बाई'को' विकल्यावर

वाह्यात कार्ट's picture
वाह्यात कार्ट in जनातलं, मनातलं
5 Dec 2013 - 2:34 pm

हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न.
आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली.

यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या.
असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो.

कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो.
शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच.
सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

राही's picture

5 Dec 2013 - 2:46 pm | राही

सुपर् लाइक. 'वर आकाशात बघून विमान येत नाहीये ना याची शहानिशा' फारच आवडले.

वासु's picture

5 Dec 2013 - 2:46 pm | वासु

मला पण बाईकची लई भारी वेड...!!!

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 2:49 pm | अभ्या..

वाहवा वाहवा
पुणेकरान्नो या या. बायकरान्नो या या. ट्रेकरान्नो या या. लिव्हा तुमीबी.
बाकी लेख जमेश एकदम.
आता टीबी ट्रम्फ़ करत करत हार्लेचे बी येउद्या लेख. :)

बायकांचे आम्ही कट्टर फ्यान आहोत. काय त्यांच्या एकेक अदा आणि विभ्रम!!! मग ती "विभवा" असो नैतर "एकशृंगिणी" किंवा "शोधिता" नैतर "प्रतिशोधिनी" किंवा जपानदेशीय "हयभूषिणी", यांच्या एकेक अवयवांचे वर्णन करताना शास्त्रकारच का, सामान्य माणसांच्या प्रतिभेलाही इतका बहर येतो की सांगता पुरवत नाही. काही जणांना हस्तिनी वर्गातल्या बायका आवडतात तर काही जणांना पद्मिनी-चित्रिणी वर्गातल्या.

आमची एकशृंगिणी तर आम्हाला पद्मिनीच वाटते बॉ. रंगाने काळी असली म्हणून काय झालं? तन्वी श्यामा आहे, मिताहारी आहे, झालंच तर अविरतगमनोत्सुका आहे, कुणाकडेही दिले तरी काही तक्रार म्हणून नाही.

(एकशृंगिणीच्या प्रेमात बुडालेला) बॅटमॅन.

वाह्यात कार्ट's picture

5 Dec 2013 - 3:13 pm | वाह्यात कार्ट

प्रतिसाद वाचून पूर्णपणे हरल्या गेलेलो आहे..
"प्रतिशोधिनी" वर एक चक्कर मारून येतो. बरं वाटेल !! ;)

(गडगडपक्षिणीच्या प्रेमात पडू इच्छिणारा) वाह्यात कार्टा

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 3:16 pm | बॅटमॅन

तुमची गडगडपक्षिणी तुम्हांस लौकर मिळो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना!

(गडगडपक्षिणीच्या प्रेमात पडू इच्छिणारा) वाह्यात कार्टा

लोल्झ

मालोजीराव's picture

5 Dec 2013 - 4:02 pm | मालोजीराव

बाईकाभेद :))

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 4:03 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

चाणक्य's picture

5 Dec 2013 - 4:53 pm | चाणक्य

प्रतिसाद आहे. पाय पाठवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2013 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर प्रतिसाद !

शिद's picture

5 Dec 2013 - 7:44 pm | शिद

ज ब रा !!!

राघवेंद्र's picture

5 Dec 2013 - 10:16 pm | राघवेंद्र

__/\__

आदूबाळ's picture

6 Dec 2013 - 2:26 am | आदूबाळ

:)) संपलो मी हसून हसून!

स्पंदना's picture

6 Dec 2013 - 3:30 am | स्पंदना

सपशेल लोटांगण.
किती किती ते मराठी+संस्कृत वापरायच. चायनिज आहेस का काय? ;)
मस्त प्रतिसाद. सुरेख नावे. या सगळ्या बायका मला आपल्याश्या वाटु लागल्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2015 - 10:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकशृंगिणीच्या प्रेमामधे आकंठ बुडालेला आणि गडगडगोळी कधी अवाक्यात येते त्याची वाट पाहतोय. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Dec 2013 - 3:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

१२ वर्षांपासुन एकच बाईक चालवतोय.नजर दुसरीकडे न वळवता

सामान्यनागरिक's picture

19 Jul 2015 - 9:56 pm | सामान्यनागरिक

अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.

