प्रामाणिक मत
आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात.