अंगठी अनामिकेत का ?

अक्शु's picture
अक्शु in जनातलं, मनातलं
17 Apr 2014 - 11:39 pm

विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत?
.
.
एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. .........
.
.
त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब.
.
.
त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक.
.
.
अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक.
.
.
मधले बोट म्हणजे आपण स्वत:
.
.
चौथे अनामिका...म्हणजे आपला जोडीदार,
.
.
तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये.
.
.
.
ही झाली गृहीतकं.आता पाहू या कुटुंबातील या घटकांशी आपली नाती कशी आहेत ती.
.
.
.
.
हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा.
.
.
मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा.आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील.
.
.
कारण आई-वडील काही जन्मभर लाभत नाहीत. कधी ना कधी ते आपल्याला सोडून जातात.
.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा.तीही उघडतील.कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं आहेत.स्वत:ची आयुष्यं आहेत.
.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा.
.
.
त्याही उघडतील.कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
.
.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा.
.
.
.
.
आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.ते सुखात आणि दु:खातही एकमेकांना साथ देतआआत

आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?

मुक्तक

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

18 Apr 2014 - 12:43 am | खटपट्या

हो व्हिडिओ पाहिलाय मी याचा.
बाकी अंगठी अनामिकेत का घालतात माहित नाही. मी तर लग्नात अंगठी वगैरे काही घातली नव्हती

शुचि's picture

18 Apr 2014 - 12:54 am | शुचि

अनामिकेचे माहीत नाही पण , जोडवीची वाट्टेल ती अंधश्रद्धाळू गृहीतके ऐकली आहेत. पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड

तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो.

कुछ भी!!!

स्वप्नांची राणी's picture

18 Apr 2014 - 2:49 am | स्वप्नांची राणी

>>> पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड >>> हे नक्कीच मिथक आहे, याचा मी 'जीताजागता सबुत'...!!

शुचि's picture

18 Apr 2014 - 5:02 am | शुचि

हाहाहा :)

प्रमोद देर्देकर's picture

18 Apr 2014 - 8:48 am | प्रमोद देर्देकर

मग पुरुषांनी पण घालायची ना जोडवी. म्हण्जे त्यांचाही मेंदू थंड राहील की. त्यांनाही गरज आहेच की.

तेच भिकबाळीचे/ कान टोचण्याचे .... अक्युपंक्चरशी म्हणे संबंध असतो.
कुछ भी!!!
पायात जोडवी घालतात तिचा म्हणे एक शीर असते तिच्यायोगे मेंदू थंड रहाण्याशी सबंध असतो :ड

भिकबाळी पुरुषांच्या उजव्या कानामध्ये टोचून घेण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे. पेशवाईच्या काळात त्याचे संदर्भ आढळतात. आणि त्यामुळे अ‍ॅक्युपंक्चर होणे- हे 'कुछ भी' नसून खरोखर मेन्दूला अधिक सतर्क ठेवण्यासाठी भिकबाळी वापरली जायची. पूर्वीच्या काळी शक्यतो ब्राह्मणच ही वापरत असत. शुद्ध सोन्यामध्ये विविध प्रकारची रत्ने, मोती, माणिक इ. वापरून भिकबाळी बनवली जात असे. त्याचप्रमाणे भिकबाळी वापरणे हे प्रतिष्ठेचेही मानले जाई. आजकाल काय कुणीही फॅशन म्हणून भिकबाळी वापरू शकतं....अनेक ठिकाणी कल्चर्ड मोती आणि स्टोन्स लटकवलेल्या भिकबाळ्या बघायला मिळतात. अर्थात या चापा'च्याही मिळतात. पण सोन्याची रया या तारेला नक्कीच येत नाही.
सोने आणि चांदी जितके अंगावर राहील.. तितके शरीराला चांगले असते. अर्थात सध्याच्या जमान्यात सोने-चांदी जास्त प्रमाणात अंगावर मिरवणे धोकादायकही आहे.
लहान मुलांनादेखील गुटी उगाळताना त्यात सोनेही उगाळले जाते. तसेच हिन्दु धर्मात- लहान मुलांचे कानही पहिल्यांदा टोचताना सोनेच वापरले जाते.

त्याचप्रमाणे स्त्रियांच्या पायात जी जोडवी असतात.. तिचाही खरोखर मेंदूशी संबंध असतो.. ती जोडवी चांदीची असतील.. तर अतिउत्तम!!!.. पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात मुख्यत्वेकरून जोडवी घतली जातात. आणि इतर बोटांत मासळ्या वगैरे असतात. डोक्याला थंडावा हवा असेल.. तर पाय, तळपाय शीतल राहणं म्हत्वाचं असतं. आणि चांदी ही थन्ड गुणधर्माची असते. म्हणून तर पायामध्ये चांदीचे पैंजण घालायची पद्धत आहे. लहान मुलांच्या पायातही चांदीचे किंवा तांब्याचे वाळे घालतात. लग्न झालेल्या स्त्रियांच्या शरीरात लग्नानंतर त्यांच्या शारीरिक बदलांमुळे अधिक उष्णता निर्माण होते.. त्यामुळे पैंजणांच्या बरोबरच जोडवीही घातली जातात.
अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी ठरवून दिलेल्या आहेत.. त्या पूर्णपणे सर्वांगीण अभ्यास करूनच. फक्त आपण त्या गोष्टी आणि त्या मागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याची गरज आहे. पूर्वीच्या स्त्रिया या सगळ्या चालीरीतींचं आणि दागिने घालण्याचेही पालन करायच्या. अर्थात सध्या काही नोकरदार महिलांना या सगळ्या गोष्टी फॉलो करायला वेळही नसतो. किन्वा या महिला त्यासाठी कम्फर्टेबल नसतात. पण त्यामुळे या दागिन्यांचं किन्वा ते घालण्यामागचं शास्त्रीय कारण व महत्व त्यामुळे कमी होत नाही.. हेही तितकंच खरं!!!!!!!

पिवळा डांबिस's picture

18 Apr 2014 - 1:07 am | पिवळा डांबिस

मिसळपाव वर स्वागत असो!!!

(एप्रिल २०१४ कोटा पूर्ण!)

अक्शु's picture

18 Apr 2014 - 9:19 am | अक्शु

@एप्रिल २०१४ कोटा पूर्ण!

हा काय नवीन लेखांचा कोटा का काय महिनेवारी ठरलेला?

आनन्दिता's picture

18 Apr 2014 - 4:34 am | आनन्दिता

चेपु वर वाचलंत का?? ब्वॉर्र !!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2014 - 6:10 am | अत्रुप्त आत्मा

@आत्ताच फेसबुकवर वाचलेला हा एक सुंदर संदेश.काही वेळा अगदी साध्या गोष्टींमधून कसले भारी अर्थ निघू शकतात ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला काय वाटते?>>> हे असं छान छान बरच काही "भावपूर्ण" असं सहज 'तयार' करता येत. त्यात काही विशेष अवघड नाही. अवघड आहे ते वापरता येणं!

शशिकांत ओक's picture

18 Apr 2014 - 9:56 am | शशिकांत ओक

मित्रा,
हे काय कोणीही करेल. सोप्प आहे. अहो, एखादे नमुन्या दाखल करून पेश करा. वापरून पाहायला कसे जमवावे ते मिपाकरांच्या वर सोपवा. ही विनंती!

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2014 - 8:01 am | आनंदी गोपाळ

आईबापाला अंगठा का बरं भो?
अन स्वतःला 'फिंगर'?

अक्शु's picture

18 Apr 2014 - 9:24 am | अक्शु

अंगठा असेल तरच इतर बोटांच काम व्यवस्थित चालत म्हणून

अमोल मेंढे's picture

18 Apr 2014 - 5:01 pm | अमोल मेंढे

ती गडबडा लोळणारी स्मायली कशी टाकतात हो?

बॅटमॅन's picture

18 Apr 2014 - 5:03 pm | बॅटमॅन

आधी=मग)मग) हे सर्व विथौट स्पेस टाकायचे.

अमोल मेंढे's picture

18 Apr 2014 - 5:16 pm | अमोल मेंढे

ती गडबडा लोळणारी स्मायली कशी टाकतात हो?

माझ्या अनामिका होतात बाजुला.
मय नई हुं। :))

इरसाल's picture

18 Apr 2014 - 9:06 am | इरसाल

अक्शय्चं काही खर नाही.

पुष्करिणी's picture

18 Apr 2014 - 11:00 am | पुष्करिणी

माझ्यापण, अगदी विनासायास :)

सूड's picture

18 Apr 2014 - 2:10 pm | सूड

माझ्यापण माझ्यापण !!

इरसाल's picture

18 Apr 2014 - 2:34 pm | इरसाल

@ पुष्करिणी आणी सुड तुम्हाकडे कोणता अक्षय आहे ? ;)

>>पुष्करिणी आणी सुड तुम्हाकडे कोणता अक्षय आहे ?

