कॉपीराईट

फुंटी's picture
फुंटी in काथ्याकूट
9 Oct 2013 - 9:47 am
गाभा: 

कॉपीराईट संबंधी एक दिशा देणारी चर्चा येथे करता येईल का ? मिपा हे एका अर्थाने प्रकाशक आहेत. वेगवेगळ्या नावाने इथें वावरणारे लेखक /कवी आणि त्यांचे लेखन याचा कॉपीराईटशी कितपत संबंध आहे??

प्रतिक्रिया

होय आणि मिपाची प्रकाशक म्हणून भूमिका इतरत्र वाचायला मिळेलच.
अशोक शहाणे यांनी सकाळवर केलेला खटला मथळ्याची बातमी होती. त्या निमीत्ताने इथे चर्चा होणे बाकी होतेच .चला, या निमीत्ते घडू द्या चर्चा .

पैसा's picture

9 Oct 2013 - 10:43 pm | पैसा

मिपा एका अर्थाने प्रकाशक म्हटले तरी तसे मिपा फक्त लेखक वाचकांना एकत्र भेटण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यासाठी लेखकाशी कोणत्याही प्रकारचा करार किंवा पैशांची देवाण घेवाण होत नाही. बरेचसे हे ऐच्छिक असते. आम्ही लेखक आपला एक लेख अनेक संस्थळांवर आणि ब्लॉगवर एकाच वेळी प्रसिद्ध करू शकतो, आणि करतो देखील. त्याला अजूनपर्यंत कोणत्याही मराठी संस्थळाने आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे इथे कॉपीराईटचा कायदा कसा लागू होईल हे माहित नाही. मात्र आपल्या लेखाची चोरी करणार्‍या एका जालीय चोराला कांचन कराई यांनी चांगला धडा शिकवला होता याची आठवण आहे.

शिवाय प्रिंट मीडियाला कॉपीराईटचे कायदे जे आणि जसे लागू होतात तसेच आंतरजालावर होतात का हे मला माहित नाही. त्यासाठी सावबर लॉ आणि सायबर क्राईमची माहिती असलेला माणूस जास्त चांगले उत्तर देऊ शकेल.

तुमचा धागा अगदीच चिमुकला असला तरी त्यातून चांगली माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. चर्चेत तुमची स्वतःची मते/माहिती इथे मांडाल अशीही अपेक्षा करते.

स्पंदना's picture

10 Oct 2013 - 4:01 am | स्पंदना

पैसाताई.
फुंटी साहेब कश्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला हे जर तुम्ही थोडफार सांगितलत तर बर होइल.

अपर्णा, गेले काही दिवस खरे आणि शहाणे आणि त्यांच्या कॉपीराईट बद्दलच्या भूमिका यांच्याबद्दल माध्यमांमधून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.येथे तशी काही चर्चा व्हावी असं मला वाटल म्हणून येथे पोस्ट टाकली. इथें बहुतेकजण टोपण नावाने लिहितात.टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखकाबद्दल कॉपीराईट कायद्याची काय भूमिका आहे याबद्दल थोड जाणून घ्यावसं वाटल.

ज्योती ,इथें लिहिणारे बरेच जण टोपण नावाने लिहीत आहेत.कॉपीराईट कायदा अशा प्रकारच्या लेखनाबद्दल काय भूमिका घेतो??

निनाद's picture

10 Oct 2013 - 7:01 am | निनाद

शोध घ्या की जरा...

हे घ्या
http://www.misalpav.com/node/16324

हे वाचा
http://bhunga.blogspot.com.au/2011/03/copyrights-piracy-bloggers-readers...

पत्राचा ‘कॉपीराईट‘ नेमका कोणाकडे...?
http://www.loksatta.com/daily/20021013/mp07.htm

उपक्रमावर प्रताधिकार विषयक विस्तृत चर्चा होती.
पण उपक्रम स्थळ बंद पडल्याने ती आता मिळणे दुरापास्त झाले आहे :(

फुंटी's picture

10 Oct 2013 - 4:32 pm | फुंटी

धन्यवाद निनाद..

तुम्ही दिलेला धागा हा केवळ कायदेविषयक पुस्तकांच्या कॉपीराईट संबंधी निगडीत आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Oct 2013 - 3:02 pm | माम्लेदारचा पन्खा

जो जे लिहितो त्याचा चोप्य हक्क असतोच त्यावर....कसलीही नवीन निर्मिति मग भले ती नोन्दणीक्रुत केलि नसली तरी तिच्यावर हक्क सान्गता येतो...

(अ)मी जर का कुणाचे लिखाण स्वत:चे म्हणून आणि मूळ लेखकाचे नाव न देता वर्तमानपत्र अथवा संकेतस्थळावर लिहिले तर ती वाङमयचोरी ठरेल .कॉपीराईट भंग .(ब)मी जर एखादे पुस्तक लिहिले आणि त्यात दुसऱ्या कुणाचा लेख अथवा कविता ( त्याची लेखी अनुमती न घेता ) लेखकाच्या नावासह छापले तर त्याच्या नावाचा आणि कृतीचा मी माझ्या पुस्तकाच्या विक्रीकरता (दुरु)पयोग करून घेतला असे म्हणता येईल .(क)कोणत्याही संकेतस्थळावर ,फोटो वेबसाईटवर नोंथणी करतांना आपण आपलीच कृती देऊ हे मान्य करतो त्यामुळे ते प्रसिध्दी माध्यम आपल्या चोरीच्या सहभागाच्या आरोपातून मुक्त indemnity राहाते .

पैसा's picture

12 Oct 2013 - 10:12 pm | पैसा

http://copyright.gov.in/Documents/CopyrightRules1957.pdf

हे वाचले तर बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. महत्त्वाचे म्हणजे टोपणनावाने लिहिलेल्या लिखाणाला सुद्धा ६० वर्षे कॉपी राईट असतो. आपण एखाद्या संस्थळावर कोणाच्या कृतीबद्दल लिहितो तेव्हा कायद्याच्या पुढील कलमांनुसार कॉपीराईटचा भंग होत नाही असे वाटते.

52. Certain acts not to be infringement of copyright. -(1) The following acts shall not constitute
an infringement of copyright, namely:

( a ) a fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work 104[not being a computer
programme] for the purposes of-
(i) 105private use, including research;
(ii) criticism or review, whether of that work or of any other work; "
(aa)106 the making of copies or adaptation of a computer programme by the lawful possessor of a
copy of such computer programme, from such copy-
(i) in order to utilise the computer programme for the purposes for which it was supplied; or
(ii) to make back-up copies purely as a temporary protection against loss, destruction or damage in
order only to utilise the computer programme for the purpose for which it was supplied;"
121A "(ab) the doing of any act necessary to obtain information essential for operating inter-operability of an independently created computer programme with other programmes by a lawful possessor of a
computer programme provided that such information is not otherwise readily available;
(ac) the observation, study or test of functioning of the computer programme in order to determine
the ideas and principles which underline any elements of the programme while performing such acts
necessary for the functions for which the computer programme was supplied;
(ad) the making of copies or adaptation of the computer programme from a personally legally
obtained copy for non-commercial personal use; ;
(b) a fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work for the purpose of reporting current
events-
(i) in a newspaper, magazine or similar periodical, or
(ii) by 107[broadcast] or in a cinematograph film or by means of photographs

अधिक स्पष्टीकरणाच्या अपेक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2013 - 11:41 am | डॉ सुहास म्हात्रे

टोपणनावाने लिहिलेल्या लिखाणाला सुद्धा ६० वर्षे कॉपी राईट असतो. हुश्श्य ! हे वाचून लैच बरं वाटलं !!! :)

ह भ प's picture

13 Oct 2013 - 12:51 pm | ह भ प

पण बर्‍याचदा लेखांची ई-पत्रे येतात.. त्यात मूळ लेखकांची नावे नसतात.. ती ई-पत्रे तशीच पुढे ढकलली जातात.. न जाणो त्या मुळ लेखकाला हा प्रकार कळल्यास तो कुणाकुणावर ठपका ठेवेल न कुणाकुणावर खटला भरेल..
तसाच प्रकार ई पुस्तके शेअरिंग वेबसाईटवर पण पहायला मिळतो.. सर्रास मुळ पुस्तकांच्या स्कॅन्ड कॉपीज किंवा खरीखुरी पुस्तके जशिच्यातशी डाउनलोड करता येतात.. कॉपीराईट कायद्याचं यावर नियंत्रण येणं अवघडच आहे.