शुभंकरोती

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
27 Apr 2014 - 1:16 am

आमच्या जुन घर १२/१५ खोल्यांचं होत.त्यात २ झोपाळे होते.एक माजघरात मध्यम आकाराचा आणि दुसरा पडवीत पहिल्यापेक्षा मोठा.हा पडवीतला झोपळा मला खूप आवडायचा त्या झोपल्यावर आम्ही सगळे जन एका वेळी मावायचो.त्या झोपल्यावर बसून मोठ्यांदा गाणी म्हणायची,कविता म्हणायच्या हे आमच एक आवडत काम असायचं . त्यातलाच एक महत्वाच काम म्हंजे त्या झोपल्यावर बसून शुभंकरोती म्हणायची .
पु लं च्या 'चितळे मास्तर'या व्यक्तिरेखेत लिहील आहे न कि मुलाला इतर चार मुलांच्यात ढकललं कि ते आपोपाप वाहत जाऊन शाळेला लागायचं.तीच गत लहानपणी आमची होती.कधी आईने हाताला धरून देवापुढे बसून 'म्हण शुभंकरोती'अस नाही केलं.घरातच ती शिस्त होती कि संध्यकाळी देवांपाशी दिवा लावला कि खेळ वगैरे आवरून हात पाय धुवून देवाला नमस्कार करायचा आणि शुभंकरोती म्हणायची.सगळ्या भावंडांबरोबर मलाही ती सवय आपसूक लागली होती . देवाला नमस्कार झाला कि सगाळे झोपाळ्यावर बसायचो.झोपाळा छान लांब आणि रुंद असल्याने त्याच्या दोन्ही बाजूनी आम्ही बसायचो मग शुभंकरोती ने सुरवात होऊन सगळे श्लोक म्हणून व्हायचे.मधूनच आई काकू डोकावून जायच्या कि नित म्हणतायत ना?मस्ती नाही न करत मध्ये.शुभंकरोती झाली कि मग 'मोरया मोरया मी बाल तान्हे 'या श्लोकाने सुरवात होऊन सगळे श्लोक म्हणून व्हायचे.नंतर मग गणपती अथर्वशीर्ष,रामरक्षा,मारुती स्तोत्र आणि विष्णू सह्त्रानाम अस क्रमाने सगळ म्हणून होई.ज्याला येत नसे त्याच ऐकून ऐकून पाठ होई.नंतर मात्र कसोटी चा क्षण असे.कारण एवढा म्हणून होईपर्यंत आई काकू तरी येउन समोर बसत आणि मग पाढे म्हणणे सुरु होई.२ पासून १५ पर्यंतचे पाढे सगळे उत्साहात म्हणत.नंतर मग पुढचे पाढे मात्र उरकून टाकल्यागत भीत भीत म्हणून मोकले व्हायचो.खर तर जसे सगळे श्लोक पाठ झाले होते तसेच सगळे पाढेसुद्धा रोज म्हणून म्हणून पाठ झाले होते.पण मनात भीती बसलेली.हे सगळ म्हणून झाल कि अभ्यासाच्या पाठ केलेल्या कविता म्हणून व्हायच्या.आणि मग उठून घरातल्या सगळ्या मोठ्या माणसाना नमस्कार करायचा .
आज एकत्र कुटुंब नाही.त्यात मी तर परदेशात येउन राहिलेली.माझ्या मुलाला हे सर्व नाही मिळत याची कुठेतरी खंत आहे.त्यामुळे त्याला हात धरून देवासमोर बसून शुभंकरोती म्हण्याला लावते.अजून तो लहान आहे त्यामुळे माझे ऐकतो देवासमोर बसतो. त्याला आरती करायला आवडते पूजा हि आवडीने करतो.मी जे जे करीन ते नित पाहून तस करायला पाहतो.त्यामुळे त्याच्या या वागण्यावर मी खुश आहे .

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 1:26 am | तुमचा अभिषेक

शुभंकरोती नो कॉमेंटस !

अगदी लहानपणापासूनच नास्तिक असल्याने आणि देव वगैरे काही नाही या श्रद्धेवर ठाम असल्याने शुभंकरोती किंवा सकाळी आंघोळ केल्यावर वा संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी देवासमोर हात जोडणे वगैरे प्रकार कधी केलेच नाहीत. मला तर तेव्हा असेही वाटायचे की हे आपल्यात थोडी करतात, या तर ब्राह्मण लोकांच्या प्रथा झाल्या. पण हा, जुन्या चाळीत कॉमन पॅसेजमधील लाईट लागल्यावर तिला नमस्कार करायचो. का ते माहीत नाही. सवय म्हणा वा संस्कार.

घरचे मात्र माझ्या अगदी उलट. धार्मिक आणि देवभक्त. बायको सुद्धा आता तशीच मिळाली आहे. पण हे मात्र एक चांगले झाले. कारण आस्तिक-नास्तिक वाद एका बाजूला ठेवले तरी लहान मुलांना संस्कार लावायला म्हणून त्यांना देवबाप्पावर श्रद्धा ठेवायला सांगणे आणि शुभंकरोती व प्रार्थनांची सवय लावणे हा उत्तम मार्ग !

१)माझ्या मते पाठांतराला विज्ञानाच्याच दृष्टीकोणातून बघितले पाहीजे. कारण लहानपणीच पाठांतराची सवय केल्याने मुलांच्या मेंदूची वाढ होत असतांनाच योग्य प्रकारे स्मृती(data storage capacity)तयार होणे व योग्य वेळी ते विचार करून लक्षात आणणे(instant data recall)ही खूप मोठी गरज आहे.

२)विज्ञान युगातही पाढे आणि गणिताची सुत्रे यांचे महत्व कायम असून कॅल्क्युलेटरचा वापर करण्या ऐवजी पाठांतरावर देखील तेवढाच भर दिला पाहीजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पंडीत विद्यासागर यांनी कै.हिंमतराव पाटील व्याख्यान मालेचे 24 वे सुत्र गुंफतांना केले. कै.हिंमतराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त नंदुरबार येथे शिवाजी नाट्य मंदिरात विज्ञान तंत्रज्ञान काल,आज,उद्या या विषयावर डॉ.विद्यासागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, जीवनात प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा संबंध येतो. त्याकडे विज्ञानाच्याच दृष्टीकोणातून बघितले पाहीजे. तरच मानवाच्या प्रगतीला उपकारक अशा गोष्टी त्यातून घेता येतील असेही ते म्हणाले. विज्ञान युगातही पाठांतराचे महत्व अधिक - डॉ.विद्यासागर

३)नमाजमध्ये कुरआनचे पठन करण्याची आज्ञा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरीच्या पहिल्या दिवसापासूनच दिली गेली होती. शेकडो सहाबा (सहकारी) नी संपूर्ण कुरआनचे आणि सर्व सहाबांनी कोणत्या ना कोणत्या भागाचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनकालातच पाठांतर केलेले होते. त्या वेळेपासून आजपर्यंत, संपूर्ण कुरआन पाठ करण्याचा आणि दरवर्षी रमजान महिन्यामधील तरावीहच्या नमाजमध्ये ते तोंडपाठ ऐकविण्याचा क्रम सार्या इस्लामी जगतात चालत आलेला आहे आणि प्रत्येक काळात लाखो हाफिज (संपूर्ण कुरान मुखोद्गत असलेले लोक) झालेले आहेत.

४)या वैज्ञानिक कारणासाठी प्रत्येकाने आपल्या लहान मुलांकडून योग्ये वेळेला योग्य ते पाठांतर करून घेणे गरजेचे आहे.

असंका's picture

27 Apr 2014 - 8:23 am | असंका

बाप रे!!

ह्या आपल्या नो कॉमेंट्स असतील तर येस कॉमेंट्स केव्हढ्या असतील!!

;-)

(अवांतराबद्दल क्षमस्व...!!)

मिपाकर नक्किच जेष्ठ झालेत :(

मिपा रॉक करत नाहिये ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट ठरतीय. असो वृध्दाश्रमाचा सराव होतोय हे ही नसे थोडके.

पाषाणभेद's picture

27 Apr 2014 - 2:25 am | पाषाणभेद

येथील रॉकर्स जेष्ठ झालेत अन काही कदाचीत निवृत्तही झाले असल्याने असे होत असावे.

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 1:36 am | तुमचा अभिषेक

सर्व जण मावणारा असाच एक झोपाळा माझ्या मामाच्या घरी होता. माझ्यासाठी तर तो एक अड्डाच होता. रात्री मी त्यावरून पडेल म्हणून मला त्यावर झोपू दिले जायचे नाही, मात्र मामाकडे गेल्यावर सकाळ संध्याकाळ चारही वेळचे खाणे आणि दिवसभरातील सारे बैठे खेळ त्या झोपाळ्यावरच चालायचे. जर झोपाळ्याला अटॅच टॉयलेट असते तर त्यासाठीही उठलो नसतो कधी एवढी क्रेझ होती त्या प्रकाराची. कारण मुंबईत हा प्रकार दुर्मिळच, कोणाकडे आजूबाजुला पण नव्हता. गंमत म्हणजे त्या झोपाळ्याच्या दोन बाजूला दोन छोटे टेबलफॅन ठेवले होते, जणू मध्ये आपण महाराजासारखे आणि दोन्ही बाजूंनी दासी हवा घालताहेत.

उत्कृष्ट विषय आणि उत्तम लेखन!

आपल्या जुन्या परंपरांचे पालन होणार की नाही माहित नाही परंतु किमान त्या अश्या प्रकारे लिहून जतन करून ठेवल्या पाहिजेत.

लहान असतांना आम्ही हे सारे स्त्रोत्र व बरेच श्लोक पठन तर करायचोच परंतु आमच्या छोट्याश्या गावात एक चांगली प्रथा होती ती म्हणजे भगवदगीतेचे अध्याय पाठांतराची! ५ वी ते ७च्या विद्यार्थ्यांसाठी १२ व १५ वा अध्याय तर ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी ९ व ११ वा अध्याय पाठ करावा लागत असे. आणि ऐतिहासिक व्यक्तींवरील पुस्तक बक्षीस म्हणून मिळत असे. आणि माझा तर दरवर्षी पाठांतरात व बक्षीस घेण्यातही सहभाग असायचाच.

मस्त. एकदम नॉस्टॅल्जिक झालो.
*GOOD* *THUMBS UP*