सामान्यनागरिक's picture

19 Jul 2015 - 9:57 pm | सामान्यनागरिक

अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.

सामान्यनागरिक's picture

19 Jul 2015 - 9:57 pm | सामान्यनागरिक

अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.

सामान्यनागरिक's picture

19 Jul 2015 - 9:58 pm | सामान्यनागरिक

अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.

सामान्यनागरिक's picture

19 Jul 2015 - 9:58 pm | सामान्यनागरिक

अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.

ब्याट्या, अत्त्युत्तम रे.
आवेगा, चित्ताकर्शिका, चपला, वैमानिका, वेगा आणि प्रवेशिकेला पण विसरु नकोस बरे. ;-)

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 3:22 pm | बॅटमॅन

धन्स :)

अहो या आणि अन्य महा-पद (दुष्ट इंग्रजांनी याचे मोपेड केले पुढे) नायिकांना विसरलो तर आमचा नायिकाभेद ग्रंथच अपूर्ण राहील की ;)

या नायिकांची नावे दिल्याबद्दल आभार. तुला बायदवे खटंकिनी पाहिजे होती ना रे? मूळ शरीर एकशृंगिणीचेच पण रूप अंमळ उफाड्याचे ;)

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 3:30 pm | अभ्या..

खटंकिनी :-D :-D
प्राप्तिची आस तर अर्थातच आहे किन्तु खाद्यकष्टाचे गुणोत्तर अम्मळ विचारास उद्युक्त करतेय. साकल्याने पाहता नायकाची आवेगा (पक्षी प्याशन) जास्त भावली आहे. ;-)

आवेगा अथवा आवेगिनी मिताहारी आहे तशी. खाद्यकष्टाचे गुणोत्तर उत्तम असल्याचे साङ्गतात लोक. एकदा तांब्याभरच्या प्राशनानंतर बरेच श्रमविले तरी अडचण नाही. मूळची प्रकृती सडसडीत अन काटक म्हणतात, पद्मिनीची ऐट नसेल पण ग्रामकन्येचा कणखरपणा आहे. आरोहणास तस्मात अडचण नसावी ;)

सूड's picture

5 Dec 2013 - 3:36 pm | सूड

सहमत.

आवेगा कोणालाही भावेल अशीच आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

5 Dec 2013 - 3:56 pm | लॉरी टांगटूंगकर

गडगडपक्षिणी (बुलेट ?), आवेगा (पॅशन) सोडून कोणतीही कळाली नाही.
जरा कोण भाषांतर करेल काय?

एकशृंगिणी= युनिकॉर्न !!

थत तू इफ इ अम नोत व्रोन्ग !!

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 4:14 pm | बॅटमॅन

ब्रोब्र ओळखलेस हो सुडक्या!

बाकी यादी:

विभवा= वैभव असलेली अर्थात स्प्लेंडर,
"एकशृंगिणी= युनिकॉर्न-सुडक्याने सांगितल्याप्रमाणे,
"शोधिता"=डिस्कव्हर,
"प्रतिशोधिनी"= अ‍ॅव्हेंजर,
"हयभूषिणी"= हायाबूसा.

लॉरी टांगटूंगकर's picture

5 Dec 2013 - 6:02 pm | लॉरी टांगटूंगकर

झकासच!!!

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 6:10 pm | अभ्या..

आणि ह्यापण, :)
आवेगा : पॅशन
चित्ताकर्शिका: ग्लॅमर
चपला: अ‍ॅक्टिव्हा
वैमानिका: अ‍ॅव्हिएटर
वेगा : वेगो
प्रवेशिका: अ‍ॅक्सेस.
(च्यायला सुवेगा, राजदूत, प्रिया अन चेतक नंतर भारतीय नावे वापरायचेच बंद केले ह्यांनी :( )

चपला बाकी म्हैलावर्गात भल्ती पापिलवार बॉ.

च्यायला सुवेगा, राजदूत, प्रिया अन चेतक नंतर भारतीय नावे वापरायचेच बंद केले ह्यांनी

हा ना राव :(

प्रास's picture

5 Dec 2013 - 6:50 pm | प्रास

विभवा ऐवजी 'वैभवी' असं नाव सुचवतो.

विभवा - विशेषत्वाने उत्पन्न झालेली
वैभवी - वैभव असलेली

काय म्हणतो? :-)

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 7:10 pm | बॅटमॅन

येस्सार! ब्रोब्र तर आहेच तुमची सुचवणी पण त्यानिमित्ताने का होईना तुमचे दर्शन झाले हे काय कमी आहे?

वाह्यात कार्ट's picture

5 Dec 2013 - 4:22 pm | वाह्यात कार्ट

गडगडपक्षिणी = थंडरबर्ड
बाकी चालुदे !! ;)

बट्ट्याबोळ's picture

5 Dec 2013 - 3:31 pm | बट्ट्याबोळ

उत्तम लिखाण ... मजा आली ... आणि एम्पथी का काय ते वाटलं!

नाव सोडून बाकी एक्दम मस्त ...

--एका धूळ खात पडलेल्या करिझ्मा चा मालक !!

मदनबाण's picture

5 Dec 2013 - 3:43 pm | मदनबाण

अभ्भीच कुछ दिन पहेलीच नया बाईक को लिया हय... जुन्या बाईको को बहुत रगड्या ! ;) इतना रगड्या की दोन्ही टायर बदल्या.अभी नया बाईक लेना बोले तो फार मोठे काम है ... चांगल्या मिळण्या मांगता ना... दिखनो को और रगडणे को भी पाहिजे... इसलिये बरीच शोधा शोधी किया, सगळ एकदम डिटेल मधे बघ्या...फिर जाउन चांगले मॉडेल मिळ्या मेरेको !
मेरे नविन बाईक्क्क-को :-
Pulasr 135 LS

या सॉल्लिड फिगर है बाप, ऐसेच बाईक्को होना देख अपन को ;)

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 3:55 pm | अभ्या..

अर्ररर राजकुमार बघ मग. :)
पंकजपुत्राने हीच स्स्वीकारलीय पूर्ण चित्रपटात. हिरण्यचक्शु मागे बसल्यास कनिष्ठ चक्रास आसनस्पर्श होइलसे वाटते. :-D

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 4:00 pm | बॅटमॅन

जबराट रे अभ्या =))

हिरण्यचक्षु बाकी भन्नाट आवडल्या गेले आहे ;) ती जर बसली तर कर्णरथासम आसनचक्र भूमीत रुतून बसेल की काय असे वाट्टे, चक्रास आसनस्पर्श तर अर्थात होणारच, वजन आहे घरचं ;)

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! अभ्या ! भारतिअय नावाच्पण भाषांतर?
महान आहात बाब्वा!

संजय क्षीरसागर's picture

5 Dec 2013 - 4:01 pm | संजय क्षीरसागर

आणि प्रतिसादाचं निमित्त करुन बाईकसमोर गॉगल चढवलेला स्वतःचा फोटो डकवणारे जाहिरातपटू आठवले! 8-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Dec 2013 - 3:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुमची ही कोणत्या क्याटेगिरीत बसते हो? म्हणजे ते विभवा,एकशृंगिणी,शोधिता,प्रतिशोधिनी,हयभूषिणी,हस्तिनी,पद्मिनी-चित्रिणी...ऐला कसं बुवा सुचतं लोकांना एकेक

ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी आहे. ;)

पल्सरिणी बद्दल लाईक केल्या गेले आहे. :D

प्रचेतस's picture

5 Dec 2013 - 5:16 pm | प्रचेतस

आमच्या धकधक तारीकेचा 'पल्सरिणी' असा आंग्ल शब्दांत उल्लेख केल्याबद्दल णिषेध.

a

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 5:33 pm | बॅटमॅन

ऐला!!!! ही तर सातवाहनकालीन दिसतेय! मागचा शिलालेखही लॅटिन लिपीत लिहिलेला दिसतोय- बहुतेक रोमक देशातून आणलेली दिसतेय ;) सातकर्णीच्या आर्मीतील जवान हीच बाईक वाप्रत असावेत. एकजण चालवणार आणि मागचा बसून गोळ्या मारणार, नहपानाला कळायचं बंद झालं असणार नक्कीच.

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 6:12 pm | अभ्या..

एकजण चालवणार आणि मागचा बसून गोळ्या मारणार

वल्लीदादा आणखी वेगळे काय करतात? ;)
होय की नै हो गुर्जी?

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 6:14 pm | बॅटमॅन

ही हा हा हा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 9:14 pm | अत्रुप्त आत्मा

अगोबाची बाईक अगोबासारखीच भव्य आणी दिव्य... ;)

ते असो... मी पण धूम शिनूमापाई येडा झाल्तो आनी मंग येलिमिनेटर घेतलीवती. त्याणंतर लै जबरी किस्सा घडलावता !

झैरात...झैरात...झैरात

=))
तर किस्सा असा,आमी आमच्या धोतारछाप-भटजी वेषात सांजच्या टायंबाला येका कार्यालयात शिमांतपुजणाला चाल्लो व्हतो.आनी त्यो आपला डेक्कनचा झेडब्रीज नव्ह का...,,, त्येच्यावरून माज्या नीलंसुंदरीयेलमीन्येटर(ब्याट्या-शब्द बग रे!!! ;) ) संगं चाल्लोवतो. तेव्हढ्यात येक पल्सरवरचा मानूस(विंडीयन येक्सप्रेसचा येक रिपोर्टर-अनिरुद्ध राईच) माला हाका मारून थांबवाया लागला. म्या थांबलू .. म्हन्लं,"का वो रस्त्यात थांबिवता?" मंग त्यानी आमाला बरुबर ह्येरल्येलं असल्यामुळं "गुर्जी कवा भेटू मंग?" असं इचारलं..णंतर त्यो भेटला. त्येच्या फोटू ग्राफरनी आम्चा आमच्या लाडक्या बाय'को सकट फोटू काडला. आनी २५ का २६ च्या फेपरात(पुणे हेराल्ड..टाइम्स ऑफ इंडीया२५/२६..१०/२००४) आमच्या फोटू सकट आम्ची,म्हंज्जे आम्च्या धंद्याची त्याणी कव्हरश्टोरी छापली. लै भारी लिवलवतं बेन्यानं =)) तवाचा यक शिनूमा "द डी कंपणी" च्या धर्तीवर त्याणं आम्हा गुर्जींची "द जी कंपणी" असा मथळा दीऊन धमाल उडवून दिल्ती. http://www.sherv.net/cm/emo/happy/too-happy-smiley-emoticon.gif मंग काय त्याच्या णंतरचे दोण..तीण दिवस आमचा शारुकखान झाल्ता. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif रस्त्यावं/शिग्नलला लोक आमाला "लै भारी बर्र का प्येपरातला फोटू आनी श्टूरी" अश्या कॉमेंटी द्यायचे! लै मज्जा वाटायची तवा. येकतर तवा येलिमिनेटर मंजी किंमत बी लाखात व्हती... आनी त्या बजाज वाल्यांनी अव्हेंजर ह्ये तिचं देशी मॉड्येल बी बाजार'ला आन्लं णव्हतं . त्यामुळं रस्त्यावर दिसायला,तशी बी ती लाखात येक! त्यातनं येखाद्या भटजीनी ती "घ्यावी" ह्येपन लाखात येकच! आनी त्येच्याहून फुडं तिचा भटजीसकट प्येप्रात फोटू..मंजी त काय..आम्च्या णशिबात ह्ये कित्तेक लाख...आणी आम्च्या धंद्यातली बाकिची भटं जळूण खाक. =)) त्येच्यामायला त्याणंतर आठवडाभर आमी णिस्ते आस्मानात तरंगत हुतो! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif लय बोल्लो.. अता बास आमच्या आत्मस्तुतीचा तास...

आनी तुमी बगा ह्यो फोटू खासमखास...आम्ची मुलाखत घ्येवुण केल्येल्या शब्दांकना-सह

https://lh3.googleusercontent.com/-fxzfC-onmaw/UqCXjeU9hxI/AAAAAAAACc4/y5l6hRisjEY/w520-h499-no/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AB_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A6.jpg

पैसा's picture

5 Dec 2013 - 9:19 pm | पैसा

लै भारी!!

गुरजी म्या येलिमिनेटर वर मांडी घालून बसायचा इशय तरी काढला होता का? ;-)
पण भारी दिसताव एकदम. आंक्षी आर्नोल्ड्शास्त्री . :-D

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा

मी तरी मांडी घालुन बसलेला दिसतोय का??? :-/
उगीच मुद्दाम कै तरी! :-/

स्पंदना's picture

6 Dec 2013 - 3:43 am | स्पंदना

ए! या अभ्याला थांबवा कुणी.
आर्नोल्ड्शास्त्री??? आम्बाक?

बॅटमॅन's picture

6 Dec 2013 - 3:53 am | बॅटमॅन

=)) अगदी आर्नोल्डशास्त्री शिरगुरकर ;)

गुरजी म्या येलिमिनेटर वर मांडी घालून बसायचा इशय तरी काढला होता का? ;-)
पण भारी दिसताव एकदम. आंक्षी आर्नोल्ड्शास्त्री . :-D

प्यारे१'s picture

5 Dec 2013 - 9:58 pm | प्यारे१

अरे मस्तच गुर्जी....

तुमचा हा किस्सा म्हायती न्हवता.
अरे एलिमिनेटरवर 'बसणार' कोण? गुर्जींशिवाय हायेच कोण!

शैलेन्द्र's picture

5 Dec 2013 - 10:28 pm | शैलेन्द्र

आयला.. भारीच :)

काय ओ एलिमिनेटरवाले बुवा, हा किस्सा बोलला नैत कधी?
बाकी फोटू एकदम जबरीच.
शिन्व्ह्गड रोडवरचा अक्षयकुमार.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

@शिन्व्ह्गड रोडवरचा अक्षयकुमार.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/cute-3d-smiling-smiley-emoticon.gif

बॅटमॅन's picture

6 Dec 2013 - 1:22 am | बॅटमॅन

बुवा खूष!

(चला, अजून जरा खोडी काढू ;) )

बॅटमॅन's picture

6 Dec 2013 - 1:28 am | बॅटमॅन

आई शप्पत!!! बुवा यू रॉक्स इंडीड!!!! फोटो लैच रापचिक आलाय :) यावर एक जबराट फ्लेक्सपण होऊ शकेल ;) सौथ पिच्चरचे हीरो म्हणूनही शोभाल या पोजमध्ये. कोण आहे फटूग्राफर खरंच, नाद खुळा काढलाय फटू.

प्रचेतस's picture

6 Dec 2013 - 9:55 am | प्रचेतस

हाहा.
अगदी अगदी.

बाकी बुवांनी पण तो फोटू फ्रेम करून मर्मबंधातली ठेव असल्यागत जपून ठेवलेला दिसतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा

:-/ :p :-/

आदूबाळ's picture

6 Dec 2013 - 2:31 am | आदूबाळ

भारीच!

मालोजीराव's picture

6 Dec 2013 - 11:45 am | मालोजीराव

बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या…आणि एखादी कडक टंचनिका…मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा' ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 3:32 pm | अत्रुप्त आत्मा

@मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा'>>> =)) हा अनमोल "ठेवा" मिळवून देण्यात सहाय्यभूत होऊ शकाल काय? =))

बॅटमॅन's picture

6 Dec 2013 - 3:36 pm | बॅटमॅन

ठेवीदार बुवा =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2013 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

ब्याटुक ... एक शब्द खाटुक! ;)

आम्ही आमच्या यामिनी सोबत आनंदात आहोत :)

स्पा's picture

5 Dec 2013 - 4:36 pm | स्पा

आमची यामिनी उर्फ यमी

dfd

आमची म्हणजे कोणाकोणाची ??

एकषष्ठांश गोरी यमी बेष्टंय हो!

ब्याट्या, अरे ही गोरी कोणत्या अंगान् दिसली तूस??

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 5:08 pm | बॅटमॅन

अरे नाव यमी म्हणून हरितात्यामधल्या यमीपर्यंत नेले रे कल्पनासूत्र. बाकी कै नै.

अन या यमीच्या गोरेपणाबद्दल बोलायचं तर शॉकाब्सर नळकांडी बघ पुढची ;)

काय एकेकाच्या प्रतिभांना बहर आलाय!
आहाहा!
योग्य जागी पण वापरत जा हो. ;)

बाकी मदनबाण ने इतरांसारखं मी माझा मी माझा असं न करता फक्त बायडीचा फटु टाकला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

कायम दुसर्याच्या प्रतिभा पाहून जळायचे :)
ही सिन्हा ची नाइ. सोताची आहे. ;-)

वाह्यात कार्ट's picture

5 Dec 2013 - 4:26 pm | वाह्यात कार्ट

अर्ररर राजकुमार बघ मग. Smile
पंकजपुत्राने हीच स्स्वीकारलीय पूर्ण चित्रपटात. हिरण्यचक्शु मागे बसल्यास कनिष्ठ चक्रास आसनस्पर्श होइलसे वाटते. Biggrin

हा उलघडा नुसता सिन्हा य एका शब्दाने झाला

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 4:29 pm | अभ्या..

हायला प्यारे.
अजुन एक सरकारी मरक्युरी :-D
असू दे असू दे.

असं म्हनू ने! साला सगळ्याला तुज्या येवडी शार्प पावर असती तर काय बोलाय्चं हुतं मं?

आनि वरच्या जळण्याबद्दल

तिजी भनं पडलं कड्यावनं!
म्या कुडं जळ्ळो बे अभ्या कडू???

कवतुक केलो क व तु क. ;)

सूड's picture

5 Dec 2013 - 4:27 pm | सूड

झालं, ठुसठुसलं ह्यांचं अध्यात्माचं गळू!! 'मी माझा मी माझा' म्हणे.

वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की बे चोच्या! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2013 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा

@वरचा गॉगलवाला प्रतिसाद वाच की बे चोच्या! >>> http://www.sherv.net/cm/emo/happy/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

पैसा's picture

5 Dec 2013 - 5:23 pm | पैसा

लेख आवडला. मग प्रतिक्रिया वाचल्या आणि लेख काय होता हेच विसरले मिनिटभर!

जेपी's picture

5 Dec 2013 - 5:29 pm | जेपी

cd dawn ला काय म्हंता .

गावारान -तथास्तु

बॅटमॅन's picture

5 Dec 2013 - 5:33 pm | बॅटमॅन

हौ अबौट उषा?

अनिरुद्ध प's picture

5 Dec 2013 - 5:34 pm | अनिरुद्ध प

प्रतिसाद्च जास्त भावले,अत्यंत उत्तम प्रतिसाद.

अभ्या..'s picture

5 Dec 2013 - 6:14 pm | अभ्या..

उषा आली की अनिरुध्दाने यायलाच पायजे का? ;)