शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न
परशुरामाचा प्रदेश म्हणजे बुद्दीवंताचा प्रदेश अशी ओळख कोकणाची आहे. याच कोकणातून विचारवंत खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेवक, स्वातंत्रसेनानी, कलाकार, लेखक अशा अनेक क्षेत्रांत कोकणपुत्रानी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. अशी ओळख असलेल्या कोकणाची मुंबई ला चाकरमाणी पुरवीणारा प्रदेश अशीही ओळख होती. मनिऑर्डवर चालणारी घरे आठवली तर आजची कोकणाची प्रगती पाहता आपसूक तोंडात बोटे जातात. शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते.त्याच बरोवर दिशा देणारा पालकही असावा लागतो.