डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)
नवीन वर्षाचा पहिला दिवस , माया -बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते मुनिसीपालीटीने शहरातला कचरा उचलून, कचरा घरांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिच्रारे सकाळ पासून कुजक-माजक, नासलेल- सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी , श्रीखंड खायला मिळेल.