बलून सांगत असते. तरीही हे घडत असेल, त्यातून कुणाचा जीव जात असेल तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो. तो तसा का ठरतो हे तरी आता समजले असेल. वर असे करणारे फक्त फूटपाथवरच्यांचाच जीव घेऊ शकतात हा विचार तर जस्ट भन्नाट.

ब्रेक निकामी होणे, टायर फुटणे हीही कारणे वाहन फुटपाथवर चढवण्यास कारणीभूत होऊ शकतात.

हे निव्वळ अपघात आहेत. यात चालकाने स्वत:हून केलेली कोणतीही चूक नसते. तरीही प्रवासाआधी किंवा नियमीत चेक-अप करून हे पण १००% टाळता येतं.

फूटपाथवर माणूस झोपू दे, नाचू दे, काही ही करू दे. कुणासही त्याला चिरडण्याचा व चिरडल्यावर माजण्याचा हक्क नाहीए म्हणजे नाहीए. बस इतनाही कहना है.....

(चांगल्या कामांसाठी देश पारितोषिकं देतो तसंच वाईट कामांसाठी शिक्षा. त्यात मनाला लावून घेण्यासारखं काय आहे?)

जिन्क्स's picture

8 May 2015 - 11:14 am | जिन्क्स

प्रचंड सहमत

मोनू's picture

8 May 2015 - 4:07 pm | मोनू

अगदी सहमत +१११११

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 May 2015 - 5:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे आणि फक्त हेचः

फूटपाथवर माणूस झोपू दे, नाचू दे, काही ही करू दे. कुणासही त्याला चिरडण्याचा व चिरडल्यावर माजण्याचा हक्क नाहीए म्हणजे नाहीए. बस इतनाही कहना है.....

हुप्प्या's picture

10 May 2015 - 2:24 am | हुप्प्या

>>फूटपाथवर माणूस झोपू दे, नाचू दे, काही ही करू दे. कुणासही त्याला चिरडण्याचा व चिरडल्यावर माजण्याचा हक्क नाहीए म्हणजे नाहीए. बस इतनाही कहना है.....
<<
एक डाय्लाग म्हणून टाळ्या खेचक वाक्य आहे. पण तर्कसंगत नाही. म्हणजे, आम्ही आगीसमोर नाचणार, गाणार, झोपणार. अगदी आगीच्या जवळ जाऊन तिच्याशी खेळ करणार पण आगीला आम्हाला जाळायचा हक्क नाही असे म्हणण्यासारखे आहे. समजा रस्त्यावर कुणाच्या वाहनातले तेल सांडले आहे किंवा अनपेक्षित पाऊस पडून रस्ता निसरडा झाला आहे. आता एखादा नवखा ड्रायवर अशा रस्त्यावरून घसरला आणि वाहन पदपथावर चढले तर हक्काने पदपथावर नाचणारे वा अन्य काही करणारे ह्यावर काय उपाय करणार?
अशा प्रकारे वाहनाचे नियंत्रण गमावणारे लोक खुनशीपणाने, फुटपाथवरील डझनवारी लोक चिरडून मारू याच अशा विचाराने फुटपाथवर वाहन चढवत नाहीत. अगदी सलमाननेही तसे केले असेल असे वाटत नाही. भारतातील रस्त्यांचा दर्जा, रस्त्यांची रुंदी, वेग, गर्दी, वाहतुकीचे नियम, लायसन मिळवण्याकरता लावलेली जात असणारी कसोटी हे बघता फुटपाथ हे असुरक्षित आहेत ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला ती अट्टाहासाने अमान्य करायची असेल तर आनंद आहे.
१००% चुका टाळता येतात हा दावा बिनबुडाचा आणि खोटारडा आहे. जशी वाहनांची संख्या वाढते तेव्हा कुठलीही चूक नसताना अपघात होण्याची शक्यताही वाढते. सरकार बोंबलून सांगते वगैरे दावे खोटे आहेत. आर टी ओ सारखे विभाग अमाप भ्रष्टाचारी आहेत. कुणाला कुठल्या वाहनाचे लायसन द्यायचे, नियम कसे बनवायचे, रस्त्यावरील चिन्हे कितपत ठळक करायची, रस्त्यावरील खड्डे, खोदकामे करताना काय खबरदारी घ्यायची ह्या बाबतीत आनंद आहे. रस्त्यावरील दिव्यांचीही तीच तर्हा. ही सगळी वस्तुस्थिती असताना पदपथ सुरक्षित असावेत असे मानणे खुळचटपणाचे आहे.

संदीप डांगे's picture

10 May 2015 - 5:38 am | संदीप डांगे

ठीक आहे. सलमान बाळ दुदु पीऊन अशं गाली गाली खेलत ओतं, लोकंश मदे आली. वेलेश आएत. मला कल्लं सगलं.

नगरीनिरंजन's picture

10 May 2015 - 5:47 am | नगरीनिरंजन

तर्कट अजब आहे! एकतर गाड्यांसाठी एवढाल्या जमिनीवर डांबर ओतून रस्ते करुनही गाडी त्या रस्त्यांवरच ठेवणे अवघड जात असेल तर गाडी घेऊ नये असं का बरं म्हणत नाही तुम्ही?
फुटपाथवर झोपणारे हौसेने तिथे झोपायला जातात असा समज आहे की काय तुमचा?

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2015 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. फूटपाथ आमच्या सारख्या करदात्यांना चालण्यासाठी आहेत. फुकट्यांना झोपण्यासाठी किंवा हातगाड्या बेकायदा स्टॉल लावण्यासाठी नाहीत.
कोणाला काय म्हणायचंय ते म्हणूदेत पदपथावर कायम झोपणार्‍यांचे समर्थन नाही होऊ शकत.
रहायला घर नाही म्हणून पदपथावर झोपतात. तिथे यांना पोरे होतात. रहायला घर नाही म्हणून ते नाही थांबत. उगाचच याच्यावर फूटपाथ उंच करणे असले फालतू उपाय करण्यापेक्षा लोक फुटपाथवर येऊन झोपणार नाहीत त्याना त्यांच्या गावात राहत्या घरी राहून इमानदारीने काम करून रोजगार मिळेल अशी योजना सरकारने करावी यासाठी सरकार्वर दबाव आणला पाहीजे.

अनुप ढेरे's picture

7 May 2015 - 11:48 pm | अनुप ढेरे

काही अंशी सहमत आहे. फक्त अभिजीतनी भाषा चुकीची वापरली. दारू प्यालेला नसताना हे घडलं असत आणि नॉर्मल वेगात जात असता, तर शिक्षा होउ नये अस वाटलं असतं.

विकास's picture

8 May 2015 - 12:05 am | विकास

दारू प्यालेला नसताना हे घडलं असत आणि नॉर्मल वेगात जात असता, तर शिक्षा होउ नये अस वाटलं असतं.

सहमत. नुसताच दारू पिऊन अपघात झाला नाही, तर सरळ घरी पळून गेला. रविन्द्र पाटीलचे व्यक्तीगत हाल केले नसले तरी तो (सलमान) त्याला देखील नक्कीच जबाबदार आहे.

नंतरच्या काळात त्याचे वर्तन बरेच बदलले असे वाटते. अर्थात तरी देखील शिक्षा कायद्याप्रमाणेच होणे महत्वाचे होते. तसे झाले याचे स्वागतच आहे.

राहता राहीला बेघर माणसांचा प्रश्न. त्यांनी नक्की कुठे जावे असे म्हणणे आहे? त्यांच्या साठी सरकार जाउंदेत समाज काही करतो आहे का?

येडाफुफाटा's picture

8 May 2015 - 1:30 am | येडाफुफाटा

ती पण सलमानच्या पी आर+ वकील यांची स्ट्रेटेजी आहे लोकोपयोगी(?) कामे करुन सहानुभूती मिळवावी व शिक्षा कमी करवून घ्यावी. संजूबाबाने पण हीच स्ट्रेटेजी वापरली होतीं.

हुप्प्या's picture

11 May 2015 - 3:56 am | हुप्प्या

सलमानचे पळून जाणे मलाही खटकले होते. पण एक बचाव असा की बघे लोकांचा समूह बिथरला होता. तो सलमानवर चाल करून येत होता. असा हिंस्र समुदाय अंगावर येत असेल तर पळून जाणे फार चूक वाटत नाही.
एक तर अभिनेता म्हणजे त्याची शारिरिक तंदुरुस्ती फारच महत्त्वाची. जर मार खाऊन हात मोडला, डोळा सुजला तर त्यांच्या शुटींगच्या टाईमटेबलचा बट्ट्याबोळ. रात्री अडीचची वेळ त्यामुळे संतापलेला जमाव काय करेल ह्याचा नेम नाही त्यामुळे पळून जाणे मला इतके चूक वाटत नाही.

मराठी_माणूस's picture

11 May 2015 - 5:00 pm | मराठी_माणूस

पण एक बचाव असा की बघे लोकांचा समूह बिथरला होता. तो सलमानवर चाल करून येत होता. असा हिंस्र समुदाय अंगावर येत असेल तर पळून जाणे फार चूक वाटत नाही.

परवाचा ह्याच समुदायाचा त्याला बेल मिळाल्यावरचा आचरट आणि बिनडोक उन्माद बघता असे काही होईल असे वाटत नाही, किंबहुना तो समुदाय त्याला डोक्यावर घेउन नाचला असता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2015 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिनडोक उन्मादाशी सहमत.

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2015 - 6:32 pm | llपुण्याचे पेशवेll

मग तो तिथून पळून सुरक्षित ठिकाणी जाऊन पोलिसांना तसे सांगू शकला असता. माझ्या पाहण्यात सातारा रस्त्यावर अशी घटना घडली होती. ज्या गाडीने २ चाकी वाल्याला उडवले तो तिथून पळून पुढे पेट्रोल पंपावर गेला व तिथून पोलिसाना फोन केला. व घटनेची माहीती दिली. जिविताच्या हानीमुळे घटना स्थळी न थांबता पुढे सुरक्षित स्थळी येऊन पोलिसाना सांगितले. सलमान दारू ढोसलेला असल्याने असे करू शकला नाही हे नक्कि.
आणि हो सलमानशेजारी त्याचा सशस्त्र अंगरक्षक होता. त्याला जिविताची भिती बाळगायचे कारण नव्हते.

खंडेराव's picture

13 May 2015 - 4:51 pm | खंडेराव

आणि तो ही शासकिय अंगरक्षक..हे काही पटत नाही कि तो घाबरुन पळाला असेल.

तिमा's picture

8 May 2015 - 9:29 am | तिमा

सगळेच विकॄत ! बॉलिवुड, नेते, जनता. सर्व समाजच विकृत झालाय.

भुमन्यु's picture

13 May 2015 - 2:32 pm | भुमन्यु

सर्व समाजच विकृत झालाय.

म्हणुनच डब केलेले दाक्षिणात्य सिनेमे इतके टी.आर.पी खेचु शकतात.

मृत्युन्जय's picture

8 May 2015 - 11:04 am | मृत्युन्जय

सगळे प्रतिसाद वाचले. मोदी - सलमान हा अँगल देउन धागा भलतीकडेच वळवण्याचा किळसवाणा प्रकारही वाचला. मुख्य गोष्ट कुणीच लक्षात घेतली नाही ती "अभिजीत " नावाच्या एका थर्ड ग्रेड गवय्याने केलेली एक किळसवाणी कमेंट. "कुत्ता रोड पे सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा.". म्हणजे यात नाइलाजाने रस्त्यावर झोपलेली माणसे म्हणजे "कुत्रे"???. इतकी भावनाशून्यता? इतका निर्लज्जपणा? इतका पैशाचा माज? इतकी संवेदनहीनता? कुठुन आली ही माजोरी? आणी का? कशाच्या समर्थनासाठी? दारु पिउन लोकांच्या अंगावर गाडी चढवणार्‍या माजोरड्यांसाठी. इज इट बिइंग ह्युमन?

कपिलमुनी's picture

8 May 2015 - 4:38 pm | कपिलमुनी

अभिजीत ला नाहीत कामे .
काही तरी करून प्रसिद्धी मिळवायच्या मागे आहे.

अशा लोकांच्या विधानाची दखल घेउन त्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे

स्मिता श्रीपाद's picture

8 May 2015 - 11:06 am | स्मिता श्रीपाद

>>फूटपाथवर माणूस झोपू दे, नाचू दे, काही ही करू दे. कुणासही त्याला चिरडण्याचा व चिरडल्यावर माजण्याचा हक्क नाहीए म्हणजे नाहीए. बस इतनाही कहना है>> +१११११११११११११

आशु जोग's picture

8 May 2015 - 12:19 pm | आशु जोग

हुप्प्या आपलं ठरलं होतं ना पेपरची कात्रणं चिकटवायची नाहीत म्हणून

आशु जोग's picture

8 May 2015 - 12:20 pm | आशु जोग

विनोद जाऊद्या पण फेबुवर बात्म्या शेयर करणे आणि मिसळीवर चिकटवणे यात काहीतरी फरक ठेवा

हुप्प्या's picture

8 May 2015 - 5:08 pm | हुप्प्या

आवडत नसेल तर कटा ना दुसरीकडे. ज्यांंना रूची आहे त्यांना सहभागी होऊ द्या. आपण इथे येऊन आवर्जून एक किळसवाणी पि़क टाकावी असा आग्रह मी तरी केलेला नाही. असला लोचटपणा करून आपल्याला नक्की काय आनंद मिळतो आहे?
आपला सल्ला योग्य जागी रवाना केला आहे ह्याची खात्री बाळगा!

प्रशांत हेबारे's picture

8 May 2015 - 12:23 pm | प्रशांत हेबारे

अभिजित ला थोडी तरी अक्कल असेल असे वाटते. फुटपाथ हा झोपण्यासाठी नसतो हे बरोबर आहे. पण तो drive करण्यासाठी सुधा नसतो.

सुबोध खरे's picture

8 May 2015 - 12:38 pm | सुबोध खरे

यात नाइलाजाने रस्त्यावर झोपलेली माणसे म्हणजे "कुत्रे"???. इतकी भावनाशून्यता? इतका निर्लज्जपणा? इतका पैशाचा माज? इतकी संवेदनहीनता? कुठुन आली ही माजोरी? आणी का? कशाच्या समर्थनासाठी?
अगदी अगदी

एक तर दोन ठिकाणी चढेपर्यंत दारू प्यायली ( हा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य केले तरी) मग गाडी का चालविली? ती सुद्धा ९० -१०० किमी ताशी वेगाने.आणि त्याला अंगरक्षक पोलिस शिपाई पाटील सांगत असताना हि त्याने गाडी चालविली हा वेग मुंबईतील कोणत्याही रस्त्यावर "नॉर्मल"नाही. ( कदाचित द्रुतगतीमार्ग सोडून). असे केल्यावर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला त्याबद्दल सिनेमातील व्यक्तींना बिइंग ह्युमनचा कळवळा. एकेकाला फटके मारले पाहिजेत.
रस्त्यावर झोपू नये हे मान्य पण जर हीच माणसे तिथे चहा पीत बसलेली असती तर काय म्हणणार? अभिजित सारख्या तिसर्या दर्ज्याच्या माणसाची अशी काय लायकी आहे?
विचार करा दिवस उजेडी देखील एखादा माणूस दारू न पिता १०० किमी वेगाने गाडी चालवेल आणि एखाद्याचा जीव घेईल तर त्याला माफ करावे? अजिबात न पटणारे विधान. या वेगाने शहरात गाडी चालविणे हाच बेजबाबदार पणा आहे. मग यात एखाद्याचा जीव गेला तर त्याला माफी का द्यायची?

हुप्प्या's picture

8 May 2015 - 5:15 pm | हुप्प्या

गप्पा मारणारा माणूस, चहा पिणारा माणूस, चालणारा माणूस हा झोपलेल्या माणसापेक्षा जास्त जागरूक असतो. त्याला वेगाने येणारी कार डोळ्याने दिसू शकते, ऐकू येऊ शकते आणि "कदाचित" त्यापासून दूर पळता येऊ शकते. झोपलेल्याला तसे काही शक्य नसते. अर्थात हे सगळे १००% खात्रीचे नाही. आणि लहान मुले आणि म्हातारे लोक जास्त असुरक्षित असणार हेही खरे. पण झोपलेले असतील तर आणखी जास्त असुरक्षित हेही खरे.
दारू पिऊन तुफान वेगाने गाडी चालवल्यास कडक दंड झाला पाहिजे, लायसन कायमचा रद्द झाला पाहिजे आणि तुरुंगवासही व्हायला हवा. सलमानच्या बाबतीत म्हणाय्चे तर त्याला कफल्लक व्हावे लागेल इतका दंड केला पाहिजे आणि शिवाय तुरुंग तरच शिक्षेला अर्थ आहे. संजय दत्तकडे बघून ह्याची खात्री आहे की सलमानही फर्लो आणि पॅरोलचे रतीब सुरू करेल आणि शिक्षा धाब्यावर बसवेल.

मंदार दिलीप जोशी's picture

8 May 2015 - 12:48 pm | मंदार दिलीप जोशी

या एकंदर विषयावर प्रतिक्रिया या लिंकवर
http://mandarvichar.blogspot.in/2015/05/blog-post.html

कोणीही फुट्पाथ वर हौसेने झोपत नाहीत हो !!

अभिरुप's picture

8 May 2015 - 3:26 pm | अभिरुप

या वेगाने शहरात गाडी चालविणे हाच बेजबाबदार पणा आहे. मग यात एखाद्याचा जीव गेला तर त्याला माफी का द्यायची?

>>प्रचंड सहमत...म्हणे सलमान खानने बराच दानधर्म केला आहे... पण कधीपासून??? सौ चूहे खाके बिल्ली चली हज....
काळवीट प्रकरण्,ऐश्वर्या राय प्रकरण आणि अशी कित्येक प्रकरणे असतील जी सामान्य जनतेला माहितसुद्धा नसतील. लोकांना हे का कळत नाही की हा माणूस एक गुन्हेगार आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 May 2015 - 5:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नाही मी काय म्हणतो..
तसाचं विचार केला तर, डॉ. प्रकाश आमट्यांना एक ८-१० खुन माफ करायला हरकत नाही. काय म्हणता?

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 6:42 pm | संदीप डांगे

हो ना.

माझ्या कडे लिस्ट तयार आहे. देउ का पाठवून....? सार्वजनिक स्वच्छता अभियान होऊन जाऊ दे एकदाचे च्यामारी.

सुबोध खरे's picture

8 May 2015 - 6:56 pm | सुबोध खरे

, डॉ. प्रकाश आमट्यांना एक ८-१० खुन माफ करायला हरकत नाही
२०० टक्के सहमत

मदनबाण's picture

10 May 2015 - 9:34 am | मदनबाण

+५०० टक्के सहमत !
अजुन इथे :-
Hit and run affirms Salman Khan's amazing record: Three convictions, six days in jail
Bail, no jail: Salman case puts question mark over legal process
बाकी सलमानचे काळवीट शिकारीचे प्रकरण तुम्हाला माहित आहे का ?
काही व्हिडीयो...

आजची स्वाक्षरी :- An open letter: Salman Khan is ‘law abusing son of a rich’, ‘woman beater’, ‘miserable drunk’!

मना सज्जना's picture

8 May 2015 - 8:18 pm | मना सज्जना

फूटपाथवर माणूस झोपू दे, नाचू दे, काही ही करू दे. कुणासही त्याला चिरडण्याचा व चिरडल्यावर माजण्याचा हक्क नाहीए म्हणजे नाहीए. बस इतनाही कहना है.....

(चांगल्या कामांसाठी देश पारितोषिकं देतो तसंच वाईट कामांसाठी शिक्षा. त्यात मनाला लावून घेण्यासारखं काय आहे?)

विवेकपटाईत's picture

11 May 2015 - 10:08 pm | विवेकपटाईत

१. कुणीही स्वखुशीने फुटपाथवर झोपत नाही.
२. पोटाची भूक त्याला शहरात आणते.
३. न्याय देवते समोर कुणीही लहान मोठे नाही. मग सलमान असो व आमटे.

विकास's picture

11 May 2015 - 10:16 pm | विकास

न्याय देवते समोर कुणीही लहान मोठे नाही. मग सलमान असो व आमटे.

अपवाद कदाचीत जयललिता? त्या मोठ्या आहेत.

काळा पहाड's picture

11 May 2015 - 11:31 pm | काळा पहाड

त्या मोठ्या आहेत.

शब्द चुकला. त्या विशाल आहेत.

विकास's picture

12 May 2015 - 7:32 am | विकास

सहमत.

या पुढे मदर्स डे नंतरचा सोमवार हा अम्माडे म्हणून साजरा करण्यात येईल.

त्या विशाल आहेत

डिस्प्रपोर्शनेट अ‍ॅसेट्सचा निकष लागू होतो, खरे म्हणजे!!

विकास's picture

12 May 2015 - 9:17 am | विकास

____/\____

=))

बॅटमॅन's picture

13 May 2015 - 2:37 pm | बॅटमॅन

ते व्यंगचित्र पाहिलेत का? न्यायदेवतेच्या हातातील तराजूची पारडी जयललिता कर्णभूषणे म्हणून घालते. अफाट आहे!

विकास's picture

29 May 2015 - 4:29 am | विकास

वरील सरकारी उत्तरातून प्रश्नच निर्माण होतात...

ही आग महाराष्ट्रातील युपिएच्या काळातील (मला वाटते पृथ्वीराजांच्या कालखंडातच) लागली होती. तेंव्हा ही बातमी कशी बाहेर आली नाही?

सलमानच्या कथीत गुन्ह्यांच्या फायली मंत्रालयात काय करत होत्या?

अशा इतर कथीत/सिद्ध झालेल्या गुन्हेगारांच्या फायली पण मंत्रालयात ठेवतात का?

तशा जर ठेवल्या गेल्या असल्या तर अजून नक्की काय काय जळले?

त्याहूनही महत्वाचे - (जळल्या - जळल्या मुद्दा दूर ठेवा) कोर्टाच्या निकालात या फायलींचा संदर्भ कसा नाही?

सलमानची हिट अ‍ॅन्ड रन केस ही मोठी केस स्टडी होणार आहे ! या एकाच केस मधे काय काय महान शोध / दावे करण्यात आले ते समजुन घेताना मेंदुच्या आकलन क्षमतेची परि़क्षाच ठरणार आहे !
आता :- सलमानच्या हिट अॅण्ड रनच्या फाईल मंत्रालयात नव्हे; तर पोलीस ठाण्यात होत्या: गृहराज्यमंत्री
बाकी या सलमानच्या खटल्या संबंधी कागदपत्रे गहाळ होण्याची घटना / बातमी काही नविन नाही, या आधीही हे घडले आहेच.
संदर्भ :-
It Took Cops 60 Hours to Find Salman Khan's Missing Case Papers
Trial in Salman Khan hit-and-run case to resume, ‘missing’ documents produced

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.net

सुशांतला न्याय द्या; सलमान खान विरोधात २९ लाख लोकांनी केल्या सह्या
आज या बातमीमुळे का कोणास ठावूक पण हा धागा आठवला !

असाच अजुन एक धागा देखील आहे :- रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Photo of the Day: India's Rama takes on China's dragon :- Taiwan News