फेर..
एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची.