हरवलेलं विश्व
विमानाने उड्डाण केल आणि जयुने हलकेच निश्वास सोडून मान मागे टाकली आणि थोड़ी रिलॅक्स झाली. आज आयुष्यात पहिल्यांदाच ती एकटीच बाहेर पडली होती. त्यासाठी विजयशी तिने कितितरी वाद घातला होता.
***
विमानात बसल्या बसल्या तिच्या मनात काही दिवासांपूर्वीच्या घटनांच्या आठवाणींचे आवर्त फिरत होते...
".....अग पण मला इतक्या लांब आणि ते ही 10/12 दिवस कस जमेल? तू मुलांना घेऊन जा ना त्यांच्या सुट्टीमद्धे. सोबत ललिताबाईंना पण घे. हव तर अजयच्या बायकोला पण विचार. ती येईल. हा काय हट्ट आहे?" विजय वैतागुन बोलत होता.