माझी 'वाईट्ट' व्यसनं : गुलझार

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Jun 2015 - 9:49 am

गविंनी लिहीलेला खूब-रुयोंसे यारियाँ न गयी.. हा लेख वाचला आणि राहवले नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच एक लेखमाला लिहायला सुरूवात केली होती. पण नंतर ती अर्धवटच राहीली. त्यापैकी काही लेख 'मीमराठी' तसेच 'ऐसी अक्षरे' वर पोस्ट केले होते. मिपा संपादकांची परवानगी आहे असे गृहीत धरून त्यातील काही लेख इथे पुन्हा रिपोस्ट करतोय. मिपाच्या पॉलीसीत बसत नसल्यास कृपया उडवून टाकावेत.

*********************************************************************************

१९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. 'माया मेमसाब' ! बरीच चर्चा झाली होती या चित्रपटाबद्दल, त्यातल्या काही खास प्रसंगांबद्दल. साहजिकच आम्ही चार मित्र (चष्म्याच्या काचा साफ करुन) थिएटरवर पोचलो. जाताना मनात एकच भीती, कुणी ओळखीचे तर भेटणार नाही ना? खरंच सांगतो, चित्रपटांमध्ये बरंच काही होतं. पण आई शप्पत, थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा बाकी काही म्हणजे काही आठवायची इच्छा नव्हती. ओठावर एका गाण्याच्या चार पाच ओळी होत्या....

खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं...
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये.....
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये....

सिनेमा कधी एकदा सुरु होतोय या एक्साईटमेंटमध्ये टायटल्सकडे दुर्लक्षच झालेले होते. ते नेहमीच होते म्हणा. त्यामुळे बाहेर आल्यावर पोस्टरवर गीतकाराचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरही काही माहिती नव्हती. खिश्यात पुरेसे पैसेही नव्हते. काय करायचे? मग आमच्या बरोबर चित्रपट बघुन बाहेर पडलेल्या लोकांना अडवून विचारणे सुरु झाले. "तुम्ही सुरुवातीला दाखवतात ती कलाकारांची नावे बघीतलीत?"

लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते. पण एका काकांनी विचारले, "का रे बाबा? काय हवेय?"
थोडंसं बिचकतच त्यांना कारण सांगितलं. त्यांनी हसत हसतच उत्तर दिलं....

" गुलजार! "

गुलजारसाहेब

गुलजारसाहेबांचं नाव याआधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव असायचा. थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं....., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला.

'पुखराज' या आपली मुलगी 'बोस्की' उर्फ मेघना गुलजारला समर्पित केलेल्या काव्यसंग्रहातली 'पनाह' ही कविता आतवर स्पर्शून गेली. अंतर्बाह्य ढवळून गेली.

उखाड़ दो अरज़-ओ-तूल खूंटों से बस्तियों के
समेटो सडकें, लपेटो राहें
उखाड़ दो शहर का कशीदा
कि ईंट - गारे से घर नहीं बन सका किसी का
पनाह मिल जाए रूह को जिसका हाथ छूकर
उसी हथेली पे घर बना लो
कि घर वही है
और पनाह भी
तुम्हारे हाथों में मैंने देखी थी अपनी एक लकीर, सोना !

(अरज्-ओ-तूल : लांबी रुंदी)

गुलजार, आता रोज कुठे ना कुठे भेटायला लागले. कधी चित्रपट गीतातून कधी गैर फिल्मी कवितांमधून. त्यांची आधी कुठल्यातरी हिंदी पत्रिकेत वाचलेली ही कविता नंतर बहुदा 'पुखराज' मध्येही घेतली होती. श्रद्धेचं महत्व,मानवी आयुष्यात तिची काय अहमियत आहे, काय जागा आहे? हे सांगण्याचा हा एक जगावेगळा अंदाज होता त्या वयात माझ्यासाठी तरी.

कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी
लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..

मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..

तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..

(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)

तुम्हारे हाथोंको चूमकर, छू के अपनी आँखोसे आज मैने....

आँखोसे छूकर ! आता या कल्पनेत नाविन्य राहीलेलं नाही, पण त्यावेळी १८-१९ वर्षाच्या त्या वयात ती कल्पनाच रोमांचित करुन टाकणारी होती. अशा पद्धतीने काही थेट आतपर्यंत जाऊन पोचणा्रं लिहीता येवु शकतं ही कल्पनाच नवीन होती माझ्यासाठी. पण त्यावेळी उर्दुच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे गुलझारच्या कवितांमध्ये सौंदर्यस्थळ म्हणून वापरलेले शब्दही आमच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरायचे कारण मुळात त्याचा अर्थच कळायचा नाही. त्यासाठी मग आम्ही एक नवीनच मार्ग शोधला. सोलापूरला सिद्धेश्वर मंदीराजवळच एक पीरबाबाची मजार आहे. तिथे माझ्या एका मित्राबरोबर (इरफ़ान काझी) नेहमी जायचो, त्यामुळे तिथल्या मौलवींशी ओळख झालेली होती. मग असे काही शब्द अडले की इकबालचचांना गाठायचे हा शिरस्ताच पडून गेला. चचा स्वत:देखील गालिबमियांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्याकडून गालिबबद्दलही खुप ऐकायला मिळायचं. इकबालचचांनीच अजुन एक वेड दिलं मला ते म्हणजे 'संत कबीर'! (त्या बद्दल नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलुच)

मग एक दिवस कुणीतरी सांगितलं 'अबे 'इजाजत' बघ बे, त्यात कसल्ली खतरा गाणी आहेत गुलजारची. 'कतरा कतरा' ओठात घोळवतच चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. शेवटचं कडवं आठवतय?

तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन हैं
काँटे भी तुम्हारी आरजू हैं
शायद अयैसी ज़िंदगी हसीं हैं
आरजू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..

सुधाला नवर्‍याच्या सामानात सापडलेली त्याच्या प्रेयसीची डायरी तिला प्रचंड अस्वस्थ करुन टाकते. आपण, आपला नवरा आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी माया यांच्या सच्च्या प्रेमात एक मोठा अडसर तर ठरत नाही आहोत ना? या कल्पनेने कातर झालेली सुधा आपल्यालाही हळवे करुन टाकते. तशात गुलजारसाहेब लिहून जातात ...

"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...."

इजाजत मी त्यानंतर पुन्हा-पुन्हा बघीतला. कधी गुलजारच्या शब्दांसाठी तर कधी रेखासाठी. हो, या चित्रपटाने गुलजारबरोबरच आणखी एक व्यसन दिलं मला ...
त्या वाईट्ट व्यसनाचं नाव आहे 'रेखा' ! असो...., त्याबद्दल परत कधीतरी !

मग गुलझारचं वेडच लागलं. पण त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांच्या कवितेत जास्त रस होता मला. साध्या-सरळ पण थेट शब्दात मनाची कोंडी अचुकपणे व्यक्त करण्यात गुलझारचा हात धरणारं कोणी नसेल?

रात कल गहरी निंद मे थी जब
एक ताजा सफ़ेद कॅनवस पर
आतिशी, लाल सुर्ख रंगोसे
मैने रोशन किया था इक सुरज
सुबह तक जल गया था वह कॅनवस
रात बिखर गयी थी कमरेंमे

"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो" हे लिहीणारा गुलझार हाच होता का हा प्रश्न पडावा इतकं प्रखर आणि दाहक होतं हे. गुलजारची कविता ही त्याच्या अनुभवांतून आलेली होती. फाळणीनंतर घरादाराला मुकलेला एक अनाथ मुलगा. त्याच्या आयुष्यात घडत गेलेली अनेक स्थित्यंतरं हे त्याच्या कवितेचं मुळ असल्याने जे काही होतं ते अस्सल होतं. परिस्थितीचे, नशिबाचे अनेक चटके सोसुन शेवटी आपल्या अंगभुत तेजाला झळाळी मिळालेलं बावन्नकशी सोनं होतं. कदाचित त्यामुळेच गुलजारची लेखणी जास्त भावली.

सारा दिन मैं खून में लथपथ रहता हूँ
सारे दिन में सूख-सूख के काला पड़ जाता है खून
पपड़ी सी जम जाती है
खुरच खुरच के नाखूनों से
चमड़ी छिलने लगती है
नाक में खून की कच्ची बू
और कपड़ों पर कुछ काले काले चकते से रह जाते हैं
रोज़ सुबह अख़बार मेरे घर
खून में लथपथ आता है

आणि हाच 'गुलजार' एका कवितेत लिहून जातो...

गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !

'प्रचंड उकडतय' या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलं.

किशोर कदम, अर्थात आपल्या लाडक्या सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. बहुतेक न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत सौमित्र यांनी, त्यांना एक प्रश्न केला,
''आपको तैरना आता है?''
गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...''

'डुबणं, बुडून जाणं' एवढं सुंदर असु शकतं, बुडण्याला असाही एक अप्रतिम अर्थ असु शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. कुठल्याही कामात झोकून स्वतःला पुर्णपणे देण्यातला आनंद काय असतो ते गुलजारसाहेबांनी शिकवलं.

रात का नशा अभी, आंखसें गया नहीं
तेरा नशीला बदन बाहोनें छोडा नहीं
ऑंखे तो खोली मगर, सपना वो तोडा नहीं
हा....वही, वो...वोही...
सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं.>...

शाहरुखचा ’अशोका’ आणि करीनाचं ते हॉट स्नानदृष्य आठवलं ना? पटकन विसरून जा. त्या 'शाहरुख आणि करीना' ऐवजी 'घर'ची 'विनोद मेहरा आणि रेखा' किंवा 'तराना' मधली दिलीपसाब आणि मधुबालाची जोडी डोळ्यासमोर आणा आणि आता पुन्हा एकदा शेवटची ओळ गुणगुणून बघा...

"सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं..."

या ओळी नाही आपल्याश्या वाटल्या, स्वतःला क्षणभर का होइना विनोद किंवा दिलीपसाबच्या जागी ठेवुन नाही पाहीलं तर बोला..... पण खरी गंमत यात आहे की या ओळी करिना आणि शाहरुखला बघतानासुद्धा परक्या वाटत नाहीत, कारण त्या ऐकताना आपण पडद्यावर बघत नसतोच मुळी तर आपण त्या ओळी आपल्या आयुष्याशी रिलेट करुन बघत असतो. ही गुलजारसाहेबांच्या लेखणीची ताकद होती.

गुलजारसाहेबांनी बहुतेक सगळे रस आपल्या कवितेत आजमावले, पण प्रेमरस आपल्या कवितेत वापरताना त्यांच्या कवितेला काही वेगळेच धुमारे फुटायचे. नेहमीप्रमाणे, सर्वसाधारण प्रेमभावना त्यांच्या कवितेत कधीच सापडली नाही. वेगवेगळी प्रतिके, निरनिराळ्या उदाहरणांचा वापर करुन प्रेम आणि प्रेयसीबद्दलच्या भावना व्यक्त करणे हा गुलजारसाहेबांचा हातखंडा होता.

