नमस्कार ,
बर्याच दिवसांनी बोलतोय तुमच्याशी ... आजकाल मिसळपाव वर वाचन मात्रच असतो ..पण , असतो एवढं नक्की ...
नवं काही केलं की ते मिसळपाव वर अधी सांगायचं ही माझी जुनी सवय ...
(बघता बघता मिसळपाव शी कनेक्ट होऊन ५ वर्षे होत आली मला !!! )
त्यासाठीच आजही लिहितोय येथे
गेल्या म्हणजे जुनच्या सुट्टीत एक वेगळा प्रयोग केला ...
कोल्हापुरात एक लोकल टीव्ही चॅनेल आहे ..चॅनेल "बी" म्हणुन ...
त्यासाठी एक टीव्ही शो केला ..बुकीश नावाचा .. पुर्णपणे पुस्तकांवर आधारीत ...
त्याची मांडणी , सूत्रसंचालन आणि दिग्दर्शन करायची संधी मिळाली होती
कालच्या शनिवार पासुन म्हणजे २० जुलै पासुन स्ट्रीमींग सुरु झालयं त्याचं
बाहेरच्या लोकांसाठी यु ट्युब वरदेखील अपलोड केलाय तो ... पहिल्या भागाची लिंक देत आहेच इथे
बुकीश भाग १
पुढच्या भागांतही बरचं काही वेगवेगळं द्यायचा प्रयत्न करणार आहे ...
जरुर पाहा हा उपक्रम .. काही चुकल माकलं असेल तर नक्की सांगा ....
लोभ आहेच तो वॄद्धींगत व्हावा हीच इच्छा ...
आपलाच
विनायक
प्रतिक्रिया
22 Jul 2013 - 3:04 pm | बॅटमॅन
वा! उत्तम उपक्रम आहे. सवडीने व्हिडिओ पाहतोच. कोल्हापुरात लोकल लेव्हलला हा प्रयत्न पाहून छान वाटलं.
22 Jul 2013 - 4:01 pm | विजुभाऊ
विनायक असाच प्रयोग मी सातार्यात केला आहे.
यू ट्यूब वर अपलोड करून मी ती लिंक इथे डकवेन
23 Jul 2013 - 1:26 pm | स्पंदना
व्वा! विनायक!
अभिनंदन!
24 Jul 2013 - 2:48 am | खटपट्या
जबरदस्त प्रयोग,
धन्यवाद विनायक