✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बाई'को' विकल्यावर

व
वाह्यात कार्ट यांनी
गुरुवार, 12/05/2013 - 14:34  ·  लेख
लेख
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली. यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या. असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो. कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो. शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच. सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
45888 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

मस्तच.

राही
गुरुवार, 12/05/2013 - 14:46 नवीन
सुपर् लाइक. 'वर आकाशात बघून विमान येत नाहीये ना याची शहानिशा' फारच आवडले.
  • Log in or register to post comments

मस्तच

वासु
गुरुवार, 12/05/2013 - 14:46 नवीन
मला पण बाईकची लई भारी वेड...!!!
  • Log in or register to post comments

वाहवा वाहवा

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 14:49 नवीन
वाहवा वाहवा पुणेकरान्नो या या. बायकरान्नो या या. ट्रेकरान्नो या या. लिव्हा तुमीबी. बाकी लेख जमेश एकदम. आता टीबी ट्रम्फ़ करत करत हार्लेचे बी येउद्या लेख. :)
  • Log in or register to post comments

बायकांचे आम्ही कट्टर फ्यान

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 15:05 नवीन
बायकांचे आम्ही कट्टर फ्यान आहोत. काय त्यांच्या एकेक अदा आणि विभ्रम!!! मग ती "विभवा" असो नैतर "एकशृंगिणी" किंवा "शोधिता" नैतर "प्रतिशोधिनी" किंवा जपानदेशीय "हयभूषिणी", यांच्या एकेक अवयवांचे वर्णन करताना शास्त्रकारच का, सामान्य माणसांच्या प्रतिभेलाही इतका बहर येतो की सांगता पुरवत नाही. काही जणांना हस्तिनी वर्गातल्या बायका आवडतात तर काही जणांना पद्मिनी-चित्रिणी वर्गातल्या. आमची एकशृंगिणी तर आम्हाला पद्मिनीच वाटते बॉ. रंगाने काळी असली म्हणून काय झालं? तन्वी श्यामा आहे, मिताहारी आहे, झालंच तर अविरतगमनोत्सुका आहे, कुणाकडेही दिले तरी काही तक्रार म्हणून नाही. (एकशृंगिणीच्या प्रेमात बुडालेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

हरल्या गेलेलो आहे

वाह्यात कार्ट
गुरुवार, 12/05/2013 - 15:13 नवीन
प्रतिसाद वाचून पूर्णपणे हरल्या गेलेलो आहे.. "प्रतिशोधिनी" वर एक चक्कर मारून येतो. बरं वाटेल !! ;) (गडगडपक्षिणीच्या प्रेमात पडू इच्छिणारा) वाह्यात कार्टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आदाब!!

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 15:16 नवीन
तुमची गडगडपक्षिणी तुम्हांस लौकर मिळो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट

(गडगडपक्षिणीच्या प्रेमात पडू

सुखी
गुरुवार, 12/05/2013 - 16:01 नवीन
(गडगडपक्षिणीच्या प्रेमात पडू इच्छिणारा) वाह्यात कार्टा
लोल्झ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट

बाईकाभेद

मालोजीराव
गुरुवार, 12/05/2013 - 16:02 नवीन
बाईकाभेद :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 16:03 नवीन
हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

तुफान

चाणक्य
गुरुवार, 12/05/2013 - 16:53 नवीन
प्रतिसाद आहे. पाय पाठवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एक नंबर प्रतिसाद !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/05/2013 - 18:06 नवीन
एक नंबर प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

_/\_

शिद
गुरुवार, 12/05/2013 - 19:44 नवीन
ज ब रा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एकदम मस्त प्रतिसाद !!!

राघवेंद्र
गुरुवार, 12/05/2013 - 22:16 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संपलो मी हसून हसून!

आदूबाळ
Fri, 12/06/2013 - 02:26 नवीन
:)) संपलो मी हसून हसून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सपशेल लोटांगण.

स्पंदना
Fri, 12/06/2013 - 03:30 नवीन
सपशेल लोटांगण. किती किती ते मराठी+संस्कृत वापरायच. चायनिज आहेस का काय? ;) मस्त प्रतिसाद. सुरेख नावे. या सगळ्या बायका मला आपल्याश्या वाटु लागल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एकशृंगिणीच्या प्रेमामधे आकंठ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/19/2015 - 22:20 नवीन
एकशृंगिणीच्या प्रेमामधे आकंठ बुडालेला आणि गडगडगोळी कधी अवाक्यात येते त्याची वाट पाहतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एकपत्नीव्रत

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 12/05/2013 - 15:16 नवीन
१२ वर्षांपासुन एकच बाईक चालवतोय.नजर दुसरीकडे न वळवता
  • Log in or register to post comments

१२? काही फार नाही

सामान्यनागरिक
Sun, 07/19/2015 - 21:56 नवीन
अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

१२? काही फार नाही

सामान्यनागरिक
Sun, 07/19/2015 - 21:57 नवीन
अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

१२? काही फार नाही

सामान्यनागरिक
Sun, 07/19/2015 - 21:57 नवीन
अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

१२? काही फार नाही

सामान्यनागरिक
Sun, 07/19/2015 - 21:58 नवीन
अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

१२? काही फार नाही

सामान्यनागरिक
Sun, 07/19/2015 - 21:58 नवीन
अहो आमचेकडे १९७२ सालची बुलेट आहे. पूर्वी पिताश्रीं च्या मागे बसून फिरतांना सुध्दा जगज्जेत्याची ऐट होती.आज वारसाहककाने ती आम्ही वापरतो. आम्ही कुठे पहायची गरजच नाही. सारी दुनिया आमचेकडे पहात कुर्निसात करते असे आंम्हास वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

ब्याट्या, अत्त्युत्तम रे.

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 15:17 नवीन
ब्याट्या, अत्त्युत्तम रे. आवेगा, चित्ताकर्शिका, चपला, वैमानिका, वेगा आणि प्रवेशिकेला पण विसरु नकोस बरे. ;-)
  • Log in or register to post comments

धन्स

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 15:22 नवीन
धन्स :) अहो या आणि अन्य महा-पद (दुष्ट इंग्रजांनी याचे मोपेड केले पुढे) नायिकांना विसरलो तर आमचा नायिकाभेद ग्रंथच अपूर्ण राहील की ;) या नायिकांची नावे दिल्याबद्दल आभार. तुला बायदवे खटंकिनी पाहिजे होती ना रे? मूळ शरीर एकशृंगिणीचेच पण रूप अंमळ उफाड्याचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खटंकिनी :-D

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 15:30 नवीन
खटंकिनी :-D :-D प्राप्तिची आस तर अर्थातच आहे किन्तु खाद्यकष्टाचे गुणोत्तर अम्मळ विचारास उद्युक्त करतेय. साकल्याने पाहता नायकाची आवेगा (पक्षी प्याशन) जास्त भावली आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आवेगा अथवा आवेगिनी मिताहारी

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 15:35 नवीन
आवेगा अथवा आवेगिनी मिताहारी आहे तशी. खाद्यकष्टाचे गुणोत्तर उत्तम असल्याचे साङ्गतात लोक. एकदा तांब्याभरच्या प्राशनानंतर बरेच श्रमविले तरी अडचण नाही. मूळची प्रकृती सडसडीत अन काटक म्हणतात, पद्मिनीची ऐट नसेल पण ग्रामकन्येचा कणखरपणा आहे. आरोहणास तस्मात अडचण नसावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सहमत.

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 15:36 नवीन
सहमत. आवेगा कोणालाही भावेल अशीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गडगडपक्षिणी (बुलेट ?), आवेगा

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 12/05/2013 - 15:56 नवीन
गडगडपक्षिणी (बुलेट ?), आवेगा (पॅशन) सोडून कोणतीही कळाली नाही. जरा कोण भाषांतर करेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एकशृंगिणी= युनिकॉर्न !!

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 16:08 नवीन
एकशृंगिणी= युनिकॉर्न !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

थत तू इफ इ अम नोत व्रोन्ग !!

सूड
गुरुवार, 12/05/2013 - 16:09 नवीन
थत तू इफ इ अम नोत व्रोन्ग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ये शाबास!

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 16:14 नवीन
ब्रोब्र ओळखलेस हो सुडक्या! बाकी यादी: विभवा= वैभव असलेली अर्थात स्प्लेंडर, "एकशृंगिणी= युनिकॉर्न-सुडक्याने सांगितल्याप्रमाणे, "शोधिता"=डिस्कव्हर, "प्रतिशोधिनी"= अ‍ॅव्हेंजर, "हयभूषिणी"= हायाबूसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

झकासच!!!

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 12/05/2013 - 18:02 नवीन
झकासच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आणी...

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 18:10 नवीन
आणि ह्यापण, :) आवेगा : पॅशन चित्ताकर्शिका: ग्लॅमर चपला: अ‍ॅक्टिव्हा वैमानिका: अ‍ॅव्हिएटर वेगा : वेगो प्रवेशिका: अ‍ॅक्सेस. (च्यायला सुवेगा, राजदूत, प्रिया अन चेतक नंतर भारतीय नावे वापरायचेच बंद केले ह्यांनी :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चपला बाकी म्हैलावर्गात भल्ती

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 18:14 नवीन
चपला बाकी म्हैलावर्गात भल्ती पापिलवार बॉ.
च्यायला सुवेगा, राजदूत, प्रिया अन चेतक नंतर भारतीय नावे वापरायचेच बंद केले ह्यांनी
हा ना राव :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बॅट्या,

