सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २
भाग १ - http://misalpav.com/node/26930
२)
रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली. ती त्याच्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठी होती. आणि मित्राची मॅडम असल्याने रघूवीर तिला "मॅडम"च म्हणायचा. हळूहळू दोघांची मैत्री वाढली. त्यावेळी मोबाईल चा वापर फारसा वाढला नव्हता. प्रणिता रघूवीर ला कॉईन बॉक्सवरुन आमच्या कार्यालयातील फोनवर कॉल करायची. कार्यालयातील फोन देखील अनेक कर्मचा-यांत सामाईक होता. ती खूप वेळ बोलायची आणि ईतर लोक फोन वापरण्यासाठी ताटकळायचे.
मी आणि इतर मित्रांनी रघूवीर ला प्रणितावरुन चिडवायला सुरु केले. तेव्हा तो त्यांच्यात फक्त मैत्री आहे असं म्हणायचा. पण लवकरच प्रकरण गंभीर होवू लागले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्यात. अखेर रघूवीर ने प्रणिताशी लग्न करण्याचा विचार आपल्या घरी मांडला. पण त्याच्या आई-वडीलांनी खूप विरोध केला. "आम्ही जीव देवू" वगैरे धमक्या दिल्यात. त्याला भाऊ नव्हता आणी लग्न झालेल्या दोघी बहिणींनी सुध्दा त्याला पाठिंबा दिला नाही.
तो खचू लागला. पण दोघांच्या भेटीगाठी चालूच होत्या. त्याने नुकताच एक छोटा फ्लॅट घेतला होता. ते दोघे त्या फ्लॅटमध्ये एकांतात भेटत. प्रणिता खूप हळवी झाली होती. रघूवीरशी लग्न करण्यास अतिशय आतूर होती. पण तो आई-वडीलांच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवत नव्हता. यावरुन दोघांत भांडणे होत. दरम्यान इनकमिंग मोफत झाल्यावर मी मोबाईल घेतला, मग माझ्या मोबाईल वर रघूवीर साठी प्रणिताचे फोन येत. त्यांच्या प्रेमप्रकरणात माझ्या मोबाईलचा सहभाग होता याची मला फार गंमत वाटे. दोघांसाठी मी एक विश्वासू मित्र आहे या भावनेने बरे वाटायचे.
थोडे दिवसानी त्यानेही मोबाईल घेतला. पण तरीही कधी त्यांचे भांडण झाले असले आणि त्याने फोन नाही उचलला की प्रणिता मला कॉल करुन विचारायची कि "रघूवीर फोन का नाही उचलत".. मग "तो आता कामात/ मिटींगमध्ये बिझी आहे" असं उत्तर मी द्यायचो.
तो काही वेळा हळवा होवून माझ्याशी बोलत्त असे. मी त्याला सुचवले की "तू लग्न कर तिच्याशी आई-वडील नंतर राजी होतीलच." पण तो हिंमत नाही दाखवू शकला. प्रणिताच्या घरुनही तिने आता लवकर लग्न करावे म्हणून दबाव होता. अखेर तिने कंटाळून घरच्यांनी दाखविलेल्या एका स्थळाला होकार दिला. लग्न ठरले , वर ही त्याच शहरातला होता. पण तरीही दोघांच्या भेटीगाठी होतच होत्या (अगदी फ्लॅटवरदेखील). मी याबद्दल रघूवीरला काही विचारायचा प्रयत्न केला तर तो उत्तर टाळायचा. पुढे तिचे लग्न झाले.
काही दिवसांनी कळाले की हे दोघे अजूनही भेटत आहेत...मी त्याला याबद्दल विचारले तर तो म्हणाला "आता आम्ही फक्त मित्र आहोत. आणि मित्र म्हणुनच भेटतो." तिच्या नव-याच्या चांगल्या स्वभावाचे गोडवेही त्याने माझ्याकडे गायलेत.
नंतर मी ती नोकरी बदलली. माझा रघूवीरशी संपर्क कमी झाला. काही वर्षांनी त्यानेही लग्न केले. पण मित्र म्हणुन तो अजूनही प्रणिताला भेटतो.
पण आता आमचा संपर्क झाला तरी मी त्याला या विषयात फारसं काही विचारत नाही.
Book traversal links for सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कथा छान आहे....
तुम बिन जिया जाये कैसे
त्या हळव्या मनस्थितीत असताना
छान लिहिलिये कथा.
पहिली आणि दुसरी कथा सेम च आहे
नाही. या कथांचा एकमेकांशी
मुलाचं छोटं आणि मुलीचं मोठं वय
अजुन येवूद्या
वाचतोय !
हजारो ख्वाहिशे ऐसी....
अजून येऊ द्या!
>>>सत्यकथा आहे का?
कथा
अगदी १०० %