तुमच्या इतकंच इरसाल उत्तर होतं, पण म्हणलं प्रत्येक धाग्यावर जीभेला धार लावून आल्यागत लिहीलं तर बरं दिसायचं नाही.

प्रमोद देर्देकर's picture

18 Apr 2014 - 8:52 am | प्रमोद देर्देकर

तुम्ही रोज कि नै संध्यानंद वाचत जा. तिथे असल्या असंख साध्या-साध्या, सहज गोष्टींना खुप महत्व देवुन, छापौन आणतात.

अक्शु's picture

18 Apr 2014 - 9:26 am | अक्शु

ते वर्तमानपत्र अजून चालू आहे का?
मला वाटलं बंद झालं असेल.

भाते's picture

18 Apr 2014 - 11:31 am | भाते

गाडीत रोज किमान एकतरी संध्यानंद असतोच कोणाकडेतरी. रेल्वेचा प्रवास सुसह्य करण्यासाठी छान टीपी आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2014 - 1:35 pm | टवाळ कार्टा

मुंबै संध्या अजुन चालु आहे का? ;)

इरसाल's picture

18 Apr 2014 - 9:11 am | इरसाल

आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत
आश्चर्य वाटले नाही कारण माझ्या अनामिका वेगळ्या होत आहेत.
कदाचित बायको आता ८-१० दिवसासाठी माहेरी जात आहे म्हणुन असावे. ती परत आली की पुन्हा वेगळ्या होणार नाहीत असे वाटते.

विनोदाचा भाग सोडला तर जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ?
किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ?

अक्शु's picture

18 Apr 2014 - 9:31 am | अक्शु

@जे लिव-इन रिलेशन मधे रहात असतील त्यांच्या अनामिका वेगळ्या होतील काय ?
किंवा ज्यांचे विबासं आहेत त्यांचे कसें ?

त्यांनी अंगठ्या घालून नात्याची सुरुवात केलेली नसते.त्यामुळे वेगळ्या झाल्या अनामिका तरी काही फरक पडत नाही.

रमेश आठवले's picture

18 Apr 2014 - 9:31 am | रमेश आठवले

पुरा कविनाम गणना प्रसंगे
कनिष्टीका धिष्टीत कालिदास:
अद्यापि तत्तुल्य कवे: अभवत
अनामिका सार्थवती बभूव

आपण नेहमी अंक मोजावयाची सुरुवात करंगळी (कनिष्टीका) पासून करतो. या पद्धतीवर आधारित वरील सुभाषित आहे आणि कालिदास हा सर्वात थोर कवि असल्याचे दाखवले आहे.

'पूर्वी कवींची गणना करायला सुरुवात केल्यावर करंगळी वर पहिले नाव कालिदासाचे घेतले गेले. त्यानंतर पूढच्या बोटावर नाव घेण्यासाठी कालिदासाच्या तोडीचा कोणी कवि आजपर्यंत न सापडल्यामुळे त्या बोटाचे नाव अनामिका असे पडले.'

अक्शु's picture

18 Apr 2014 - 9:35 am | अक्शु

बहुतेक अंगठ्याजवळ असलेल्या बोटाला तर्जनी म्हणतात.त्याबद्दल काही माहिती आहे का?

अनामिकेतील शीर/ वाहिनी थेट हृदयापर्यंत जाते
आपल्या हृदयात सदैव आपल्या जीवनसाथिचे प्रेम असावे म्हणून अनामिकेत अंगठी घालतात
महितीचा स्त्रोत : DDLJ picture मधील संवाद !

चाणक्य's picture

18 Apr 2014 - 11:21 am | चाणक्य

स्त्रोत वाचून भडभडून आलं. हृदय बंद पडायची वेळ आली होती पण अनामिका दाबून दाबून रक्तपुरवठा वाढवला हृदयाचा.

बॅटमॅन's picture

18 Apr 2014 - 12:59 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

अजया's picture

18 Apr 2014 - 2:03 pm | अजया

=))

पुणे तिथे काय उणे's picture

18 Apr 2014 - 3:02 pm | पुणे तिथे काय उणे

जबहरी!!!):)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2014 - 6:48 pm | अत्रुप्त आत्मा

@पण अनामिका दाबून दाबून रक्तपुरवठा वाढवला हृदयाचा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif

पोटे's picture

19 Apr 2014 - 9:06 am | पोटे

बरोबर आहे ते .. हृदयामधून मुख्य धमनी बाहेर पडते आणि तिला फाटे फुटत जातात .. पण अनामिकेला जाणारी वाहिनी ही त्या मुख्य धमनीचे डायरेक्ट कंटीन्युएशन असते. असे आम्हाला मेडिकल कालिजात सांगितले होते.

आणि हो, अनामिका दाबून हृदयाचा रक्तपुरवठा वाढत नाही, हे म्हणजे नळाच्या आशिर्वादाने पाऊस पडण्याचा प्रकार होईल. :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Apr 2014 - 10:53 am | प्रभाकर पेठकर

>>>> पण त्या वेगळ्या होत नाहीत.कारण जोडीदार,म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.

आश्चर्य आहे. अंगठ्या घालणार्‍यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण पाहता हे कांही खरं वाटत नाही.

सुनील's picture

18 Apr 2014 - 1:12 pm | सुनील

खरे म्हणजे अंगठ्यात घालतात ती अंगठी, अशी साधी, सरळ, सोपी व्याख्या आहे. ही अनामिका कुठून आली मध्येच?

;)

(अंगठीनिरक्षर) सुनील

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2014 - 1:38 pm | टवाळ कार्टा

शाळेत दुसरीमध्ये असताना वर्ग्मैत्रीणीने हे सगळ्यांना सांगुन भाव खाल्लेला आठवतोय ...कैच्याकै लॉजिक

मुक्त विहारि's picture

18 Apr 2014 - 2:05 pm | मुक्त विहारि

धन्यवाद.

भीडस्त's picture

18 Apr 2014 - 2:43 pm | भीडस्त

छान माहिती आहेfingerring विषयी....

अस्मादिकांनी
सर्व letters व्यवस्थित टंकून
कोटी करायचा मोह टाळलेला आहे.

बॅटमॅन's picture

18 Apr 2014 - 2:49 pm | बॅटमॅन

सर्व letters व्यवस्थित टंकून
कोटी करायचा मोह टाळलेला आहे.

नाव भीडस्त पण कमेंट जबरदस्त ;)

भीडस्त's picture

18 Apr 2014 - 4:40 pm | भीडस्त

बहुभाषाकोविद दस्तुरखुद्द रा.रा.श्री बॅटमॅन यांसकडून वाखाणनी पावल्याने अंगावर मूठभर मांस चढले असे...

त्याच्यानी

आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा...

आमच्याकं संकष्टी नस्ति आन संकष्ट चतुर्थी तं कव्हायबि नास्ति. तव्हा सुदरायचं सांगशान तं आम्हि आयकत नस्तो ओ ;-) ;-) ;-)

भाषाप्रेमी(मावळी)भ्यिडिस्त

बॅटमॅन's picture

18 Apr 2014 - 5:00 pm | बॅटमॅन

आज सवसान्च्याला संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावं द्वोन मोदक ज्येदाच मुरथळणार पघा...

ऐला, नक्की मोदकच मुर्गळणार आहात की दुसरे काही ;) वशाट- टु बी स्पेषिफिक.

तसेही वशाटाचं सारण भरलेले मोदक मिळतातच म्हणा चायनीजवाल्यांकडं ;)

भीडस्त's picture

18 Apr 2014 - 5:35 pm | भीडस्त

खारयातले दोन दोन बाऊ खाऊ....

सातों दिन भगवानके क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक भूखा रहे फकीर

-- हा तकिया कलम असणारा काफिर फ़क़ीर

बॅटमॅन's picture

18 Apr 2014 - 5:45 pm | बॅटमॅन

अवश्य!

व्याकरण आणि शुद्ध लेखन आवडले.

लेख चान चान!

भीडस्त's picture

18 Apr 2014 - 4:48 pm | भीडस्त

व्याकरण आणि शुद्ध लेखन आवडले

शालजोडीतला नसावा असं वाटतंय....
;-);-)

सूड's picture

18 Apr 2014 - 4:56 pm | सूड

>>प्य्यारेराया??

=))))

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Apr 2014 - 5:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्यारेराया???

प्यारेराया वरुन खालील तीन गाणी आठवली,

नको प्यारेराया अंत अता पाहु
व्याकरण हे सर्वथा पाहु नये,

भीडस्त रावांनी मजे मधे लिहीले
सिरीयसली त्यास घेउ नये

दुसर गाण,

सुध्दलेखन कधी का कुनाच चुकल, दोश न द्यावा फुका
प्यारेराया मला टेंपोत बसवु नका

किंवा तिसर
मिपा येतय बहरात भावड्या, नका शोधु डोळ्यातल कूसू,
प्यारे राया चला टेंपो मधी बसू

अशी गाणी आठवली

भीडस्त's picture

18 Apr 2014 - 6:10 pm | भीडस्त

पैजारबोआ
लेखणी सिद्धहस्त आहे अगदी....

मिपाचे 'गदिमा'ही खिताबत आपणास बहाल व्हायला काही प्रत्यवाय नसावा.
:-D :-D :-D

भीडस्त's picture

18 Apr 2014 - 5:41 pm | भीडस्त

प्यारे चालतंय

अन
राया का चालंना
;-) ;-) ;-)

धन्या's picture

18 Apr 2014 - 6:05 pm | धन्या

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही.

प्यारे१'s picture

18 Apr 2014 - 6:29 pm | प्यारे१

भीडस्त , आता नाव बदलाच. ;)
आणि राया म्हटल्याबद्दल नेमकं 'काय' म्हणावं ह्या संभ्रमात आहोत.

पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू!

भीडस्त's picture

19 Apr 2014 - 12:55 am | भीडस्त

राया म्हणजे राजा असतंय ना राव..

रामराया,देवराया आठवा की जरा ;-)

दाते कर्वे शब्दकोष पृष्ठ क्रमांक २६२०
राया-पु. डौलानें बोलतांना फांकडे, फंदी, अफीणबाज इ॰ कांनीं स्वत:स लावलेली ऐश्वर्याची व वैभवाची पदवी. [सं. राज्

तसेच
मोल्सवर्थ शब्दकोष पृष्ठ क्रमांक ६९३
राया [ rāyā ] m (राय King.) A title of majesty or grandeur, assumed by blades, swells, opium-eaters &c. in speaking pompously
हे नजरेत राहूद्या.

लयीच हूलझपट कराया लावली मित्रा तुम्ह्या. :-D :-D

भीडस्त's picture

19 Apr 2014 - 1:03 am | भीडस्त

छिद्रान्वेष आजच्यापुरता पुरे करावा असं वाटल्याने

पैजारबुवांना एक मस्तानी आमच्यातर्फे लागू

हे दुर्लक्षिले आहे. ;-) ;-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2014 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार

नका हे नवं ओझ आमच्यावर लादू.

तरुण पणी आम्ही बाजीरावा सारखे दिसत होतो खरे, पण तेव्हा कोणी मस्तानी दिली नाही.

आता या वयात घरी काशीबाई आहेत तेवढंच पुरे वाटत.

फार दगदग केली तरी गुढगे दुखतात हो आजकाल. मस्तानी वगेरे तुमच्या सारख्या तरुणांना ठिक आहे.

सध्या आम्ही आलं घातलेल्या कपभर चहातच आनंद शोधतो.

पर्दापणातच हाफ शेंच्युरी माराणार्या अक्शु भौ चे हार्दिक अभिनंदन . चेपु च्या पोस्टला प्रतिसाद देणार्या मिपाकरांचे जाहिर आभार .

शुभेच्छुक-जेपी आणी समस्त 'मी पयला क्लब' सदस्य.

अक्शु's picture

18 Apr 2014 - 6:57 pm | अक्शु

धन्यवाद जेपी भौ. आमाला बी सामील करून घ्या की तुमच्या 'मी पयला' क्लबात :-))

मदनबाण's picture

18 Apr 2014 - 6:42 pm | मदनबाण

अंगठी... अनामिका इं वाचुन उगाच मला माझाच हिरा है सदा के लिये... हा धागा आठवला.
बाकी चालु द्या... ;)

अक्शु's picture

18 Apr 2014 - 6:51 pm | अक्शु

छायाचित्रे सुंदर आली आहेत.

मदनबाण's picture

18 Apr 2014 - 11:21 pm | मदनबाण

धन्यवाद.

लंबूटांग's picture

19 Apr 2014 - 1:53 am | लंबूटांग

असे कळले की पाश्च्यात्यांमधे अंगठी डाव्या हातात घालण्याचे प्रॅक्टिकल कारण म्हणजे लोक उजव्या हाताचा वापर जास्ती करत असल्याने (डावखुरे अपवाद वगळता) त्या मौल्यवान धातू/ खड्याची झीज कमी व्हावी/ सहज चरे पडू नयेत. आता त्यातही कमीत कमी वापर करंगळीचा केला जातो पण करंगळी फारच छोटी असल्याने त्या अंगठीवर कलाकुसर करण्यास फारच कमी वाव राहतो म्हणून मग अनामिका.

आता असाच प्रॅक्टिकल विचार करता भारतात डाव्या हातात न घालण्याचे कारण म्हणजे डावा हात = धुता हात हे असावे बहुधा.