प्रास
गुरुवार, 12/05/2013 - 18:50 नवीन
विभवा ऐवजी 'वैभवी' असं नाव सुचवतो. विभवा - विशेषत्वाने उत्पन्न झालेली वैभवी - वैभव असलेली काय म्हणतो? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

येस्सार! ब्रोब्र तर आहेच

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 19:10 नवीन
येस्सार! ब्रोब्र तर आहेच तुमची सुचवणी पण त्यानिमित्ताने का होईना तुमचे दर्शन झाले हे काय कमी आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

गडगडपक्षिणी = थंडरबर्ड

वाह्यात कार्ट
गुरुवार, 12/05/2013 - 16:22 नवीन
गडगडपक्षिणी = थंडरबर्ड बाकी चालुदे !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

:)

बट्ट्याबोळ
गुरुवार, 12/05/2013 - 15:31 नवीन
उत्तम लिखाण ... मजा आली ... आणि एम्पथी का काय ते वाटलं! नाव सोडून बाकी एक्दम मस्त ... --एका धूळ खात पडलेल्या करिझ्मा चा मालक !!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

मदनबाण
गुरुवार, 12/05/2013 - 15:43 नवीन
अभ्भीच कुछ दिन पहेलीच नया बाईक को लिया हय... जुन्या बाईको को बहुत रगड्या ! ;) इतना रगड्या की दोन्ही टायर बदल्या.अभी नया बाईक लेना बोले तो फार मोठे काम है ... चांगल्या मिळण्या मांगता ना... दिखनो को और रगडणे को भी पाहिजे... इसलिये बरीच शोधा शोधी किया, सगळ एकदम डिटेल मधे बघ्या...फिर जाउन चांगले मॉडेल मिळ्या मेरेको ! मेरे नविन बाईक्क्क-को :- Image removed.
  • Log in or register to post comments

या सॉल्लिड फिगर है बाप, ऐसेच

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 15:48 नवीन
या सॉल्लिड फिगर है बाप, ऐसेच बाईक्को होना देख अपन को ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अर्ररर राजकुमार बघ मग.

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 15:55 नवीन
अर्ररर राजकुमार बघ मग. :) पंकजपुत्राने हीच स्स्वीकारलीय पूर्ण चित्रपटात. हिरण्यचक्शु मागे बसल्यास कनिष्ठ चक्रास आसनस्पर्श होइलसे वाटते. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जबराट रे अभ्या

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 16:00 नवीन
जबराट रे अभ्या =)) हिरण्यचक्षु बाकी भन्नाट आवडल्या गेले आहे ;) ती जर बसली तर कर्णरथासम आसनचक्र भूमीत रुतून बसेल की काय असे वाट्टे, चक्रास आसनस्पर्श तर अर्थात होणारच, वजन आहे घरचं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

स्पंदना
Fri, 12/06/2013 - 03:38 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! अभ्या ! भारतिअय नावाच्पण भाषांतर? महान आहात बाब्वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नुसत्या बाईकचा देखणा फोटो आवडला!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 12/05/2013 - 16:01 नवीन
आणि प्रतिसादाचं निमित्त करुन बाईकसमोर गॉगल चढवलेला स्वतःचा फोटो डकवणारे जाहिरातपटू आठवले! 8-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@मदनबाण

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 12/05/2013 - 15:51 नवीन
तुमची ही कोणत्या क्याटेगिरीत बसते हो? म्हणजे ते विभवा,एकशृंगिणी,शोधिता,प्रतिशोधिनी,हयभूषिणी,हस्तिनी,पद्मिनी-चित्रिणी...ऐला कसं बुवा सुचतं लोकांना एकेक
  • Log in or register to post comments

ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी

मदनबाण
गुरुवार, 12/05/2013 - 16:00 नवीन
ही लाईट स्पोर्टीणी पल्सरणी आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

पल्सरिणी बद्दल लाईक केल्या

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 16:08 नवीन
पल्सरिणी बद्दल लाईक केल्या गेले आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आमच्या धकधक तारीकेचा

प्रचेतस
गुरुवार, 12/05/2013 - 17:16 नवीन
आमच्या धकधक तारीकेचा 'पल्सरिणी' असा आंग्ल शब्दांत उल्लेख केल्याबद्दल णिषेध. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऐला!!!! ही तर सातवाहनकालीन

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 17:33 नवीन
ऐला!!!! ही तर सातवाहनकालीन दिसतेय! मागचा शिलालेखही लॅटिन लिपीत लिहिलेला दिसतोय- बहुतेक रोमक देशातून आणलेली दिसतेय ;) सातकर्णीच्या आर्मीतील जवान हीच बाईक वाप्रत असावेत. एकजण चालवणार आणि मागचा बसून गोळ्या मारणार, नहपानाला कळायचं बंद झालं असणार नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अर्र

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 18:12 नवीन
एकजण चालवणार आणि मागचा बसून गोळ्या मारणार
वल्लीदादा आणखी वेगळे काय करतात? ;) होय की नै हो गुर्जी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा