मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.
सदस्य मित्र मैत्रिणींनो,
सदस्य मित्र मैत्रिणींनो,
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.
पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत.
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो.
मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' .... च्या, जुन्या-जाणत्या आयडींना छपरी प्रतिसाद टाकून चिथवशील तर ब्लॉक करीन !' तेंव्हापासनं तू फक्त गोग्गोड लिहू लागलास.
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693
नमस्कार मंडळी,
मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो.
नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे.
अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.
ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन
मित्रांनो,
गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर.
सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.
(५ सेकंद कॅमेर्याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)