आतापर्यंत.....
आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला.
आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला....." शक्यच नाही ?"
पुढे चालु....
स्क्रिन शॉट भाग -५
"शक्यच नाही ? "
जिने आपल्या वॉलवर स्क्रिन शॉट टाकला ती अभिषा व तिच्या सोबत सुधीर, जगदीश, विशाल, सुषमा,नेहा,सोहम,सार्थक सगळे एकत्र पाहुन अमित आश्चर्यचकित झाला त्याला त्या वाक्यानंतर काहिच बोलता येत नव्हते. असेच काही मिनिट शांततेत गेले आता अमित बराच सावरला कोणीच काही बोलत नाही असे पाहुन अमितने बोलायला सुरुवात केली
अमित " तुम्ही सगळे इथे कसे काय?"
सुधीर " आता किती वाजले आहेत माहीत आहे का?"
अमित " का? असे का विचारतोस ?"
सुधीर " संध्याकाळचे ५ वाजले आहेत."
विशाल " तू सकाळी घरातून बाहेर पडला आणि गाडीवर बसून इकडे निघाला तेंव्हापासून सोहम व साईराज तुझ्या मागे होते."
अमित "काय?"
त्याला मधेच थांबवत सुधीर बोलू लागला.
" सकाळी ९ वाजता तू इथे आला आहेस आणि तुझ्या मागोमाग सोहम व साईराज आले आहेत.तेंव्हा पासून ना तू पाणी पिलास कि ना काहि अन्न घेतले आहेस आणि त्यामुळे तुझ्यासह हे दोघेही उपाशीच आहेत.अगोदर आपण सर्वजण काहितरी खाऊन घेऊया."
हे ऐकताच सकाळ पासून तणावात असलेल्या अमितला भुकेची नाही पण आपल्याला तीव्र तहान लागल्याची जाणीव मात्र झाली.
अमित "मला थोड़े पाणी मिळेल का?"
सुषमाने आपल्याकडील पाण्याची बाटली अमितला दिली.
सुषमा " हळू हळू पाणी पी एकदम पिलास तर त्रास होईल."
अमितने तिच्या सांगण्यानुसार सावकाश पाणी पिले आता सर्वजण शांतपणे टेकडी उतरु लागले.
आता सगळे हॉटेल शिवसागर मध्ये शांतपणे नाष्टा करत होते. पण खरेच सगळे शांत होते का? या दिवसभरात नेमके काय घडले आहे? हे सगळ्यांनाच एकमेकांकडून जाणून घ्यायचे होते.
सुधीर तसा गृपचा लिडर होता. आता सुध्दा त्यानेच बोलायला सुरुवात केली.
सुधीर " आम्हाला सुध्दा ते मेसेज आले आहेत. म्हणजे जो पर्यंत हे सगळ्यांनाच आलेत हे एकमेकांना समजण्यासाठी पहाटे पर्यंत वेळ गेला. अगोदर आम्ही सुध्दा शॉक झालो.पण रात्री 12.30 नंतर अतिशय महत्वाचे काम असेल तरच तुझा मोबाईल व नेट चालु असते हे आम्हाला माहीत आहे."
अमित " मला नाही समजले "
सुधीर "तसे पाहिले तर आपल्या गृप मधिल प्रत्येकाचे गुण, दोष आपल्याला माहीत आहेत. कोण कसा आहे? कशी वेळ आल्यावर तो कसा वागेल? याचा आपल्याला एक अंदाज असतो. हे अंदाज अपवादात्मक परिस्थितीत मात्र बदलू शकतात. मात्र असे काही घडलेले नसताना हा प्रकार का घडला? यात तूच आहेस कि दुसऱ्या कोणी हे केले आहे? हे आम्हाला सुध्दा शोधायचे होते."
अमित " मी नाही समजलो"
विशाल " हा विषय कोणी ना कोणी ऑनलाईन आणल्या नंतर तुझी बदनामी होणारच होती."
अमित " मग आता अजुन काय बाकी राहिले आहे. जे काही व्हायचे ते होऊन गेले कि"
सुधीर " अरे यासाठीच आम्ही अभिषाला ती स्क्रिन शॉटची पोस्ट करायला सांगितली होती."
अमित " म्हणजे?"
विशाल " अरे अभिषा नेहमी कविता,ललित लेखन, कथा असे सगळेच लेखन अगदी ऑर्कुट पासून करत आहे.आज आपल्या सर्वांपेक्षा तीची फ्रेंड लिस्ट व फॉलोअर यांची संख्या जास्त असल्याने सर्व फ्रेंड्सना तिच्या पोस्टचे नोटिफिकेशन जाणार आणि ज्यांना ज्यांना हे मेसेज आलेत ते तिच्या पोस्टवर एकत्र येणार हे आम्ही ओळखून तिला पोस्ट करायला सांगितली."
अमित " फ्रेंड्स तुम्ही हे काय केले? अरे ज्याला मेसेज नाही गेले त्याला सुध्दा ह्या प्रकाराविषयी समजलेच ना."
सुधीर " जेंव्हा वेगवेगळ्या अकाउंट वरुन ह्या प्रकाराची पोस्ट आल्या असत्या तर अगदी तसेच झाले असते. मग कोण काय म्हणते आहे? नेमक्या किती जणांना ते मेसेज आले आहेत हे आपल्याला कसे समजणार होते? आणि सगळ्यात महत्वाचे सोशल नेटवर्कवर एखाद्या वेगळ्याच विषयाची पोस्ट पहिली येते आणि जिथे एखादा चांगला असो वाईट असो विषय येतो तिथे त्यात इंटरेस्ट असणारे जमा होतात. आणि काहितरी गरमागरम होत असेल तर तिथे तर अगदी हौश्या, नवश्या यांची जत्रा भरते. आणि आम्हाला सुध्दा तेच हवे होते जेणे करुन हा विषय मोठ्या प्रमाणात आपल्याच नजरे खाली होईल आणि त्याला कसे वळण द्यायचे ते आपल्याच हातात असेल."
अमित " एवढे सगळे करुन काही साध्य झाले का? माझी व्हायची ती बदनामी झालीच आहे कि "
सुधीर " टेंशन सोड.आम्ही तुझ्या सपोर्टरचा एक गृप केला.आणि ज्याला जसे शक्य आहे त्यांनी काय करायचे? हे काम विभागुन घेतले आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने हा काय प्रकार आहे,आणि कसा घडवला गेला हे सगळे आता समोर आले आहे."
विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे."
हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना.
विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे? हे उद्या आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे."
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Sep 2015 - 1:52 pm | मांत्रिक
वा! असे असावेत मित्र!
बाकी कथा मस्तच!!!
28 Sep 2015 - 11:08 am | पद्मावति
कथा खूपच मस्तं रंगत चाललीय. वाचतेय.
28 Sep 2015 - 4:39 pm | द-बाहुबली
ओह माय गॉद अतिशय अतार्कीक...