सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल?
घन निल यांचा लाडू झाला, ३_१४ विक्षिप्त अदिती यांचा झाडू झाला, खटासि खट यांचा खडूसुद्धा झाला.
मा. श्री. विजुभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे साडू आणि भाडू राहीले आहेत. रडू आणि भिडू चे क्वापीराईट मा. श्री. ध्यानस्थ बगळा यांनी घेतले आहेत. च्यायला, गडू कसे काय विसरले सगळे? त्याचा क्वापीराईट कोणीही कसा नाही घेतला? मा. श्री. वटवाघुळ यांनी गडू संबंधी सुतोवाच केलेच आहे. तेव्हा आधी कोणी जिलबी टाकायच्या आधी आपणच बाराखडी पुर्ण करण्याचा प्रयत्न करूयात या सदविचाराने हा धागा काढत आहे.
मला पडलेला प्रश्न म्हणजे सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल?