अण्णा
अण्णा
---------
अण्णा
---------
"चला तर सदाशेठ. तुम्हाला अजिबात ताटकळत न ठेवता लवकरात लवकर तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकतो."
आपल्या छातीचे ठोके जोरजोरात पडताहेत हे सदाला जाणवलं.
सनी दिवानी - मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब, मदनिका, पूर्वाश्रमीची मादकपटांची नायिका व आताची चित्रपट अभिनेत्री. सनी दिवानी, जिने संपूर्ण जगभरातील तरुणांची हृदयं आणि जिच्या मादक व्हिडीओजनी त्यांच्या मोबाईलमधली मेमरी आणि कॉप्युटर्समधली हार्ड डिस्क व्यापली होती, ती सनी दिवानी. तिला भेटण्याच्या कल्पनेने सदाची अशी अवस्था झाली होती, त्यात नवल ते काय?
नमस्कार मंडळी !!
कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते.
लोणावळयाला उन्हाळयाचे भय कसले?? डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या या शहराचे सौभाग्य की ग्रीष्माच्या तापत्या उन्हाचा कोप याला कमीच सहन करावा लागत होता. तरीही नाजुक प्रवृत्तिची लोक डोक्यावर छत्र्या धरून निसर्गाने दाखविलेल्या औदार्याप्रती कृतघ्नपना दाखवित होती.
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.
रूमचं दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला.
“गुड मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली.
“वेरी गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले.
“कधी आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं.
“आत्ता just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.”
“ओके बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली. आंघोळ करून ती बाहेर आली तोपर्यंत निनाद साहेब चहाचे कप टी-पॉय वर मांडून सोफ्यावर पाय पसरून आडवे झाले होते.
खुर्चीवर बसत तिने चहाचा घोट घेतला.
“ह्म्म्म, मस्तं झालाय चहा” ती समाधानाने उद्गारली.
१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.