क्रेडीट कार्डाबद्दलचे गैरसमज
क्रेडीट कार्डाबद्दलचे गैरसमज
हा विषय मुद्दाम घेण्याचे कारण आपल्यापैकी जवळ जवळ ९५ % (कदाचित १००%) लोक क्रेडीट कार्ड वापरत आहोत. पण या बद्दल आपल्या मनात बरेच गैरसमज आहेत त्यातील काही जर दूर करता आले तर मला आनंदच होईल.
सर्व प्रथम मी अर्थ क्षेत्रातील तज्ञ नाही किंवा माझ्याकडे त्यातील कोणतीही पदवी नाही. बरीच मासिके आणि पुस्तके वाचून आलेल्या सामान्य ज्ञानातून मी हा लेख लिहित आहे यात झालेल्या चुका किंवा घोडचुका तज्ञ लोकांनी दुरुस्त कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे.
श्री ज्ञानव यांनी मांडलेल्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा मी सरळ कृती करण्याचा मार्ग अवलंबित आहे. चूक झाली तर क्षमस्व.
गैरसमज १) माझा c v v (card varification value) कुणालाच माहित नाही/ मी तो पाठ करून खोडला आहे म्हणजे माझे कार्ड सुरक्षित आहे. हा cvv क्रमांक कार्डच्या मागे आपण जिथे सही करतो त्याच्या बाजूला असतो.
पेट्रोल पंपावर किंवा हॉटेलात आपण कार्ड देतो तेन्व्हा त्याच्यासाठी त्यांना हा क्रमांक लागत नाही म्हणजेच जालाबाहेरील विनिमयासाठी (offline transaction) हा क्रमांक लागत नाही. (जालावरील विनिमयासाठी तो क्रमांक लागतो)
उपाय-- जेथे कार्ड आपल्यासमोर वापरले जात नाही तेथे ते न वापरणे किंवा आपल्या खुर्चीतून उठून कार्ड आपल्यासमोर स्वाईप होते आहे हे पाहणे. ( लोकांना कसे दिसेल -विशेषतः हॉटेलात- हा विचार बाजूला ठेवा).
गैरसमज २) माझा पिन(personal identification number) आणि पासवर्ड कुणालाच माहित नाही म्हणजे माझे कार्ड सुरक्षित आहे. सुदैवाने भारतीय रिझर्व्ह बँकेने आता भारतीय वेबसाईट(आंतरजालीय स्थळांवर) पिन वापरणे १ डिसेंबर पासून आवश्यक केले आहे. त्यामुळे आता भारतीय स्थळावर जालीय विनिमय तेवढा सुरक्षित झाला आहे. परंतु बर्याच आंतरराष्ट्रीय स्थळांवर अजून ते अत्यावश्यक नाही त्यामुळे आपल्या कार्डाचा नाव क्रमांक आणि cvv ची कोणी नक्कल केली असेल तर आपले कार्ड दुसरीकडे वापरले जाऊ शकते.
गैरसमज ३ )-- माझ्या कार्डाची नक्कल(duplication) करता येणार नाही. आपल्या कार्डच्या मागच्या बाजूला चुंबकीय पट्टी असते त्यात आपली सर्व माहिती साठविली जाते जेंव्हा आपण आपले कार्ड स्वाईप करता तेंव्हा आपल्या कार्डाची माहिती त्या यंत्रातून काढली जाउ शकते आणि त्याचे दुय्यम कार्ड बनवून त्याचा दुरुपयोग केला जाउ शकतो.
उपाय -- EMV EUROPAY, MASTERCARD आणी VISA यांनी आता चीप असलेली कार्डे बाजारात आणली आहेत ज्याचे DUPLICATION फार कठीण आहे.असे कार्ड वापरायला सुरुवात करा. तोवर ज्याठिकाणी आपल्याला शंका वाटत असेल तेथे आपले कार्ड वापरू नका
गैरसमज ४) कार्डमागे असलेली माझी सही फारशी महत्वाची नाही.
आपण आपल्या कार्डावर सही करता आणी ते कार्ड एखाद्या दुकानात वापरता तेंव्हा तो दुकानदार आपली सही कार्डावर आणी पावतीवर जुळत आहे कि नाही हे पाहण्यासाठी बांधील आहे. जर आपली सही जुळत नसेल( चोराने आपले कार्ड वापरले आणी आपल्या सहीची नक्कल केली असेल) तर ते पैसे देणे आपण बांधील नाही. जर आपण सही केलीच नसेल तर चोर त्या ठिकाणी सही करून आपला CVV वापरून आपले कार्ड( आणी खिसा) रिकामा करू शकतो.
मी क्रेडीट कार्ड १९८८ पासून वापरात आलो. परंतु मी आजतागायत त्यावर एक पैसा देखील व्याज भरलेले नाही
मी अशा मताचा आहे कि आपल्या गरजेपेक्षा जास्त रक्कमेचे क्रेडीट लिमिट मुळीसुद्धा घेऊ नये. अफरातफर झाली तर तेवढे जास्त पैसे आपल्या खिशातून जातील.
ज्या वेबसाईट बद्दल मला जरासुद्धा शंका असेल (चित्रपटगृहे ई ई) तेथे मी क्रेडीट कार्ड वापरत नाही. पेट्रोल मी फक्त रोख रक्कम देऊन घेतो हॉटेलात कार्ड स्वैप माझ्या समोर करायला लावतो.
(तरीसुद्धा माझ्या क्रेडीट कार्डावर फसवाफसवी होणार नाही असे मी खात्रीलायक रित्या सांगू शकत नाही.
खालील दोन दुवे जरूर वाचावे. माझे वरील बरेचसे लिखाण हे त्यातील पहिल्या दुव्यातील लेखाचे भाषांतरच आहे
http://profit.ndtv.com/news/your-money/article-credit-card-myths-you-should-be-careful-about-372355
http://profit.ndtv.com/news/your-money/article-10-ways-to-protect-yourself-from-credit-card-frauds-317424
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख....
पण...
सुंदर....
अगदी घाबरायला नको....
+ १ हेच लिहायला आले होते.
साहेब
सुयोग्य धागा व सावधगिरीच्या उपाय योजना
नजरेसमोर वापर करा.
क्रेडीट कार्ड ची जरूरच काय?
+१११
क्रेडीट कार्ड
क्रेडीट कार्ड ची जरूरच काय?
क्रेडिट कार्ड फी
साहेब,
माझा अनुभव
क्रेडीटा कार्ड माझ्याकडे नाही
सर्विस चार्ज
अनेक ज्वेलर्सकडे सोन्याचे भाव
जर होणारा पुर्ण व्यवहार
मी आत्ता पर्यंत सराफाकडे
सेक्शन १३८
पेठ्यांच मोठेपणा काही नाही
ईतक्या लहान खरेदीवर नसेल
डेबीट कार्ड वरुन खरेदी करताना दुकानदार बिलात सर्विस चार्ज अॅड क
सर्विस चार्ज ग्राहकांकडून घेणे
त्रोटक वाटला खुप
महत्त्वाचा विषय
लोकांना असे का वाटते की
क चिंग..
मोहात पडून घेतलेल्या
त्याचा विवेकी वापर करणार्या लोकांची संख्या अत्यल्प आहे.
१००% सत्य
.
दुधारी
युयुत्सुंचा या बाबतचा अनुभव
मी क्रेका वापरते. त्यावरील
In the decade to 2008,
बाप रे
सहमत
सुबोध खरे याना धन्यवाद
बघा असा फायदा होतो.
...म्हातारी मेल्याचं दुःख नाही
आरबीआयच्या बँकिंग
अशा प्रकारांची दाद कोठे मागावी ? कसा पाठपुरावा करावा ?
सर्वोत्तम उपाय
प्रकाश घाट्पांडे साहेब या साठी उर्वरित मार्गदर्शन करतीलच.
मी रोजच्या वापरात डेबिट