भाषा - आपली सर्वांचीच
नुकतंच (म्हणजे दहा मिंटं झाली असतील) अविनाश बिनीवाले यांचं 'भाषा - आपली सर्वांचीच' हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. (अजून एक लिंक) आणि मराठी भाषेविषयीचा (खरंतर इतरही अनेक भाषांविषयीचा) दृष्टीकोन काही बाबतीतं नव्याने उमगला, काही बाबतींत दृढ झाला, काही बाबतीत तो पूर्णपणे बदलला. अविनाश बिनीवाले यांचे 'लोकसत्ता' मध्ये जुलै १९९८ ते डिसेंबर १९९९ या काळात भाषाविषयक सदरांत ७८ लेख प्रकाशित झाले.