साहित्यिक

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 9:18 pm

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 3:27 pm

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. पुण्यात होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.

मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.

काही मुद्दे..

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाचित्रपटविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

२६ फेब्रुवारी वीर सावरकर ह्यांची पुण्य तिथी निमित्य .

kalpana joshi's picture
kalpana joshi in जनातलं, मनातलं
20 Jan 2014 - 6:45 pm

स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर

“धगधगत्या ज्वाला पेटवून ह्र्दयात,
स्वातंत्र्य चे स्वप्न पाहिले क्रांतिविरांनी त्यात ,
कितीएक प्राणाच्या आहुत्या पडल्या ,
त्या स्वातंत्र्याच्या महासंग्रात ”

साहित्यिकलेख

भाषा - आपली सर्वांचीच

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
15 Jan 2014 - 4:45 pm

नुकतंच (म्हणजे दहा मिंटं झाली असतील) अविनाश बिनीवाले यांचं 'भाषा - आपली सर्वांचीच' हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. (अजून एक लिंक) आणि मराठी भाषेविषयीचा (खरंतर इतरही अनेक भाषांविषयीचा) दृष्टीकोन काही बाबतीतं नव्याने उमगला, काही बाबतींत दृढ झाला, काही बाबतीत तो पूर्णपणे बदलला. अविनाश बिनीवाले यांचे 'लोकसत्ता' मध्ये जुलै १९९८ ते डिसेंबर १९९९ या काळात भाषाविषयक सदरांत ७८ लेख प्रकाशित झाले.

भाषासाहित्यिकआस्वाद

मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Jan 2014 - 1:30 pm

खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर

कवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.

विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Jan 2014 - 10:25 pm

विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.

उळळागड्डी , एक अप्रतिम एकांकिका.

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
30 Dec 2013 - 7:24 pm

नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं.

नाट्यसाहित्यिकसमीक्षा

टोपण नावे

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
30 Dec 2013 - 6:56 pm

मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का?

१. कलंदर : अशोक जैन
२. ठणठणपाळ : जयवंत दळवी
३. तंबी दुराई : ??
४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर

प्युअरसोतम - ला - देस्पांद

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
24 Dec 2013 - 8:22 am

उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो.

साहित्यिकआस्वाद