माया
माया
एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो . तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मनुष्य एका लहान मुलाला घेऊन पुढील रस्त्यावर बसला . त्यानंतर त्याने त्याच्या पोतडीतून एक तेलाची बाटली काढली व तो मुलाच्या हाता / पायांना लावू लगला .ते पाहून मला वाटले कि तो मनुष्य त्या लहानग्याची किती काळजी घेतो आहे क़दाचित त्या मुलाने व्यवस्थित मोठे होऊन आपल्या म्हातारपणी आपली काळजी घ्यावी असा रेखिला त्याचा हेतू असेल . तो मनुष्य बर्याच आपुलकीने त्याला तेल लावत होता व तो मुलगा देखील शहाण्यासारखा तेल लावून घेत होता .