मुक्तक

स्वामी चेकाळदर्शी उवाच: प्रतिगामीस्य किम् लक्षणं?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
5 Sep 2014 - 12:01 pm

माझ्या चेकाळपंथी आशारामा, स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या गोष्टींनासुद्धा धर्मतत्वाचा मुलामा चढवायची, आपली जुनी हौस कायम आहे वाटते. उपजत धार्मिक, निस्वार्थी, निर्मोही अशी स्वतःच बनविलेली, स्वतःची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपली तत्वशून्य वागणूक लपविण्याचे प्रयत्न आपणाला हातचलाखीने आजही तुरुंगातूनच करावेच लागतात.
माझ्या उच्चनैतिक ओसामा-बाबा, आपल्यासारख्यां विचारसरणीच्या तमाम लोकांच्या मुखकमलातून, उच्च नैतिक अधिष्ठानाचे संरक्षक कवच

मिस यू बाप्पा ...

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
5 Sep 2014 - 12:02 am

आज तुझ्या मूर्तीच आम्ही विसर्जन केल ..अगदी मिरवणूक काढली ,फटाके फोडले,मंत्रजागर केला ,जागरणाची रोजची सवय लावलीस तू ,बघ ना देवा ,आज झोप पण येत नाहीये,खर तर दरसाल आम्ही तुझा उत्सव साजरा करतो, तुझ्या दर्शनाला येणारे अनेक लोक नवस करतात, एवढी वर्ष मलापण काही न काही हव असायचं,आणि मी मागायचो तुझ्याकडे,पण यंदा मी काहीच नाही मागितल आणि हे मला आता आठवलं..उगाच छान छान वाटत ...मी तुझ्याकडे काहीच मागितल नाही आणि तू मला छान छान असं काहीतरी अदृश देऊन टाकलस....भारीच आहेस हा तू...पण ज्यांनी ज्यांनी मागितलंय त्यांना दे रे ...फारच उदास करतोस रे तू जाताना...हल्ली तुझ्या मूर्तींचे किनाऱ्यावरचे अस्ताव्यस्त पडले

मुक्तक

केमिकल लोच्या

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
3 Sep 2014 - 2:45 am

कोण रे तू?
मासाच्या गोळ्यात अडकलेला तू ,
त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष ,
बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे
अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू ,
कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस??
विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर....
येडा कुठला .... साक्षात्कार म्हणे ....आत्मिक विचारचक्र गरगर फिरतात...
बरळून घे बरळून घे.....हेच आहे हक्काचं व्यासपीठ ...
तुझ्या येड्झवेगीरीला समजणार ...मोकळ करणार ..

मुक्तक

वरुण राजाला साकडं

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
2 Sep 2014 - 11:47 am

(चुकीच्या विभागात कविता टाकली होती आणि त्यात चुका ही होत्या)

श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.

साकडं घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला
वादळ फोडून पाऊस बरसला.

गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.

वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?

झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
साकडं घालतो तुच्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.

शांतरसमुक्तक

वंगाळ !

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
28 Aug 2014 - 2:20 am

साद झलकेची ,
मना मंदी चाळं,
शरावणातल बेडकं स्साल,
वंगाळ वंगाळ

गव्हाळ मानंखाली
तीळ मस्त काळं
चवचाल जीभ स्साली
वंगाळ वंगाळ

लाजुन पाठमोरी
बसली दातखीळं
कलिजा खल्लास स्साला
वंगाळ वंगाळ

पदराला पुरना कापड
अंगी रतीच मुळं
दमच निघना स्साला
वंगाळ वंगाळ

दोन चंद्राची रात म्हणं
गारवा आनं ढगाळं
सरना च आज स्साली
वंगाळ वंगाळ

शृंगारमुक्तक

मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 Aug 2014 - 12:34 pm

मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).

(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?

कामधेनु

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
23 Aug 2014 - 5:44 pm

जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर मनात आलेले विचार....

हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.

चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.

त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
डोकावुनी तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.

स्वत:ची लाज वाटली
का ओळखू शकलो नाही
प्रेम तिचे?

मुक्तक

जडण-घडण 10

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
22 Aug 2014 - 6:08 pm

ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता.

मुक्तकप्रकटन

सल आठवांचा...

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
18 Aug 2014 - 1:48 am

(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद)

सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही
विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे
तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता
अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे...

दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी
अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी
आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे...

करुणमुक्तक

कहां गये वो लोग?--रणशूर

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
16 Aug 2014 - 4:08 pm

http://www.misalpav.com/node/28220 कहां गये वो लोग?--बाबूकाका

http://www.misalpav.com/node/28221 कहां गये वो लोग?--आजीबाई

http://www.misalpav.com/node/28230 कहां गये वो लोग?--नाथा

http://misalpav.com/node/28237 कहां गये वो लोग?--मंग्या

मुक्तकप्रकटन