नायक क्रमांक एक

लेखनविषय:
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)

लेखनविषय:
लेखनप्रकार
नवीन वर्षाचा पहिला दिवस , माया -बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते मुनिसीपालीटीने शहरातला कचरा उचलून, कचरा घरांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिच्रारे सकाळ पासून कुजक-माजक, नासलेल- सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी , श्रीखंड खायला मिळेल.

ग्रेस ...

लेखनविषय:
तू देउन गेला जाता दु:खाचा निळासा भार स्वप्नांच्या वाटेवर दाटला गडद अंधार हे जगणे अडले येथे तू जेथे सोडली साथ ... चाचपडत शोधतो आहे सुखाचा मोडका हात ! -अनिल बिहाणी. कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

पुरानी जीन्स

लेखनप्रकार
इक हि डाली पर कुछ हसते गाते पत्ते थे। हरदम खुश रहा करते थे। फिर हमेशा की तरह पतझड का मौसम आया। हलकीसी हवाके झोकेसे सब पत्ते बिखर गये। न जाने कहा कहा चले गये । हर कोई अलग अलग राहोंपर गुमाशुदासा होता चला गया। अब कोई न पहेचानता, के इनकी दुनिया कभी इकसाथ हुआ करती थी । अब कोई न पहेचानता, के यही वो पत्ते है जो हरघडी साथ रहा करते थे। - - - "अग ये परे आटप कि भरभर, तुझ झाल कि बाकीच्यांचं आवरायचं आहे तुला. तू स्वतःचच आवरत राहणार कि आमचा पण मेकअप करणार आहेस? नाहीतरी आता तुझ्याकडे कोणी बघणार नाहीऐ. तुम्ही आता दुसऱ्या कुणाच्या तरी आहात हे साऱ्या जगाला माहित आहे हं." पल्ली ओरडत होति.

लाल पेरू

लाल पेरू "अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो. पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे.

श्री. ना. आणि व्ही. एस.

लेखनविषय:
लेखनप्रकार
"मी कोण" हा प्रश्न मानवाला अनादि कालापासून पडला आहे. प्रत्येक मानव जाणते-अजाणतेपणे या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे. कधी आपल्या कक्षेत राहून, तर कधी कक्षा भेदून. वैयक्तिक आवडी निवडी, निवडलेले पर्याय, घेतलेले निर्णय हे प्रत्येकाच्या "मी" च्या शोधाचं दृश्य रूप. मानवसमूहात रहायचं तर प्रवाहाबरोबर पोहोणं आलंच. सर्वदा आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. मानवसमूहाचा हा अदृश्य दबाव माणसाला वेगळं वागायला भाग पाडतो. कधीकधी काही पर्याय मनाविरुध्द निवडावे लागतात, काही निर्णय बळजबरीने घ्यावे लागतात. अशा वेळी तो "मी" चा शोध बंड करून उठतो.

प्रेम दुसरं काय...!!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
yes..! माझं प्रेम आहे..! म्हणजे माझं, प्रेम या कल्पनेवर आणि सतत प्रेमाच्याच प्रेमात पडुन आयुष्यभर प्रेमात डुंबुन राहण्यावर प्रेम आहे.प्रेम हे खरंतर नकळत ,आणि अगदी क्षणार्धापेक्षा कमी वेळामधे घडून जाणारं, आणि नंतर खोल खोल रुजत जाऊन प्रत्येक क्षण भारवून टाकणारं कोडं. त्याला कोडं म्हणा किंवा गणित(गणिताईतकी नीरस उपमा का देतात देव जाणे..! )ते सोडवण्यापेक्षा त्याच्या हातात हात घालून आयुष्यभर त्याच्या धुंदीत जगण्याईतकं सूख कशातच नाही. मी सतत प्रेमात पडते.! हो ना .. कारण पडणं हीच एक अशी गोष्ट आहे जी झाल्यावरच कळते. बर आणि प्रेमात पडण्याचे माझे ठोकताळे , नियम (so called criteria)असं काही नाही.

एका दिशेचा शोध....(पुस्तक परिचय)

लेखनविषय:
लेखनप्रकार
संदीप वासलेकर यांचे 'एका दिशेचा शोध' म्हणजे प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. भारत उद्याची महासत्ता आहे हा समज असणा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांना वास्तवाची जाणीव हे पुस्तक करुन देते. पण महत्त्वाची बाब म्हणजे लेखक नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर त्यांची उत्तरे ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एका सम्रुद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्यासाठी सामान्य नागरीकांपासून ते राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने काय करायला पाहिजे याचे व्यवस्थित विवेचन करतो. सर्वप्रथम संदीप वासलेकरांचा थोडक्यात परिचय करून देतो.

जयविजय

लेखनविषय:
लेखनप्रकार
"ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला. आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी. "जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे" मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी. "जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन" "दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत.

प्रकाशन सोहळा..

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, नमस्कार, माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
Subscribe to साहित्यिक