मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती.
एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते. मलाही बुद्धिबळ खेळायला आवडायचे. त्याला म्हटले की खेळू एकदा. आता त्या संपूर्ण बालगोपाल मेळाव्यात बुद्धिबळाचा संच केवळ बंड्याकडेच होता. त्यामुळे त्याच्या घरी खेळणे अपरिहार्य होते. मग ठरले, एका दिवशी दुपारी आम्ही सगळे त्याच्याकडे जमलो. पट मांडला, डाव सुरु झाला. बंड्या ठीकठाक खेळत होता. पण अगदी अपराजित राहण्या इतका नाही. काही चालीतच त्याने वजीर मैदानात आणला. माझी घोड्यावरची पकड मजबूत असल्याने मी दोन घोडे उतरवले. पुढच्या काही चालीतच मला संधी मिळाली आणि एका घोड्याने एकाच वेळी राजा आणि वजीर दोघांवर हल्ला केला. झाले, राजा हलवावा लागणार आणि वजीर पडणार, आणि एकदा का वजीर पडला की डाव माझा. बंड्याचे अपराजित पणाचे रेकॉर्ड मोडणार. या आनंदात मी असताना अचानक बंड्याने घड्याळ पाहिले. "अरेच्या, तीन वाजत आले"!! असे उद्गारला आणि धडाधड डाव मोडून त्याने सोंगट्या डब्ब्यात टाकायला सुरुवात केली.
मी अवाक. अरे काय झाले? मी विचारले.
आमच्या घरी तीन नंतर बुद्धिबळ खेळायला मनाई आहे, बाबांना आवडत नाही, तो म्हणाला.
अरे, मागेच तर आपण दुपारभर खेळत बसलो होतो ना, शेजारचा पिंट्या बोलला.
तेव्हा हरकत नव्हती, आता आहे, इति बंड्या.
ओके, पण मी जिंकलो ना डाव, मी विचारले.
असे कसे, डाव तर रद्द झाला. उद्या परत नव्याने खेळू, बंड्या म्हणाला.
तेव्हा माझ्या लक्षात आले, बंड्याच्या अजिंक्यपणाचे गुपित. गेले काही दिवस का कोण जाणे पण बंड्याची खूप आठवण येतेय !!!
प्रतिक्रिया
7 Dec 2013 - 4:16 pm | मुक्ती
तुम्हाला बुद्धिबळ येतं वाट्टं?
7 Dec 2013 - 4:18 pm | सुहासदवन
असे हरण्याचे प्रसंग आले की प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतेच पळायचे.
समोरा समोर सामना होतच नाही.
प्रतिसाद अवांतर आहे.
कृ. ह. घ्या.
7 Dec 2013 - 4:28 pm | सचीन
हा बंड्या कॉंग्रेसचा प्रतिनिधी असेल का?
नाही भाजपचा
7 Dec 2013 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंड्याच्या नियमाने बुद्धीबळ खेळा, कारण पट बंड्याचा, कवड्या बंड्याच्या, खेळण्यासाठीची जागा बंड्याची. (तुम्ही आपले सुट्टीत त्याच्याकडे गेलेले ) तेव्हा विजय आणि पराभवाचा विचार करण्यापेक्षा बंड्याशी खेळण्याचा आनंद घ्यावा उग फार विचार करुन नये असे वाटले आणि नै पटलं तर आपण आपला स्वत: बुद्धीबळाचा डाव मांडावा आणि बंड्याला खेळायला निमंत्रण द्यावे तो आला की आपल्या नियमाने त्याला बुद्धीबळ खेळवावे आणि अजिंक्यपद राखावे. :)
-दिलीप बिरुटे
7 Dec 2013 - 6:28 pm | अन्या दातार
१. बंड्याचा हेतू केवळ अजिंक्यपद राखणे हाच आहे काय?
२. बंड्यासाठी अजिंक्यपद राखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे काय?
या २ प्रश्नांचा विचार करण्यास प्रवृत्त होत आहे
7 Dec 2013 - 6:41 pm | प्यारे१
>>>>"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
कधी घेतलीस रे ही सिग्नातुरे? आडौली. :)
9 Dec 2013 - 9:53 am | विश्वनाथ मेहेंदळे
रोचक मुद्दे आहेत !!! पण इफेक्ट बघा. कथानायक व्यवस्थित खेळत राहिल्याने त्याचा खेळ सुधारेल. बंड्याच्या अशा वागण्यामुळे तो जन्मभर केवळ आपल्या घरात राजा राहील. खेळात काडीची प्रगती नाही होणार.
शिवाय सदर सामना आणि त्या आधीचे काही सामने समस्त बालगोपाळ मंडळी बघत होती, त्यांच्यापुढे बंड्याची अखिलाडू म्हणून नाचक्की होणार. बंड्या कोत्या मनाचा म्हणून प्रसिद्ध होणार. मग त्याचे परीणाम त्याला बाकीच्या खेळांत किंवा इतरही आस्पेक्ट मध्ये दिसू शकतील. शेवटी बंड्या जन्मभर केवळ बुद्धिबळ खेळत बसणार नाही ना, ते ही स्वतःच्याच पटावर.
9 Dec 2013 - 12:14 pm | संजय क्षीरसागर
पण लेखकाची सही मात्र
खेळ काय असावा याकडे निर्देश करते.
9 Dec 2013 - 12:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे
खेळ काय असायचाय ?? मी ऐसी विकत घेणार आहे लवकरच... तुम्हाला माहित नव्हते ???
9 Dec 2013 - 12:41 pm | प्यारे१
>>> मी ऐसी विकत घेणार आहे लवकरच... तुम्हाला माहित नव्हते ???
अरे?????
तू मालक असलास तर आम्ही मेंबर.
बाकी प्रतिक्रिया खूप सुचतात.
१. एवढ्यात विकायची वेळ आली का? वाटलेलंच.
२. काढलं विकायला? चालत नसेल नीट.
३. कोण घेणार?
४. विमे- बंड्या इन द मेकिंग.
५. कशाला कुणाच्या नादाला लागतोस?
६. आता चर्चा होणारच. शतक नक्की. होऊ दे खर्च.
सध्या एवढंच. =))
9 Dec 2013 - 1:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे
एंजल इन्व्हेस्टर्स कसे काम करतात या बद्दल अभ्यास वाढवा....
9 Dec 2013 - 1:43 pm | प्यारे१
=))
बस्स का?
तू 'माझ्या' प्रतिसादांना सीरियस घेतलंस? 'माझ्या'?
9 Dec 2013 - 2:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी एकटा वाचक असतो तर प्रश्ण नव्हता रे. बाकी कुणी घेतले तर ??
9 Dec 2013 - 2:57 pm | सूड
>>तू 'माझ्या' प्रतिसादांना सीरियस घेतलंस? 'माझ्या'?
प्रतिसाद देऊन झाला की असं म्हणायची फ्याशन आहे का हल्ली ?? =))
9 Dec 2013 - 3:22 pm | प्यारे१
हो. कारण मुळात विमेनं संक्षींना दिलेला प्रतिसाद सीरियस नव्हता.
(ह्यानं विकत घ्यायला मालकांनी विकायला हवं ना? ;) तशी बोलणी सुरु असतील तर आधीच म्हटल्याप्रमाणं विमेच्या संस्थळाचा मेम्बर व्हायला नक्की आवडेल. )
त्या अनुषंगानं 'सुचणारे प्रतिसाद' देखील 'मुद्दाम' दिले आहेत.
असो.
9 Dec 2013 - 12:55 pm | संजय क्षीरसागर
चेसबोर्ड स्वॅप झालेला दिसतोय! (का डायरेक्ट बंडूच स्वॅप केलायं?)
7 Dec 2013 - 4:33 pm | पैसा
हे कै तरी इंटुक दिसतंय. आपल्याला कळायचं नै! मारा कल्टी.
7 Dec 2013 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रर्र....वरचा प्रतिसाद प्रकाटाआ करु की काय !!!
-दिलीप बिरुटे
7 Dec 2013 - 4:42 pm | पैसा
विमेकाकांनी कधी नव्हे ते लिहिलं म्हणजे कै तरी भारी असणार! गहन गोष्टींचा आपल्याला झेपेल तेवढा अर्थ लावायचा हो!
7 Dec 2013 - 4:52 pm | अनुप ढेरे
बंड्याला वाटेल तेव्हा तो नवा नियम(!) बनवू शकेल (खेळाच्या मध्ये सुद्धा) हे लेखकाला माहीत नव्हतं. म्हणून लेखकाला आश्चर्य वाटलं बहुदा.
असो, बंड्या म्हटलं की 'वार्यावरची वरात' मधल्या गरूड-छाप तपकीर वाल्याची आठवण येते.
पुलः हे काये??
तपकीरवाला: हे... बंड्यासाठी.
पुलः कोण बंड्या?
तपकीरवाला: आमचा बंड्या, सातवा.
पुलः हं !!! कितियेत?
तपकीरवाला: नऊएत... सध्या...
7 Dec 2013 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बंड्याला काय वाटते यावर खर तर मस्त चर्चा होईल. पण अब वो चर्चा करने के दिन गये. यावरुन छायाचित्र : चतुर कावळाया उपक्रमवरच्या गोष्टीची आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
(उपक्रमच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलेला)
7 Dec 2013 - 5:02 pm | राही
मुक्तक आवडले.
7 Dec 2013 - 5:06 pm | खेडूत
:)
7 Dec 2013 - 5:21 pm | जेपी
त्या बंड्याला कार्लसन बरोबर मॅचसाठी पाठवा . परत विश्वविजेता आपणच .
हाकानाका
7 Dec 2013 - 6:11 pm | प्रास
विमेकाकांचा लेख
आनंदाचं उधाण
चर्चेला आमंत्रण
हीच यातली मेख
होऊ दे खर्च!!!!
7 Dec 2013 - 6:15 pm | अन्या दातार
लेख लिहिल्याबद्दल विमेकाकांचे हार्दिक अभिनंदन
विमेकाकांचा लेख
आनंदाचं उधाण
चर्चेला आमंत्रण
हीच यातली मेख
एक घाव हज्जार तुकडे, निम्मे इकडे निम्मे तिकडे
एकच फाईट वातावरण टाईट!!
होऊ दे (बँडविड्थचा) खर्च!!!!
7 Dec 2013 - 6:26 pm | प्यारे१
'बंड्या' नेहमी अजिंक्यच राहणार.
बंड्याच्या ह्या स्वभावामुळं बंड्याच्या विरोधात आणखी एक बंड्या येतो, तो जुन्या बंड्याला मात देतो नि स्वतः बुद्धीबळ खेळतो. थोडे दिवस इमानदारीत खेळतो... कधी मधी हरताना त्याला काही वाटत नाही. पण काही दिवसांनी सगळी पोरं आपल्याकडंच खेळायला येत आहेत हे बघून नव्या बंड्याला मज्जा वाटू लागते. मग काय होतं??????
अवांतर होईल म्हणून नको ब्वा!
असंच ना प्रा. डॉ. ??? ;) ;)
7 Dec 2013 - 7:22 pm | आशु जोग
आनंदकडे घड्याळ नाही असे दिसते !
आनंदी कार्लसन गडे...
7 Dec 2013 - 7:27 pm | आतिवास
मुक्तक आवडलं.
7 Dec 2013 - 7:53 pm | मुक्त विहारि
बंडेच,बंडे... चहूकडे
(ह्या निमित्ताने, विरोधी उमेदवाराचा अर्जच स्वीकारला जावू नये,तो पात्रच होवू नये, ह्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे घड्याळवाले बाबा आठवले.)
7 Dec 2013 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
आता सगळे (आपापल्या ;) ) बुद्धीला बळ लावणार! =))
8 Dec 2013 - 3:43 am | राजेश घासकडवी
बंड्याचं माहीत नाही, पण मुगाबेची अशी कथा सांगतात. तो स्वतः हुकुमशहा असल्यामुळे त्याला हरण्याचं वावडं होतं. आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक बोर्ड होता (अजूनही असेल अर्थातच). कोणी कुठच्या मूव्हज केल्या हे लोकांना मोठ्ठ्या स्क्रीनवर दिसायचं. मग कधीकधी काय व्हायचं, की मुगाबेचा वजीर गेला किंवा लवकरच चेकमेट होणार अशी पाळी आली की स्क्रीनवर प्रोजेक्ट करणारे लोक भराभर आधीच्या मूव्हज काढून टाकायचे. त्यामुळे मुगाबेचं प्यादं अनाहितपणे पुढे आलंच नाही, त्यामुळे वजीराला धोका निर्माण झालाच नाही, वगैरे वगैरे सगळी सत्यं अनएक्झिस्ट व्हायची. स्टालिनच्या काळात छापील प्रकरणं असल्यामुळे हे कष्टदायक असायचं, मुगाबेला मात्र एका क्लिकसरशी हे करता यायचं. स्क्रीनवर सगळा डाव मनापासून बघणारांना मात्र प्रश्न पडत असे की आधीच्या सगळ्या मूव्ह्जचं झालं तरी काय? त्यावर मुगाबेचं उत्तर असे, 'काळजी करू नका, त्या मूव्हज काढून टाकलेल्या नाहीत. मी माझ्याकडे व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत. पण आपण इथपासूनच पुढे खेळू.'
