हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न.
आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली.
यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या.
असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो.
कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो.
शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच.
सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
प्रतिक्रिया
5 Dec 2013 - 6:24 pm | विटेकर
अहो , येउ द्या ना अनिरुद्धाला , आपलं काय जातय?
5 Dec 2013 - 6:54 pm | अनिरुद्ध प
पण माझ्या प्रतिसादाच्यावेळी बहुतेक उषा नव्हती तेथे,असो आता आलीच आहे तर अनिरुद्ध पामराची काय खैर नाय (आता लपुन बसावे लागेलना,नाय्तर घरी माझी काय खैर नाय बगा अता माझ्या मिपाकर मित्राना मद्तीस धावावे लागेल)
5 Dec 2013 - 5:49 pm | वडापाव
ह ह पु वा =))
बाकी शिर्षक वाचून बाई आणि बाईक यांत पुरुषाला नेमकं जास्त कोण आवडतं (किंवा आवडायला हवं असं म्हणू आपण) या संभ्रमात; पुढील कारणांमुळे :
(ह. घ्या)
१. बाईकला आपण कितीही वेळा किक मारू शकतो. ती बिचारी काही बोलत नाही.
२. नेहमी आपणच बाईकवर बसतो. बाईक आपल्या डोक्यावर कधीच बसत नाही.
३. बाईकचा कान जितका पिळाल, तेवढा ती बिनतक्रार वेग वाढवते.
४. नियमित आंघोळ, खाण्या-पिण्याचे लाड आणि गरजेनुसार तेलाची मालीश सोडून बाईक सहसा कोणत्याही मागण्या
करत बसत नाही.
५. मूड खराब झाला की बाईकबरोबर एक शांत फेरफटका मारून यायचं. मस्त वाटतं.
६. बाईक पसेसिव्ह नसते. आपण इतर कुणाच्या बाईकवरून राऊंड मारायला गेलो तर आपली स्वतःची बाईक उगाच
बसल्या बसल्या जळत नाही.
इत्यादी इत्यादी इत्यादी...
5 Dec 2013 - 6:08 pm | विनटूविन
.....णिषेध!!!
5 Dec 2013 - 8:02 pm | शैलेन्द्र
आणि दुसर्याची बाइक कशीही असली तरी आपल्याला स्वत:चीच चांगली वाटते.. :)
5 Dec 2013 - 8:09 pm | बॅटमॅन
हा एक महत्त्वाचा फरक आहे खरे तर दोहोंत ;)
5 Dec 2013 - 10:38 pm | प्रभू-प्रसाद
पॅ़कीच्या पॅकी गुंण
5 Dec 2013 - 10:57 pm | प्रभू-प्रसाद
पॅ़कीच्या पॅकी गुंण
6 Dec 2013 - 3:49 am | स्पंदना
देवा!!
वाचव!
5 Dec 2013 - 5:59 pm | विटेकर
सुरेख .. प्रतिसाद वाचून मजा आला...
ए़कूण मायबोलीचे भवितव्य उज्ज्वल आहे. एवेढे बोल्लोन मी माझे ४ शब्द संपवितो.
5 Dec 2013 - 6:02 pm | सूड
मिसळपाववर मायबोलीची झायरात!! जळ्ळं मेलं लक्षण ते !! ;)
5 Dec 2013 - 6:09 pm | विटेकर
अवो , ती नाय वो !!!!
मायबोली .. मातृभाषा....आपली भाषा.
5 Dec 2013 - 6:12 pm | विनटूविन
द्व्यर्थ.....हे बरोबर लिहिलेय का पण?
5 Dec 2013 - 6:37 pm | माझीही शॅम्पेन
तुमच्या ह्या सुंदर सुंदर बायका सरासरी किती देतात हो :)
(त्यात ही आज काल तर किती जण स्वार असतात ना)
डंबिस शॅम्पेन
5 Dec 2013 - 7:11 pm | बॅटमॅन
बायकांबद्दल असे वैयक्तिक प्रश्न विचारतात का ? अच्रत मेले =))
5 Dec 2013 - 7:16 pm | सूड
वशाड मेलो. =))
5 Dec 2013 - 7:24 pm | प्यारे१
तुम्ही पुरुष आयडी की स्त्री आ यडी?
5 Dec 2013 - 7:29 pm | माझीही शॅम्पेन
हा हा हा ... उसे की फर्क पेन्दा ..
रच्याकं आणि केव्हाही कुठेही पुरूषच :)
5 Dec 2013 - 7:27 pm | अतुल पाटील
मस्त लिहिलेय. विषेश उल्लेखनीयः "महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात."
5 Dec 2013 - 9:29 pm | उपास
आमची एकशृंगिणी अगदी 'लख लख चंदेरी..'
मिरवायला, सरासरीला, उंचीला सगळेच बेष्ट.. उतार असलेल्या चिंचोळ्या आसनावरुन 'माल्'वहातुकीस दुसरे उपयुक्त काही नाही :))
दुसरी चपला आहे पण ती 'सामान'वाहून न्यायला बेष्ट, 'माल' नव्हे!
6 Dec 2013 - 1:30 am | बॅटमॅन
एकशृंगिणीचा खरेच नाद नै करायचा :)
5 Dec 2013 - 10:45 pm | भटक्य आणि उनाड
6 Dec 2013 - 11:13 am | भटक्य आणि उनाड
उजवीकडची आमची गडगडपक्षिणी = थंडरबर्ड.. पैसा वसुल..
6 Dec 2013 - 12:56 am | खटपट्या
ब्याटमन आणि अन्य प्रतिभावंत यांसी,
बुलेट इलेक्ट्रा घेण्याच्या विचारात आहे.
नाव सुचवावे हि नम्र विनंती.
सौदामिनी कसे वाटते???
सद्या धकधक तालिका आहे माझ्याकडे.
चारचाकी ना पण नावे सुचवा.
6 Dec 2013 - 1:38 am | बॅटमॅन
बुलेट इलेक्ट्रा = विद्युत गोलिका हे लिट्रल पण सौदामिनी अजून एलेगंट आहे. आवडेश!
शिवाय दामिनी ऐवजी सौ-दामिनी नाव ठेवण्यातले औचित्य असे की ती 'तुमची' आहे, कुंवारी नाही ;)
बाकी धकधक तालिका म्हणजे काय? ते अंमळ लक्षात नै आले.
चारचाकींनाही यथावकाश नावे सुचवेनच.
6 Dec 2013 - 3:58 am | खटपट्या
वर कोणीतरी पल्सर ला धक धक तालिका म्हटलेय
6 Dec 2013 - 11:10 am | प्रचेतस
मीच म्हटलंय पण तालिका नाय हो. तारिका. पल्सर म्हणजे पल्सेटिंग स्टार म्हणून. =))
6 Dec 2013 - 1:09 pm | बॅटमॅन
हाहाहा रैट्ट. आत्ता फॉक्कन ट्यूबलैट पेटली.
6 Dec 2013 - 2:33 pm | आनंद भातखंडे
बॅटमॅन भाऊ तुमचे एकदम सॉलीट ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! चालू आहे. विद्युत गोलिका आवडले. पूर्वी याच बुलेट/याझदी फटफटी म्हणायचे याची आठवण झाली. बाकी नामकरण सोहोळा मस्त रंगला आहे. ..... कामेंटण्या पेक्षा एक वेगळाच धागा किंवा तागा काढलात तर अजून मज्जा येईल.
6 Dec 2013 - 10:20 am | जेपी
जबरद्स्त प्रतिसादाचा धागा
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
6 Dec 2013 - 10:38 am | वेल्लाभट
लिखाण अफ्फाट आवडलंय साएब ! जबरदस्स्स्स्स्त !
