ओव्या
ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची .