खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर
कवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.
Where The Mind Is Without Fearमधील रबिंद्रनाथ टागोरांच्या "Where the world has not been broken up into fragments By narrow domestic walls मध्ये अशीच काहीशी भावना असेल का ? रबिंद्रनाथ पुढे म्हणतात Where the clear stream of reason has not lost its way Into the dreary desert sand of dead habit.जर रिझन जिंकायच असेल तर मनाचा खुलेपणा (ओपन माईंडेडनेस) लागतो खेळाडू वृत्ती नाही का ?
ओपन माईंडेडनेस बद्दल John Dewey म्हणतो Openness of mind means accessibility of mind to any and every consideration that will throw light upon the situation that needs to be cleared up, and that will help determine the consequences of acting this way or that. पुढे म्हणतो to welcome points of view hitherto alien; an active desire to entertain considerations which modify existing purposes. Retention of capacity to grow is the reward of such intellectual hospitality.
* अशा या मनाच्या खुलेपणाबद्दल एक मस्त युट्यूबवर सादरीकरण (इंग्रजी) उपलब्ध आहे.
मिपाकरांच्या सहकार्याने मराठी विकिबुक्स प्रकल्पात मागच्या वेळी कठोर टिका कशी करावी या बद्दल चर्चा करून लेख लिहिण्याची पुर्वतयारी केली तशीच मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? या विषयावर मिपाकरांचे दृष्टीकोण माहिती करून घेऊन मराठी विकिबुक्समधील लेखात घ्यावयाचे आहेत.
*वरील John Deweyच्या क्वोट्स प्रमाणेच इतरही क्वोट्स/अवतरणे मराठी विकिक्वोट्स या मराठी विकिपीडियाच्या बंधू प्रकल्पात उपलध केली आहेत. त्यांच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.
मनाच्या मोकळेपणा/खुलेपणा बद्दल मराठी/हिंदी/उर्दू लेखकांचे कवींचे अजून क्वोटेशन्स अवतरणे मिळाल्यास तेही हवे आहे.
(येथील चर्चा मराठी विकिप्रकल्पात वापरावयाची असल्यामुळे आपले या धाग्यावरील चर्चेतील लेखन कॉपीराईट्फ्री होते आहे असे गृहीत धरून चालतो)
*बेताचे अनुषंगिक विषयांतर चालु शकेल
प्रतिक्रिया
15 Jan 2014 - 1:57 pm | बर्फाळलांडगा
माइंड इट!
15 Jan 2014 - 8:45 pm | माहितगार
धन्यवाद
16 Jan 2014 - 12:39 pm | शशिकांत ओक
मित्रा,
आपण याविषयावर विकीपीडिया साठी फक्त कोट्स वा अवतरणे याशिवाय अनुभवात्मक माहितीची जोड हवी असेल तर....
मी काही मदत माझ्या अनुभवांना धरून करू इच्छितो. बेताचे अनुषंगित विषयातर चालेल अशी पुस्ती जोडल्याने ही विचारणा...
आपण दिलेली यु ट्यूब लिंक ऐकली. वाचली. त्यात नेमके जे म्हटले आहे की पुराव्याशिवाय काहीही मानणे गैर आहे. त्याचा पाठपुरावा करूनच...
....वरील जॉन डेवी यांचे उद्धरण वाचले व आपल्याला मनाचा खुलेपणा कसा जोपासावा यावरील माझे विचार नाडी ग्रंथांच्या अनुरोधाने कसे निर्माण झाले व पुढे रिवॉर्ड ऑफ सच इंटलेक्चुअल हॉस्पिटॅलिटी कशी घडते आहे यावर प्रकाश टाकता येईल. ते इथे टाकावे की आपल्याला वेगळे ईमेल करून कळवावे ते सांगावे. माझी दोन्हीला तयारी आहे.
16 Jan 2014 - 1:08 pm | माहितगार
हो प्रत्यक्षात विकिबुक्सवर लिहिणार आहे.विकिबुक्स विकिपीडियाचा बंधू प्रकल्प असून लेखन विषयक अधिक लवचिकता उपलब्ध होते.अनुभवात्मक माहितीची जोड देता येऊ शकेल हे लक्षात घेऊनच बेताचे अनुषंगित विषयांतर चालेल अशी पुस्ती जोडली.तेव्हा आपल्या अनुभवांची माहिती जाणून घेण्यास उत्सूक आहे. सोबतच कुणाला चुटकूले आणि प्रताधिकार मुक्तस्वरूपात चित्रे व्यंगचित्रे देणे शक्य असेल तर तेही हवे आहे
मोकळेपणा बद्दल चर्चा होताना माझ्या सकट फारशा कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याचे कारण होईल असे वाटत नाही कुणाच्या व्यक्तीगत भावना दुखावल्या जाण्याची अगदीच अगडबंब शक्यता नसेल तर या धाग्यावरच चर्चा होऊन जाऊद्या असे वाटते म्हणजे इतरांनाही सहभागी होता येईल. तरी सुद्धा व्यनिने आपल्या करता माझा इमेल पत्ताही उपलब्ध करेन बाकी लिहिणारे आपण आहात तेव्हा लेखकाची इच्छा शिरोधार्य.
नाडी ग्रंथ म्हणजेही कल्पना नाही आणि त्याच्या अनुरोधाने काही नवी माहिती मिळते तर जाणून घेण्यास
-मनाच्या खुलेपणाची अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने मदत होऊ शकते आपल्या अनुभवातून शिकण्यास - निश्चित उत्सूक आहे.
धन्यवाद
16 Jan 2014 - 5:02 pm | शशिकांत ओक
माहितगार,
मिपावर नाडी ग्रंथ विषयावरील धाग्यावर विविध प्रकारांची रंजक चर्चा झडलेली आहे. शिवाय नाडी ग्रंथ भविष्य यावर पुस्तके ही उपलब्ध आहेत. नाडी ग्रंथ विषयावर मेन विकीवर माहिती उपलब्ध आहे. नाडी ग्रंथ भविष्य हे तमिळ भाषेच्या कूट्टेळुत्तु लिपीत ताडपत्रावरील लेखनाद्वारे केले गेलेले व्यक्तीचे भविष्य कथन आहे. सुरवातीला मजा वाटली म्हणून व नंतर असे असणे अशक्य आहे असे वाटून मी याचा पाठपुरावा करत गेलो. मी ज्योतिषी नाही. भविष्य जाणून घेण्यात रस नाही. मात्र ताडपत्रावर व्यक्तीच्या नावाचे उल्लेख खरोखरीच असतात का याचा सतत शोध घेऊन आलेल्या अनुभवांना ओपन माईंडने पहायला प्रयत्न करत आहे. त्यात तमिळ भाषेच्या,लिपीवर काम करणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे.
गेल्या काही काळापासून मिपावर नाडी विषयावर लेखन टाळतो. तरीही कधी मधी इतरांच्या प्रतिसादातून त्यावर लिहिले जाते. विज्ञान आणि चमत्कार ग्रंथ परिचय या घाग्यावर बऱ्याच खाली नाडी ताडपट्टीचा फोटो टाकायला मला भरीला घातले गेले. त्यातील फोटो वरून आपल्याला नाडी ताडपत्रावरील लेखनाचा मासला मिळेल.
लाल निळ्या रंगाचा इंगा धागा ही वाचावा त्यात अधिक माहिती मिळेल. मी पुण्यात असतो मोबाईलवर उपलब्ध . व्य निरोप इतरांच्या माहितीसाठी.
16 Jan 2014 - 5:45 pm | प्यारे१
@ माहितगार,
'तुझा झगा गं झगा गं वार्यावर उडं' हे गाणं आपल्याला माहिती आहे का ?
मनाच्या मोकळेपणानं सांगावं.
21 Jan 2014 - 3:33 pm | पैसा
मला वाटलं तो एकतर असतो किंवा नसतो!
21 Jan 2014 - 4:12 pm | मदनबाण
पै तै शी बाडिस...