काही कचकून स्ट्राईकलेल्या ओळी :
पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता
डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना
आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो.
परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं
येऊद्यात थंडरबर्ड ! पडूदेत आणखी एक जिलबी ! होउदे खर्च !
3 Feb 2014 - 5:55 pm | वाह्यात कार्ट
धन्स ;)
6 Dec 2013 - 10:43 am | hemants.gokhale
अप्रतिम प्रतिक्रिया.
चारचाकी साठी एक नाव सुचते लवन्यलतिक (लीनीया हे पटकन सुचले कारण आम्ही हीच वापरतो.) प्रतिक्रिया येण्याच्या आधी स्पष्टा करतो की ही आम्हाला आमच्या बायको ने दिली (बैइको नाही) कारण डोने सुंदर स्त्रियांचे एकमेकींशी पटत नाहीत्यामुळे तूर्तास (म्हणजे गेली टीन वर्षे) आम्हीच लटिकेतून विहरात असतो
6 Dec 2013 - 11:01 am | उद्दाम
http://www.misalpav.com/node/25563
6 Dec 2013 - 11:43 am | मालोजीराव
बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या…आणि एखादी कडक टंचनिका…मंजी लेडी असिस्टंट पण 'ठेवा' ;)
6 Dec 2013 - 1:02 pm | अभ्या..
अयायायायाया
टंचनिका आणि ट्याब्स?
कसल्या ओ राजे ट्याब्स? ;-)
6 Dec 2013 - 12:42 pm | एच्टूओ
थंडरबर्ड ला "गडगडपक्षिणी" पेक्षा "मेघारवी" कसे वाटते ??
6 Dec 2013 - 12:45 pm | एच्टूओ
थोडी दुरूस्ती...मेघरवी
6 Dec 2013 - 2:15 pm | झकासराव
लेख भारीचे पण प्रतिसाद अजुन भारी... :)
आमची ब्लॅक ब्युटी..
6 Dec 2013 - 5:36 pm | झकासराव
ब्लॅक ब्युटी आहे म्हणुन कृष्णविवर म्हणावं काय?
तीच ओ धकधक तारीका.. काळीशी असेल तर कृष्ण्विवर??
6 Dec 2013 - 5:42 pm | बॅटमॅन
श्यामा/श्यामासुंदरी/कृष्णसुंदरी वैग्रे चांगले आहे. कृष्णविवर फार तर पेट्रोल टँकला म्हणता येईल ;)
6 Dec 2013 - 5:51 pm | प्रचेतस
श्यामलिनी कशी वाटते रे.
6 Dec 2013 - 5:56 pm | बॅटमॅन
मस्तच रे. (कुठली श्यामलिनी मस्त वाट्टे तेवढे विच्यारू नको-लंबी लिष्ट है ;) )
अवांतर: स्नेक ला "नाग निका" हे नाव कसे वाटेल ;)
6 Dec 2013 - 6:04 pm | प्रचेतस
=))
पण त्या नावावर आमच्या पहिल्या सातकर्णीचा कापीराईट आहे हे लक्षात ठेव.
6 Dec 2013 - 6:08 pm | बॅटमॅन
मान्य, म्हणून तर मध्ये स्पेस टाकलाय ना ;) "फोले पाखडिता तुम्ही निवडितो ते सत्त्व आम्ही निके" मधला निका अन आधीचा नाग.
6 Dec 2013 - 6:10 pm | प्रचेतस
=))
7 Dec 2013 - 9:25 am | झकासराव
शामलिनी मस्त आहे.. :)
पण ते जाहिरात पाहिलीये ना डेफिनेटली मेल्ची.
त्यावर अन्याय होतोय अस वाटतय का?
6 Dec 2013 - 2:28 pm | कवितानागेश
पैसाताईसारखंच झालं... लेख कशावर आहे? :)
बाकी ब्लॅक ब्युटी म्हणजे कृष्णसुंदरी का?
7 Dec 2013 - 10:19 am | मुक्त विहारि
आणि
प्रतिसाद...
12 Jan 2014 - 12:45 am | रेवती श्रीकांत अ
चला आपण पण लाईम लाईट मध्ये यायलाच हवे ...!
अभिनंदन...!!
जेन - ६ गुरूजी..!!
12 Jan 2014 - 12:07 pm | टवाळ कार्टा
हा माझा डुआयडी??? माझ्यासारखेच फक्त ३ लेख (माझ्या १ लेखाला पंख लागले :))
3 Feb 2014 - 5:51 pm | वाह्यात कार्ट
सदस्य-कालान्वये ३ महिने थोरले आहात आपण, म्हणून ही आर्त हाक ;)
ता.क. तुम्हाला विनोद आवडत असतीलच. कारण "टवाळा आवडे विनोद" :P
3 Feb 2014 - 8:46 pm | टवाळ कार्टा
वा वा...आपल्या आदरयुक्त विशेषणांनी मन भरुन आले...बोले तो एकदम विनम्रता से
25 Jan 2014 - 8:55 pm | अत्रन्गि पाउस
इथे अजून एक धागा होता इथल्या आयड्यानं वरून...कुणी हेल्पेल का मज ....
3 Feb 2014 - 5:52 pm | वाह्यात कार्ट
टवाळ दादाच्या कि माझ्या ??
19 Jul 2015 - 5:34 pm | कौन्तेय
दोन वर्षं झालीत नोंदीला. एव्हाना थंडरबड आलीही असेल. पण भावा, सांगायचं म्हणजे पल्सर काढून अव्हेंजर घेण्याइतपत काही ती बरी नाही रे. पल्सरचा रुबाब काही अलगच. माझी आवड म्हणायची तर मला थंडरबडपेक्षा क्लासिकच जास्त बरी वाटते हो. मजपाशी दोन आहेत इलेक्ट्रा ३५०, नि क्लासिक ५००!
असो. लेखाची भट्टी उत्तम जमलीए सांगण्यासाठी हा उशीराचा अभिप्रायप्रपंच. ज्ञातीबांधव भेटले की राहवत नाही म्हणून बोलायचं आपलं थोडं ...
चालैवेति!
19 Jul 2015 - 11:17 pm | मास्टरमाईन्ड
हहपुवा
7 Dec 2015 - 1:45 pm | कौन्तेय
अंमळ उशीराने प्रतिसाद देतोय याची कल्पना आहे, पण विषयही तसाच जिव्हाळ्याचा आहे.
बाबौ, ... सर्वांना दंडवत् सगळ्या बाईकांना भारतीय नावं देण्याची ही प्रतिभा खरोखर अलौ‘किक’ आहे.
सन १९९९ पासून आमचीही साथसंगत एका बाईकोने केली होती. नर्मदेपासून ते कोचीन पर्यन्त आणि महाराष्ट्राच्या कडे कपारींतही मज एकट्यासोबत चलून तिने कधीही कुरकुर कशी ती केली नाही.
ती ईमानी अबलख कृष्णा ही बजाज कॅलिबर जमातीची होती, आम्ही तिला प्रेमाने ज्या नावाने हाक मारीत असू त्याच नावाने ती आमच्या दोस्तदारांमधेही नामांकित होती "काळीभ्भोर"!
7 Dec 2015 - 5:02 pm | मम्बाजी सर्वज्ञ
हि आमची 'यामिनी रावण' -
7 Dec 2015 - 8:50 pm | टवाळ कार्टा
R-1???
7 Dec 2015 - 9:24 pm | मम्बाजी सर्वज्ञ
7 Dec 2015 - 9:33 pm | मम्बाजी सर्वज्ञ
https://www.youtube.com/watch?v=rgA1sDTjUuM
7 Dec 2015 - 10:55 pm | टवाळ कार्टा
व्हिडो खाजगी मालमत्ता आहे असं सांगतयं योउतुबे...बाकी बैक बघून बरीच जळजळ झाली...आम्च्या हातात हि कधी येणार देव जाणे :(
7 Dec 2015 - 11:15 pm | मम्बाजी सर्वज्ञ
व्हिडीओ पब्लिक करण्यात आला आहे.
आता भारतात पण मिळतात या गाड्या.
माझी गाडी १९९७ ची आहे. नवीन आर वन फारच भारी केली आहे.
7 Dec 2015 - 11:22 pm | टवाळ कार्टा
भारतात मिळ्तात हो...पर्वडाय्ला पैजे...आज्काल हुंडा पण देत नै कोण :)...बाइकवेडी पोर्गीच शोधावी म्हणतो
आणि अज्जूनपण व्हिडो दिसत नै
7 Dec 2015 - 11:26 pm | मम्बाजी सर्वज्ञ
हे खरं आहे. आत्ताच जालावर चेक केली किंमत, बाब्बो! २२ लाख? काय च्या काय!!
इथे वापरलेल्या गाड्या १ लाखात मिळतात. कारण नवीन गाडी आली कि जुन्या गाडीची किंमत लगेच घसरते.
7 Dec 2015 - 11:28 pm | टवाळ कार्टा
इत्की नैयै...१०-१५ लाखाच्या मधे आहे किंमत
7 Dec 2015 - 11:29 pm | टवाळ कार्टा
बाब्बौ...ही २२ लाखाच्या वर आहे....बाकी लिटरक्लास .१०-१५ लाखाच्या आसपास मिळतात
7 Dec 2015 - 11:31 pm | मम्बाजी सर्वज्ञ
https://www.google.co.uk/?gfe_rd=cr&ei=VsllVvXaO_Sq8we8kLLYCA&gws_rd=ssl...
Powered by 998 cc liquid-cooled, parallel four-cylinder engine that can pump out 147.1kW (200.0PS) @13,500rpm and a peak torque of 112.4 Nm (11.5 kg-m) @ 11,500rpm, Yamaha YZF-R1 and R1M get 17 litre fuel tank. While R1M has been priced at ₹29, 43,100 (Ex-Showroom Delhi), YZF-R1 comes with a price tag of ₹22, 34,300.10 Apr 2015
2015 Yamaha YZF-R1 and R1M Launched in India; Price ...
www.ibtimes.co.in/2015-yamaha-yzf-r1-r1m-launched-india-price-feature-...
7 Dec 2015 - 11:28 pm | मम्बाजी सर्वज्ञ
आता विदेओ दिसायला पायजे. मी चुकून दुसराच विदिओ पब्लिक केला होता.
7 Dec 2015 - 11:36 pm | टवाळ कार्टा
दिस्ला दिस्ला...बाकी ते ट्राफिकमध्ये गाड्यांच्या मधून बैक चालव्णे बघून ड्वाळे पाणावले =))
7 Dec 2015 - 11:53 pm | मम्बाजी सर्वज्ञ
वर्षभर पिंजर्यात बसून प्रवास केला. असाच अडकून पडायचो गर्दीत. शेवटी दुचाकी घेतली आणि १ तासात पोचायला लागलो. तेवा पासून दुचाकी फार आवडायला लागली. जर भीती वाटते कधी कधी येडे लोक मुका घ्यायला येतात.
https://www.youtube.com/watch?v=fr-NRDUXb_0
7 Dec 2015 - 10:50 pm | भीमराव
मि गाडी शिकलो सातवीत, मैंशी वर,
फष्ट घेर वर रेस फुल्ल करुन सोडली कि भारी ष्टंट व्हायच तेचा.
2 May 2024 - 1:36 pm | अहिरावण
भारी