फोकनाड !

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 8:55 pm

फोकनाड !!

एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला. साहेबांचा नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता... साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला...
याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता... शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'...
'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले.
याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला. 'येतो साहेब.. थँक्यू!'... असं म्हणून तो बाहेर पडला.
दोनतीन दिवस गेले. पुन्हा तो आला तेव्हा स्वतं:वरच जाम खुश दिसत होता...
दरवाजातूनच हातातला बातमी लिहिलेला कागद उंचावत तो आनंदानं ओरडला, 'साहेब, आज आणखी एक 'फोकनाड' बातमी आणलीय!'...

मुक्तकमाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

10 Dec 2013 - 8:58 pm | प्रकाश घाटपांडे

ओके मला वाटल ही नाडीग्रंथातील नाड आहे कि काय? पण सायंदैनिकांना अशा फोकनाड लागतात.

पैसा's picture

13 Dec 2013 - 9:23 pm | पैसा

वर्‍हाडी बोलीतील शब्द आहे का? कारण माझ्या वर्ध्याला रहाणार्‍या चुलतभावाकडून ऐकला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा

फोकनाड= फेक बातमी

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 1:33 am | बॅटमॅन

नवीन शब्द कळाला, धन्यवाद! सुरुवातीला मलाही एकनाड वैग्रे भानगडीपैकी असेल असं वाटलं होतं.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2013 - 1:56 am | अत्रुप्त आत्मा

@सुरुवातीला मलाही एकनाड वैग्रे भानगडीपैकी असेल असं वाटलं होतं.>>> =)) तरी विशेष फरक पडत नव्हता..एकनाड=फोकनाड... समानार्थी'च शब्द आहेत! ;)

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 3:06 am | बॅटमॅन

चॅपमन पिंचर नामक विख्यात पत्रकारांचा एक किस्सा आठवला. दुसर्‍या महायुद्धात किंवा त्याच्या जरा नंतर कधीतरी आम्रिकेत क्लॉस *क्स नामक शास्त्रज्ञ रशियातर्फे हेरगिरी करताना पकडला गेला. सनसनाटी बातमी म्हणून पिंचरबुवा गेले आणि संपादकांना सांगितले काय ते. संपादकाने ऐकून घेतल्यावर म्हणतो कसा, काय जबरी बातमी आहे!!! "तो" शब्द आपल्या पेपरच्या फ्रंट पेजमध्ये दिसावा अशी लै दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2013 - 7:18 am | अत्रुप्त आत्मा

अरे शब्द'खाटुकम्याना =)) =)) =))