टोपण नावे

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
30 Dec 2013 - 6:56 pm
गाभा: 

मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का?

१. कलंदर : अशोक जैन
२. ठणठणपाळ : जयवंत दळवी
३. तंबी दुराई : ??
४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर

प्रतिक्रिया

तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत बोजेवार.

विभावरी शिरूरकर= मालती बेडेकर.

ग्रेस= माणिक गोडघाटे.

गोविंदाग्रज= रा.ग.गडकरी, कुसुमाग्रज= वि.वा.शिरवाडकर. बालकवी=त्र्यंबक बापूजी ठोंबरे, माधव ज्यूलियन= माधव पटवर्धन, बाकीबाब= बा.भ.बोरकर.

कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब?

बाकीही अनेक असतीलच. मला बरोबर आठवत असेल तर बहुतेक पुलंनीही त्यांचे "अण्णा वडगावकर" हे व्यक्तिचित्र टोपणनावानेच प्रकाशित केले होते.

अत्रन्गि पाउस's picture

30 Dec 2013 - 7:08 pm | अत्रन्गि पाउस

शेवटी एक यादी प्रकाशित करूयात ..

अमेरिकन त्रिशंकू's picture

31 Dec 2013 - 6:48 am | अमेरिकन त्रिशंकू

कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब?

बी = नारायण मुरलीधर गुप्ते

बॅटमॅन's picture

31 Dec 2013 - 6:49 pm | बॅटमॅन

हायला, हा तर फुटात बारा इंचाचा फरक पडला की हो =))

धन्यवाद त्रिशंकू साहेब दुरुस्तीबद्दल.

सुहास झेले's picture

30 Dec 2013 - 7:36 pm | सुहास झेले

ज्ये बात :) :)

अत्रन्गि पाउस's picture

30 Dec 2013 - 7:55 pm | अत्रन्गि पाउस

आम्हास्नी सुचलंच न्हाई पघा !!!
तुम्हाले पण ठ्यांक्यू बर्रका!!

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 8:06 pm | बॅटमॅन

मस्त पा यसवायजी!!

टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा त्याची गोष्ट द्या .उदा ठणठणपाळची सही मिळवायला आइडलपाशी लागलेली रांग आणि कोण ते उघड केल्याशिवाय वाचक जाईचनात .त्यांचे लेख बंद झाल्यावर धारवाडकरांचे (जीएंचे) आलेले खरमरित पत्र .

अत्रन्गि पाउस's picture

30 Dec 2013 - 8:21 pm | अत्रन्गि पाउस

अजून काय माहिती आहे?

विटेकर's picture

2 Jan 2014 - 6:34 pm | विटेकर

इसकटून सांगा की !

खटपट्या's picture

31 Dec 2013 - 12:58 am | खटपट्या

भटक्या = प्रमोद नवलकर (स्तंभ लेखक)

बाल्गन्धर्व = नारायण राजहंस

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Dec 2013 - 6:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नारायण श्रीपाद राजहंस __/\__!

केशवसुत - कृष्णाजी केशव दामले.

अमोल मेंढे's picture

4 Jan 2014 - 5:02 pm | अमोल मेंढे

प्रल्हाद केशव अत्रे

प्रसाद गोडबोले's picture

7 Jan 2014 - 1:47 pm | प्रसाद गोडबोले

मिपावरच्या टोपणनावांची अशी सुची करता येईल का हो ? ;)