मुक्तक

संत ज्ञानेश्वर व आपण

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 Jul 2014 - 10:23 am

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला.

जडण-घडण...6

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
21 Jul 2014 - 6:15 pm

डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली.

मुक्तकअनुभव

CID एपिसोड: आईच्या गावात अंन बाराच्या भावात

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
15 Jul 2014 - 4:22 pm

३ दिवसांपूर्वी सुषमाचा फोन आला, मी म्हटले - बोल सुशे, कशी आठवण काहाडली ? सुषमा म्हणाली - तुमची मदत हवी, ACP प्रद्युम्न, आम्ही विनंती करू करू दमलो, पण हाफिजचा पत्ता लागत नाही. मी म्हणालो - तुम्ही चुकीच्या जागी शोधू राहू लागले न बाप्पा, तो तुम्हाला पाकिस्तानात सापडेल. सुषमा म्हणाली - तेवढ बघा न भाऊ. माझा पाकिस्तान्यांवर भरोसा नसल्याने, मी आपल्या टीमबरोबर, जुन्या क्वालीसमधून पाकिस्तानात गेलो. (या भारतात काही लोक आहेत कि जी जगात कोणालाही कुठेही कधीही जाऊन भेटू शकतात, त्यांना पासपोर्ट विसा प्लानिंग असं काही लागत नाही ) .

मुक्तकविरंगुळा

"टी "

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 12:57 pm

असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो.

" जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन
करावा ।"

"अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. "

मुक्तकअनुभव

पाऊस दाटलेला

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 1:50 am

Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत..

मुक्तकविचार

कठीण समय येता कोणही कामास येतो

बुडबुडा's picture
बुडबुडा in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 12:26 am

आपण ज्याला जमेतही धरत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला नेमक्या वेळी कामास येतात आणि मजा येते जगण्याला..आपलचं आपल्याला हसू येत राहतं..
आज सकाळचीच मजा..९.३०चं ऑफिस..घरातच ९.२०वाजलेले..आता अशा घाई गडबडीच्या वेळी ट्राफिकमध्ये अडकायला नको म्हणून आवरायची गडबड.. आणि अशावेळी माझं नेहमीप्रमाणे स्वगत चालू. “नशीब आज विकेंड आहे..फोर्मल घालायची गरज नाही..” जीन्स चढवली..बेल्ट लावायला लागलो..आणि ‘कट्ट्’ असा आवाज झाला आणि बेल्टच्या बक्कलची स्प्रिंग तुटून खाली पडली.. “आईचा घो याच्या”. आता आली का पंचाईत.. दुसरी जीन्स धुतलीच नव्हती..आणि आज फोर्मल घालायची इच्छा नव्हती.

मुक्तक

जडण-घडण...5

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
9 Jul 2014 - 5:51 pm

गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.

मुक्तकअनुभव

कहां गये वो लोग?--संज्या

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
7 Jul 2014 - 4:15 pm
मुक्तकविरंगुळा

कहां गये वो लोग?--मंग्या

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
4 Jul 2014 - 5:26 pm
मुक्तकआस्वाद