पाहिला पाऊस…
पाहिला पाऊस…
पाहिला पाऊस…
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती
सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर
ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.
असामान्य व्यक्तिमत्व, आणि कर्तुत्ववान देशभक्त
आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे
प्रगाड बुद्धिवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)
हडळीचा आशिक
जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते,
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र
श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.
(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)
तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.
आपापल्या नवर्यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.
१० एप्रिल आणि खलील जिब्रान
‘You are my brother and I love you. I love you when you bow in your mosque, and kneel in your church and pray in your synagogue. You and I are sons of one faith – the Spirit.’
मराठी विकिपीडियावरील काही छायाचित्रांचे परवाने अद्ययावत करावयाचे आहेत म्हणून छायाचित्रे चाळताना योगा योगाने श्रीधर बळवंत टिळक (सुमारे १८९६ - मे २५, १९२८) यांच्या वरच्या छायाचित्रावर आणि तेथून त्यांच्या संबंधीच्या लेखावर गेलो.