8 Dec 2013 - 2:23 pm | प्रास
आमचं अभिवादन स्विकारा, घासकडवी गुरूजी..... :D
9 Dec 2013 - 2:38 pm | सूड
एकच नंबर !!
8 Dec 2013 - 4:49 am | उपास
अहो सोप्प आहे, नाना फडवणीस युद्धावर गेला नाही कधी समशेर पाजळायला, त्याची लढाई बाहेर.. तसं बंड्या तुम्हाला बुद्धिबळाच्य पटाबाहेर बुद्धिचं बळ लावतोय (प्रसंगी इतर कुठलही बळ लावेल कदाचित..) तस्मात, आउट ऑफ द बॉक्स (म्हणजे बोर्ड) खेळायला शिकायला हवं आणि तसे पेच/ प्रतिपेच तयार ठेवायला हवेत बंड्याच्या समोर उभं राहायचं म्हणजे!
8 Dec 2013 - 7:00 am | संजय क्षीरसागर
तरच तुमच्या शर्तींवर खेळ होईल.
जर सर्वसाधनं दुसर्याची असतील तर दरवेळी न्याय्य गोष्ट होईल असं नाही, तस्मात त्याच्या शर्तींवर खेळायला हवं.
अर्थात, आहे त्या परिस्थितीत देखिल बंडूविरुद्ध जिंकणं काही कठीण नाही कारण कपटापेक्षा बुद्धी केंव्हाही श्रेष्ठ आहे; फक्त तुमचा स्वतःवर विश्वास हवा. थोडक्यात, ज्यांच्या हातात काही नाही त्यांच्यासमोर कैफियत मांडून सहानुभूती मिळेल पण तिचा उपयोग नाही, तो जिंकण्याचा मार्ग नव्हे.
8 Dec 2013 - 10:44 am | कवितानागेश
अहो काका, मी काय म्हणते, तुम्ही पुढच्यावेळेस कुठलातरी गमतीचा खेळ खेळा की.
असे हरण्या-जिंकण्याचे खेळ का खेळायचे म्हणते मी....
भांडणच नको!!
8 Dec 2013 - 5:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Exactly !!! You said it..
पण मज्जा म्हणजे, कथानायक गम्मत म्हणूनच खेळत होता. इगो इश्यु बंड्याने केला.
8 Dec 2013 - 5:59 pm | कवितानागेश
बंड्याचे अपराजित पणाचे रेकॉर्ड मोडणार. या आनंदात मी असताना...>>>>>>>
हम्म. ज्याची त्याची गम्मत.....
9 Dec 2013 - 10:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
कुठलाही खेळ, अगदी पत्ते किंवा गोट्या पण, जिंकण्यासाठी खेळला जातो. सबब, जिंकणार म्हणून कथानायकाला आनंद होण्यात गैर काही नाही. पण तो जिंकू पाहत होता तो केवळ "खेळ". बंड्याला हे कळेल तो सुदिन.
8 Dec 2013 - 2:45 pm | भीडस्त
टु बी (अप्प्रोक्झिमेटली ) प्रीसाईज
ऑक्टोबर 2011 च्या सुमारास...
8 Dec 2013 - 3:21 pm | दिनेश सायगल
पण तिकडे त्यांची १० जणांची टीम विरुद्ध मी एकटा अशी मॅच खेळायची म्हणाले, मग मी आलो पळून.
8 Dec 2013 - 2:52 pm | मुक्त विहारि
काहीतरी लिहायचे आणि मग बोलती बंद करणारे प्रतिसाद मिळाले की, ट्रोलिंग करायला सुरुवात करायची.
8 Dec 2013 - 3:27 pm | आदूबाळ
विमेंना काय अपेक्षित होतं माहीत नाही, मला आपलं यात मिपाच दिसलं... :)
8 Dec 2013 - 5:34 pm | खटासि खट
खेळ, खेळाडू, खिलाडूवृत्ती आणि वक्तशीरपणा यावरची ही कथा आवडली.
( गूढार्थ तर नाही ना ? आम्ही स्ट्रेट वाचली )
8 Dec 2013 - 6:42 pm | देशपांडे विनायक
' असे हरण्या-जिंकण्याचे खेळ का खेळायचे म्हणते मी....
भांडणच नको!!''
हरण्या जिंकण्याचे खेळ अशा सवंगड्याशी खेळावेत जिथे हरलो तरी जिंकलोचा आनंद मिळतो
आणि भांडण गोड वाटते
8 Dec 2013 - 7:19 pm | यशोधरा
नातेवाईकांकडे जाऊन तुमच्या वयाच्या मुलांशी मस्त मैदानी खेळ खेळण्यापरास हे गप्पा उर्फ गॉसिपिंग करायचं काय सुचलं म्हणे? श्या! :D
9 Dec 2013 - 2:38 pm | सूड
स्वभावाला औषध नसतं म्हणतात !!
बंड्या हा असाच आहे समजून खेळणार्यांना त्रास कमी होत असावा. वागण्याचा कंटाळा येऊन जुने खेळाडू गेले तरी नवे मिळत असतीलच की बंड्याला. त्यांना त्याचा स्वभाव कळला की ते बंद होत असतील मग पुन्हा नवीन कोणतरी. जुने खेळाडू कमी होऊन नवीन येणं बंद झालं असेल तेव्हा कदाचित बंड्याला उपरती झाली असावी. अशा बंड्यांच्या स्वभावाला औषध नसतं. त्यांना फाट्यावर मारावं म्हणजे आपला त्रास कमी होतो. अर्थात पुढे ज्याची त्याची इच्छा!
9 Dec 2013 - 3:03 pm | स्पा
आयला सूड तुला पण समजले ?
आता मला सांग .. फुल बावुन्सार गेलाय इमे काकाचा लेख
9 Dec 2013 - 3:05 pm | मुक्त विहारि
थोडा जास्त विचार करून वाचले तरी चालेल.
9 Dec 2013 - 3:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
लेख बाउंसर गेला की प्रतिसाद बाउंसर गेले ??
9 Dec 2013 - 3:35 pm | स्पा
काहीच झेपलं नाहीये
कूच तो गडबड हे दया
9 Dec 2013 - 3:45 pm | बॅटमॅन
मलाही काहीच झेपलं नैये. कधी काय वाटते तोपर्यंत दुस्रा प्रतिसाद वाचून ते नैच असे वाट्टे, कूच तो जरूर गडबड है दया. ह्यो दरवाजा तोडलाच पायचे.
(एशीपी) बॅटद्युम्न.
9 Dec 2013 - 3:38 pm | सस्नेह
काही प्रश्ण.
१) 'मुक्तक' ठीक आहे, पण यात 'सद्भावना' कुठे आहे ?
२) नेमके कोणाकडे या खेळाचे 'बळ' असल्याची ही झैरात आहे ? बंड्या की प्रतिस्पर्धी ?
३) या धाग्यात 'राजकीय' हात आहे का ?
9 Dec 2013 - 11:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
१ सद्भावना मनात आहे, बंड्याबद्दल...
२ ही कसलीही जाहिरात नाही
३ प्रश्ण कळला नाही
10 Dec 2013 - 12:20 pm | वेल्लाभट
लहानपणी क्रिकेट खेळायचो तेंव्हा शंतनू नावाचा एक बंड्या होता. तो त्याची बॅटिंग झाली, की चिडाचिडी करून त्याची बॅट घेऊन निघून जायचा. (बॅट त्याची होती त्यामुळे तो गेला की बॅट गेली. खेळ बंद) लोल! पुढे आमचीही बॅट आली. मग `तो' आमच्यात यायचा बंद झाला.
10 Dec 2013 - 12:31 pm | अधिराज
शक्यता आहे कि बंड्याशीहि पूर्वी कोणीतरी असेच वागले असेल म्हणून बंड्याने स्वताचा बुद्धिबळाचा पट आणून तसेच वागायचे ठरवले असेल.
10 Dec 2013 - 1:53 pm | वेल्लाभट
सॉलिड कलाटणी.... तुम्ही सिनेमा किंवा मालिका काढा अशी.... नाव 'एक डाव बंड्याचा' किंवा 'बुद्धीबळ' किंवा 'चेकमेट' यांसम... :)
10 Dec 2013 - 3:17 pm | अधिराज
चालेल! *yes3* काढू सिनेमा, विमे डायरेक्टर, तुम्ही फायनान्सर. पण बंड्याचा रोल कोण करणार हा प्रश्न आहे.