नज्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए है होटों पर
उडते-फिरते है तितलीयोंकी की तरह
लफ्ज कागज पे बैठते है नही
कब से बैठा हूं मै जानम
सादे कागज पे लिखके नाम तेरा...

बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?

आयुष्‍याच्‍या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्‍ये कार मेकॅनिक म्‍हणून काम करणारा 'संपूरणसिंग काला' हा तरुण चित्रसृष्‍टीत 'गुलझार साहब' या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्‍हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्‍यांनी विपुल लेखन करून आपल्‍या वाचकांमध्‍ये मानाचे स्‍थान मिळविले आहेच. पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या 'गुलजार' व्यसनाने माझं जगणं फारच सुसह्य करुन टाकलय, समृद्ध करुन टाकलय. कधी कधी असं वाटतं की 'गुलजार' हे संवेदनशीलतेचं दुसरं नाव असावं.

एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने
यही पडी थी बाल्कनी में
गोल तिपाही के उपर थी
व्हिस्की वाले ग्लास के नीचे रखी थी
नज्म के हल्के हल्के सिप मैं
घोल रहा था होटाँ में
शायद कोई फोन आया था
अन्दर जाके लौटा तो फिर नज्म वहां से गायब थी
अब्र के उपर नीचे देखी
सुट शफक की जेब टटोली
झांक के देखा पार उफक के
कही नजर ना आयी वो नज्म मुझे
आधी रात आवाज सुनी तो उठ के देखा
टांग पे टांग रख के आकाश में
चांद तरन्नुम में पढ पढ के
दुनिया भर को अपनी कह के
नज्म सुनाने बैठा था

आपल्या पुखराजच्या अर्पणपत्रिकेत गुलजारसाहेबांनी म्हटलय...

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...

गुलजारसाहेब, तुमच्या लाडक्या बोस्कीचं किंवा इतरांचं मला माहीत नाही पण तुमचे हे तजुर्बे आणि आशीर्वाद मला माझ्या आयुष्यात नेहमीच मोलाची साथ करत आलेले आहेत.

विशाल.

साहित्यिकआस्वादलेख

प्रतिक्रिया

क्या टॉपिक निकाला है विशाल.....
गुलजार मनात घुसले ते इजा़जत पासून आणि ती जखम मग भरलीच नाही! त्यांचा रावीपार हा कथासंग्रह नक्की वाच!

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 10:24 am | विशाल कुलकर्णी

त्यांचा रावीपार हा कथासंग्रह नक्की वाच!

पारायणे झालीत :)

अनंत छंदी's picture

26 Jun 2015 - 10:35 am | अनंत छंदी

छान जमलाय लेख! आवडला!! गुलजार यांची शायरी हा एक आवडीचा विषय आहे. खूप वर्षांपूर्वी कॅसेटच्या जमान्यात माझ्याकडे त्यांचा एक चार कॅसेटचा अल्बम होता त्यात त्यांच्या आवाजात त्यांचं मनोगतही होतं त्याची आठवण झाली. हा अल्बम कुठे आं.जा. वर आहे का पहायला पाहिजे.

मृत्युन्जय's picture

26 Jun 2015 - 10:54 am | मृत्युन्जय

आहाहा. गुलजार. काय लिहु? अशक्य माणूस.

मला वेड लावणारे त्यांचे वाक्यः

लिखते रहे तुम्हे रोजही मगर
ख्वाईशो के खत कभी भेजेही नही.

हूतूतु नावाच्या डोक्यावरुन साडे सोळा फूटे गेलेल्या चित्रपटातले अप्रतिम गाणे.

दुसरे असेच अप्रतिम पण थोडे कमी प्रसिद्ध असलेले गाणे म्हणजे "नैना ठग लेंगे" काय अप्रतिम गाणे आहे.

नैनो की मत मानियो रे, नैनो की मत सुनियो - (२)
नैनो की मत सुनियो रे
नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे, ठग लेंगे नैना ठग लेंगे

जागते जादू फूकेंगे रे जागते जागते जादू
जागते जादू फूकेंगे रे नींदें बंजर कर देंगे
नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे
नैनो की मत मानियो रे

भला मंदा देखे ना पराया ना सगा रे
नैनो को तोह डसने का चस्का लगा रे - (२)
नैनो का जेहर नशीला रे - (४)
बादलो में सतरंगिया बोंवे, भोर तलक बरसावे
बादलो में सत्र अंगिया बोंवे, नैना बांवरा कर देंगे
नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे - (२)

(नैना रात को चलते चलते स्वरगान में ले जावे
मेघ मल्हार के सपने दीजे हरियाली दिखलावे) - (२)
(नैनो की जुबान पे भरोसा नहीं आता
लिखद परख ना रसीद ना खाता) - (२)
सारी बात हमारी - (२)
बिन बादल बरसाए सावन, सावन बिन बरसाता
बिन बादल बरसाए सावन नैना बांवरा कर देंगे
नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे
नैनो की मत मानियो रे, नैनो की मत सुनियो
नैनो की मत सुनियो रे, नैना ठग लेंगे
जागते जादू फूकेंगे रे जागते जागते जादू
जागते जादू फूकेंगे रे नींदे बंजर कर देंगे
नैना ठग लेंगे -२ ठग लेंगे, नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे - (२)
नैना

अजुन एकः

वह मेरे साथ ही था दूर तक मगर इक दिन
जो मुड़ के देखा तो वह दोस्त मेरे साथ न था

फटी हो जेब तो कुछ सिक्के खो भी जाते हैं।

लोग मेलों में भी गुम हो कर मिले हैं बारहा
दास्तानों के किसी दिलचस्प से इक मोड़ पर

यूँ हमेशा के लिये भी क्या बिछड़ता है कोई?

आणि अजुन एक जबरदस्त उदाहरण द्यायचे तर हे घ्या:

तेरे जाने से तो कुछ बदला नहीं,
रात भी आई थी और चाँद भी था,
सांस वैसे ही चलती है हमेशा की तरह,
आँख वैसे ही झपकती है हमेशा की तरह,
थोड़ी सी भीगी हुई रहती है और कुछ भी नहीं,
होंठ खुश्क होते है, और प्यास भी लगती है,
आज कल शाम ही से सर्द हवा चलती है,
बात करने से धुआ उठता है जो दिल का नहीं,
तेरे जाने से तो कुछ बदला नहीं
रात भी आई थी और चाँद भी था,
हाँ मगर नींद नहीं ...नींद नहीं..

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 11:16 am | विशाल कुलकर्णी

जियो श्रेष्ठी ...

और एक..

मुझको भी तरकीब सिखा मेरे यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते बुनते
जब कोई तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बाँधके
और सिरा कोई जोड के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
एक भी गाँठ गिराह बुनतर की
देख नही सकता कोई

मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकीन उसकी सारी गिराहे
साफ नजर आती है मेरे यार जुलाहे
मुझको भी तरकीब सिखा मेरे यार जुलाहे
– गुलजार

पद्मावति's picture

26 Jun 2015 - 11:16 am | पद्मावति

गुलझार---माझ्या अतिशय आवडत्या कलाकाराविषयी अतिशय सुरेख आणि नेमक्या शब्दात लिहिले आहे तुम्ही....
फारच आवडले.

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 11:18 am | विशाल कुलकर्णी

अजून एक...

रात भर सर्द हवा चलती रही
रात भर हमने अलाव तापा

मैंने माज़ी से कई खुश्क सी शाखें काटी
तुमने भी गुजरे हुए लमहों के पत्ते तोड़े
मैंने जेबों से निकाली सभी सूखी नज़्में
तुमने भी हाथों से मुरझाए हुए ख़त खोले
अपनी इन आँखों से मैंने कई मांजे तोड़े
और हाथों से कई बासी लकीरें फेंकी
तुमने भी पलकों पे नमी सूख गई थी, सो गिरा दी
रात भर जो भी मिला उगते बदन पर हमको
काट के डाल दिया जलते अलावों में उसे
रात भर फूकों से हर लौ को जगाए रखा
और दो जिस्मों के ईंधन को जलाए रखा

रात भर बुझते हुए रिश्ते को तापा हमने..

मृत्युन्जय's picture

26 Jun 2015 - 11:44 am | मृत्युन्जय

जबरा.

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 11:38 am | वेल्लाभट

वाह ! लुत्फ आ गया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2015 - 11:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

गुलजा़र हे माझ व्यसनच नाही तर मी त्यासाठी चरसीसारखा वागतो. कधीतरी लिहीणारच होतो.. तुम्ही ते करुन टाकलेत. आणि अतिशय अभ्यासपूर्ण आणि इंटेस लिखाण मनापासून आवडले. बाकी गुलजा़र आणि विशाल हे काँबिनेशन अत्यंत जहरी आहेच. हैदर चित्रपटातली गाणि ऐकून पहा. गुलजार अजुनही तितक्याच ताजेपणाने लिहीतात. त्यांच्याबद्दल लिहावे थोडे कमी आणि बोलावे तितके तोकडेच पडते. त्यांच्या मला अत्यंत आवडलेल्या नज्मांमध्ये गालिब सिरीयलच्या टायटल साँगचे रुप घेऊन आलेली, बल्लीमाराँ के मोहल्ले मे. शिवाय गालीब वर लिहीलेली नज्म.. माशा अल्ला.. थोड्या वेळाने देतो इथे.. पण आतासाठी हि वाचून बघ.. संवेदनशिलता म्हणजे काय ते कळते:

मै अखबार के तीसरे पन्ने पर
हररोज जब देखता हूँ
मरनेवालोंकी तस्बीरे
कुछ देर मै धुंडता रहता हूँ
मेरीभी तस्बीर है क्या?
बेहिस हुवा हूँ अब
एहसास नहीं होता के साँस आती है, जाती है
चलती भी है के नहीं
अखबार के पाहिले पन्नेपर बस
एहदाद की गिनता हु
गिनती ही देखता हु
आज के दिन फिर कितने मरे
आजका "स्कोर" क्या है ।
बेहिस हूवा हूँ अब
एहसास नहीं होता के साँस है की नहीं
चलती भी है के नहीं
खून देख कर टाप के दूर
हो जाता हूँ
9:11 की गाडी पकडनी है
मै ऐसा बेहिस हूवा हूँ !
एहसास नहीं होता के साँस है की नहीं
चलती भी है के नहीं
-- गुलज़ार

अवांतरः ते खाली 'क्रमशः' दिसल नाही त्याबद्दल जाहीर आणि जंगी निषेढ...

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 12:01 pm | विशाल कुलकर्णी

अवांतर बद्दल क्षमस्व ;)

छोटे थे, माँ उपले थापा करती थी
हम उपलों पर शक्लें गूंथा करते थे
आँख लगाकर, कान बनाकर
नाक सजा कर
पगड़ी वाला, टोपी वाला
मेरा उपला
तेरा उपला
अपने अपने जाने पहचाने नामों से
उपले थापा करते थे
हँसता खेलता सूरज रोज़ सवेरे आकर
गोबर के उपलों पर खेला करता था
मेरा उपला सूख गया
उसका उपला टूट गया
रात को आंगन में जब चूल्हा जलता था
हम सारे चूल्हा घेर कर बैठे रहते थे
किस उपले की बारी आई
किसका उपला राख हुआ
वह पंडित था
वह मास्टर था
इक मुन्ना था
इक दशरथ था
बरसों बाद
श्मशान में बैठा सोच रहा हूँ
आज की रात इस वक़्त के जलते चूल्हे में
इक दोस्त का उपला और गया!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2015 - 12:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__!

मृत्युन्जय's picture

26 Jun 2015 - 12:18 pm | मृत्युन्जय

खल्लास. जबरदस्त,

क्रेझी's picture

26 Jun 2015 - 12:40 pm | क्रेझी

+१

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2015 - 1:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

गालिबच्या घराचे म्युझियम करणार अशी बातमी आली त्या नंतर गुलजार साहेबांनी लिहीलेली हि नज्म

(उर्दू शुद्धलेखनाच्या चुका माफ कराव्यात, वेळ फारच कमी आहे.)

गली कासिम मे आकर
तुम्हारी देवडीपर रुक गया हू मिर्जा नौशा
तुम्हे आवाज दू पहले
चली जाये जरा परदे मे उमराव
तो फिर अंदर कदम रखू
चिलमचि लोटा सैनी उठ गये है
बरसता था जो दो घंटे छल्ली
छत चार घंटेतक बरसती थी
उसी छन्नीसे अब छत की मरम्मत हो रही है
सदी से कुछ जादा वक्त आने मे लगा
अफसोस है मुझको
असल मे घर के बाहर कोयलेंके टाल की स्याही लगी थी
वो मिटानी थी
उसी मे बस कयी सरकारे बदली है तुम्हारे घर पहूचने मे
जहा कल्लन को लेके बैठते थे याद है
बालायी मंजीलपर
लिफाफे जो उडते थे तुमलई से
खतोंकी कश्तिया उर्दू मे बहती थी
अछूती साहील उर्दू नस्र छू ने लग गयी थी
वही बैठेगा कंप्युटर
वहा से लाखो खत भेजा करेगा
तुम्हारे दस्तखत जैसे वो खुश्खत तो नही होंगे
मगर फिरभी
परसदारोंकी गिनती असद अब तो करोडोंमे है
तुम्हारे हाथ के लिख्खे हुवे सफात रख्खे जा रहे है
तुम्हे तो याद होगा
मस्वदा जब रामपूरसे लखौनेसे आग्रातक घुमा करता था
शिकायत थी तुम्हे

यार अब न समझे है न समझेंगे वो मेरी बात
उन्हे दिल और दे या मुझको जबाँ और

जमाना हर जबाँ मे पढ रहा है तुम्हारे सब सुखन गालीब
समझते कितना है ये तो वही जाने, या तुम समझो..
यही शिशो मे लगवाये गये है पैरहन अब कुछ तुम्हारे
जरा सोचो तो किस्मत चार गिरह कपडे की अब गालीब
कि थी किस्मतही उस कपडे की गालीब का गरेबाँ था
तुम्हारी टोपी रख्खी है, जो अपनी दौरसे उंची पहनते थे
तुम्हारे जुते रख्खे है जिन्हे तुम हाथ मे लेकेर निकलते थे
शिकायत थी कि सारे घरकोही मस्जिद बना दिया है बेगम ने
तुम्हारा बुतभि अब लगवा दिया है उंचा कद देकर
जहासे देखते हो अब तो सब बाजी-चा-ए-अतफाल लगता है
सभी कुछ है मगर नौशाँ
अगरचे जानता हू के हाथ मे जुंबिश नही बुत के
तुम्हारे सामने एक सागर-ओ-मिना तो रख देते
बस एक आवाज है जो गुंजती रहती है घरमे

न था कुछ तो खुदा था, कुछ ना होता तो खुदा होता
डबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता!

- गुलजार

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 2:20 pm | विशाल कुलकर्णी

अहाहा.... ज्जे ब्बात !

कधी कधी हाच माणुस अशक्य कोटीतलं रोमँटीक लिहून जातो..

अशक्य रोमँटेक लिहतो हा माणूस.
त्यांच्याच आवाजात ऐकलेली त्यांची एक कविता-

“मुझको इतने से काम पे रख लो…
जब भी सीने पे झूलता लॉकेट
उल्टा हो जाए तो मैं हाथों से
सीधा करता रहूँ उसको
मुझको इतने से काम पे रख लो…

जब भी आवेज़ा उलझे बालों में
मुस्कुराके बस इतना सा कह दो
आह चुभता है ये अलग कर दो
मुझको इतने से काम पे रख लो….

जब ग़रारे में पाँव फँस जाए
या दुपट्टा किवाड़ में अटके
एक नज़र देख लो तो काफ़ी है
मुझको इतने से काम पे रख लो…

‘प्लीज़’ कह दो तो अच्छा है
लेकिन मुस्कुराने की शर्त पक्की है
मुस्कुराहट मुआवज़ा है मेरा
मुझको इतने से काम पे रख लो”

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 2:21 pm | विशाल कुलकर्णी
पद्मावति's picture

26 Jun 2015 - 1:59 pm | पद्मावति

हे असे काही वाचले की माझी vocabulary संपते. काय बोलणार.....सुरेख, अप्रतिम,जबरदस्त वगैरे शब्द काहीच्या काही कमी पडतात.

गुलझारांच्या खजिन्यातील अजुन एक रत्न..

छोड आये हम वो गलियां ...
जहां तेरे पैरों के कमल गिरा करते थे
हंसे तो दो गालों में भंवर पडा करते थे
तेरी कमर के बल पे नदी मुडा करती थी
हंसी तेरी सुन सुन के फसल पका करती थी
छोड आये हम वो गलियां ...

ओ जहां तेरी एडी से धुप उडा करती थी
सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती हैं
लटों पे उलझी लिपटी एक रात हुआ करती थी
कभी कभी तकीए पे वो भी मिला करती हैं
छोड आये हम वो गलियां ...

दिल दर्द का टुकडा है पत्थर की डली सी है
एक अंधा कुंवां है या एक बंद गली सी है
एक छोटा सा लम्हा है जो ख़त्म नहीं होता
मैं लाख जलाता हूं ये भस्म नहीं होता
ये भस्म नहीं होता
छोड आये हम वो गलियां ...

उगा काहितरीच's picture

26 Jun 2015 - 2:10 pm | उगा काहितरीच

दंडवत!

चिगो's picture

26 Jun 2015 - 2:43 pm | चिगो

गुलजारच्या गीतांचं व्यसन होतंच, आता कवितांचपण लागणार..
काय अफाट लिहीतो हा माणूस.. ह्या लेखासाठी लाख-लाख धन्यवाद..

वर मृत्युंजय बोललेत त्याच्याशी सहमत.. विशाल भारद्वाज आणि गुलजार हे अत्यंत जहरी आणि तितकंच नशीलं काँम्बिनेशन आहे..

शशांक कोणो's picture

26 Jun 2015 - 11:54 am | शशांक कोणो

विकू शेट जियो
काय मस्त उलगडला गुल्जार तुम्ही. दिल का गुल्श्न खिला दिया ...........
इजाजत तर काय सांगावा. मनाच्या कोंदणात फिट केलेली सगळी गाणी आणि तिथून त्या त्रिकुटाच्या प्रेमात आकंठ बुडालो मी. मग "दिल पडोसी है" ने तर अजूनच खोलात बुडवले. त्या काळी सीडी नव्हत्या. आठवतय मला. टेपरेकोर्ड च्या दोन कसेट निघाल्या होत्या. एक महिना जीव खाल्ला दुकानदाराचा. शेवटी माल आल्यावर पहिली कॉपी तो बिचारा घरी देऊन गेला.
जियो बॉस

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 12:02 pm | विशाल कुलकर्णी

_/\_

अद्द्या's picture

26 Jun 2015 - 12:06 pm | अद्द्या

जियो जियो .

जबरा धागा. .

आणी त्याहूनही जबरा प्रतीसाद सगळ्यांचे

अद्द्या's picture

26 Jun 2015 - 12:06 pm | अद्द्या

जियो जियो .

जबरा धागा. .

आणी त्याहूनही जबरा प्रतीसाद सगळ्यांचे

चिगो's picture

26 Jun 2015 - 2:19 pm | चिगो

गुलजार साब.. क्या बात है.. मी त्यांच्या कविता फार वाचल्या नाहीत. पण त्यांची गीतेपण फार फार सुंदर असतात. 'घर' पासून 'इजाजत' असो, वा 'ओंकारा', 'साथियां' 'इश्कियां'असोत, हा माणूस सरळ हृद्यातच उतरतो. इतका अलवार, तरल प्रेम-गीत लिहणारा बघितला नाही की दाहक लिहीणारा नाही.. 'ओ साथी रे' लिहणाराच 'बिडी जलाय ले' आणि 'नमक इस्क का' लिहीतोय आणि त्यानेच 'नैना ठग लेंगे' लिहीलंय, ह्यावर विश्वास बसत नाही..

गुलजार साब, तुम्ही आम्ही दुनिया गुलजार केलीय हे नक्की..

चिगो's picture

26 Jun 2015 - 2:50 pm | चिगो

गुलजार साब, तुम्ही आम्ही दुनिया गुलजार केलीय हे नक्की..

हे "गुलजार साब, तुम्ही आमची दुनिया गुलजार केलीय, हे नक्की.." असं करावं प्लीज..

'आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' वालं बच्चन कुटुम्बियांवर चित्रित 'कजरारे कजरारे' पण गुलज़ार साहेबांचंच.
आणि मूळ काश्मिरी असल्यानं गाण्या मध्ये बऱ्याचदा 'घाँटी' येत असावं.

'आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' वालं बच्चन कुटुम्बियांवर चित्रित 'कजरारे कजरारे' पण गुलज़ार साहेबांचंच.
आणि मूळ काश्मिरी असल्यानं गाण्या मध्ये बऱ्याचदा 'घाँटी' येत असावं.

ब्लाॅगवर वाचली तेव्हाही आवडली होती ही गुलजारियत.

गुलजार ही जखमच खरी, स्वतःचा निराळासा आठवा रंग ल्यायलेली. या माणसाला कशाहीवर कविता लिहिता येते. नव्हे, त्याने काहीही लिहिलन् तरी त्याची कविता होते.

जरा आवाज का लहजा तो बदलो
जरा मद्धम करो इस आँच को सोना
कि जल जाते हैं कँगुरे नरम रिश्तों के
जरा अल्फाज के नाखून तो तराशो
बहुत चुभते है जब नाराजगी से बाते करती हो
-गुलजार

तक्रारीचाच सूर, पण तोही किती स्निग्ध. न राहवून याचं मी मराठीत रूपांतर केलं होतं...

जरा आवाजाचा नूर तरी बघ
ती धग कमी कर बोलण्यातली शोना
अशानं करपतात कोवळे कोंब नात्याचे
शब्दांची नखं तास गं जराशी
नखलतं मन रागेजून बोलतेस तेव्हा

गुलजारच्या कवितेतली रात्र, गुलजारचा चंद्र, गुलजारची नाराजगी.. सगळंच त्या आठव्या रंगातलं! तसलं दुसरं नाही..

- (आजचा दिवस गुलजारमय झालेली) इनि.

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 2:42 pm | विशाल कुलकर्णी

गुलजार ही जखमच खरी, स्वतःचा निराळासा आठवा रंग ल्यायलेली. या माणसाला कशाहीवर कविता लिहिता येते. नव्हे, त्याने काहीही लिहिलन् तरी त्याची कविता होते.

अगदी...अगदी !

क्या बात है, विशाल!मनापासून आलेला लेख.अतिशय आवडल्या गेला आहेच.लेखाच्या निमित्ताने इनीने किती दिवसांनी सुंदर प्रतिसाद दिलाय!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2015 - 2:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त इनीतै.. प्रतिसाद आवडला.

ओ साथी रे ...
दिन डुबे ना
आ चल दिनको रोके
धुपके पिछे दौडे
छाव छुए ना
ओ साथी रे

प्यारे१'s picture

26 Jun 2015 - 2:46 pm | प्यारे१

मोरपिशी धागा....
वाचनखूण साठवून ठेवायची आणि हवा तेव्हा काढून वाचायचा.
विशाल भौ आणि मिपाच्या सगळ्या गुलज़ार भक्तांना सलाम. आणि गुलज़ारसाब ___/\____.

विशालभाऊ… तुम्हाला कल्पना आहे का…. कित्ती सुंदर लिहिलंय हे??
खूपच सुंदर लिहिलंय…. तीनदा वाचून अभिप्राय देतोय…. आह…. वाह… मनापसून जियो….!!!

पैसा's picture

26 Jun 2015 - 3:16 pm | पैसा

दंडवत रे विशल्या! तुला आणि बाकी सगळ्यांनाच. उशीरा धागा उघडला म्हणून लिहायला काही शिल्लक राहिलं नाही याचं अजिबात वाईट वाटलं नाही!

महासंग्राम's picture

26 Jun 2015 - 3:42 pm | महासंग्राम

खरच गुलझार वेड लागलेला आणि लावणारा माणुस आहे. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाला लिहिलेली थोडस पोस्ट करतोय

य गुलझार,
समजायला लागल तेव्हा तु जी 'माचिस' पेटवलीस
ती आजतागयात चालूच आहे.
'आसमा के पार शायद और कोई आसमा होगा' अस
म्हणत जेव्हा स्वप्न पुरी करण्या साठी पुण्यात
आलो तेव्हा सुद्धा तू सोबत होतास.
घर सोडल्यावर "छोड आये हम वो गलीया" च महत्व जाणवल तेच तू
सोबत होता.
रात्री बेरात्री जेव्हा पुण्यात 'एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में आब-ओ-दाना ढूँढता है,
आशियाना ढूँढता है' म्हणत घरोंदा शोधत भटकत होतो तेव्हा तू सोबत होता.
'सपने मे मिलती है' अस म्हणत फक्त स्वप्नात मिळणारी कुडी जेव्हा प्रत्यक्षात भेटली,
तेव्हा 'पहली बार मोहब्बत कि है' असा म्हणत
दोघात एक ICE -cream खाताना तुझी सोबत होती.
'हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए खुले आम आँचल
ना लहरा के चलिए ' अस म्हणत तिचे मानेवर मागे
रुळणारे कुंतल रेशमी केस सांभाळत F C road वर तिच्या सोबत भटकताना तू होतास.
'अजून सुद्धा ऐ जिंदगी गले लगा ले
हम ने भी तेरे हर एक ग़म को गले से लगाया हैं', म्हणत
आयुष्यासोबत जेव्हा उभा दावा मांडत
असतो तेव्हा तुझी सोबत असते अनंत
काळच्या मित्रासारखी
एखाद्या उदास संध्याकाळी 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' PC वर चालू
असताना एकटेपणात सुद्धा तू कुठेतरी लपलेला असतोस.
यु तो गुनगुनाता हु हर शाम तेरी नज्मे
तेरे होनेसे हि ये जिंदगी 'गुलझार' है....

#Gypsy
www.gypsykavita.blogspot.in

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 4:56 pm | विशाल कुलकर्णी

सर्व रसिकांना दंडवत _/\_

गुलजार भेटला होता तो हिंदी चित्रपटां मधुनच. तेवढ्यातही त्याने वेड लावले होते.

विशालमुळे त्याची एक नवीच ओळख झाली. सगळ्याच कविता बेहद्द आवडल्या....

- माँ उपले थापा करती थी
- मुझको इतने से काम पे रख लो
- जरा आवाज का लहजा तो बदलो
- तेरे जाने से तो कुछ बदला नहीं,
- एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने

या कविता तर फारच खास आहेत. त्या इकडे शेअर करणार्‍या सर्व गुलजारवेड्यांचे मनःपूर्वक आभार

गुलजार नावाचा संसर्गजन्य रोग मिपावर पसरवल्याबद्दल विशाल यांच्यावर संमंने योग्य ती कारवाई करावी.

पैजारबुवा,

बोका-ए-आझम's picture

28 Jun 2015 - 3:47 am | बोका-ए-आझम

मेरा गोरा अंग लैले लिहिणारा गुलजार!
चड्डी पहनके फूल खिला है लिहिणारा गुलजार!
गीला गीला पानी लिहिणारा गुलजार!
रोज रोज आंखो तले लिहिणारा गुलजार!
मुसाफिर हूं यारों म्हणून तत्वज्ञान शिकवणारा गुलजार!
आपकी आंखोंमे कुछ महके हुवे से राज है असा प्रेयसीच्या डोळ्यांचा गंध लुटणारा गुलजार!
तेथे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही असं केविलवाणं प्रतिपादन करणारा गुलजार!
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही असं म्हणून असफल हळव्या प्रेमाची कबुली देणारा गुलजार!
जिनके सर हो इष्क की छांव पांव के नीचे जन्नत होगी अशी खात्री असलेला गुलजार!
पर्सनलसे सवाल करणारा गुलजार आणि गोली मार भेजे में असं ठणकावून सांगणारा गुलजार!
गुलजार हा एक कॅलिडोस्कोप आहे. ज्याने जसा, जिथून, जेवढा पाहाता येईल तसा पाहावा!
आणि विशालजींसारखा ओंजळीत पकडून दाखवावा!

मित्रहो's picture

28 Jun 2015 - 9:00 pm | मित्रहो

आणि तितकेच सुंदर प्रतिसाद.
जे जे हिंदी चित्रपटांच्या गाण्यात अर्थ शोधतात त्या सर्वांसाठी गुलजार हे एक व्यसन आहे. गुलजार हे तस अजब रसायन आहे. तो जितक्या सुंदर प्रकारच्या कविता लिहीतो तशीच साऱ्या प्रकारची गाणी लिहीतो आणि प्रत्येकात आपली गुलजार छाप सोडून जातो. हाच गुलजार अगदी मोकळेपणाने सांगतो सालोसे ये सच है की पहले धुन आयी फिर शब्द. म्हणजे काय आधी धुन की शब्द अशा वादात न पडता तो हाती आले त्याचे सोने करणे हेच योग्य. सलाम गुलजार आणि धन्यवाद विशालजी.

ए हैरते आशिकी जगा मत
पैरों से ज़मीन ज़मीन लगा मत
ए हैरते आशिकी

आता अशी सुंदर दमदार सुरवात केल्यावर गुलजार उगाचच प्रेमाची कौतुक सांगत थांबत नाही तर तो कडव्यात सुंदर संवाद लिहीतो.

क्यों उर्दू फ़ारसी बोलते हो
दस कहते हो दो तोलते हो
झूटों के शहंशाह बोलो ना
कभी झाँखों मेरी आँखें
सुनाये एक दास्ताँ
जो होंटों से खोलो ना

निव्वळ अप्रतिम. सतत असे काही गोड धक्वेके दिल्यामुळेच आम्ही सारे गुलजारला डोक्यावर घेतो.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

28 Jun 2015 - 9:17 pm | मनोज श्रीनिवास जोशी

विशाल - तुमचा लेख आणि काही प्रतिक्रिया - अतिउत्तम !

चाणक्य's picture

28 Jun 2015 - 11:11 pm | चाणक्य

सुरेख लिहीलंय. आणि प्रतिसादही एकसो एक. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहीन. सध्या ही पोच.

विशाल कुलकर्णी's picture

29 Jun 2015 - 10:44 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !

gogglya's picture

30 Jun 2015 - 8:50 pm | gogglya

एक क्य़ासेट होती - इजाजत आणी लिबास यांची संवादासह गाणी… निव्वळ अप्रतीम
नुकताच गोव्यात लिबास प्रदर्शित शल. गुलझार ने इतकी वर्षे तो प्रदर्शित केला नव्हता [काही सेन्सोर बोर्डाशी झालेले मतभेद कारण असावेत अशी वंदता ऐकली होती ] वाट बघतोय कधी तो चित्रपट बघायला मिळेल याची…

बाकी चित्रपटांवरुन बोलायचे झाले तर गुलझार काळाच्या अनेक पावले पुढे असलेले चित्रपट बनवत असे. मेरे अपने मध्ये ऐन भरातील मीना कुमारी ला म्हातारीची भूमिका करायला लावणारा पण तोच आणी विवाह बाह्य संबंधांवर 'लिबास' सारखा चित्रपट काढणारा पण तोच…

- 'वो जो एक शायर था' ही गुलझार च्या मिसरा ऐकलेल्या [हिंदी चित्रपट गीते] पण उर्वरीत गाणे पुर्णपणे वेगळे, अशी L. P. संग्रही असलेला एक गुलझार प्रेमी… [गायक भूपिंदर सिंग]

इस मोड से जाते है , कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें
सहरा की तरफ जाकर , एक राह बगोलों मैं खो जाती है चकरा कर
रुक-रुक के झीझकती सी , ईक मौत की ठंडी -सी वादी उतरती है
इक राह उधडती सी छीलती हुई कांटो से, जंगल से गुजराती है -
इक दौड के जाती है और कुद के गिरती है , अनजाने खलाओ मै
उस मोड पे बैठा हूं जिस मोड से जाती है , हर एक तरफ राहें
एक रोज तो युं होगा , इस मोड पे आकर तुम
रुक जाओगी कह दोगी
वह कौनसा रस्ता है
जिस राह पे जाना है …

वो जो शायर था

निखिलचं शाईपेन's picture

1 Jul 2015 - 7:44 pm | निखिलचं शाईपेन

खुपचं छान ....
गुलजार याचं लेखन, त्याचं स्वतःच्या किंवा इतरांच्या साहित्याचे वाचन कायमच एक आफ्टरटेस्ट ठेवून जातं, मग जॉनर नुसार ती कडू, गोड कधी मिश्र असू शकते.
गुलजार यांच्याच एका गाण्याविषयी ....दो नैना और एक कहानी ..

ब़जरबट्टू's picture

2 Jul 2015 - 4:34 pm | ब़जरबट्टू

आवडले..

विजुभाऊ's picture

3 Jul 2015 - 10:37 am | विजुभाऊ

माताय.........
आजचा दिवस सगळा सैरभैर जाणार.............

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुलजारसाब!