स्क्रिन शॉट

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
22 Sep 2015 - 5:52 pm

( विशेष सूचना- सदरील कथा व यातील व्यक्ति त्यांची नावे, प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे.
सोशल नेटवर्क म्हणजे सर्वप्रकारचे फोटो,व्हिडिओ, लिखाण,माहिती,मैत्री,वाद-विवाद यांचा अफाट महासागर असल्याने पुढील कथा कोणाला आपल्या जवळची वाटली तर तो योगायोग समजावा. )

अमितने नेहमी प्रमाणे सकाळचा नाष्टा झाल्यानंतर घरच्यांशी ठरल्याप्रमाणे रात्री बंद केलेला मोबाईल व त्यावरील डाटा फेसबुक,व्हाट्स अप वरील नोटिफिकेशन पाहण्यासाठी सुरु केला. अपेक्षे प्रमाणे सतत टिंग...टिंग येणाऱ्या आवाजाने तो सुखावला. जवळ जवळ 1.30 ते 2 मिनिट नोटिफिकेशन्सचा पाऊस सुरु असलेला आवाज थांबला आणि सवयी प्रमाणे प्रथम आपल्या वॉलवर त्याने नजर टाकली आणि त्याला शॉकच बसला.

अशक्य !!! शक्यच नाही !!! अमित मनातल्या मनात बोलला. अभिषाने टाकलेला स्क्रिन शॉट पाहताच तो जबरदस्त हादरला..... या पहिल्या झटक्यानंतर त्याला अजुन एक मोठा झटका त्याने कॉमेंट्सचा आकड़ा पाहिल्यावर त्याला बसला ....
तब्बल 689 कॉमेंट्स पाहुन तर त्याला दरदरुन घाम फुटला....अचानक बसलेल्या या धक्यातून सावरायला त्याला 5 ते 7 मिनिट लागले.

आता त्याने थरथरत्या बोटाने स्क्रिनवर कॉमेंट्स ओपन केल्या आणि त्याच्या फ्रेंडलिस्ट मधिल मूली,महिला,ज्येष्ठ नातेवाईक,शाळा कॉलेज, कामातील मित्र यांना त्याच्या प्रोफाईल वरुन केलेल्या असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली.

क्रमशः

कथाkathaaलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

22 Sep 2015 - 6:03 pm | मांत्रिक

बाप रे! काय झालं कुणास ठाऊक? सगळं ठीक असावं अशी अपेक्षा करतो!
हाय टेक थ्रिलर चांगलाच जमला आहे! पु.भा.प्र.

मी-सौरभ's picture

22 Sep 2015 - 8:04 pm | मी-सौरभ

खुप छोटा भाग लिहीलात
पु. भा. प्र.

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2015 - 8:24 pm | प्रभाकर पेठकर

हि फक्त एका फटाक्याची वात सुरसुरली आहे.

शित्रेउमेश's picture

23 Sep 2015 - 12:49 pm | शित्रेउमेश

नक्की काय होतं त्या स्क्रिन शॉट मध्ये???

द-बाहुबली's picture

23 Sep 2015 - 1:31 pm | द-बाहुबली

सोशल नेटवर्क म्हणजे सर्वप्रकारचे फोटो,व्हिडिओ, लिखाण,माहिती,मैत्री,वाद-विवाद यांचा अफाट महासागर असल्याने...

I wanted to spy everyone... and so I invented social network - Person Of Interest.