ज्याचे त्याला कळले
शिलेदार धारातीर्थी
बालेकिल्ले ढळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
तरातरा निघालेले
पुन्हा मागे वळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
बेघर होतील आता
जे पंधरा वर्ष रुळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
पीळ बघूया जाईल का
सुंभ मात्र जळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
शुभ्र कपड्यांमागचे
रंग खरे उजळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
आहे नव्याची आशा
संकट परी ना टळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले