शब्दांशी दोस्ती
शब्दांनीच जर मैत्री करायची
तर शब्दाना कशाला प्रौढ करायचे
कशाला द्यायची त्यांच्या हातात पंतोजीची छडी
नि उगाच आजोबाची काठी
एवढ्या जुन्या पिंपळ वृक्षाला फुटतेच ना नव्याने पालवी
केशरी छटा असलेल्या कोवळ्या पानांनी
वृक्ष जातोचना सळसळून
पोपट करतातच न मुक्काम भर रात्री त्यांच्या फांदीची उशी करून
झाडांना कशी स्वप्ने पडतात उद्याची
मग कशी दिसते
त्यांच्या अंगावर नव्याने फुलून गेलेली कोवळी पालवी